Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मग वर नीधप नी जस सांगीतल आहे
मग वर नीधप नी जस सांगीतल आहे त्याप्रमाणे मला ४ वेळा केस धुवावे लागतील का?<<
कंपलसरी नाहीये. माझे केस पातळ आणि तेलकट आहेत त्यामुळे तेल जराही राह्यले तर विचित्र दिसते. कुरळ्या केसांच्यात थोडे तेल खपून जाते.
Thanks नीधप ते जास्वंद जेल
Thanks नीधप
ते जास्वंद जेल डोक्याला अणि केसांना लावल्या वर केस धुणे गरजेच नाही ना
माफ करा हं मी आधी हे कधी वापरलं नाही ना म्हणुण असे हे सर्व प्रश्न
तुम्ही जरा आधीच्या पोस्टस पण
तुम्ही जरा आधीच्या पोस्टस पण वाचत चला.
मला आज माझ्या मुलीचा १ केस
मला आज माझ्या मुलीचा १ केस पांढरा दिसला. ती फक्त ४ वर्षांची आहे. त्यामुळे मला खुप टेन्शन आले आहे.
काय कारण असु शकते? आणि अजुन होउ नये म्हणुन मी काय काळजी घेउ? खाण्यात काय कमी जास्त करु?
तिच्या डॉक्टरांना विचारा.
तिच्या डॉक्टरांना विचारा.
johnson baby shampoo केसासाठी
johnson baby shampoo केसासाठी चागला आहे. कोन्डा जातो. mild असल्यामुले केसाना अपाय होत नाहि Try karun bagha...Oil सगळे जाते.
johnson baby shampoo केसासाठी
johnson baby shampoo केसासाठी चागला आहे. कोन्डा जातो. mild असल्यामुले केसाना अपाय होत नाहि Try karun bagha...Oil सगळे जाते.
sorry for spelling mistakes....
इथे डॉक्टर ला काय सांगू ते
इथे डॉक्टर ला काय सांगू ते कळत नाही आणि खाण्याच्या बाबतीत ते नीट सांगू शकणार नाहीत म्हणून इथे विचारले.
मी बेबी शांपू च वापरते. तिला ऑलिव्ह ऑइल लावते मी केसांना. पण रोज नाही लावत. तर रोज लावलेच पाहिजे का? रोज ऑलिव्ह ऑइल लावणे चांगले आहे का?
वर उल्लेखलेले उर्जिता जैनचे
वर उल्लेखलेले उर्जिता जैनचे जास्वंद जेल वापरायला सुरवात करा. केस अकाली पांढरे होत असतील तर फायदा होईल असे त्याच्या इंट्रोमध्ये लिहिलेय.
http://www.agricultureinformation.com/mag/?p=1264
actually johnson baby shampoo
actually johnson baby shampoo मोठया साठी पण चान्गला आहे. मी स्वतहा तोच वापरते.
शांपू म्हणजे डिटरजंट्च. थोडा
शांपू म्हणजे डिटरजंट्च. थोडा माइल्ड. त्यामुळे तो केसातील नैसर्गिक तेल काढून टाकतो. जगात एक विदाउट शांपू चळवळ सुरू आहे. ते लोक नैसर्गिक पदार्थांनी केस साफ करा( शिकाकाई+ रीठा) असे म्हणतात. पहिले काही आठवडे विचित्र वाट्ते पण मग केस एकदम सुन्दर होतात असे वाचले.
रच्याकने माझे केस पांढरेच आहेत. मी काळे करते. पण लोरीअल चा ( बिकॉज यू आर वर्थ इट ) डाय महाग व बेकार आहे. त्याने १००% कवरेज नाही व लगेच केस पांढरे दिसतात दोन तीन दिवसात. आजिबात पैसे वाया घालवू नका. त्यापेक्षा रेव्लॉन ठीक आहे. ब्राउन व गोल्ड हायलाइट करून बघूका असे उच्चारून दाखिवल्यावर घरी मुक्ताफळे ऐकायला मिळाली त्यामुळे सध्या काळ्यावरच समाधान.
