६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा. पण झोप लागतेय कोणाला, सामना सुरू व्ह्यायच्या आधीपासूनच एक्स्पर्ट कॉमेंट ऐकत मी टीव्हीसमोर ठाण मांडून. देवाकडे एकच प्रार्थना, सलामीवीरांना कमीतकमी खेळायची बुद्धी दे रे, अन देवाने ती ऐकली. अर्ध्या तासातच सचिन मैदानावर दिसू लागला. भारताची दुसरी विकेट पडल्यावर टाळ्यांचा एवढा कडकडाट आजवर झाला नसेल. पण आता पुढचे काही क्षण श्वास रोखून बसायचे होते, जो पर्यंत सचिन सेट होत नाही तो पर्यंत टीव्हीवरून नजर न हलवण्याचे होते. ऑन साईडला दोन सुरेख चौकार लगावत मी आज क्रिकेटरसिकांना पर्वणी द्यायला सज्ज आहे असा इशारा त्याने देताच मी जरा रिलॅक्स झालो, अन इथेच नियतीने डाव साधला. कांदेपोह्याचा चमचा तोंडाजवळ नेतो न नेतो तोच अचानक प्रतिस्पर्धी खेळाडूंचा एकच कल्ला. वर पाहिले तर एलबीडब्ल्यूची अपील, स्ट्राईकला सचिन, कॅमेरा अंपायरवर. त्या चेंडूवर नक्की काय घडले हे पाहिले नसल्याने श्वास घशात. जो पर्यंत तो अंपायर नकारार्थी मान हलवत नाही तोपर्यंत. पण त्याने बोट उचलले आणि खेळ खल्लास, रंगात भंग, क्रिकेटप्रेमींचा पचका. पुढचे काही क्षण एकच शांतता. तिथेही आणि इथेही. रिप्लेमध्ये निर्णय संशयास्पद दिसत असल्याने थोडी निराशा, थोडी चीडचीड. मात्र थोड्याच वेळात परिस्थितीचे भान राखून ग्राऊंडबाहेर पडणार्या सचिनसाठी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट. कारण एका अपयशी इनिंगने त्याच्या आजवरच्या कामगिरीचे मोल तीळमात्र कमी होणार नव्हते. सचिन निराश मनाने मानवंदना स्विकारत पॅवेलियनमध्ये दाखल..!
- एण्ड ऑफ पार्ट वन -
.
.
.
अॅण्ड नाऊ,
- पार्ट टू -
सचिन बाद झाल्यावर टिव्ही बंद करायचे दिवस आता गेले. नव्या दमाचे खेळाडू या बिकट परिस्थितीतून बाहेर काढतात का यावर आता सार्यांच्या नजरा. धवन, विजय, पुजारा हे तिघे सचिनच्या आधीच तंबूत परतले होते तर फॉर्मातला आणि भरवश्याचा कोहली सचिनपाठोपाठ माघारी. बिनबाद ३७ ने झालेली दिवसाची सुरुवात तासाभरात ८३ धावा ५ बाद या स्थितीत परिवर्तित. खेळपट्टीवर संकट मोचक धोनी आणि आपला पहिलावहिलाच कसोटी सामना खेळणारा रोहित शर्मा. वेस्टईंडिज फिरकी गोलंदाज शिलिंगफोर्डने विणलेल्या जाळ्यातना बाहेर पडायच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ पाहताना नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्वान आणि पानीसरने आपली उडवलेली धांदल सर्वांच्या ताजी स्मरणात. आपल्या सदोष तंत्रासह बचाव करावा की आपले शक्तीस्थान वापरून काऊंटर अॅटेक करावा या चक्रव्यूहात फसलेला कर्णधार माही. इथून आपण एका पराभवाच्या दिशेनेच प्रवास करणार आहोत असे समजून चुकलेला प्रेक्षक. मात्र इथेच सर्वांचे अंदाज चुकवून गेला तो आपला सध्याचा सर्वात लाडका फलंदाज रोहित गुरुनाथ शर्मा !
पण खरेच तो अंदाज चुकवून गेला का???
माझ्यासाठी तरी याचे उत्तर - नाही.
इतर कोणाला नसेल पण मला त्याच्याबद्दल पुरेपूर खात्री होती.
