माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
एका मोठ्या गाळण्यात, चीज
एका मोठ्या गाळण्यात, चीज क्लॉथ, किंवा स्वच्छ रुमालाची चौपदरी घडी घालून, त्यावर श्रीखंड ओतायचे आणि ते सगळे फ्रीजमधे ठेवायचे, हा एक पर्याय.
किंवा त्यात फळे घालून फ्रूट सलाड करायचे, हा दुसरा पर्याय.
मी वाचलेला हा उपाय, मला पटला
मी वाचलेला हा उपाय, मला पटला नव्हता पण सांगतो.
श्रीखंड मलमलच्या फडल्यात बांधून वर्तमानपत्राच्या घड्यंवर ठेवायचे, आणि त्या घड्या बदलत जायच्या. कागद जास्तीचे पाणी शोषून घेईल.
मी चक्का करताना योगर्ट आणि
मी चक्का करताना योगर्ट आणि सावर क्रिम एकत्र मिसळून टांगायचे.
आता साखर घातल्यावर सावर क्रिम घालून कन्सिस्टंसी अॅडजस्ट करता येईल का हे येथील जाणकारच सांगतील.
अमी, आपण चक्का बांधुन ठेवतो
अमी, आपण चक्का बांधुन ठेवतो तसच श्रीखंड पातळ पंच्यात घट्ट बांधुन ठेव. हे गाठोड एका मोठ्या चाळ्णीत्/कोलँडर मधे ठेव आणि खाली एक भांडे - पाणी कलेक्ट करायला. (चाळ्णी चा तळ भांड्याच्या तळापासुन वर राहिल अश्या साइजचे भांडे घे) हे सगळे फ्रिज मधेच ठेव. हवच असेल तर वरती वजन म्हणुन एखाद फ्रोजन पीज्/भाजी च पाकिट किंवा एखाद दुसरा कॅन ठेव. जास्तीचे पाणी गळुन जाईल. तुला कशी कन्सिस्टंसी हवी तितका वेळ श्रीखंड चाळणीत ठेव. हे पाणी नंतर श्रीखंड उरलेच तर त्यात घालुन पियुष करता येइल
मिल्क पावडर/सावर क्रिम घातले तर चवीत फरक पडेल.
आरती २१, दिनेशदा, भरत मयेकर,
आरती २१, दिनेशदा, भरत मयेकर, बस्के, लाजो - उत्तरांसाठी धन्यवाद! खूप गडबडीत आहे पण श्रीखंड बांधून ठेवले आहे फ्रीजमध्ये- बरेच पाणी निथळतेय. असं वाटतंय की संध्याकाळपर्यंत ठीक चक्का जमेल. उद्या पुन्हा पोस्टेनच! धन्यवाद मंडळी!
अमी
आज अगोच्या रेसिपी प्रमाणे
आज अगोच्या रेसिपी प्रमाणे इंस्टंट खरवस केला. आत्ता पूर्ण गार झाल्यावर पाहिले तर सेट झाल्यासारखे वाटत नाहीये. वरती जमलंय पण सुरी खुपसल्यावर जाणवतंय की अजून दुधासारखे आहे. पंधरा मिनिटे वाफवला होता पण मध्यम आचेवर (कूकरमधले पाणी अगदी कमी होऊन खाली लागणार नाही ह्या काळजीमुळे). मोठ्या आचेवर वाफवायला हवे होते का? खरवसच्या बाफवर पण हाच प्रश्न टाकला आहे.
अमी
श्रीखंडा बद्दल विचार करत
श्रीखंडा बद्दल विचार करत होते, चक्का साखर टाकण्याच्या आधि बांधुन ठेवतात ना? जर साखर टाकुन मग बांधुन ठेवल तर पाण्यात विरघळलेलि साखर पण निघुन गेल्यामुळे श्रीखंड आंबट नाहि का होणार?
रमा,
रमा,
रमा, या बाफवरचा
रमा,
या बाफवरचा आत्तापर्यंतचा उत्कृष्ट प्रश्न!
रमा बहुतेक अमीच्या
रमा बहुतेक अमीच्या प्रश्नाबद्दल बोलतेय. तिने साखर घातली होती तरी तिला सर्वांनी फडक्यात बांधुन ठेवायला सांगितले आहे. (पण तरी :D)
रमा, अगं अमी ने आधीच साखर
रमा, अगं अमी ने आधीच साखर घातली होती आणि श्रीखंड पातळ झाले होते म्हणुन तिली फडक्यात बांधायला सांगितले.