>>>>इथे डॉक्टर ला काय सांगू
>>>>इथे डॉक्टर ला काय सांगू ते कळत नाही आणि खाण्याच्या बाबतीत ते नीट सांगू शकणार नाहीत
डॉक्टरांना, "मुलीला पांढरा केस आहे डोक्यात" हेच सांगावं लागणार. जपानातले डॉक्टर्स खाण्याच्या बाबतीत नीट सांगू शकणार नाही यात तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही. आपले आहार वेगवेगळ्या पध्दतीचे असले तरी सर्वशाधारणतः 'योग्य आहार' काय असावा याबद्दल डॉक्टर सांगू शकतात. लहान मुलांमधे पांढर्या केसांचं कारण Vitamin B12 ची कमी (व्हेजिटेरियन खाणार्या मुलांमधे जास्त प्रमाणात आढळून येते), त्वचेचा काही प्रॉब्लेम, थायरॉइड प्रॉब्लेम किंवा अनुवंषिकता असू शकते एवढं माहिती आहे. योग्य तपासण्या करून डॉक्टर व्हिटॅमिन सप्लिमेंट किंवा आहारात बदल याबद्दल नक्कीच सांगू शकतील. काळजी करू नका. डॉक्टरांना दाखवा.
मला काल मॅट्रिक्स बायोलेज
मला काल मॅट्रिक्स बायोलेज शँपू (१०% डिस्काऊंट) आणि सीरम (१५% डिस्काऊंट) माटुंगा स्टेशनच्या बाहेरील मंडईतल्या होलसेलच्या दुकानात मिळाले. अजून बर्याच चांगल्या ब्रँड्सची कॉस्मेटिक्स डिस्काऊंटवर आहेत.
आठ्वड्यातुन किमान एकदा
आठ्वड्यातुन किमान एकदा नारळाच्या दुधात कचुरसुगंधी घालून उकळवावे व थोडेसे कोमट असताना केसांना लावून शक्य तेवढे मुळात जिरवावे............साधारण अर्धातास राहू द्यावे व नंतर उर्जिता जैन यांच्या केशिका या उत्पादनाने केस स्वच्छ धुवावेत केस पांढरे होण्याचे प्रमाण सततच्या वापराने नक्कीच कमी होते व केस मुलायम होउन चमकदार देखिल होतात.....जैन यांचे डोनाकेअर हे उत्पादन देखिल उत्तम आहे .
निर्मयी! तुझ्या लेकीसाठी हा उपाय जरुर कर तसेच खाण्यात शक्य असल्यास ऑलिव्ह ऑइलचा वापर सुरु कर.
पहिल्या पानापासून प्रत्येक
पहिल्या पानापासून प्रत्येक पोस्ट वाचून काढली तरी शंका आहेतच म्हणून विचारत आहे.
माझा मुलगा साडे-तीन वर्षांचा आहे. त्याला डोक्यात प्रचंड कोंडा आहे. कोंड्यामुळे खूप खाजही सुटते त्याच्या डोक्यात. उन्हाळ्यात किंचित कमी झाल्यासारखा वाटतो पण तरी वर्षभर असतोच. पहिल्यांदा आठवड्यातून दोनदा हेड अँड शोल्डर्स वापरुन पाहिला. फरक वाटला नाही म्हणून डॉक्टरांना विचारले. त्यांनी tar based -Neutrogena t-gel वापरायला सांगितले. एक दिवसाआड लावा म्हणून सांगितले. तीन आठवडे करुनही काही फायदा नाही. आता त्यांनी Selsun Blue वापरायला सांगितला आहे. गेले एक आठवडा वापरुन ढिम्म फरक नाहीये. एवढ्या लहान मुलाला इतक्या सातत्याने केमिकल शँपू वापरायला फार टेंशन येतं आहे. घरगुती उपाय करायचा तर कशा पद्धतीने करायचा ते प्लीज सविस्तर सांगा.
त्याची त्वचा एकंदरित कोरडी आहे. प्रकॄती उष्णच असावी पण तरीही त्याला वारंवार सर्दी-खोकला होतो.
लिंबू कोरड्या त्वचेला चांगले नाही असे वाचले. नारळाचे दूध काढून लावावे का ?
सध्या त्याला जॉन्सन बेबी ऑईल वापरत आहे. दुसरे कुठले तेल वापरता येईल ? कधी लावावे ? किती वेळा लावावे ?
त्याच्यासाठी एरवी लावायला म्हणून बर्टस बी कंपनीचे प्रॉडक्टस आणते. त्यात केमिकल्स नसतात. पण सध्या ह्या शँपूजचा इतका मारा चाललाय की तो लावलाच जात नाही !
ऊर्मी, कापूर वापरून पहा...
ऊर्मी,
कापूर वापरून पहा... छोटया कापराची वडी हातावर घेऊन, चुरडून, आंघोळीआधी त्याच्या ओल्या केसांना लावा आणि ५-१० मि धुवून टाका... कोंडा लगेच कमी होतो
माझ्या भाचीचा असा प्रॉबलेम
माझ्या भाचीचा असा प्रॉबलेम एकदा झालेला.
