अवघी विठाई माझी (७) - फेनेल बल्ब

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

fenel.jpg

शाळेच्या मधल्या सुट्टीतला आवडता खाऊ म्हणजे ओली बडीशेप. आणि
हॉटेलमधले जेवण झाल्यावर पुढ्यात आलेली बडीशेप म्हणजे, लहानपणी
बोनसच वाटायचा.
पण तरी फेनेल बल्ब आपल्याकडे फ़ारसा खाल्ला जात नाही. फ़नेल म्हणजे
बडीशेपेचा कांदा. पण हा कांदा जमिनीच्यावरच वाढतो.

fc.jpg

गुजराथ, राजस्थान पासून काश्मिर पर्यंत सगळीकडे याचे उत्पादन होते, पण
त्यांच्याकडेही जेवणात याचा वापर केलेला दिसत नाही.
या कांद्याचे आतले रुपडेही जवळ जवळ कांद्यासारखेच असते. पण कांद्यासारखा
हा रडवत नाही. याला ओल्या बडीशेपेचाच स्वाद असतो. पानांनाही हाच गंध
असतो.
हा सलादमधे कच्चाच वापरता येतो. कांद्याच्या जोडीनेही वापरता येतो.
उकडून, वा तेलात परतूनही वापरता येतो, पण जास्त शिजवला तर याचा
स्वाद खुपच कमी होतो. त्यामूळे जर शिजवायचा असेल तर अगदी थोडा वेळ
शिजवावा, आणि तेलात परतायचा असेल, तर बाकिचे जिन्नस परतून मग शेवटी
ह्याचे काप टाकावेत.

fd.jpg

शिजवून मग ब्रेडच्या चूर्‍यात हा बेक केला तर छान स्वाद येतो. मी याचा वापर
करुन मोरोक्कन पिझ्झा केला होता.

fb.jpg

याची कृति मी आधी लिहिली आहेच. हा पिझ्झा करताना, याचे सारण आतमधेच
घातलेले असते. कणकेत यीष्ट घालून ती फ़ूगल्यावर, फ़नेल, नट्स, मिरची, मनुका
यांचे परतून घेतलेले मिश्रण घालायचे. आवडीचे चीज किसून त्यात मिसळायचे,
आणि परत फ़ुगून आले, कि १५ ते २० मिनिटे बेक करायचे. तव्यातही हा प्रकार
सहज होतो.

या फेनेलचा उगम भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावर झाला असे मानतात. पण आता
जगभर हे आढळून येते. रेताड जमिनीत, समुद्र किनार्‍याजवळ याचे पिक चांगले
येते. आपल्याकडेही बडीशेप सहज उगवून येते (पानपट्टीच्या दुकानाजवळ अनेकदा
याची रोपे दिसतात.)
युरप आणि भूमध्यसमुद्राच्या परिसरात ही भाजी चांगलीच लोकप्रिय आहे. याची पानेही
जेवणात वापरता येतात. (पाने साधारण शेपूसारखीच दिसतात, पण त्यापेक्षा नाजूक
असतात.) माश्यांबरोबर याचा संयोग चांगला लागतो. मासे ग्रील करताना, ही पाने
व कांदेही वापरता येतात. ऑमलेट्मधेही हा कांदा व पाने वापरता येतात.
याचे शास्त्रीय नाव, वेनेकुलम वेल्गरे. यामधे अनेक खनिजे सुक्ष्म रुपात असतात.
याचा स्वाद भारतीय जीभेला सहज रुचण्यासारखा आहे.

विषय: 
प्रकार: 

छान माहिती दिलीत दिनेशदा. पहिल्यांदाच पाहीले फनेल. कच्च्या बडिशेपेची पानं मात्र भरपुर हाणलीत.

फनेल तब्येतीला थंड असे वाचलेय, खरे का ते माहित नाही. झाडे फारच देखणी वाटतायेत. शोभेसाठी कुंड्यात लावावीत अशी.
बाकी या पानांची भाजी होते का शेपुसारखी?

