Submitted by प्रिती on 22 January, 2010 - 03:35
मी साद तुला देते
प्रतिसाद माझा होशिल का...
नयनि स्वप्न तुझे पाहते
तु स्वप्न होऊन राहशिल का...
मी नित्य होऊन रातराणि
रात्र हि जागते
सुवास होऊन दरवळताना
ध्यास तुझाच घेते
स्पर्श तुझा होता
मोरपिसारा फुलते
मन वेडे धुंद होऊनि
थुईथुई नाचते
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर आहेत . अजुन येवु द्यात
सुंदर आहेत .
अजुन येवु द्यात आवडतील वाचायला!
छान....
छान....