टोक्यो 'आऊटडोअर्स' गटग पार पडलं!

Submitted by ऋयाम on 10 October, 2010 - 08:52
ठिकाण/पत्ता: 
शिंज्युकु, टोक्यो. -- > शिनागावा, टोक्यो.

कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.

हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.

२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.

३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )

स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)

शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.

* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.

अधिक माहितीसाठी, "watch this space!!!" Light 1

माहितीचा स्रोत: 
मायबोली, जपान बीबी.
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उस्साहात पडले हो\\\\

मी \पात्र नाहीये. मी ब्लॉगर आहे. लेखक नाही.

२०० णक्की Wink
त्या अमेरिकेतलेल्यांना सांगा. तुम्हीच नाही काही. आम्हीही आहोत रिक्कामटेकडॅ Light 1

केपीना विचारावं का, जपानात सुड कसा उगवावा?>>> Lol
ऋयामा, फुकुश्यु लाव कुंडीत. सोबत थोडे निखारे ठेव मग नीट फुट उगवेल. Happy

काय टीपी केलाय इथे. मि ट्रेन मधे बसुन वाचतेय. आणि गार सल्ला वाचुन इतक्या जोरात हसले कि लोकांना वाटतय काहितरि पेयप्राशनानाचा परिणाम आहे Rofl

हॅप्पी जर्नी आडो. Happy

काय हे, आडोताई तिकडुन निघाल्या.. उद्यावर गटग आलं तरी बाफ चवथ्या पानावर????? शोनाहो! Happy

अले. कोन म्हन्तंय आमाला त्वयंतेवक? आमी काइ त्वयंतेवक नाइ आए. तहेश ताव जला बोला तली..
ताय तालवलय या बायतांनी.. त्या... अवदल आए एतंदल.

माझ्याकडे कुणाचाच नाही .. पण तरी गटागटाने शुभेच्छा !
तृयाम - त वरून तुझा हत्ती झाला नाही म्हणजे मिळवले.

हो कळलाय. नाहीतर फोन करीनच तुला पोचले की.
महेशचा फोन नं माझ्याकडे नाही पण ऋयामकडे आहे आणि तुझ्याकडे ऋयामचा नंबर आहे, त्यामुळे नो पुरोबुरेमु Happy

आडोबाई सोलकर गटगला शुभेच्छा. भोंडल्याचे, पाटावरल्या हत्तींचे फोटो काढून आम्हांला पाठवायला विसरु नका. तुमचे फोटो बघून, इथून तिथून दिसणारं टोक्यो बघून नॉस्टॅल्जिक होऊन बाथरुमात जाऊन गुपचूप रडून घेईन. Proud

२०० Happy

२००+ Happy हिपीप..

त वरुन हत्ती नाही होउ देनार! Happy

काय अध्यात्म! रुमाल कमी पडतात Wink थेट काळजाला भिडतं आडोताईंचं गानं..
मी लहान अस्ताना त्यांच्या एल्प्या ऐकुनऐकुन रडलोय. भाँ..

सायो ऋयाम व सगळेच. Lol

नंद्या उद्या विकांत असल्याने घोटाघोटानी शुभेच्छा पण देता येतील रे. Proud

हो. हो येतीलच. किती बुरीनं ? > सायो ? माहितीये का.

बरोबर येतील नव्हे!?

सगळा इंतकाम मंजरी वहिणींकडे सोपवलाय.

>एल्प्या:
हो. म्युट करुन तासन्तास ऐकायचो.
आता गंजल्या त्या. एल्प्या.. Light 1

Pages