फोर्ट कॅनिंगाचा दरवाजा

Submitted by संकल्प द्रविड on 14 November, 2008 - 04:54

सिंगापुरात जुन्या शहराच्या जवळपास मध्यभागी 'फोर्ट कॅनिंग हिल' नावाची एक टेकडी आहे. सिंगापुराची पर्वतीच म्हणा ना! पर्वतीला जसा इतिहास, तसाच या टेकडीलाही. पर्वतीला जशी नानासाहेब पेशव्यांची समाधी तशी इथे 'राजा परमेश्वर' ऊर्फ 'इस्कंदर शाह' (इ.स. १३४४ - १४१४) या मलाक्क्याच्या पहिल्या सुलतानाची (आणि योगायोगाने सिंगापुराच्या शेवटच्या राजाची) कबर आहे. 'बुकित लारांगान' (मलय भाषेत बुकित = टेकडी, लारांगान = राखीव, निषिद्ध/इंग्रजीतल्या 'फर्बिडन' अशा अर्थी) नावाची ही टेकडी या इस्कंदर शाहाच्या काळापूर्वीपासून स्थानिक मलय राजांचं समाधिस्थान मानली जात होती.पुढे इ.स. १८१९ सालात सिंगापुरात आलेल्या स्टॅम्फर्ड रॅफल्स यानं या टेकडीवर स्वतःकरता एक बंगला बांधला. रॅफल्सानंतरच्या काळातही वसाहतीच्या अधिकार्‍यांची, गव्हर्नराची राहती घरं असल्याने या टेकडीला 'गव्हर्मेंट हिल' असं नाव पडलं. सिंगापूर बंदरावर लष्करी देखरेखीच्या दृष्टीने ही जागा मोक्याची असल्यामुळे पुढे इ.स. १८५९ साली ब्रिटिशांनी हिच्यावर हत्यारबंद किल्ला उभारायचं ठरवलं. याचसुमारास भारतात १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून ब्रिटिश सरकाराने स्वतः सत्ता हाती घेतली अन्‌ 'चार्ल्स जॉन कॅनिंग' याला भारताचा पहिला व्हाइसरॉय नेमले. ब्रिटिश प्रशासनाच्या दृष्टीने सिंगापूर त्याकाळी भारत खात्यातच गणले जाई. अर्थातच पहिला व्हाइसरॉय म्हणून नेमलेल्या कॅनिंगाच्या कार्यकक्षेत भारताबरोबरच सिंगापुराचाही समावेश होता. या नव्या व्हाइसरॉयाला खूष करण्यासाठी नव्याने बांधून झालेल्या किल्ल्यास फोर्ट कॅनिंग असं नाव देण्यात आलं.

पुढे मलय द्वीपकल्पातील ब्रिटिश वसाहतींमधलं सामरिक महत्त्वाचं ठाणं म्हणून फोर्ट कॅनिंगाने महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटिशांच्या आधुनिक सामरिक इतिहासातील ठसठसती जखम असलेल्या दुसर्‍या महायुद्धातल्या ब्रिटिश मलायाच्या पराभवाची परिणती ब्रिटिशांनी जपान्यांसमोर शरणागती स्वीकारण्यात इथेच झाली.

फोर्ट कॅनिंगावर आता ब्रिटिशांची दारुगोळ्याची कोठारं, बराकी, बंकर, थोडीशी तटबंदी आणि एक मोठं गॉथिक धाटणीचं गेट ही बांधकामं आहेत. आपल्या किल्ल्यांच्या तुलनेत अर्थातच चांगल्या, संरक्षित स्थितीत.

किल्ल्यावरच्या त्याच गॉथिक दरवाजाचं हे चित्र :
माध्यम : पेन

gate_fort_canning.jpg

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास... चित्र आणि बरोबरचा इतिहासही...
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

हायला ... फ आप तो बहोत बढिया कलाकार हो Happy

समहाऊ, यावेळेस मला चित्रापेक्षा दिलेली माहीतीच अधिक आवडली! इन्टरेस्टीन्ग! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मस्तच. चित्रही आणि माहितीही.

वा मस्तच आहे चित्र.

माहिती आणि चित्र दोन्ही छान.
दरवाज्याजवळची उजवीकडची भिंत किंचीत तिरपी काढली गेलीये त्यामुळे दरवाजा मागे कललेला वाटतोय. चित्र पेनने काढले असल्याने बहुदा खाडाखोडीला/दुरुस्तीला वाव नसेल.

मस्त. चित्र, माहिती दोन्ही..

फ मस्तच. तुझ्या चित्रातून सगळं सिंगापूर पहायला मिळणार तर.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

छान आहे. रुनीसारखं मलाही वाटलं. की ते बांधकामच तसं आहे का ?

    ***
    comfortably numb

    फ, मस्तचं आहे चित्र. सिंगापूरमधी माझे ९ वर्ष फुकट गेलेत Happy

    प्रोत्साहक आणि प्रामाणिक प्रतिसादांबद्दल धन्यवाद! (छे! अखेरच्या शब्दात माती केली .. अनुप्रास हुकला. Sad :फिदी:)
    रुनी, स्लार्टी: दरवाजाच्या दोन्ही बाजूंच्या भिंती वास्तवातच उभ्या प्रतलाशी तिरक्या आहेत. म्हणजे त्या दोन्ही भिंतीचा पाया दरवाजाच्या उंबर्‍यापासून काहीसा लांब सुरू होतो आणि त्यांच्या माथ्याच्या कडा दरवाजावरच्या भिंतीच्या प्रतलाकडे जवळ सरकत येतात. त्यामुळे वास्तवात जशी रचना आहे तशी चितारायचा परयत्न केलाय.
    मीनू, अगदी अगदी. माझ्या मनात तसाच डाव होता. Proud
    बी: सिंगापुरात काही फुकट आहे?! कुठे?? (कुठे गेलं तर प्यायला पाणीही कुणी विचारत नाही.. स्वत:च्या घरून किंवा विकत घेऊन प्यावं लागतं.) Proud

    -------------------------------------------
    हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

    मस्तच रे फ........... बोहोत बढीया!!!!!!! माहिती पण मस्त...
    तुला वेळ मिळाला की हिस्ट्री म्युझीयमला पण भेट दे .. खुप मस्त आहे ते..
    तिथे अशियन ड्रेप हा विभग आहे... माझी नौवरि साडी झळकते आहे एका मॉडेल वर....
    फिल्म वरचा विभगपण खुपच मस्त

    nice