माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
१/२ म्हणजे अर्धी वाटी. दुसरी
१/२ म्हणजे अर्धी वाटी.
दुसरी पद्धतः पालक न चिरता - एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायचे पालकाची पाने उकळत्या पाण्यात टाकायची दोन तीन मिनिटांनी पाने काढून थंड पाण्यात टाकायची. मग एक तर बरीक चिरायची किंवा मिक्सरमधून कोअर्स वाटायची. एस (S) आकाराच्या ब्लेडने. मस्त हिरवीगार होते भाजी.
अवंतिका, सोडा का टाकता पालक
अवंतिका,
सोडा का टाकता पालक पनीरमध्ये? नक्की काय उपयोग? छोले तत्सम असेल तर समजते.
सोडा नका टाकू त्यानेच रंग बदलतो. दूध टाकले तर काही होत नाही पण रंग कमी गदद येइल.
पालक blanch करायचा व झाकण न लावता शिजवायचा. येतो छान रंग.
धन्यवाद मन:स्विनी. तुम्ही
धन्यवाद मन:स्विनी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करून पाहीन.
सॉरी मी दोन-तीन दिवस नेटवर सर्फिंग करू शकले नाही. १० तारखेला माझ्या जावेला मुलगा झाला.
मला मदत करा
मला मदत करा प्लीज्..तिळ्गुळाचा प्रॉब्लेम झाला आहे.आधी गूळ गरम करून पातळ केला,त्याच्यामधे तीळ आणि दाण्याचा कूट टाकून घोटून घेतले.काय चुकले माहीत नाही,पण तो खडखडीत चुरा झाला.शेवटी मिक्सर मधे फिरवला,तर आता कोरडा तिळगूळ झाला आहे...काय करू?
मला वाटत गुळ कमी पडला असावा.
मला वाटत गुळ कमी पडला असावा. अजुन थोडा गुळ घेउन त्याचा पाक करुन त्यात हा चुरा टाकुन पहा.
करून पाहते...थँक्स....
करून पाहते...थँक्स....
मी मेघना चितळे-रानडे (वय
मी मेघना चितळे-रानडे (वय वर्षं २३), San Jose, CA मधे राहते. लग्न 28 April, 08 ला झालं. लग्नाच्या आधि खूपच क्वचित cooking केलं होतं, पण इथे पुष्कळ वेगवेगळे पदार्थं बनवले, (basically स्वतःला खाण्याची आवड असल्यामुळे), so नवरा म्हणतो त्याचा मटकाच लागला.
लगेच कळलं पण तोपर्यंत सगळी मेहनत वाया गेली होती. मला तर रडायलाच यायला लागलं
, तो दिवसच खराब होता, आधीच शेवया पण एकदा जाळून झाल्या होत्या कारण खूप बारीक होत्या. नवरा आधी खो खो हसायला लागला
मग म्हणाला it's okay, आत्तापर्यंत प्रथमच काहीतरी गडबड झाली आहे, होतं असं कधीकधी, मग काय पुन्हा केली खीर, मस्त झाली. आईशी फोनवर बोलले, ती लगेच बिचारी वगैरे म्हणाली मग बरं वाटलं.
तर, मधे मी गेल्या महिन्यात एकदा शेवयांची खीर करत होते. मस्त शेवया तुपावर भाजल्या. दूध गरम करुन शिजवल्या. केशर, साखर टाकली. तेवढ्यात नवरा आला, मी थाटात सांगितलं कि खीर झालीच आहे आणि गडबडीत वेलदोडा पूडीऐवजी जिरापूड घातली
मायबोलीची नियमीत वाचक आहे पण आज प्रथमच काहीतरी post करते आहे. सवय नसल्यामुळे वेळ लागत आहे, पण तुफान मजा येत आहे.
चिमेघ, सुरवातीला होत अस.. येत
चिमेघ, सुरवातीला होत अस.. येत जा नियमित
मायबोलीवर तुझ स्वागत. 
>>मी मेघना चितळे-रानडे (वय
>>मी मेघना चितळे-रानडे (वय वर्षं २३), San Jose, CA मधे राहते. लग्न 28 April, 08 ला झालं>>
इथे(ह्या बीबी वर) कुठल्याही वयाच्या,विवाहित्/अविवाहित स्त्री/पुरुष पाकृतील चुका विचारू शकतात. कूठल्याच दाखल्याची(वय/married status वगैरे) गरज नाही (अजुनतरी).
(ह. घ्या.)
ह्या बीबी वर स्वागत!
मेघना सो स्वीट. प्यार में कभि
मेघना सो स्वीट. प्यार में कभि कभी ऐसा हो जाता है. छोटीसी बात का फसाना बन जाताहै. एक वाडगा खीर आम्हाला पण हवी.
धन्स अमृता मनःस्विनी तू
धन्स अमृता
अगं पहिल्यांदाच पोस्टत आहे म्हणून जरा details दिले 
वाह! जरूर जरूर चांगली वेलदोडा पूड घातलेलीच खीर देईन, 
मनःस्विनी तू पुण्याची आहेस की काय ही ही
अश्विनीमामी
मेथीची भाजी दाण्यांचे कूट न
मेथीची भाजी दाण्यांचे कूट न घालता केल्यास कडवट का लागते...?
चिमेघ, गम्मत करतेय.
चिमेघ, गम्मत करतेय.
RH , मी नेहमी मेथीची भाजी
RH , मी नेहमी मेथीची भाजी तशीच प्लेन करते. लसणाची फोडणी द्यायची आणि मेथी थोडीशी चिरुन (अगदी बारीक नको) परतायची तव्यावर. शिजली कि मीठ घालायच आणि ताबडतोब एखाद्या भांड्यात काढायची. मस्त लागते. अजिबात कडवट लागत नाही.
