Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुल्तानी मिट्टी वापर्ली तर
मुल्तानी मिट्टी वापर्ली तर त्वचा ओढ्ल्यासारखी वाटते. असं त्वचा ओढ्लं जाणं चान्गलं की वाईट? कारं त्याने स्किन टाईट थोदा वेळ्च होते ना? मग नन्तर परत सैल.
जास्त वेळ ओढल्यासारखी वाटत
जास्त वेळ ओढल्यासारखी वाटत असेल तर वापरू नको.
तेलकट त्वचेसाठीच मुलतानी माती ठिक आहे.
किंवा मग पॅक लावताना दुधात भिजवून लावणे.
माझ्या लेकीचे पाय पांढरे पडले
माझ्या लेकीचे पाय पांढरे पडले आहेत व त्याची सालंही निघाली आहेत, हाताचीही थोडीफार निघाली आहेत. यावर काहि उपाय आहे का? नेहमी मातीत क्रिकेट खेळणे चालु असते.
वर्षा माझा ही साधारण तसाच
वर्षा माझा ही साधारण तसाच प्रॉब्लेम आहे, बांधकामाच्या ठिकाणी गेलं की माझे हातपाय कोरडे पडतात, इतके की मला अस्वस्थ व्हायला लागतं. मग मी घरी आले की खसाखसा साबणाने हात धुऊन मॉईश्चरायजर लावलं की बरं वाटतं. तु थोडं कैलासजीवन वापरून पहा बरं.
पहिल्यांदाच फेशियल करायचं
पहिल्यांदाच फेशियल करायचं असेल पार्लरमध्ये जाऊन, तर कोणत्या फेशियलने सुरूवात करावी? पार्ललमध्ये अनेक ऑप्शन्स असतात. स्किन तेलकट नाही, नॉर्मल आहे.
पूनम, तुळशीचं करून पहा...
पूनम, तुळशीचं करून पहा... अजिबात अपायकारक नाही. बदाम किंवा ऑरेंज अशी ऑप्शन्स पण असतात पण त्याने चेहर्याची आग होते.
माझ्या हातापायाची स्किन खूप
माझ्या हातापायाची स्किन खूप कोरडी आहे. डव साबण वापरते त्यामुळे बरी झालिये सध्या. पण हातापायाची स्किन कोरडी पडू नये म्हणून काय करू? रोज रात्री मॉइश्चरायजर लावत बसायला वेळ नसतो. तरिही एखाद्या दिवशी लावलं आणि दुसर्या दिवशी अंघोळ केली की गेलंच.. लॅक्मेचं मॉइश्चरायजर तर काही क्षणातंच उडून जातं. मला मुळात बाहेर जाताना ते तेलकट मेणचट फिलिंग आवडत नाही..
अंघोळीच्या आधी तीळाचं तेल लाव
अंघोळीच्या आधी तीळाचं तेल लाव हाता पायांना ५ मिनिटं आधी. हवं तर एका छोट्या बाटलीत काढून बाथरुममधेच ठेव. हमखास उपाय आहे.
पायाला पेट्रोलीअम जेली लावून
पायाला पेट्रोलीअम जेली लावून मोजे घालुन झोपायचे. खात्रीचा उपाय आहे. पण उन्हाळ्यात अवघड वाट्ते.
धन्स दक्षिणा. तुळशीचं आहे का
धन्स दक्षिणा. तुळशीचं आहे का बघते. नाहीतर कोरफडीचंही आहे तिच्याकडे. ते करेन ट्राय. तुमचं ऐकून मला कोरफड जेलबद्दल फार उत्सुकता वाटायला लागली आहे. तेही आणणार आहे आता.
दक्षिणा माझी पण हातापायाची
दक्षिणा माझी पण हातापायाची त्वचा भयानक कोरडी आहे. उन्हाळ्यात धुळ असते सगळीकडे, त्यामूळे जर २ तासांनी हात पाय धुतले तर्च थोडं बरं वाटतं. मला तर मॉइशरायझरचा पण उप्योग नाही होत. अगदी भरपूर बॉडी क्रिम रात्री नाही लावले तर हाता-पायाला तर भयानक दिसतात पाय.
साबाईंनी सांगितलेला उपाय. अंघोळ झाल्यावर शेवटचा तांब्या अंगावर घ्यायच्या आधी दोन थेंब सरसोचं तेल हातावर घेवून अंगाला लावायचं. २-४ थेंब पुरतात. वासपण येत नाही. बहुतेक याचपद्धतीने तिळाचं तेल लावलं तरी चालेल. अंघोळीच्या आधी अश्विनी म्हणते तशी थोडीशी तेलाने मालिश केली तर छानच. पण रोज तेवढं करायला जमत नाही मला तरी.
अगं मालिश नको करायला. नुस्तं
अगं मालिश नको करायला. नुस्तं घाईघाईत हातापायाला थोडं लावलं तरी काम होतं. तीळाच्या तेलात एकंदरच चांगले गुणधर्म आहेत. मी रोज लावते १० सेकंद पुरे होतात. एकीकडे गिझर लावायचा. बालदी भरेपर्यंतचा वेळ बास होतो.