श्रीखंड करताना दही आधीच फडक्यात बांधायचे असते आनि मग पाणी गळुन चक्का तयार झाला की मग साखर मिसलायची
अगं कंट्रोलबाहेर श्रीखंड पातळ
अगं कंट्रोलबाहेर श्रीखंड पातळ झालं तर सरळ आटवायचं आणि वड्या थापायच्या.
रमा- एकदम मस्त प्रश्न. मलाही
रमा- एकदम मस्त प्रश्न. मलाही तोच पडलाय.
मला पण शंका आलेली पण म्हट्ल
मला पण शंका आलेली पण म्हट्ल बघु काहीतरी नवा उपाय असेल.
जर साखर टाकुन मग बांधुन ठेवल
जर साखर टाकुन मग बांधुन ठेवल तर पाण्यात विरघळलेलि साखर पण निघुन गेल्यामुळे श्रीखंड आंबट नाहि का होणार?
पण साकह्रेबरोबर श्रीखंडाची quantity पण कमी होईल ना? मग आंबत अक्से होईल?
आता याचे उत्तर अमीलाच peacelily2025 देता येईल.
माझी मैत्रीण दम आलू/दम
माझी मैत्रीण दम आलू/दम बिर्यानी ओव्हनमधे करते. (पण खडूस मला रेसिपी सांगत नाहिये) मला पण तसेच करायचे आहेत, पण ओव्हनचे सेटिंग काय ठेवू?? आणि बेक मोडमधेच ठेवून करू का??
श्रीखंड बांधून ठेवल्यावर जवळ
श्रीखंड बांधून ठेवल्यावर जवळ जवळ सव्वा ते दीड कप पाणी सुटले. चव फारशी बदलली नव्हती - आंबट लागत नव्हते पण साखरेचा कमीपणा जाणवत होता. अर्धा कप साखर मिसळल्यावर चव, गोडवा बरोबर वाटले - श्रीखंड पाहुण्यांना आवडले (उरले नाही) ह्यातच सर्व काही आले! मदत करणार्या सर्वच मंडळीला माझे पुन्हा एकदा धन्यवाद! मायबोलीवर असलेल्या एक एक पाककृती पाहून, वाचून त्या करून पाहण्याचा उत्साह जसा वाटतो, तसेच चुकल्यावर मदत त्वरित मिळते ह्यामुळे खात्री असते की मायबोली मित्रमंडळ चूक सुधारण्यात अवश्य मदत करतील - हसे होऊ देणार नाही.
अमी
पण साकह्रेबरोबर श्रीखंडाची
पण साकह्रेबरोबर श्रीखंडाची quantity पण कमी होईल ना? मग आंबत अक्से होईल?
कारण साखर फक्त पाण्यातच विरघळेल दह्यात (प्रोटिन मॉलेक्युलस मध्ये नाहि). एका पारदर्शक पिशवित सारख्या आकाराचे आणि वजनाचे कापसाचे बोळे अगदि सहज बसतिल असे सोडलेत (अजिबात दाब न देता) तर जसे दिसेल तशि दह्याच्या रेणुंचि रचना आहे फक्त पिशवितिल हवेच्या ऐवजि त्यांच्या मध्ये पाणि आहे. चक्का टांगुन (म्हणजे दाब देउन) आपण त्यातिल पाण्याचे प्रमाण कमि करतो आहोत पण ते पुर्ण निघुन गेलेले नाहि. त्या उरलेल्या पाण्यातच आपण टाकलेलि साखर विरघळते. आपण श्रीखंड गाळुन्/घोटुन घेतो तेन्व्हा दर पाण्याच्या रेणु (ज्यात साखर विरघळलेलि आहे) मागे ठराविक दह्याचे अणु अशि सिमेट्रिक रचना होइल (लिक्विड इन सॉलिड सस्पेंशन).
ह्याच रचेनेवर दाब दिला (श्रीखंड टांगुन ठेवल) तर हि सिमेट्रि बिघडेल आणि चवित फरक पडेल.
तेन्व्हा इतका विचार नव्हता केला पण वरति बर्याच झणिंना हसु आल म्हणुन मग मी 'माझ काय चुकल (असेल?)'
असा विचार करत होते म्हणुन हि थियरि मांडलि.
नंदिनी, कन्वेक्शन मोड असलेले
नंदिनी, कन्वेक्शन मोड असलेले मायक्रोवेव असेल तर सात मिनिटात कोण्चीही ग्रेवीवाली भाजी मस्त होते.
