तेलबैला : 'क्लायंबिंग- व्हॅली क्रॉसिंग- रॅपलींग'

Submitted by सुन्या आंबोलकर on 31 December, 2009 - 06:05

शनिवारी (२६डिसें) कंपनीच्या अ‍ॅन्युअल पार्टी वरून घरी जाताना रूपेशने (ऑफिसमधला मित्र)विचारले "उद्या तेलबैला 'क्लायंबिंग- व्हॅली क्रॉसिंग- रॅपलींग' आहे, येतोयस ना? माझा लगेच होकार. तिथे सकाळी ७:३०- ८:०० वा पोहचायचे होते..

001 Activity Route.jpg

ग्रुप तर अगोदरच रात्री गेला होता. आमचे सकाळी ६:०० वा. चिंचवडहून निघायचे ठरले. त्याप्रमाणे सकाळी थोडं लवकर उठून निघालो. पण गाडी चालवताना गाडीचा कसलातरी आवाज येत होता काही कळत नव्हते. एक्सप्रेस हायवेला जायच्या अगोदर मी खाली उतरलो रूपेशने हळूहळू गाडी चालवायला सूरू केले मी बघायला लागलो, पुढच्या चाकातून आवाज येत होता पण काहीच कळत नव्हते. आता तोच खाली उतरला त्यांने बघायला चालू केले. चाक बदलय पण आवाज कसला कळत नाही रे... असं म्हणत सहज त्याने चाकाच्या बोल्टला हात लावला तर चारपैकी तीन बोल्ट तसेच फिट न करता बसवले होते. आमचे दोघांचेही डोक्यावर हात. रात्री त्याच्या कुटूंबासहीत पार्टीला जावून आलो.. त्या पुढच्या चाकाच्या एका बोल्टवरच... (तुम्हीच विचार करा पार्टीवरून येताना किंवा एक्सप्रेस हायवेला गेल्यानंतर काय झाले असते ते...)

सुरवातच अशी थ्रिलींग झाली त्यामूळे आता तेलबैलावरच्या अ‍ॅक्टीव्हीटीसाठी पुर्ण तयार झालो.
चिंचवडवरून लोणावळा- भुशी धरण - आय. एन. एस. शिवाजी तिथून तेलबैला गावत जावून पोहचलो. तिथून एका बाजुला 'धनगड' कडचा देखावा.. डाव्या बाजूला दिसंणार्‍या तिन दगडांच्या रचनेला काहीजण 'नवरा-नवरी आणि भटजी' तर काहीजण 'ताजमहाल' म्हणतात...

002_Morning.jpg

सकाळची थंडी चांगलीच जाणवत होती ; त्यामुळे वातावरण खुपच प्रसन्न वाटत होतं. दुसर्‍या बाजूला तेलबैलाची भिंत....

003_Wall.JPG

ग्रुप पुढे गेला होता. त्यातील एकजण (हे रुपेशचे मित्र) वर जायला निघत होते त्यांच्याबरोबर आम्ही निघालो. वाटेत त्यांनी अ‍ॅक्टीव्हिटीबद्दल बरीच माहीती दिली...
२० ते २५ मिनीटांत त्या भिंतीच्या एका बाजूला जाउन पोहचलो. तिथून दिसणारा भिंतीचा साईड व्ह्यू आश्चर्यकारक आहे. भिंत पायथ्याशी ७ -८ फूट रुंद तर माथ्यावर रुंदी वाढत जात गेली आहे..

010_Wall side View.JPG

त्या भिंतीच्या कडेकडेनेच पुढे जायला वाट आहे.
इथून घेतलेला सुधागडचा फोटो..

011_Sudhagad.JPG

या पठारावरून सहज उडी मारून पलीकडे सुधागदावर जाता येईल असेच वाटते...
दोन्ही भितींचा मधल्या खाचेतून डाव्या बाजूच्या भिंतीवरून रोपच्या सहाय्याने वर चढायचे होते (क्लायंबिंग). वर पोहचल्यावर मधली खाच रोपने पार करून (व्हॅली क्रॉसिंग) पलीकडच्या भिंतीवरून खाली उतरायचे (रॅपलींग). अशी ती पुर्ण अ‍ॅक्टीव्हिटी पुर्ण करायची होती. बापरे.... ! Happy

012_Climbing.JPG

खाली फोटोत दिसणार्‍या वरच्या बोल्टचा वापर रोप फिक्स करण्यासाठी करतात.

014Bolt.JPG

वर चढताना एका पॅचपर शिडी लटकवलेली होती त्याच्यावरून चढताना वजनदार किंवा नवख्या लोकांची तारांबळ उडते. एकतर एवढ्या वर येवून तिथून खाली उतरता येत नाही आणि दुसर म्हणजे शिडीवर पाय ठेवला की शिडीचा झोका होतो, परत मागच्या बजूला खोल दरी.. Happy

015_Ladder.JPG

तिथून थोडे वर गेल्यावर एक मोठा रॉक पॅच आहे. तो चढल्यावर माथ्यावर पोहचता येते. वर गेल्यावर बराच वेळ बसून रहावे लागले. तिथे थांबायलाही मोकळी जागा नव्हती. भिंतच ती , दोन्ही बाजुला कडा !

024_Top.jpg

फोटोत रूपेश! आणि मागच्या बाजूला काहीजण दिसतात तिथून ग्रूपचे लोक आम्हाला रोप ला बांधून सोडून देत होते...