थंडीत तेल मस्त गरम कर मेथी टाकून. चांगला मसाज करायचा. व २ तासात धूवून केस कोरडे करायचे.
हे सर्व स़काळी १० नंतर वगैरे(जेव्हा उन्हं वर आलेली असतात ,थंडी कमी असते).
मुलाची कॉबो प्रवृती दिसतेय. सर्दी खोकला पण स्किन कोरडी तेव्हा डोक्यावर तेल ज्यास्त ठेवू नकोस.
जर कोंडा ड्राय मुळे होत असेल तर हा उपाय.
थोडे राईचे तेल + खोबरेल तेल + सुके मेथी दाणे रात्रभर तेलातच भिजत ठेव.
मग सकाळी गरम कर तेल व कोमट असतानाच डोके घासून मसाज दे व एक कपडा बांध.
मग अंघोळ झाली की कोरडे कर.
धुवायला वाटीकाचे लहान मुलांचे शांपू चांगले आहेत. बहिणीने तेव्हा हिमालयाचे आयुर्वेदिक शांपू ऑनलाईन मागवले शेवटी(महाग पडले पण ..)
आठवड्यात दोनदा कर. किंवा जसा जसा कोंडा असेल त्यावर.
कोरफड मिळते व्होल फूडस मध्ये ,तिचा गर बेस्ट.
बरोबर.कापोरचा उपाय खरोखर
बरोबर.कापोरचा उपाय खरोखर मस्त. त्यापेक्षा कापूरचा धूर द्यायचा केस धुतल्यावर्(आठवतो,, देवदास मधला सीन. पुर्वी असेच करत. धूर देवून केस सुकवत.)
>>पुर्वी असेच करत. धूर देवून
>>पुर्वी असेच करत. धूर देवून केस सुकवत.
खरय.. अजूनही बर्याच ठिकाणी हे वापरतात.... especially प्रसूतीनंतर.. सगळ्या अंगालाच धुरी देतात.. यामध्ये कापूर, नागरमोथा, चंदन पावडर, शेपवा-वावडींग इ. इ असते
मन-कवडा आणि मनःस्विनी धन्यवाद
मन-कवडा आणि मनःस्विनी धन्यवाद
कापराचा धूर द्यायचा म्हणजे नक्की काय करायचे ? पण कापूरवडी चुरडून लावून बघते.
कोरफड गराचा उपायही चांगला वाटतोय. पण कापूर, कोरफड थंड पडेल का ?
इथे आयुर्वेदिक उपचार मिळत नाहीत पण त्यानेच शेवटी फरक पडेल असं वाटतं आहे. सेल्सन ब्लूने फरक पडला नाही तर डर्मिटॉलॉजिस्टकडे घेऊन जा म्हणजे ते स्टिरॉईड क्रीम वगैरे लिहून देतील असे पेडीने सांगितले. ते करणे शक्यतो टाळत आहोत.
कोरफड गर लावून मग दहा मिनिटांनी केस धुवायचे का ? मागच्या पानावर आहे कुठेतरी ती माहिती पण आता सतरा पानं परत पालथी घालण्याचा उत्साह नाहीये.
त्याला सर्दी आहे तर तेल,
त्याला सर्दी आहे तर तेल, कुठलाही गर लावून ठेवू नकोस ज्यास्त वेळ. धुवायचा लगेच.
कोरफड थंड, कापूर उष्ण..म्हणून
कोरफड थंड, कापूर उष्ण..म्हणून छोटीच १ वडी लाव..
>>सर्दी आहे तर तेल, कुठलाही गर लावून ठेवू नकोस ज्यास्त वेळ
बरोबर आहे...
ऊर्जिता जैन ह्यांचे प्रॉडक्टस
ऊर्जिता जैन ह्यांचे प्रॉडक्टस अमेरीकेत कुठे मिळतात का?
उर्मी. ट्रेडर जोस मधे तुला
उर्मी. ट्रेडर जोस मधे तुला अलोवेरा जेल [९९%प्युअर असे लिहिले आहे ]मिळेल..मी केस गळण्यावर आणि चेहर्यावर लावायला आणली आहे..तेलासारखे लावले तरी चालते..चिपचिपी अजिबात नाही..फायदेकारक आहे..
कोंड्यासाठी---भिमसेनी कापुर बारीक वाटुन खोबरेल तेलात/तिळ तेलात मिक्स करायचा.. हे तेल रोज लावायचे..कोंडा पुर्ण जाईल..पुन्हा होणार नाही..जर भिमसेनी कापुर नाही मिळाला तर साधा कापुर ही चालेल..
