Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी भाची ५ वषाची आहे पण ती
माझी भाची ५ वषाची आहे पण ती खुपच सावळी आहे तीचा रंग उजळण्यासाठी काही उपाय आहे का?
>>>>Laazure नावाचा एक केशर व हळदीचा साबण येतो. अक्षरश: केशराच्या काड्या दिसतात त्यात. त्याने अंघोळ करायला सांग. फेस २ मिनिटं ठेवायचा, मग धुवायचा. १५ दिवसांत ग्लो येईल. ७५ रुपये किंमत आहे पण वर्थ आहे.
Laazure नावाचा एक केशर व
Laazure नावाचा एक केशर व हळदीचा साबण येतो. अक्षरश: केशराच्या काड्या दिसतात त्यात. त्याने अंघोळ करायला सांग. फेस २ मिनिटं ठेवायचा, मग धुवायचा. १५ दिवसांत ग्लो येईल. ७५ रुपये किंमत आहे पण वर्थ आहे.>>> अश्विनी, हा मुंबईत कुठे मिळतो? माझ्या लेकीचा रंग काळवंडला आहे आणि ती कसलेही पॅक लावायला तयार नसते.
खरे तर लहान मुलाना कोणताहि
खरे तर लहान मुलाना कोणताहि स्क्रब किंवा पॅक लावु नये...त्यांची त्वचा खुप संवेदनशिल असते..
उगाच त्यांना स्किन प्रोबलम होइल.
त्यापेक्षा अंघोळ घालताना, त्यांना दुध आणी बेसन मिस्क करुन लावावे...त्यानेहि फायदा होइल.
वर्षा, साधारण आयुर्वेदिक
वर्षा, साधारण आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स मिळायच्या दुकानात बघ. ठाण्याला टेंभी नाक्याला नारायण फार्मसीमधे आहे तो साबण. तसेच अझार्डियन म्हणुन एक अँटीपोल्युशन सोप पण मिळतो, तो पण छान आहे. मोठया माणसांसाठी पण आहेत हे सोप्स.
मी नगर मधुन केसर गोटी नामक
मी नगर मधुन केसर गोटी नामक वडी आणलीय. असला रिफ्रेशिंग वास आहे त्याचा! त्यातहि केशर दिसते.
अशक्य वाटते त्याने. (रंगहि उजळतो म्हणे. )
दुसरा भारी प्रकार म्हणजे : facia नामक साबण. त्यात केशर्,चंदन्,कापूर आणि कोरफड आहे. त्याने मात्र लगेच रंग उजळतो. हे दोन प्रकार नक्की ट्राय करा.. (जाहीरात नाही. केवळ सल्ला. )
(जाहीरात नाही. केवळ सल्ला. )
(जाहीरात नाही. केवळ सल्ला. ) >>>> माझा पण !
पण आश्विनी तिने नेहमी हा साबण
पण आश्विनी तिने नेहमी हा साबण वापरला तर कायमचा रंग उजळेल ना? (ति अगोदरची सावळी आहे पण गावी उन्हात खेळत असल्याने जास्त झाली आहे या साठी कायमचा उपाय)
ट्राय करुन बघ माझ्या
ट्राय करुन बघ माझ्या पहाण्यात ३-४ डार्क काँप्लेक्शनच्या मुलींचा रंग उजळलेला (नुस्ता पांढरटलेला नाही) आणि वेगळाच ग्लो आलेला पाहिलाय. मी १५ दिवसांपुर्वीच आणलेत हे २ साबण. माझा रंग आधिचाच उजळ आहे पण ग्लो मात्र नक्की येऊ लागलाय.
धन्स अश्विनी, बघते गोरेगावात
धन्स अश्विनी, बघते गोरेगावात कुठे मिळतो ते. माझी लेक १२ वर्षांची आहे आणि ३-४ वर्षांपुर्वी सुट्टीत पोहायला जात होती, तेव्हापासुनच तिचा रंग बदलला. ती वडिलांसारखी खुप गोरी नव्हतीच पण सावळीही नव्हती, आणि आता उन्हात, धुळीत खेळत असते, कितीही सांगितले तरी प्रत्येक वेळी बाहेरुन आल्यावर चेहरा साबणाने धुत नाही.
तिला आम्ही जबरदस्तीने कच्च दुध लावायचो पण आता ती लावुन घेत नाही. सध्या मी हिमालयाचा बदामाचा साबण आणला आहे. मलातरी चांगला वाटला.
कितीही सांगितले तरी प्रत्येक
कितीही सांगितले तरी प्रत्येक वेळी बाहेरुन आल्यावर चेहरा साबणाने धुत नाही.
अजुन एक दोन वर्षे थांब, मग तुला सांगायची गरज पडणार नाही, उलट किती वेळा धुतेस म्हणुन ओरडावे लागेल.