माझ्या रिकाम्या पोह्यांची प्लेट उचलायला म्हणून आलेल्या वहिनीची स्कोअरबोर्ड वर नजर जाताच ती ओरडली, अरे देवा ..!! जेमतेम क्रिकेट समजणार्या जगातल्या सर्वच बायकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया नेहमीच अशीच अतिउत्साही असते. त्यातही रोहित शर्माला खेळपट्टीवर पाहताच तिने सरळ पाचाच्या सहा विकेट मोजल्या. कारण एकेकाळी त्याचे खराब दिवस चालू असताना, जेव्हा तो बरेचदा आल्याआल्याच हजेरी लाऊन परत जायचा तेव्हा आमच्या दादाने त्याला "मॅगी नूडल्स" हे नाव दिले होते. मॅगी नूडल्स म्हणजे बस्स, दोन मिनिटांचाच खेळ..! आणि हेच तिच्या लक्षात राहिले होते. कदाचित गेल्या वर्षभरात त्याने केलेली लक्षवेधी कामगिरी त्यांचे लक्ष वेधून घेण्यास कमी पडल्याने अजूनही ते दोघे त्याला त्याच नावाने हाक मारायचे. आज आपल्या कारकिर्दितील पहिल्याच कसोटीत संघातली स्वताची जागा बनवायच्या दडपणाव्यतिरीक्त आता भारताचा डाव सावरायचे अतिरीक्त दडपण पाहता दादा देखील वहिनीच्या हो मध्ये हो मिसळवून मोकळा झाला. पण मला मात्र कमालीचा विश्वास होता की कदाचित स्वताची जागा टिकवण्याच्या दडपणाखाली तो बाद झाला असता, मात्र संघहिताचे दडपण त्याच्या पथ्यावरच पडणार होते. कारण हेच त्याला आवडते, अश्या परिस्थितीत खेळणे हिच त्याची खासियत आहे आणि म्हणूनच इथूनच सुरू होणार होती एक लेझी एलिगन्स असलेली एफर्टलेस फटक्यांनी भरपूर खेळी !
धोनीबरोबर त्याने केलेल्या ७३ धावांच्या भागिदारीने नामुष्कीच नाही टाळली तर सामन्यात आपल्याला थोडेफार परत आणले होते. तरीही धोनीच्या बाद होण्यानंतर डाव पटकन गुंडाळला जाण्याचा धोका होताच. कमी धावांच्या सामन्यात पाचपन्नास धावांचा लीड देखील कोण घेतो याने फरक पडतो. मात्र आश्विनच्या जोडीने त्याने आपला सहजसुंदर खेळ तसाच सुरू ठेवला. बघता बघता त्याचे शतक धावफलकावर लागले तर आश्विनचे अर्धशतक. धावगती कसोटीला अनुसरून असली तरी बघता बघता एवढ्यासाठीच म्हणालो कारण रोहित टोटल चान्सलेस इनिंग खेळत होता, कधीही आता हा पटकन बाद होईल आणि वेस्टईंडिज सामन्यात परत येईल असे वाटत नव्हते. त्यामुळे घड्याळाचा काटा जसा सरकत होता तसे धावांचे चक्र फिरत होते. आपण वेस्टईंडिजचा स्कोअर केव्हाच पार करून आता त्यांना लीड द्यायला सुरुवात केली होती. दडपण दडपण ज्याला म्हणतात ते केव्हाच झुगारले गेले होते, नव्हे आता ते दोघांनी मिळून वेस्टईंडिजच्या माथ्यावर नेऊन टाकले होते. तरीही, खराब होत जाणार्या खेळपट्टीवर चौथ्या डावात कमीतकमी फलंदाजी करण्यासाठी हा डाव शक्य तितका लांबवणे गरजेचे होते आणि नेमके हेच त्याने ओळखून शतकानंतरही कुठलीही घाईगडबड न करता आपली रनमशीन चालूच ठेवली. पलीकडून आश्विनचे शतक झाले आणि इथे रोहित शर्माने रेकॉर्डबूकमध्ये आपले नाव नोंदवले होते. पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणार्या निवडक खेळाडूंच्या पंक्तीत बसायचा मान त्याने थोडक्यात गमावला असला तरी तब्बल १७७ धावांची बोहणी केली होती. ज्या स्थितीतून त्याने सामना खेचून आणला ते पाहता सामनावीराचा बहुमान अर्थातच त्यालाच देण्यात आला. मुंबईकर सचिनचा खेळ पहायला आलेल्या कोलकतावासीयांची नाराजगी कमी कशी करता येईल हे एका दुसर्या मुंबईकराने पाहिले होते !
