टोक्यो 'आऊटडोअर्स' गटग पार पडलं!

Submitted by ऋयाम on 10 October, 2010 - 08:52
ठिकाण/पत्ता: 
शिंज्युकु, टोक्यो. -- > शिनागावा, टोक्यो.

कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.

हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.

२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.

३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )

स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)

शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.

* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.

अधिक माहितीसाठी, "watch this space!!!" Light 1

माहितीचा स्रोत: 
मायबोली, जपान बीबी.
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वाधात सहभागी होणारी मंडळी
वेळः ३:००
सावली (१+१) (पुर्वाधाच्या यजमानिण बाई)
आडो (१)
आडोची मैत्रिण (१)
मंजिरी (१+१)
एम्बी (?)
कुसुमिता१२३ (?)

उत्तरार्धात सहभाग
सावली (१+१)
आडो (१)
आडोची मैत्रिण (१+१)
मंजिरी (१+१)
महेश (१)
ऋयाम (१)
एम्बी (?)
कुसुमिता१२३ (?)

ठिकाणः
शिनागावा : देवी धाबा
http://devi-group.com/news/?p=34

वेळः ६:०० (अंदाजे)
ड्रेसकोडः आवडीप्रमाणे पारंपारिक किंवा आधुनिक
(अत्याधुनिक नको : यजमानिण बाईंच्या हुक्मावरुन)
सोपवण्यात आलेली जबाबदारी :
सावली: कॅमेरा + खिरापत
मंजिरी : हातरुमाल + खिरापत
ऋयाम आणि महेश : वेळेत येणे
आडो: मैत्रिण आणि प्रवचन Happy

आडो मैत्रिणीच्या मुलाला काहीतरी गेम / पुस्तक बरोबर घेऊन यायला सांग. म्हणजे तो बोअर होणार नाही. माझ्याकडे गेम नाहीएत. पुस्तकं चिकार आहेत पण त्याच्या आवडिची असतील की नाही ते माहीत नाही.

फार गोंगाट करताय, मला तरी पत्त्यावरून देवी कॉर्नर आणि हे देवी धाबा सेमच वाटतय. असो कळेल लवकरच.

महेश कान बंद करुन घे बरं. डोळे उघडे ठेऊन वाच मात्र इथे Wink
त्याच मजल्यावर आहे देवी धाबा> अरेच्च्या हे माहितच नव्हते Happy
मंजिरी कॉल करशील का तिथे प्लिज?

तर माझ्या जपानभेटीची रुपरेषा खालीलप्रमाणे :

१५/१०/२०१० - भल्या पहाटे इंचॉन विमानतळाकडे रवाना. तिथून ११.२० च्या जालच्या (ऑपरेटेड बाय कोरियन एअर) विमानाने नरिताकडे प्रयाण. नरिताला पोचायची वेळ दुपारी १.३०. तिथून लिमोझिन घेऊन 'इकेबुकुरो' या गावाकडे. साधारण ४ वा. इकेबुकुरोला पोचेन. मग संध्याकाळी काय टी.पी. करायचा ते मनिषा (माझी मैत्रिण) ठरवेल.
१६/१०/२०१० - सकाळचं शेड्युल माहित नाही. दुपारी ३ वा. सावलीकडे भोंडल्याचा कार्यक्रम तिथून ६ वा. पुरुष मंडळींना भेटून ऑफिशियली माबो गटगला सुरुवात. रात्री 'देवी' ला एकत्र जेवण.
१७/१०/२०१० व १८/१०/२०१० - दोन दिवस मोकळे (खरेदी व भटकायला)
१९/१०/२०१० - सकाळ मोकळी. दुपारी १२.३०-१ च्या सुमारास इकेबुकुरोहून हनेदासाठी लिमोझिन किंवा ट्रेन घेईन. ४.३५ च्या अ‍ॅनाच्या विमानाने कोरियातील 'गिम्पो' विमानतळाकडे प्रयाण. सं. ६.५५ ला गिम्पोला उतरल्यावर ट्रेन घेऊन घरी परत.

सावली, अगं तुझ्याच पोस्टीत आहे की
<< same floor as devi india>> Uhoh
काय हे, तुच राइट करतेस आणि मग तुच फरगेट करतेस. हे राँग आहे!
फोन करुन बघते उद्या नक्की.

आडो, तुझं जवळचं स्टेशन नेरिमा आहे न? आपण ओओसाकी ला भेटुन एकत्र जाउ शकतो सावलीकडे. (मी इतके दिवस अगदी जवळ रहात होते नेरिमाच्या... आपण अजुन एखादं गटग पण करु शकलो असतो. पण Sad )

आडो तु हनेदाला येणार होतीस ना? नरिता झालं का आता?
मंजिरी ओओसाकीला भेटलात तर जे आर मधन एक्झीट करु नका. रिन्काई सेन आतमधेच आहे.
इकेबुकुरो वरुन खरतर डायरेक्ट ट्रेन आहे. शिनकिबाला जाणारी ट्रेन पकडली तर तीच ट्रेन ओओकीला रिन्काई होते.
इकेबुकुरो > शिन्जुकु > शिबुया > एबिसु> ओओसाकी >

आसाही आणि तसाही झोपणार आहे आता Happy
अरे पण तू एवढ्या उशीरा येणार आहेस मग मी लवकर येऊन काय करू ?
लगता है मुझे आया का रोल मिलनेवाला है Sad

शिनागावाच्या ताकानावा एक्झीट मधुन बाहेर पडून उजवी कडे चालत गेल्यावर मला वाटतं आधी देवी ढाबा लागतं..देवी कॉर्नर थोडस पुढे आहे बहुदा..

Pages