माझी लेकही तिन वर्षांपुर्वी कसलेही लेप बिप लावुन घ्यायची नाही.. पण आता काही दिवसातच स्विट सिक्स्टिनमध्ये पाऊल ठेवेल, त्याचा परिणाम असा की या वेळेला आलेली तेव्हा इथले 'उजळ कांती' आणि 'केसांचे आरोग्य' ची पारायणे करुन, त्यातले सगळे प्रकार करुन झाले.. जाताना मुलतानी माती+इतर पावडरी मिक्स करुन घेऊन गेली. मी भेटायला जाईन तेव्हा परत घेऊन ये अशी आज्ञाही देऊन देली
साधना, अस झाले तर किती बरे.
साधना, अस झाले तर किती बरे. मला एकसारखे सांगावे लागणार नाही.
हसरी उन्हात जाताना सनस्क्रिन
हसरी
उन्हात जाताना सनस्क्रिन लोशन लावावे म्हणतात. अती कडक उन्हाने त्वचेची हानी होते. लहान मुलांना (खरेतर मोठ्यांनाही) केमिकल्स नको तर बाहेर जायच्या आधी कोरफडीचा गर लावला तर तो पण युव्ही रेज पासुन प्रोटेक्ट करतो असे एकुन आहे.
रच्याकने, कुणाला ह डाळ
रच्याकने, कुणाला ह डाळ खाल्लेली (बाळांतीण इ.) चालत नसेल तर ह्या मसुराच्या पीठाचे छान पिठले होते. नेहेमीची पिठल्याची कृती फक्त बेसन ऐवजी म. डाळीचे पीठ. (माहिती आहे, कुणाचे काय नी कुणाचे काय :))
सिंडी, मस्त लागते ते,, मी
सिंडी, मस्त लागते ते,, मी खाल्लेले आहे
स्वाती. मी उर्जिता जैन चा कोरफड गर आणलाय, त्यावरही लिहिलेय सनस्क्रिन लोशन म्हणुन वापरावे असे..
उर्जिता जैन चे कोरफड जेल आणि
उर्जिता जैन चे कोरफड जेल आणि जास्वंद जेल म्हणजे संजीवनी बुटी आहेत जवळजवळ. एक त्वचेसाठी एक केसासाठी....
उर्जिता जैनच्या कोरफडीच्या
उर्जिता जैनच्या कोरफडीच्या गरामुळे माझ्या भाजल्याच्या खुणा बर्याच कमी होत आहेत.. माझ्या मावशीनेही केमोथेरपीनंतर हे जेल वापरलं होतं. तिलाही खूप फायदा झाला होता.
साधी जखम जर झाली तर नुसते
साधी जखम जर झाली तर नुसते स्वच्छ धुवुन वर कोरफडीचा गर लावला तर नंतर त्या जागी जखमेची खुण अजिबात राहात नाही. मी मुलीवर बरेचदा हा प्रयोग केलाय. सायकलवरुन पडलेली तेव्हा तर डोळ्याच्या बाजुलाच खुप खरचटलेले. पण तिथे जराही खुण राहिली नाही. अशा वेळी घरची कोरफड वापरली तरी चालते. पण सनस्क्रिनसाठी मात्र उर्जिता जैनवालीच वापरलेली बरी. घरी आपण गर काढतो त्यात बरेच तंतु राहतात.
वर्षा११ गोरेगाव पछ्चीमेला जो
वर्षा११
गोरेगाव पछ्चीमेला जो रोड जवाहर नगर मध्ये जातो तिथेच एक मंदीर आहे वेगवेगळ्या देवांच.
त्याच्या अपोझिट गजानन मेडिकल स्टोअर आहे. तिथे फेशिया आणी ति केशर गोटि साबण मिळतो. दोन्हि छान आहेत साबण. मत फ्रेश वाटत.
धन्स रिमा, नक्की बघते.
धन्स रिमा, नक्की बघते.
ए काखेतली त्वचा काळी झाली
ए काखेतली त्वचा काळी झाली असेल तर काय करायचं ?
फेशिअल, manicure, pedicure
फेशिअल, manicure, pedicure साठी घरच्या घरी क्रिम तयार करता येतं का ? घरगुती ingradients वापरुन ? नसेल तर मग बाहेर मिळणारी कुठली क्रिम्स चांगली आहेत ?
माझ्या कोपराची त्वचा काळी
माझ्या कोपराची त्वचा काळी पड्ली आहे. आणि सतत मांडी घालुन बसण्याचे सवय असल्याने पायाच्या घोट्याची त्वचा निबर झाली आहे आणि अतिशय काळी पडली आहे. त्वचा परत मऊ व्हावी आणि रंग उजळण्यासाठी काय करावे ?
उर्जिता जैन चे कोरफड जेल
उर्जिता जैन चे कोरफड जेल चेहर्याला हि लावतात ना? किती वेळ ठेवायचा?
तु आणलायस कां??? आधी आण आणि
तु आणलायस कां??? आधी आण आणि मग तो चेह-यावर क्रिमसारखा लाव आणि विसरुन जा....