जे क्रिकेट नियमित फॉलो करतात त्यांना रोहितच्या गेल्या वर्षभरातील कामगिरी बद्दल खोलात जाऊन सांगायला नकोच. तरीही आकड्यांचा खेळ न करता सांगायचे झाल्यास यंदाच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा त्याच्याच असाव्यात. त्यातही नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेले धडाकेबाज आणि सोळा षटकारांनी सजलेले द्विशतक कोण कसे विसरणार. आयपीएल आणि चॅम्पियन ट्रॉफी या ट्वेंटी-२० क्रिकेटच्या फॉर्मेटमध्येदेखील त्याच्या मोक्याचा क्षणी भरभरून केलेल्या धावांमुळेच मुंबईने या दोन्ही चषकांवर आपले नाव कोरले. एक कर्णधार म्हणून दडपण न घेता खेळ उंचावण्याची त्याची क्षमता विशेषच. आता कसोटीत देखील त्याने आपला पहिलाच शिक्का खणखणीत उमटवला आहे आणि हे तो पुढेही करणार यात कोणतीही भविष्यवाणी नाहीये. सामना जिंकवून द्यायची क्षमता असलेल्या एखाद्या खेळाडूला आपण मॅचविनर असे संबोधतो मात्र त्याच निकषावर मी रोहितचा उल्लेख सिरीज विनर म्हणून करेन.
एक गंमतीशीर तुलना करायची झाल्यास, रोहितची आजवरची कारकिर्द मला "कोई मिल गया" चित्रपटातील हृतिक रोशन सारखी वाटते. त्यात हृतिकचे नाव "रोहित मेहरा" होते, तर हा आपला रोहित शर्मा. तेच नाव, तसेच आडनाव बस्स काही अल्फाबेट्स आपली जागा बदलून येतात, पण कमाल मात्र तीच. त्या सिनेमात आधी इतरांपेक्षा दुबळा म्हणून गणल्या गेलेल्या हृतिकमध्ये अचानक जादू’च्या चमत्काराने एवढी ताकद येते की की तो बास्केटबॉलचा बॉल लीलया आकाशात भिरकाऊन देतो. तर इथेही एकेकाळी संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत असलेला रोहित आजकाल चमत्कार झाल्यासारखे क्रिकेटचा चेंडू लीलया सीमारेषेच्या पार भिरकाऊ लागला आहे.
पण हा कायापालट चमत्काराने नक्कीच झाला नाहीये ना यामागे कुठली जादू आहे. त्याच्यात असलेल्या टॅलेंटबद्दल सुरूवातीपासूनच कोणालाही शंका नव्हती. क्रिकेटचे जाणकार हे वेळोवेळी बोलून दाखवायचे तर सामान्य क्रिकेटरसिकाला देखील त्याच्या काही खास ठेवणीतल्या फटक्यातून ते जाणवायचे. पण नेमके काय गंडले आहे ते समजत नव्हते आणि त्यामुळे त्याच्यातले फलंदाजीचे असामान्य स्किल धावांमध्ये परावर्तित होत नव्हते. काहींच्या मते त्याचे शॉट सिलेक्शन चुकायचे तर काहींच्या मते टेंपरामेंटचा प्रॉब्लेम होता. पण ते जे काही होते त्याला तो आता दूर भिरकाऊन देऊन सज्ज झाला आहे एवढे मात्र नक्की.
असे म्हणतात की टॅलेंट आणि ग्रेटनेस एका पिढीतून दुसर्या पिढीत पास होत असते. हेच जर फलंदाजीच्या कौशल्याबद्दल असेल तर ते नेहमी एका मुंबईकराकडून दुसर्या मुंबईकराकडे पास होत आलेय. ‘लिटील मास्टर’ सुनिल गावस्करच्या पर्वानंतर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनने या खेळावर आपली हुकुमत गाजवली, तर येणारा काळ नक्कीच ‘एफर्टलेस वंडर’ रोहित शर्माचा असेल. सचिनच्या अंतिम कसोटी मालिकेत रोहितचे होणारे पदार्पण हा निव्वळ योगायोग नक्कीच नसावा नाही का !