अशी आवडत नसेल तर मुगाची डाळ घालुन किंवा तांदळाची कणी घालुन पण छान होते मेथीची भाजी.
ठीक आहे गं मनःस्विनी ,कोई बात
ठीक आहे गं मनःस्विनी ,कोई बात नही!
रस्त्याच्या कडेने तुझा मोदकाचा जोरदार बेत बघितला आज, सहीच! तिकडच्या त्या बाईचा मस्त पोपट झाला असेल
anyway विषयांतराबद्दल क्षमस्वः
फजितीपुराण आणि सल्ले चालू द्या
मेथी-बेसन पण छान लागते. फक्त
मेथी-बेसन पण छान लागते. फक्त पीठ आधी तिखट- मीठ घालून पाण्यात कालवून घ्यायचं आणि मेथी शिजत आली(with लसूण फोडणी) की घालायचं. एक वाफ काढायची.
मी पालक-पनीर साठी, पालक
मी पालक-पनीर साठी, पालक microwave ला २-३ मिनिटं शिजवून घेते, मग मिक्सर वर वाटते, हिरवागार राहतो.
रॉबीन, न चिरता एकदा करुन बघा.
रॉबीन,
न चिरता एकदा करुन बघा. निवडलेली - धुतलेली - निथळलेली मेथी तेलात लसणाची फोडणी करुन त्यात टाकायची. अजिबात कडु लागत नाही.
हो रॉबीन, मेथीची पाने चिरायची
हो रॉबीन, मेथीची पाने चिरायची नाहित. तसेच फार जून भाजी पण नाही वापरायची. पण काहि जणाना (उदा. मला ) कडवट चव आवडते. बेसन, मुगाची डाळ, तूरीचे वरण वगैरे घालून कडवटपणा कमी करता येतो. दाण्याचे कूटच हवे असे नाही.
हूड- तुम्हाला मेथी कडू लागते
हूड- तुम्हाला मेथी कडू लागते ? तर कारलं काय लागतं ?:फिदी:
मला मैत्रिणीच्या आईने
मला मैत्रिणीच्या आईने सांगितलं होतं की, मेथी विकत घेताना, पानात पहावी.
बुटकी आणि गोल पानांची मेथी असते जी कडू नसते,
आणि थोडी उंच आणि त्रिकोणी पान असली की त्याला मेथा म्हणतात, त्याची चव थोडी कडवट आणि जुन असते. जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.
इथे गव्हाच्या खीरीवर चर्चा
इथे गव्हाच्या खीरीवर चर्चा झाली होती एकदा. आज त्यापद्धतीने गूळ घोटुन बिटुन खीर केलीये. दूध फाटलं नाही ह्यावेळी. मनु, मिनोती धन्यवाद
तरी सुद्धा आईने केली तेव्हा कशी नाही फाटली हा प्रश्न आहेच 
दलिया कूकरमधे शिजवुन घेतला. मग चमचाभर तुपावर परतला. ५ मिन. झाल्यावर त्यातच नारळ/काजु घालुन अजून परतले. नारळाचा खमंग वास यायला लागल्यावर मग गूळ/जायफळ घालुन गूळ पूर्ण वितळेपर्यंत घोटले. दूध वेगळे उकळी आणुन गार करुन ठेवले होते. रिस्क नको म्हणुन पुन्हा एकदा उकळी आणली आणि मग वरुन दलियामधे घातले. दूध गरमच होते त्यामुळे खीरीला पुन्हा लगेच उकळी आली.
मी आज सॅलडच्या पानांची
मी आज सॅलडच्या पानांची कोशिंबीर केली. पाने धुउन चिरुन त्यात सेंगदान्याचा कुठ, मीठ, थोडी मिरची (वाटलेली), साखर आणि लिंबु रस टाकले. पण कोशिंबीर कडवट झाली
कारण सांगु शकाल कुणी
सॅलडची पानं थोडी चरचरीत आणि
सॅलडची पानं थोडी चरचरीत आणि कडवट असतातच म्हणून त्यात भरीला थोडा कांदा टोमॅटो टाकावा.
सॅलड ची पाने थोडी कडू असतील.
सॅलड ची पाने थोडी कडू असतील. लिंबू रस जर बाटलीतला नसेल (ताजं पिळलं असेल तर ) तर सालीचा कडवटपणा येऊ शकतो.
कारणे बरीच सांगू शकेन, पण कदाचित असंबद्ध असतील म्हणून एवढीच बास
(ताजं पिळलं असेल तर ) तर
(ताजं पिळलं असेल तर ) तर सालीचा कडवटपणा येऊ शकतो. >> हो ताजच पिळलं होत्..पण मला नाही वाटत सालीचा एव्हडा कडवटपणा येउ शकेल असे.
वर्षा... त्यात थोडा कच्चा
वर्षा... त्यात थोडा कच्चा कांदा, बिट, गाजर, टोमॅटो घालुन मग दाण्याचं कुट घालुन जरुर असल्यास फोडणी द्यावी.. मस्त लागते ती कोशींबिर
सॅलडची पानं ताजी होती का?
सॅलडची पानं ताजी होती का? शिळी असल्यास असं होऊ शकतं.
सॅलडची पानं हातानीच तुकडे
सॅलडची पानं हातानीच तुकडे करुन टाकायची असतात. सुरीने चिरायची नसतात म्हणे.
पण बर्याचदा ती पाने कडसर लागतात. भाजीवाल्याकडे हळुच चव घेऊन बघायची.
लिंबाच्या सालीनीपण येतो हं कडवटपणा
सॅलडची पाने म्हणजे काय ?
सॅलडची पाने म्हणजे काय ?
Pages