तिळाचं तेल आणते आता.. पण मी
तिळाचं तेल आणते आता.. पण मी लावण्याच्या बाबतीतच जाम ढिसाळ आहे.
सकाळी अंघोळीला वेळ मिळतो तेच खूप आहे.
दक्षिणा, खुप कोरडी त्वचा असेल
दक्षिणा,
खुप कोरडी त्वचा असेल तर 'मॉइशरायझर' न लावता, कोल्ड क्रिम लाव. nevea च लाउन बघ.
पण निवियाने चेहरा काळा पडतो
पण निवियाने चेहरा काळा पडतो गं!...माझी पण ड्राय स्किन आहे ना...आधी निवियाच लावायचे १२ ही महिने! सध्या मॉइस्चरायजरच वापरतेय..भर उन्हाळ्यात!
नयने यडपट!! मॉइश्चरायजर लावून
नयने यडपट!! मॉइश्चरायजर लावून उन्हात फिरलीस तर काळिच पडशील. मॉइश्चरायजर लावून उन्हात कधीच जाऊ नये. परदेशात तर लोक खास टॅनिंगसाठी क्रिम लावून ऊन्हात बसतात.
ए बधिर.... .मी म्हटलय
ए बधिर.... .मी म्हटलय निवियाने चेहरा काळा पडतो! लक्ष कुठाय गं तुझं?
पूनम, कोरफड केव्हाही उत्तम.
पूनम, कोरफड केव्हाही उत्तम. खरंतर गरज नाही पण उगाच घोळ नको म्हणून फक्त अॅलर्जी चेक कर. रूपाला आहे अॅलर्जी कोरफडीची. ती एकमेव व्यक्ती मला भेटलेली जिला कोरफडीची अॅलर्जी आहे. अर्थात रूपा एकमेवाद्वितीय आहे याबद्दल किंचितसुद्धा शंका नाही मला..
आठवड्यातून किमान एकदा तरी
आठवड्यातून किमान एकदा तरी रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी व्यायाम/ अंघोळ करायच्या आधी तिळाचं तेल किंवा कोकम तेल शरीराला लावून ठेवायचं. निदान १ तासभर तरी ते मुरलं पाहिजे.
तेल लावून मग व्यायाम केला तर अजूनच मस्त.
खच्चून उकडतं, चिकट होतं पण अंघोळीनंतर त्वचा एकदम मऊ मऊ...
डाएटच्यापायी रोजच्या जेवणातलं साजूक तूप कमी करून आपण अनेक व्याधींना आमंत्रण देतो. अपचन आणि रूक्षता ही सुरूवात.
रोजच्या जेवणात पोळीला किंवा भातावर असं मिळून किमान एक छोटा चमचा तरी तूप पोटात जायला हवं. प्रतिकारशक्ती आणि पचन सुधारणे, रूक्षता जाणे असे परिणाम महिन्याभरात दिसायला लागतील. आपोआपच कांती उजळेल.
तसंच रोज रात्री झोपताना एक ग्लास आणि सकाळी उठल्यावर दोन ग्लास कोमट ते गरम पाणी (ऋतूनुसार) प्यायला हवं.
हे एवढं जपता आलं तरी फरक दिसायला लागेल.
रोजच्या जेवणात पोळीला किंवा
रोजच्या जेवणात पोळीला किंवा भातावर असं मिळून किमान एक छोटा चमचा तरी तूप पोटात जायला हवं. प्रतिकारशक्ती आणि पचन सुधारणे, रूक्षता जाणे असे परिणाम महिन्याभरात दिसायला लागतील. आपोआपच कांती उजळेल.
>> मोदक! आहारात दुध,दह्याचे प्रमाण वाढवल्यानेही फरक पडतो.
पूनम, फ्रुट फेशियल बद्दल पण
पूनम,
फ्रुट फेशियल बद्दल पण विचारु शकता.
कोरडेपणा जास्त वाटत असेल तर साबणा ऐवजी उटणे दुधात भिजवुन वापरुन बघा. त्या आधी शरीराला सुट होईल अशा तेलाने मालीश करा. खरतर जास्त वेळ नाही लागत हे सर्व करायला.
हे सगळं तुम्ही खरंच करता ? एक
हे सगळं तुम्ही खरंच करता ? एक भा. प्र.
प्लीज प्लीज प्लीज मला सांगा. (अत्यंत डेस्परेट बाहुली)
रैना, हो भारतात असताना रोज
रैना, हो भारतात असताना रोज उटणे, तेल वगैरे. महिन्या आठवड्यातुन फेस पॅक हे मी घरी करायचे. तेव्हा अर्थात घराची जवाबदारी नवती. उलट इथे आल्यावर भरपुर वेळ आहे तर काही होत नाही. भारतात असताना अजीबात वेळ नवता तरी सगळ करायचे
हायला स्वाती- तुझा उत्साह
हायला स्वाती- तुझा उत्साह मानला पाहिजे गं. ग्रेट आहेस खरोखर.