पराग फाटक यांच्या वॉलवरून
पराग फाटक यांच्या वॉलवरून साभार
१२ मार्च २०२४. स्थळ राजकोट. हे शब्द आहेत रवीचंद्रन अश्विनचे
५००व्या विकेटचं सेलिब्रेशन होऊन मी हॉटेलवर माझ्या खोलीत आलो. तेवढ्यात मला आईला बरं नसल्याचं बायकोकडून कळलं. तिला एकदमच बरं वाटत नसल्याने तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. ती शुद्धीत आहे का? मी पाहू शकतो का असं मी डॉक्टरांना विचारलं. त्यांनी आता तुम्ही न पाहिलेलंच बरं असं सांगितलं. माझ्या काळजात धस्स झालं. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मला काय करावं ते कळेना. काही मिनिटांपूर्वी मी ५००वी विकेट पटकावली होती. आता माझ्या डोळ्यासमोर मी या मालिकेसाठी निघताना आईला भेटलो ते आठवलं. मी थिजून गेलो. तेवढ्यात माझ्या खोलीत राहुलभाई आणि रोहित आले. त्यांनी मला सावरलं. रोहितने मला सांगितलं, तुला तातडीने निघायला हवं. तुझी घरी गरज आहे. मॅचचं काय असा प्रश्न माझ्या मनात येण्याआधी तो म्हणाला, मॅचचं आम्ही बघतो. तू बॅग भर. राजकोटचा एअरपोर्ट छोटासा आहे. संध्याकाळी ६ नंतर तिथून विमानं जा ये करत नाहीत. रोहितने बीसीसीआयच्या माध्यमातून राजकोटहून चेन्नईला जायला चार्टर्ड फ्लाईट अरेंज केलं. मनातले सगळे विचार थांबव आणि लगेच निघ असं रोहितने सांगितलं. मी तयार होऊन लाऊंजमध्ये पोहोचले तर दोन माणसं तिथे माझी वाट पाहत होती. एक सेक्युरिटी टीमचा माणूस होता आणि दुसरा होता फिजिओ टीममधला कमलेश. कमलेश माझा चांगला मित्र आहे. आम्ही एअरपोर्टच्या दिशेने निघालो. मी कसा आहे विचारायला रोहितचा कमलेशला कॉल आला. जोवर माझी घरच्यांशी भेट होत नाही तोवर तू त्याच्याबरोबरच थांब असं रोहितने कमलेशला सांगितलं. मी चेन्नईत उतरून हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. काही दिवसात सुदैवाने आईची तब्येत स्थिर झाली. चिंता मिटली. या संपूर्ण काळात रोहित संपर्कात होता. माझी आणि घरच्यांची विचारपूस करत होता. मी कर्णधार असतो आणि एखाद्या खेळाडूच्या बाबतीत असं झालं असतं तर त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली असती पण तिथून निघाल्यानंतर घरी पोहोचल्यावर आणि नंतरही विचारपूस, काळजी कोण करतं? या स्वार्थी जगात दुसऱ्याच्या कठीण प्रसंगात ठामपणे उभी राहणारी माणसं कुठे असतात? मी रोहितच्या रुपात तो माणूस पाहिला. कर्णधार म्हणून, खेळाडू म्हणून त्याच्याप्रति आदर होताच पण या प्रसंगामुळे माणूस म्हणून त्याच्याप्रति असलेला आदर दुणावला. तो माणसांसाठी असं काही करतो की ते त्याच्यासाठी सर्वस्व देऊ शकतात.
स्थळ- दुबई, आयपीएल फायनल २०२० नंतरचे क्षण
दुबईत आयोजित आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं. जेतेपद पटकावल्यानंतर मुंबई संघाने सेलिब्रेशन केलं. पत्रकार परिषद झाली. बाकी मीडिया कमिटमेंट्स पूर्ण करून कर्णधार रोहित शर्मा ड्रेसिंगरुममध्ये परतत होता. वाटेत त्याला मित्र आणि संघातील सहकारी धवल कुलकर्णी भेटला. धवलच्या कडेवर त्याची मुलगी होती. रोहितकाकाला पाहून ती चिमुरडी हसली. तो तिच्याशी खेळू लागला. खेळता खेळता विचारलं, तू झोपली नाहीस अजून? तिला कुरवाळून, थोपटून रोहित पुढे निघाला. दोन महिन्यांची स्पर्धा, जेतेपद पटकावण्याचं दडपण, तणावपूर्ण फायनल, पुढचे सोपस्कार या सगळ्यानंतरही रोहितमधला काका जागा होता. बराच उशीर झालाय, तू अजून झोपली नाहीस का असा आस्थेवाईक प्रश्न त्याने विचारला.