(चेह-याला मस्त मऊ फिल येतो तो मधुन मधुन गालावर हात फिरवुन परत परत अनुभवायचा )
जयश्री, हेअर रिमूव्हरचा
जयश्री, हेअर रिमूव्हरचा अतिरिक्त वापर असल्यास काखेतली त्वचा काळी पडते, त्यावर उपाय मला नाही माहित, पण हेअर रिमूव्हिंग क्रिमच्या ऐवजी वॅक्सिंग करणं कधीही उत्तम. फार काळपट असेल आणि जर समारंभाला वगैरे जायचं (स्लिव्हलेस घालून) तर ब्लिच करून मग वॅक्सिंग करावं... तात्पुरता इफेक्ट.... बाकी लाँग टर्म साठी... स्किन स्पेशालिस्ट कडूनच माझ्यामते क्रिम घ्यावं लागेल.
एक अनुभव सांगायचाच राहून गेला... माझी मैत्रिण पण बरीच सावळी आहे, तिच्या ओठांच्या शेजारी आणि काखेतल काळपटपणा घालवण्यासाठी क्रिम हवं होतं. पुण्यातल्या चांगल्या स्किन स्पेशालिस्ट ने तिला एक महागडं औषध लिहून दिलं होतं, पण त्याचा रिझल्ट खूप स्लो होता, पण ती मात्रं ते डाग जावेत म्हणून नित्यनियमाने ते क्रिम आणून लावत होती. नंतर कुणा एका नातेवाईकांनी तिला दिवाळीत एक छोटी क्रिमची डबी अशीच भेट दिली.. तिने ती लावली... तर चक्क तिचा तो भाग उजळत गेला...
ते क्रिम कोल्हापूरच्या प्रकाश मेडीकल स्टोअर्स चं स्वत:चं प्रॉडक्शन आहे. त्याला नाव नाही. आता तिच्या मानेवरचा, हातावरचा काळपटपणा जवळ जवळ नाहीसा झालाय.. माझे बाबा दरवेळी येताना तिच्यासाठी १२-१५ डब्या घेऊन येतात.
किंमत रू. ५०/- (एका डबीची)
>>उर्जिता जैन चे कोरफड जेल
>>उर्जिता जैन चे कोरफड जेल आणि जास्वंद जेल म्हणजे संजीवनी बुटी आहेत जवळजवळ. एक त्वचेसाठी एक केसासाठी.... >> यातलं केसांना नक्की कोणतं लावायचं? काय काय उपयोग होतात त्याने? दाट होतात का? पांढरेपणा कमी होतो का? कोंडा जातो का? केस वाढले नाहीतरी चालतील. निदान हे बेसिक उपयोग झाले तरी बास.
लवकर सांगा...
त्वचेच्या एखाद्या
त्वचेच्या एखाद्या काळवंडलेल्या पॅचसाठी इव्हिऑन क्रिम (व्हिटॅमिन इ) चांगलं आहे. माझ्या आईच्या पायाला रक्ताभिसरण नीट होत नसल्याने डार्क पॅच आला होता पावलावर. त्या क्रिम ने तो पॅच थोड्याच दिवसांत पुर्ण गेला व त्वचा पहिल्यासारखी झाली. तसेच माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा अॅक्सिडंट होऊन डावा गाल जखमी झाला होता. एकदम सत्यम शिवम सुंदरम झालं होतं. तिलाही हे क्रिम मी सजेस्ट केलं होतं व २ महिन्यांत तिच्या गालावर जखमेचं नामोनिशाण नाही राहिलं
चिनूक्सने सुचवल्याप्रमाणे
चिनूक्सने सुचवल्याप्रमाणे उर्जिता जैनचं कोरफड जेल मी तोंडाला लावतेय आणि त्याचा चिक्कार फायदा होतोय. मला प्रचंड घाम येतो. अगदी तयारी करून बाहेर पडायच्या आतच तोंडावरून घामाच्या धारा वाहायला लागतात. पण हे जेल लावायला लागल्यापासून धारा प्रकरण जवळ जवळ बंदच झालंय. गालावरचे पुटकुळ्यांचे डागही कमी झालेत.
मला ही अलिकडे कपाळावर आणि
मला ही अलिकडे कपाळावर आणि नाकाजवळ खोबणीतच पिंपल यायलेत
पाणी भरपूर पिते, उष्ण काही खात नाही, मसाला, तिखट जळजळित बिल्कूल वर्ज्य आहे, तरिही का येत असतील? काय करू?
दक्षिणा! जास्वंद जेल
दक्षिणा! जास्वंद जेल केसांसाठि आहे. केसांच्या लांबिनुसार १-२ चमचे जेल तेवढ्याच पाण्यात मिसळुन केसांना सगळिकडे लावुन १५-२० मिनिटांनी धुवायचे.
केसांचे प्रॉब्लेम कमी होतात.
Pages