025_Valley Crossing.JPG026_Valley Crossing.JPG027_Valley Crossing.JPG

रोपने पलिकडे जाताना खुप मजा(?) आली.
मला वरून खाली बघायचे होते पण उलटा टांगलेला असल्यामुळे ते शक्य झाले नाही.
तरी मी मान इकडे-तिकडे फिरवून थोडी मजा घेतली.. भारीच वाटत होते. Happy
मधेच माझा एक पाय आधारासाठी असणार्‍या दोरीतून बाहेर आला तसं आणखी मी रोपमधून बाहेर (शक्यच नसते) यायच्या आत घाईघाईत पलिकडे गेलो.
तिथून खाली उतरायचे होते..
इथे त्या लोकांनी लटकलेल्या रोपवरून काढून परत त्या खाली जाणार्‍या रोपला अडकवले म्हणजे लटकवले. सुरवातीपासून ते खाली उतरेपर्यंत आपण रोपला लटकलेलेच असतो Happy
फोटोत दिसत असलेल्या रोपने खाली यायचे तिथून येताना खाली बघता येत होते...
कड्यावर आपण लटकलेलो असतो आणि सगळेजण आपली मजा बघत असतात... Happy

039_Rappeling Route.JPG

***या सगळ्या अ‍ॅक्टीव्हिटी मधे सगळ्यात महत्वाची असतात ती त्या ग्रूपची माणसे..
संपूर्ण मार्गावर मधेमधे ते थांबलेले असतात. ज्याला भिती वाटत असेल तर त्याला धीर देतात आणि न घाबरता पुढे जाण्यासाठी तयार करतात. कोणताही प्रसंग आला तरी त्यासाठी ते तयार आसतात.
आपल्या सुरक्षेची पुर्ण काळजी घेतात. आपण कुठूनही घसरलो तरी खाली पडणार नसतो कारण सुरवातीपासून शेवटी खाली उतरेपर्यंत आपण रोपला अडकवलेले/लटकलेलोच असतो. Happy

सकाळी ८:०० वाजता चालू केलीली अ‍ॅक्टिव्हीटी संध्याकाळी ६:०० वाजता संपवून आम्ही परत घरचा रस्ता धरला....

048_Wall.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्या, छानचं रे.

मनुष्य खाली पडत नाही का? आणि जर दोरालाच जर बांधून ठेवले असेल आपल्याल तर पुढे पुढे दोर सरकतो की तुम्ही सरकता?

ह्म्म सही आहेत हे फोटो आणि हा रुट Happy रॅपलिंग मी लास्ट मिनिटला नाही केले ज्याम भिती वाटली होती अर्थात राजमाचीच्या रॅपलिंगपेक्षा हे जास्त कठिण वाटतय!

धन्यवाद प्रकाश , डुआय, रुपाक्का ! Happy

शँकी, मजा खर जबरीच Happy

बी, आपण नाही पडत खाली !
वर चढताना एक रोप आपल्याला फिक्स आसतो तो वरच्या माणसाच्या (तो एक्सपर्ट असतो)कंट्रोल मधे असतो . दुसरा रोप आपल्याला कनेक्ट करून ठेवलेला असतो तो आपल्याला मागे सरकवत चढायचे असते. जर अपघाताने आपण खाली घसरलो तरी ५ ते ६ फूटांपेक्षा आपण खाली येत नाही पण याची शक्यताही खुपच कमी असते ....

उतरताना पण अशीच स्थिती असते.
जरी आपण दोन्ही हात सोडले तरी थोडेसुद्धा अंतर खाली सरकणार नाही Happy

मस्त!! फोटो छान आलेत. हे रॅपलिग मी नुसते टीव्हीवर बघीतलय प्रत्यक्षात अजूनपर्यंत बघीतले नाहीये.

सुन्या खरच मस्त रे!!!!
तेलबैला ह्या नावाचेच मला पहिल्यापासुन आकर्षण होते पण कधी जायचा योग आला नाहि. फक्त सुधागडावरून त्याचे दर्शन झाले होते. ब्रेडचे दोन स्लाईस बाजुला उभे ठेवल्यासारखे.
धन्यवाद फोटो आणि माहिती शेअर केल्याबद्दल.

हायला!!
फोटु बघुनच टरकलो.
प्रत्यक्ष काय भ्या वाटत असल.

फोटु आणि वर्णन चांगल आहे. Happy

आपल्या सुरक्षेची पुर्ण काळजी घेतात. आपण कुठूनही घसरलो तरी खाली पडणार नसतो कारण सुरवातीपासून शेवटी खाली उतरेपर्यंत आपण रोपला अडकवलेले/लटकलेलोच असतो.
>>>>

ह्या एकाच वाक्यामुळे मला वाचायला धीर आला. नाहीतर नुसतं वाचतानाच भीती वाटत होती Happy

सुन्या.. मस्त आहेत रे फोटो आणि वर्णन पण छान लीहिलं आहेस रे Happy
मला वाचतानाच भिती वाटत होती... काळजी घेत जा बाबा असं काही करताना

धन्यवाद सगळ्याचे ! Happy

सॅम, दमणूक म्हणजे ... १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जेवढी होईल तेवढीच. आपण कशा प्रकारे चढतो-उतरतो यावर खुप अवलंबून असते.
गृप चिंचवड होता. Happy

धन्यवाद साधना, जागोमोहनप्यारे, निवांत पाटील , प्रीति , केदार सगळ्यांचे Happy

<<चष्मावाले लोक >> Happy काढून ठेवा..
(गळ्यात दोरी बांधून वापरला तर..... ठिक वाटतं) Happy

केदार, ग्रेट !

Pages