स्थळ- राजकोट, सर्फराझ खानचं पदार्पण
खाचखळग्यांची वाट पार करत मुंबईकर सर्फराझ खानने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत पदार्पण केलं. या सामन्याला सर्फराझच्या घरचे उपस्थित होते. सर्फराझचे बाबा हेच त्याचे प्रशिक्षक आहेत. सर्फराझला भारताची कॅप देण्यात आल्यानंतर रोहित त्याच्या घरच्यांच्या दिशेने गेला. सर्फराझचे बाबा भावुक झाले होते. त्यांचा हात हातात घेत रोहितने त्यांचं अभिनंदन केलं. रोहित त्यांना म्हणाला, ही कॅप जेवढी सर्फराझची आहे, तेवढीच तुमची आहे. तुम्ही त्याच्यासाठी किती संघर्ष केला आहे ते आम्ही पाहिलं आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. यावर सर्फराझचे बाबा म्हणाले, माझ्या मुलाला तुमच्याकडे सोपवतो आहे. सर, प्लीज त्याची काळजी घ्या. यावर रोहितने बिल्कुल बिल्कुल म्हणत त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं. कसोटीदरम्यान या संवादाबाबत रोहितला विचारलं तेव्हा तो म्हणाला, मी सर्फराझच्या वडिलांबरोबर क्रिकेट खेळलो आहे. त्यांनी सर्फराझसाठी खूप कष्ट घेतले आहेत. सर्फराझ भारतासाठी खेळणं ही त्यांच्यासाठी प्रचंड भावुक करणारी गोष्ट आहे. मी त्यांच्या भावना समजू शकतो. याच कसोटीदरम्यान सर्फराझ फॉरवर्ड शॉर्ट लेग आणि सिली पॉइंट या बॅट्समनच्या अगदी जवळच्या ठिकाणी उभं राहून क्षेत्ररक्षण करत होता. स्पिनरच बॉलिंग टाकणार आहे त्यामुळे सर्फराझ हेल्मेटविना फिल्डिंग करणार होता. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहितने त्याच्या बंबईया हिंदीत बॉलरला थांबवलं आणि सर्फराझला सांगितलं, ए भाई, यहाँ हिरो नही बनने का. सर्फराझसाठी हेल्मेट येईपर्यंत रोहितने खेळ थांबवून ठेवला. आपल्या तरुण सहकाऱ्याच्या सुरक्षेची काळजी रोहितने केली. उत्साहाच्या भरात जीवघेणा प्रसंग ओढवू शकतो हे ओळखून रोहितने त्याला समजावलंही. भलतं धाडस करू नकोस हे त्याला समजेल अशा शब्दात बोलला.
स्थळ- बार्बाडोस २०२४, वर्ल्डकप पटकावल्यानंतर राहुल द्रविड
वर्ल्डकपसह भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. रोहितबद्दल काय सांगाल, काय मिस कराल असं विचारल्यावर द्रविड म्हणाले, तो ग्रेट प्लेयर आहे, चांगला कॅप्टन आहे ते सगळं आहेच पण मी माणूस म्हणून त्याला सर्वाधिक मिस करेन. त्याने ज्या पद्धतीने मला आदर दिला. संघातल्या प्रत्येकाची काळजी घेतली. सगळ्यांना जोडून ठेवलं. आता आमच्या भेटी कमी होतील पण तो माझा सदैव मित्र राहील. तासाभरानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये बोलताना द्रविड म्हणाले, तुम्हा सगळ्यांबरोबर काम करताना अतिशय मजा आली. कर्णधार रोहितशी खास नातं निर्माण झालं. कोच आणि कॅप्टन यांच्यात सतत संवाद होतो. आम्ही चर्चा करायचो, एखाद्या मुद्यावर आमचं एकमत व्हायचं, कधी एकमेकांचं पटायचंही नाही पण तू माणूस म्हणून खास आहेस. रो, वनडे वर्ल्डकप हरल्यानंतर मला कोचपदी राहायचं नव्हतं. तू फोन केलास, कोचपदी राहावं असा आग्रह धरलास. त्यामुळे मी थांबलो. त्या फोनसाठी खरंच थँक्यू यू.
राहुल द्रविड यांचं नाव सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये घेतलं जातं. खेळाडू इतकंच माणूस म्हणूनही त्यांना वाखाणलं जातं. त्यांना रोहितप्रति किती आदर आणि आपुलकी आहे हे वर्ल्डकपनंतरच्या प्रत्येक व्हीडिओत दिसून आलं. ५०वर्षीय द्रविड यांच्या मनात जो ऋणानुबंध रोहितने निर्माण केला आहे तोच नुकतंच भारतीय संघात दाखल झालेल्या खेळाडूच्या मनातही आहे. हरभजन सिंग सामन्यापूर्वीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणालेला, रोहित यारों का यार आहे. त्याने केलेल्या धावा, रेकॉर्ड, जेतेपदं हे कौतुकास्पद आहेच पण बंदा माणूस म्हणून खरा आहे. आजही त्याच्या जुन्या मित्रांशी तसंच बोलतो. तसाच वावरतो. हरभजनचं म्हणणं खरं आहे. सोशल मीडियाने व्यापून टाकलेल्या जगात लोक फोटोलाही फिल्टर लावतात. रोहित अनफिल्टर्ड आहे.