राम राम दिनेशदा. मी सकाळी वाचलं तेव्हा डोक्यात शंकेची पाल चुकचुकली मग नंतर एक दोन जणांनी त्याला दुजोरा दिल्यावर इथेच टाकू म्हंटलं. बडिशेप म्हणजे "फेनेल" (fennel) असा उच्चार होइल ना इंग्रजीत? Happy

छान माहिती आणि तो पिझ्झा तर मस्तच. त्याची कॄती मागे वाचली तेव्हाच आवडली होती Happy
मागे आणून पाहिला होता एकदा फेनल बल्ब. जास्त शिजवल्यामुळे बहुतेक फार सपक लागला आणि अजिबात आवडला नाही. आता परत आणून पाहते.

हो वैद्यबुवा, मराठीत या भाज्यांबद्दल लेखनच नसल्याने, मराठी उच्चार आणि प्रतिशब्द, याबद्दल खात्री नाही. भाग्यश्री या पानांचा शिजवल्यावर स्वाद टिकणार नाही. कच्ची पाने वापरता येतील.

दिनेशदा मी फक्त ज्याला वरती बडीशेप आलेल्या काड्या असतात तेच तुरे पाहिलेत आणि आणलेही होते. पण त्याच काय करायच हेही माहीत नव्हत. आम्ही फक्त त्याच्यावरची बडीशेप खाल्ली. त्या तुर्‍यांच काय करतात तेही सांगा. आणि हा कंद तर मी पहिलांदाच पाहते. खुप अफलातुन माहीती देता तुम्ही. चालू ठेवा.

मोरोक्कन पिज्जा तेव्हाच केलेला आणि घरी एकदम हिट्ट झालेला...

हा कंद मी ही पहिल्यांदाच पाहिला..... जागुशी सहमत. अफलातुन माहिती देताय...

हा कांदा वापरून मी दुधीभोपळ्या सारखी मुगाची डाळ घालून भाजी करते , मस्त लागते . मुले सुध्दा आनंदाने खातात. कोणत्याही डीप बरोबर हा कांदा कच्चा पण छान लागतो. हा कांदा चिरून त्यावर tomato sauce आणि चीज घालून बेक केल्यास पण चांगला होतो.

बडिशेप कुंडीत पेरल्यास हा कांदा उगवतो का? >>

मी हेच रडगाणे गायला आले होते, माझ्याकडे कुंडीत बडिशेप तर चांगली आली, पण कांदा नाही आला. बडिशेप अगदी सुके पर्यंत झाड ठेवले होते पण तरी कांदा काही दिसला नाही.

हे झाड इतके मोठे होत असेल असे वाटलेच नाही.

धन्यवाद दिनेश Happy

आरती, जागू मला वाटते फेनेल आणि अनिस, हे दोन वेगळे प्रकार आहेत. आपण अनिस म्हणजेच बडीशेप वापरतो. स्टार अनिस म्हणजे चक्रीफूलालापण हाच स्वाद असतो. या दोन्ही बिया नजरेला पण वेगळ्या दिसतात, पण अनेक पुस्तकात हे शब्द समानार्थी वापरल्याचे बघितले.
फेनेल च्या बिया बेकींग मधे वापरतात तर अनिस स्वादासाठी (एका फ्रेंच वाईनला पण हा स्वाद असतो, असे एका फ्रेंच मित्राने सांगितले.) वापरतात.
आपल्या ठंडाई त स्वादासाठीच बडीशेप वापरतात.

बाकी सगळे वाचताय, हे बघून आनंद झाला.

दिनेश , अनिस म्हणजे ओवा ना?. बडीशेपला ते समानार्थी नाही वापरणार. तुमच काहीतरी कन्फ्युजन होतय अस मला वाटतय.

मलाही सीमासारखंच वाटलं, अ‍ॅनिस म्हणजे ओवा. ह्या इटॅलियन कुकिंगमध्ये वापरताना बघितलंय कुकीजमध्ये वगैरे.

नाहि ओव्याला कॅरम सीड्स असा शब्द आहे. आणि चक्रिफूलाला कुठे ओव्यासारखा वास असतो ? यात आणखी थोडा गोंधळ असा आहे, कि ज्याला आपण ओव्याची पाने (जाडसर, पांढुरकी, भजी करतात ती) म्हणतो, ती सुद्धा ओव्याची नसतात.