वर झाकण ठेवायचे. बिर्यानीसाठी बासमती तांदुळ आधी अर्धा तास भिजत घालायचा हे मेन सिक्रेट आहे मग मावेच्या व माबोच्या सूचनांप्रमाणे ठेवायचे.
मी एकदा कन्वेक्षन अवनमधे बिर्यानी ठेवली होती अशीच गरम ठेवायला तर वाफ व उष्णतेच्या एकत्रित परिणामामुळे अवनची काच फुटून ते बिर्यानीत पड्ले तुकडे. ते ही स्वयंपाक हेच कार्यक्षेत्र असलेल्या
धाक्ट्या नणंदे समोर. त्याहून लक्षात आहे.
रमा वरील केमिकल अनेलिसिस लाजवाब आहे. आज काल फॅन्सी परदेशी रेस्टॉरेन्ट्स मध्ये एक मॉलिक्युलर कुकिन्ग म्हणून अभ्यासिले जाते व त्याचे टेस्टिन्ग मेन्यू खायला देतात त्याची याद आली.
रमा, सुदर विवेचन. अशी काहि
रमा, सुदर विवेचन.
अशी काहि अडचण, आली कि इथे आमची डोकी (प्रत्येकी एकच) भराभर चालतात.
थँक्यु अश्विनिमामी, दिनेशदा .
थँक्यु अश्विनिमामी, दिनेशदा :).
रमा मस्त थिअरी एकदम कॉलेजचे
रमा मस्त थिअरी एकदम कॉलेजचे दिवस आठवले..
या बाफवरचा आत्तापर्यंतचा
या बाफवरचा आत्तापर्यंतचा उत्कृष्ट प्रश्न>>> रैना तुला आणि रमाला विभागुन एकेक श्रिखंडाची वाटी
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू करण्यात आलेला आहे. शुल्क, नावनोंदणी इ.च्या माहितीसाठी खालील लिंक पहा...
http://www.maayboli.com/node/16976
?? भाजी शिजल्यावर त्यात मीठ
?? भाजी शिजल्यावर त्यात मीठ टाकणे किती योग्य आहे???
मी अगोदर[माहेरी] कांदा टोमॅटो परतल्यावर भाजीत एकत्रच तिखट -मीठ घालायचे तेव्हा शिजायची....
पियापेटी, पाण्यात मीठ
पियापेटी,
पाण्यात मीठ घातल्याने पाण्याचा उत्कलनबिंदू वाढून जास्त उष्णता द्यावी लागते हे खरे आहे, पण आपल्या पदार्थात मीठाचे प्रमाण अल्प असल्याने, त्याने एवढा फरक पडत नाही.
पण काही भाज्या, खास करुन पालेभाज्या शिजल्यावर आकारमानात कमी होतात. म्हणून आधी मीठ घातले तर हमखास जास्त पडते, म्हणुन ते शिजल्यावर घालतात.
रमा, छान समजाऊन सांगितलंस ..
रमा, छान समजाऊन सांगितलंस ..
LOL ते अमीच्या प्रश्नावर आहे
LOL ते अमीच्या प्रश्नावर आहे हे माहीत नसताना वाचले आणि भाग्यचे उत्तर तिथे होते तेव्हा वाचले. त्यामुळे श्रीखंड करण्याची पद्धत तशी आहे असे तुला वाटते असा माझा समज झाला. साखर इ. सगळे घालून मग टांगायचे
स्वतंत्र पोस्ट म्हणून ते विनोदी वाटले.
अजून एक, चक्का टांगत नाहीत. दही टांगतात आणि पाणी निघून गेल्यावर त्याचा चक्का होतो.
कुणी उरलेल्या साबुदाणा
कुणी उरलेल्या साबुदाणा खिचडीची थालिपिठं लावली आहेत का? माझ्याकडे आजच सकाळी केलेली खिचडी होती. त्यात एक बटाटा उकडून आणी एक कच्चा बटाटा किसून घातला. पिठाची कन्सिसटन्सी व्यवस्थीत होती पण थालिपिठं तुटत होती. काय चुकलं असेल? आईला बरेचदा पाहिलं आहे खिचडी वापरून थालिपिठं करताना. तिची कधी तुटत नाहीत. उपास भाजणी वगैरे घालायला हवी होती का? मला बटाट्या मुळे पिठाला आलेलं बाईंडिंग बरोबर वाटत होतं. म्हणून घातली नाही.
हो प्रॅडी मी जेव्हा पाहिलय
हो प्रॅडी मी जेव्हा पाहिलय आईला तेव्हा ती थोडी भाजणी टाकते... मग ती तुटत नाहीत..
Pages