जुन्या साहित्यात 'वडीलबंधू' अशी एक संकल्पना असायची. रोहित तो आहे. आपल्या प्रत्येकाचा आपल्यापेक्षा वयाने थोडा मोठा असा मित्र किंवा भाऊ असतो. जो आपल्याला जगरहाटी शिकवतो. आपलं भलं चिंततो. तो स्पूनफीड करत नाही पण मार्ग दाखवतो. मार्ग भरकटला तर कान उपटतो. रोहित युवा मंडळींसाठी हे सगळं अगदी सहजतेने करतो. काही वर्षांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला. विराट कोहली पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतला. अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व आलं. त्या मालिकेत प्रत्येक कसोटीगणिक खेळाडू दुखापतग्रस्त होत होते. शेवटच्या कसोटीवेळी तर नेट बॉलरला पदार्पण करावं लागेल अशी स्थिती होती. त्या मालिकेदरम्यान रोहित शर्मा फिट होऊन ऑस्ट्रेलियात दाखल झाला. रोहितच्या समावेशानंतर अजिंक्य म्हणाला, रोहित मला मोठ्या भावासारखा आहे. तो आल्याने मला बळ मिळालं आहे. युवा शिलेदार म्हणजे गार्डन में घुमने वाले मंडळींसाठी तो रोहितभैय्या आहे. काहींसाठी तो रोहितभाई आहे. काहींसाठी रो आहे. युझवेंद्र चहल त्याला रोहिता म्हणतो. तो फक्त कर्णधार नाहीये. तो घरातला आहे.
काही महिन्यांपूर्वी रोहित दोन सामन्यात शून्यावर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात त्याने सुरुवात केली. एक चौकार बसला. या सामन्यात भोपळा नाही असं वाटून रोहितने हुश्श केलं पण काही मिनिटांनी पंचांनी तो लेगबाय दिल्याचं त्याला कळलं. पुढच्याच क्षणाला तो पंचांना म्हणाला, अरे वीरू थायपॅड दिया क्या? हे विचारुन तो मिश्कील हसला. पंचांनाही हा कोण आला मला विचारणारा असं वाटलं नाही. रोहितच्या बाबतीत हातचं राखून, परीटघडीचं काहीच नाही. म्हणूनच स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड होणारे त्याचे डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्याच्या बोलण्यात शिव्या असतात पण त्यांचा उल्लेख हिणवण्यासाठी, दुखावण्यासाठी नसतो. बोलण्याच्या ओघात त्या येतात. त्याचं वागणं पीआर प्रेरित नसतं. त्यामुळे त्याच्या वागण्याला मधाळ कोटिंग नसतं. तो विसरतोही. मध्यंतरी न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्यात टॉसवेळी बॅटिंग घ्यायची की बॉलिंग हेच त्याला ठरवता येईना. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम हसून वेडा झाला. अगदी परवा वर्ल्डकपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळीही गंमत झाली. पाकिस्तानविरुद्ध मॅच म्हणजे माहोल असतो. टॉसला सगळे सज्ज झाले. रोहित नाणं उडवेल असं समालोचकाने जाहीर केलं. काही सेकंदांनंतर रोहितच्या लक्षात आलं की नाणं आपल्या खिशात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मॅचरेफरी, कॅमेरा क्रू सगळे पोटभर हसले. मग टॉस झाला.
लीडरशिप आणि त्याचे फंडे यावर हजारो टेड टॉक आणि खंडीभर पुस्तकं तुम्हाला मिळतील. रोहितने या वर्ल्डकपच्या माध्यमातून मोट कशी बांधावी ते दाखवून दिलं. या संघातल्या प्रत्येकाशी त्याचं वैयक्तिक नातं आहे. लेफ्ट आर्म चायनामन कुलदीप यादवचं करिअर पूर्णत: भरकटलं होतं. कुलदीपने बॉलिंगमध्ये काय बदल करायला हवा ते रोहितने खूप आधीच त्याला सांगितलं होतं. कुलदीपने ते बदल केल्यावर रोहितने त्याला थेट अंतिम अकरात खेळवलं. सूर्यकुमार यादव रोहितचा जुना दोस्त. अनेक वर्ष कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. सहाव्या-सातव्या क्रमांकावर यायचा. रोहितने त्याला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणलं. आज सूर्यकुमार कुठे आहे ते जग जाणतं. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंडया हे दोघंही रोहितच्याच नेतृत्वात घडले, बहरले.