माझ्या लेकाला खूप कोंडा होता
माझ्या लेकाला खूप कोंडा होता एक-सव्व वर्ष. मी त्याला आंघोळीच्या अर्धा तास आधी लाइट तेलाने (बेबी ऑइल) हलक्या हाताने मसाज करायचे. १०-१५ मिन. झाले की बेबी हेअर ब्रशने विंचरुन पुन्हा हलका मसाज आणि आंघोळीला घ्यायच्या आधी पुन्हा हेअर ब्रशने विचरणे जेणेकरुन स्काल्पला चिकटलेला कोंडा निघून येइल. आंघोळीसाठी युसिरिन टिअर फ्री वापरायचे. तेल सगळे निघून गेले पाहिजे. झोपायच्या आधी किंवा संध्याकाळी बेबी लोशन लावायचे आणि हेअर ब्रशने मसाज करुन हातानेच झटकून टाकायचे कोंडा. अर्थात त्याला केस खूप कमी होते. तू तुझ्या लेकाचे बारीक कापून आण हवं तर. तो ब्रश प्रत्येक वेळी वापरला की स्वच्छ धुवून टाकायचा.
कोंडा होत असेल तर तेल लावू नका म्हणतात. पण ती त्वचा कोरडी तर कोरडीच रहाते. रोज सकाळी अर्धा तास तेल आणि रात्री मॉइश्चरायझर लावल्याने त्याची स्काल्प आता नॉर्मल आहे. परत नाही कोंडा झाला.
धन्यवाद सुलेखा आणि सिंडी
धन्यवाद सुलेखा आणि सिंडी
भीमसेनी कापूर कसा ओळखायचा ? इथे मिळाला तरी कदाचित ह्याच नावाने मिळणार नाही म्हणून विचारले.
सिंडे, केस कापले की कोंडा कमी होतो खरा. तेल लावले नाही तर त्याला जास्त खाज सुटते आणि कोंडा दिसतोही खूप. त्यामुळे केसाच्या मुळाशी थोडे तरी तेल लावावेच लागते. बेबी लोशन केसांत लावायचे ? ते पण जॉन्सनचे होते का ?
कोरफड जेल आणि कापूर दोन्ही आणते आज उद्यात आणि युद्धपातळीवर उपाय सुरु करते. तेलात कापूर घालून लावणे, कोरफड गर आणि बेबी लोशन हे सगळेच उपाय एका वेळी सुरु करण्यासारखे वाटत आहेत.
बेबी लोशन केसांत लावायचे ? ते
बेबी लोशन केसांत लावायचे ? ते पण जॉन्सनचे होते का ? >>>> हो.
कोरफड गर थंड असतो तेव्हा
कोरफड गर थंड असतो तेव्हा जपुन..
ऊर्मी, या लिंका
ऊर्मी, या लिंका बघः
http://www.babycenter.com/0_dandruff_1459138.bc
http://www.ehow.com/how_2139635_treat-dandruff-children.html
उर्मी. भिमसेनी
उर्मी.
भिमसेनी कापुर-नेहमीच्या कापरासारख्या चौकोनी लहान लहान वडया नसतात..मोठा तुकडा मिळेल..वास तिव्र असतो..सहज चुरला जातो..इंडियन स्टोर मधे मिळेल..पुजा-सामाना च्या जागी.[.न मिळाल्यास साधा चालेल..जास्त वापर..]
त्वचा कोरडी आहे त्यासाठी तिळाचे तेल आंघोळी आधी सर्वांगाला लावावे..डो़क्यालाही लावावे..
आंघोळीला साबण कधीतरी लावावा..कणीक्+दुध रोज लावावे..बेसनाने त्वचा रुक्ष होते....
कापुर मिश्रीत तेल आन्घोळीनंतर डोक्याला लाव...[बोटाचे एक पेर इतका तुकडा+ साधारण पाऊण वाटी तेल घे]
एलोवेरा रात्री तळ्हातावर तेलासारखी चोळुन लाव..
सर्दी साठी-सितोपलादी चुर्ण मधात कालवुन ३-४ वेळा १-१ टी-स्पुन दे..भुक व सर्दी दोन्ही वर गुणकारी आहे..
चमच्यात दुध्+हळ्द [अगदी पाव चमचा/त्यापेक्षा कमीपण चालेल] कालवुन दिली नियमीत तरी सर्दी होणार नाही..नाक गळणे लगेचच थांबेल..
Pages