हे सगळं तुम्ही खरंच करता ? एक
हे सगळं तुम्ही खरंच करता ? एक भा. प्र.
प्लीज प्लीज प्लीज मला सांगा. (अत्यंत डेस्परेट बाहुली)<<
सल्ले हे देण्यासाठी असतात रैने... हे सगळं आणि इतर ठिकाणचंही सगळं मी करत असते तर शिडशिडीत, सतेज कांतीची, आरोग्यपूर्ण आणि केवळ २५ वर्षाची दिसणारी अशी मुलगी असते मी... मला भेटलीस की यातल्या कशाची शंकाही येणार नाही..
रैना, अनुमोदन. तरीपण तुला
रैना, अनुमोदन. तरीपण तुला काही साध्याशा टिप्स... मी दिवसातून शक्य होइल तितक्या वेळा नुसत्या पाण्याने तोंड धुते. हा सर्वात चांगला उपाय आहे स्किन साफ ठेवण्यासाठी. रोजचा आहार नियमित आणि चांगला ठेव (तुझ्या प्रकृतीनुसार) आणि टेन्शनला एखाद्या पोत्यात घालून कुठेतरी दूर सोडून ये.
मी सध्या रोज एक अर्धी वाटी इतके पन्चामृत सकाळी उठल्याबरोबर घेतेय. फारच फायदा होतो.
त्वचेला कोरडेपणा वाटत असेल तर
त्वचेला कोरडेपणा वाटत असेल तर पाणी प्यायचे प्रमाण वाढवावे.
कॉलेजमधे असताना आम्ही दुधात चंदन उगाळुन त्याचा पॅक लावायचो. पॅक धुताना चेहरा जरा खसखसून धुवायचा. वेगळे स्क्रब करायची गरज नाही. त्याने स्किन इतकी छान होते. इतर सर्व पॅक, स्क्रब झक मारतात त्यापूढे.
काय असतं विशित सगळ्याच छान
काय असतं विशित सगळ्याच छान दिसतात आणि आपल्याला वाटत हे सगळं पॅक, फेशिअलमुळे होत होतं.
पूनम पहिल्यांदाच फेशियल करणार
पूनम पहिल्यांदाच फेशियल करणार असशील तर बेसिक साधं किंवा हर्बल म्हणून जे फेशियल असतं तेच कर. खरं तर आत्ता या अशा उन्हाळ्यात फेशियल शक्यतो करुच नये. क्रीम मसाजची स्कीनला या ऋतूत काहीच गरज नसते. घरच्याघरी क्लिन्सिंग क्रीम लावून साधा पॅक लावावा. माया परांजपेंच्या ब्युटिकचा नीतळ पॅक छान आहे घरच्याघरी लावायला. शक्य असेल तेव्हा रुमालात बर्फाची क्यूब घेऊन चेहर्यावर फिरवावी.
हातापायांच्या रुक्ष त्वचेसाठी ब्युटिकचंच हॅन्ड बॉडी लोशन मस्त आहे. आंघोळीनंतर आणि झोपायच्या आधी लावावे. ऑफिसात/घरी सतत एसी असेल तर हातांची स्कीन खूप ड्राय होऊन काळपटपणा येतो. त्यामुळे हे हॅन्ड-बॉडी लोशन ऑफिसातही लावावं मधून मधून.
सिंडरेला म्हणतेय तसं चंदन किंवा बदाम बी उगाळून लावली तर कधीही पिम्पल्स किवा ड्रायनेसचा त्रास होत नाही. पॅची स्कीनला रक्तचंदनही उगाळून लावतात. अर्थात हे सगळं कॉलेजात असतानाच शक्य होतं हे खरच. पूर्वी फोर्टमधल्या खादी एम्पोरियममधे वस्त्रगाळ चंदन पावडरीचा एक पाउच मिळायचा. ती दुधात किंवा गुलाबपाण्यात थोडा वेळ भिजवून मग चेहर्याला लावली की खूप छान दिसायची स्कीन.
* खास उर्जिता जैन प्रॉडक्ट्सच्या फॅन्ससाठी- यांचं एक केवडा जल म्हणून बाटली मिळते ती आता या उन्हाळ्यात जरुर जवळ ठेवावी. उन्हातून आल्यावर नुसतं हातावर घेऊन चेहर्यावर आणि मानेवर वगैरे फिरवायचं. भन्नाट फ्रेशनेस आहे. आणि अगदी मंद सुगंध येत रहातो.
उर्जिता जैन प्रॉडक्ट्स इथे
उर्जिता जैन प्रॉडक्ट्स इथे मिळ्तील का?? असेल तर कुठे मिळतील?? कोरफड जेल आणी जास्वंद जेल? मला पण हाता वर आणी चेहेर्यावर बाळांतपणानंतर pigmentation झालय. त्यावर पण उपाय माहीत आहे का?
Pages