रोहित यशस्वी जैस्वालच्या बरोबरीने नुसता सलामीला जात नाही, तो त्याचा दादाच आहे. आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध मॅच असली की राजस्थानकडून खेळणारा यशस्वी सरावाच्या वेळी रोहितच्या बाजूला बसलेला दिसतो. जीवघेण्या अपघातातून सावरत पुनरागमन करणारा ऋषभ पंत रोहितचा दोस्त आहे. वयात बरंच अंतर असलं तरी रोहित नेहमी त्याच्या पाठीशी आधारवड होऊन उभा राहिला आहे. भारतीय संघात नवीन आलो तेव्हा दडपण वाटायचं. रोहितभाई आम्हा पोरांना घेऊन जेवायला बाहेर घेऊन जायचे, गप्पा मारायचे असं संजू सॅमसन सांगतो. रोहितभाईंची एक वेगळीच शैली आहे, त्यांच्या नेतृत्वात खेळताना खूपच मजा येते असं मोहम्मद सिराज सांगतो. तुला जशी फिल्डिंग हवेय तशी लावू, तुला जसा अटॅक करायचा असेल तसा कर असं सांगतात. अडलं तर ते त्यांचे प्लॅन्स सांगतात असं सिराज सांगतो. वर्ल्डकपदरम्यान अर्शदीप सिंगवर बॉल टेंपरिंगचे आरोप झाले. रोहितने पत्रकार परिषदेत या आरोपांचा खरपूस समाचार घेत विषयच संपवून टाकला. इंग्लंडच्या सामन्यात अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहितला हा पुरस्कार मिळायला हवा होता कारण त्याच्या खेळीमुळेच एवढ्या धावा झाल्या असं अक्षर म्हणाला. संपूर्ण स्पर्धेत विराटची बॅट रुसली होती. दरवेळी रोहितला विराटबद्दल प्रश्न विचारण्यात येत होते. एकदाही त्याचं उत्तर बदललं नाही. विराट मोठा खेळाडू आहे. त्याच्या फॉर्मची आम्हाला चिंता नाही. एकाच कालखंडात खेळणारे विराट आणि रोहित खरंतर एकमेकांचे प्रतिस्पर्धीही पण ते दोघं याच्या पल्याड गेले आहेत.
नुसती नातं तयार करून, जपून होत नाही. काम बोलावं लागतं. रोहितचं काम बावनकशी आहे. वर्ल्डकप जिंकायचा असेल तर आक्रमक सुरुवात करावी लागेल हे त्याने ओळखलं. प्रत्येक सामन्यात रोहित नावाचं वादळ घोंघावत असे. हे काम चोख पार पडलं की बॉलिंगमधले बदल, फिल्डिंगमधले बदल ही जबाबदारी सुरू व्हायची. सलग ८ सामने तिन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत रोहितच्याच नेतृत्वात भारताने वर्ल्डकपवर नाव कोरलं. वनडे वर्ल्डकपमधल्या पराभवानंतर हमसून रडणाऱ्या रोहित शर्माला पाहून क्रिकेटरसिकांच्या काळजात कालवाकालव झाली होती. परवा बार्बाडोसमध्येही रोहितच्या डोळ्यात अश्रू होते पण ते विजयाचे होते. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या मांदियाळीत स्थान पटकवायचं तर माणूसही तेवढा खास हवा. तसंच झालं!
-पराग फाटक
मी पण रोहितचा फॅन आहे पण हे
मी पण रोहितचा फॅन आहे पण हे वरचे काय किस्से झाले? पाणचट काहीतरी लिहीलंय. मटणाची थाली समोर येईल म्हणून वाट बघत बसायचं आणि कोबीची भाजी समोर यावी त्यातला प्रकार आहे हा. ज्याने लिहीलंय तो महाभयानक अल्ट्रा बोरिंग माणूस आहे. पोरीला झोपली नाहीस विचारलं रोहित ग्रेट माणूस. अरे उठली असेल उशिरा तिकडे तेव्हा दुपार होती. अश्विनला फोन केला रोहित ग्रेट माणूस. सरफराजच्या बाबांशी हात मिळवला रोहित ग्रेट माणूस. अरे काय हे. काय पण जिलेब्या पाडत बसायच्या.
वर्ल्डकप चालू असताना आणि
वर्ल्डकप चालू असताना आणि विजया नंतर एकूणच तो हार्दिक पांड्या सोबत जसे वागला त्याला तोड नाही!
मुंबई मध्ये हार्दिक पांड्याला ट्रॉफी घेऊन त्याने लीड करायला सांगितले. त्यानंतर वानखेडे वर मुद्दाम एका प्रश्नाचे उत्तर देताना अचानक हार्दिकचे कौतुक सुरू करून पब्लिक ला हार्दिक हार्दिक ओरडायला लावले.. जिथे त्याला बरीच ट्रोलिंग झेलावी लागत होती.. तिथेच हा मानसन्मान त्याला मिळेल हे रोहितने बघितले.. हार्दिकच्या डोळ्यातून पाणी आले.. आशा करतो रोहीतच्या सानिध्यात त्याचे व्यक्तिमत्त्व सुद्धा तसेच बहरेल..
After Rahul Dravid, Rohit
After Rahul Dravid, Rohit Sharma also decides to give his ₹5 Crore prize money, Indian captain unhappy with support staff's bonus
https://m.thesportstak.com/cricket-news/after-rahul-dravid-rohit-sharma-...