अनिस म्हणजे ओवा नव्हे, बाळंतशोपाही नव्हेत. अनिस थोडे बडिशेपेसारखे , पण अजून गोडसर लागते. बिस्कोटीमधे अनिस घालतात. उझो अन साम्बुका हे दोन्ही अनिस फ्लेवर्ड aperitifs / liqueurs आहेत.

सॉरी दिनेश. आणि गुगल केल्यावर जी माहिती सापडली त्याप्रमाणे, तुम्ही म्हणताय तस बडिशेप सारखी चव आहे अनिसची. (पण समानार्थी शब्द नाही.)
मेघा माहिती बद्दल धन्यवाद.

इथे नेहेमी दिसतात अ‍ॅनिस सीड्स. आता या वेळी मुद्दाम आणून बघेन. म्हणजे मग पुढच्या वेळेपासून गोंधळ होणार नाही Happy
ओव्याची पानं ओव्याची नाहीत तर मग कसली असतात ? लागतात तर अगदी ओव्यासारखीच तिखट !

ओव्याची पानं म्हणजे एक प्रकारची सेज ची पानं असतात.स्पेशल्टी अर्ब्स नर्सरी मधे पाहिलित कधी कधी. आता नाव आठवत नाहीये Sad

अमि, आपण खातो ते अनिस. त्याचे रोप साधेच म्हणजे कोथिंबीरीसारखेच दिसते. या कांद्यासाठी फेनेल सीड्स हव्यात.
त्या ओव्यासारख्या वासाचे आणखी एक झाड असते, ते म्हणजे माईन मूळ्याचे. (असे मी वाचलेय)
शिवाय नायजेरियात, सेंट लीफ नावाने एक भाजी खातात, त्याला पण ओव्यासारखाच वास येतो. (पण ते कदाचित माईनमूळ्याचेच झाड असेल. सेंट लीफ मी बघितलेय आणि खाल्लेही आहे, पण माईनमूळ्याचे झाड बघितले नाही.)

अमि, आपण खातो ते अनिस.>> तुम्ही बहुधा उलट म्हणताय फेनेल्/फेनल म्हणजे बडिशोप्/शोप, हिरवट रंगाची.
अनिस म्हणजे ओव्यासारखे दिसते पण चविला बडिशोप च्या जवळची चव आणी वास.
(हे माहित असायचे कारण नवरा जिरे समजुन अनिस सिड्स घेवुन आलाय
:फिदी:)

अरे बापरे , किती तो गोंधळ Happy
बडीशेप म्हणजे फेनेल सीड्स (च).
अनिस म्हणजे बडिशेप नव्हे, अनिस म्हणजे ओवा नव्हे, काडे चिराइत, शहाजिरं सुद्धा नव्हे.
अगदी बारीक गोड बडिशेप मिळते भारतात - ती त्यातल्या त्यात चवीने अनिस च्या जवळपास आहे.

हे वर लिहिलेले बल्ब्स आहेत ते बडिशेपेच्या एका स्पेसिफिक Species चे आहेत. घरची बडिशेप पेरली तर ते उगवणार नाहीत. इकडे बर्पी वगैरे सीड कॅटलॉग मधून असल्या फेनेलच्याबिया मिळतात. (मी कधी लावल्या नाहीत.)

याच्या जाडसर चकत्या बार्बेक्युवर ग्रिल करुन वरुन थोडं ऑलिव्ह ऑइल घालून पण मस्त लागतात.
ही बॉटॅनिकल नावं
.
Anethum graveolens (Dill)
Bunium persicum (Black cumin)
Carum carvi (Caraway)
Coriandrum sativum (Coriander)
Cuminum cyminum (Cumin)
Foeniculum vulgare (Fennel)
Pimpinella anisum (Anise)
Smyrnium olusatrum (Alexanders)
Trachyspermum ammi (Ajwain)
.

रच्याकने मेथिचं इंग्रजी नाव फेन्युग्रीक हे फीनम ग्रिशियम या टर्म वरून आलेलं आहे - ग्रीक फेनेल - जुन्या ग्रीक मधे फीनम चा अर्थ hay असाही होत असे.

Pages