*दानशूर रोहित शर्मा*
एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे भाई
ही माणसे खेळाडू म्हणून लिजेंड आहेतच. त्याच सोबत माणुसकी आणि खिलाडूवृत्तीची फुटपट्टी लावता फार पुढे गेली आहेत
कपिल शर्मा शो रोहित शर्मा
कपिल शर्मा शो रोहित शर्मा आलेल्या भागाच्या क्लिप्स फेसबुकवर वर आल्यात. एका क्लिपमध्ये कपिल रोहितला तुझ्या टीममध्ये अमुक गोष्ट कोण करतं, अशा प्रकारचे प्रश्न विचारत होता. कोणत्या क्रिकेटरचा फोन स्पीकर ऑन ठेवून घेऊ शकत नाही असा एक प्रश्न होता.
यावर रोहितने उत्तर दिलं की तो मीच असेन. कारण माझ्या वाक्याची सुरुवात आणि शेवट शिवीने होते आणि मध्येही एकदोन शिव्या असतातच.
मग स्टंप माइकने पकडलेल्या रोहितच्या काही शिव्या वाजवण्यात आल्या.
आपल्याच तोंडाने हे सांगणारा रोहित खरंच किती महान आहे. त्या च्यासारखा दुसरा क्रिकेटपटूच काय, माणूसच झाला नाही आणि होणार नाही.
राहुल द्रविडनेसुद्धा रोहितचा आदर्श ठेवत आपल्याला मिळालेला बोनस नाकारला. पण मिडियाने जाणूनबुजून त्याचीच बातमी आधी दाखवली.
रोहीतच्या शिव्या मिठी लगे है
रोहीतच्या शिव्या मिठी लगे है तेरी गाली रे या कॅटेगरीमधील आहेत. यावरून त्याचे कॅरेक्टर आणि जवळचे लोकं त्यावर किती प्रेम करतात हे समजते.
नुसते शिव्याच नाही तर कोणालाही मागून येऊन धपाटा मारून जातो, पोटात गुद्दा काय मारतो, हूल काय देतो, प्रेमाने गळा काय धरतो असाही त्याचा एक व्हिडिओ आहे. मनाने राजा माणूस आणि यारो का यार है. आमच्याकडे त्याच्या या वागण्याचे फॅन आहेत. पक्का मुंबईकर आहे तो..
इरफान पठाण म्हणालाच होता की आजच्या तारखेला क्रिकेट खेळणाऱ्यामध्ये त्याच्याइतका चांगला माणूस दुसरा कोणी नाही. आणि लागलीच हरभजन, जतीन वगैरे सर्वांचे यावर एकमत झाले होते.
Rohit Sharma- The GOAT .
Rohit Sharma- The GOAT .
His levels are unmatchable!
(No subject)
माझे पण मम!
माझे पण मम!
रोहितने अंड्या दिला.
रोहितने अंड्या दिला.
Here’s the complete list of
Here’s the complete list of records Rohit Sharma broke in Cuttack:
*Most Centuries by an Indian Player After Turning 30*
Rohit Sharma smashed his 36th international century across formats since turning 30, the most by an Indian batter. This record previously belonged to legendary Sachin Tendulkar, who crossed the three-figure mark 35 times after celebrating his 30th birthday.
*Most ODI Hundreds After 30th Birthday*
Rohit Sharma broke Sanath Jayasuriya’s world record of scoring the most ODI centuries after crossing 30 years of age. Rohit notched up his 22nd ODI hundred after turning 30 and went past the Sri Lankan legend’s tally of 21 ODI centuries after the age of 30.
*Most 50-Plus Scores by an Indian Opener*
This century was Rohit Sharma’s 121st fifty-plus score by an Indian opener across formats in international cricket. He surpassed batting maestro Sachin Tendulkar, who had scored fifty or more while opening the innings 120 times.
*2nd-Highest Runs by an Indian Opener Across Formats*
Rohit Sharma also surpassed Sachin Tendulkar to become India’s second-most successful opener across formats. Rohit has amassed 15,404 runs as an opener in international cricket, while Tendulkar scored 15,335 runs. Rohit Sharma only trails Virender Sehwag, who accumulated 15,758 runs as an opener.
Rohit Sharma Becomes The
Rohit Sharma Becomes The First Indian Captain To *Whitewash* Opponents In 4 ODI Series In The History
आजच्या तारखेला रोहित शर्मा
आजच्या तारखेला रोहित शर्मा इतिहासातील सर्वाधिक विजयी रेशिया असलेला कर्णधार आहे.
https://www.timesnownews.com/sports/cricket/rohit-sharma-creates-history...
The win over Bangladesh was Rohit's 100th win as captain in international cricket and he became the joint fastest captain along with Ricky Ponting to win 100 matches with a win percentage of over 70
Pages