मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण लाईक आणि सबस्क्राईब पाहिला . मला आवडला . छान एन्गेजिंग आहे , बऱ्याच दिवसांनी मराठीत चांगला सिनेमा पहिला .

फुलवंती पहायला घेतला. पण सोडला अर्ध्यातच.
त्या प्राज्क्ता माळीला काही जमलं नाही ते पात्र.
मध्येच स्वच्छ मराठी, ते हि अलीकडचे आणि मध्येच गावरान मराठी… जराही दम नाही संवादफेक मध्ये.
बाकी, सेट्स वगैरे चांगले केलेत. दुसर्‍या कोणाला तरी घ्यायला हवे.
ती अमृता घेतली असती तर बरं झालं असतं..( वात आणलाय चंद्रमुखी नंतर तरी)

प्रामा स्वतः नृत्यांगना आहे असे एकलय पण तिचे प्रत्यक्षातले डान्स प्रोग्रॅम पाहून कधीच वाटले नाही, जराही ग्रेस नाही नाचात. फक्त गोल पापडसारखा चेहरा आणि एकच भाव..
गश्मीर फक्त दिसायला ठि़कय पण मक्ख भाव…

स्वाती ती गाणी बेस्टच आहेत. लता आणि बाळ कॉम्बो. बहुदा त्यानंतर फार नाही आली दोघांची, माया मेमसाब, भय इथले संपत नाही वै सोडता. माई री एकदम टिपिकल हृदयनाथ आहे. फार आवडते ते.

गश्मीर फक्त दिसायला ठि़कय पण मक्ख भाव>>>

कुठल्यातरी ओटीटीवर त्याचा मला काही प्रोब्लेम नाही चुकुन पाहिला. कथाच नाही चित्रपटाला. वर हा ठोम्ब्या… चेहर्‍यावरची माशीही उडत नाही असा आहे. रविंद्र महाजनी देखणा होताच पण चेहरा प्रसंगानुरुप भाव दाखवायचा.. ह्याच्या चेहर्‍यावर लॉस्ट भाव असतो कायम.

: मोहे नैहर से अब तो बुलाय ले पिया.>>
सही! शुद्ध केदार आहे ना.
तो म वरुन प वर जातानाचा ग चा टच (बुलैले पिया मध्ये) किती गोड वाटतो.

फुलवंती प्राईमवर आलाय.
वरच्या सर्वच कमेंट्स शी सहमत.
मला बोर झाला.

गमा ला ३-३ वेळा अंघोळ करताना बघून पण मजा नाही आली Sad

सगळ्यात चक्क स्नेहल तरडे च काम चांगलं वाटलं.

फुलवंती बघायचा प्रयत्न केला. पहिली २० मिनीटं बघून सोडून दिला. बाकी वर ज्यांनी ह्याबद्दल लिहिलं आहे त्यांच्याशी सहमत. प्रामा अगदी सुमार अ‍ॅक्टिंग आणि नाचणंही. गश्मिर जस्ट आला आणि लगेच बंद केला त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही. जितकं स्ट्राँग प्रमोशन करतात तितक्याच सिरियसली अ‍ॅक्टींगही केली तर!!

लाईक आणि सबस्क्राईब बघितला. एकदम मस्त आहे. सस्पेन्स टिकवून ठेवलाय, अनेक वळसे आहेत. मजा आली बघायला. ओळखीच्या-अनोळखी सगळ्या कलाकारांची कामं एकदम चांगली झाली आहेत.

आवडलं असतं मला लिहायला... पण चित्रपटावर अजून कधी लिहिलं नाही.

येथे इतर लोकं खूप सही पिसं काढतात. ते वाचायला आवडतं.

लाईक आणि सबस्र्काईब>>>> बोर झाला. मधेच सोडून दिला. सुरूवातीचीच ती अमेय वाघची पार्टी, त्या पॉलिटिशन आणि अजून एका माणसाबरोबरचा सीन इथेच बोर झाले. असं वाटतंय माझ्यातच पेशन्स कमी आहेत हल्ली Wink

फुलवंती पाहिला.
इथल्या सगळ्यांशी सहमत. कपडेपट पण आवडला नाही.
बाकी मूळ मालिकेत ती शास्त्री बुआंच्या घरी राहायला जाते इथे वेगळाच शेवट.
एकदा पाहायला ठीक आहे.

संपूर्ण भारतातून फुलवंतीला शिकवायला आलेल्या नर्तिका हा तर सर्वात मोठा विनोद आहे. विभावरी देशपांडे इरकल तमिळ पद्धतीने गुंडाळून आंडाल अंबाडा बांधून हिंदी बोलते, आणि ती कुणी मुघल अनारकली घातलेली नर्तकी त्यावर ठुशी घालून मराठी बोलते!
मस्तानी महाल आणि त्यातला नाच हा बहुतेक 'भूल भुलैया'ला नॉड आहे. तो बॅड आहे.>>>>>> Lol

लाईक अँड सबस्क्राईब मस्त आहे.

ला व स पाहिला. एकदा पाहण्यासारखा आहे. बर्‍याच गोष्टी पटल्या नाहीत पण चित्रपटाला कथा आहे व लॉजीकल एंड आहे हेच खुप झाले. हल्ली मराठी चित्रपटात शेवट पर्यंत तग धरुन राहिले तरी हाती काहीच पडत नाही.

स्प्रूहा व गश्मिरचा मला काही प्रोब्लेम नाही पाहिलेला. कथा काय याचा सुगावा शेवटपर्यंत लागु दिला नाही हेच दिग्दर्शकाचे यश.. त्यात गश्मिर इतक्या माठ चेहर्‍याने वावरलाय की त्याच्याबद्दलच्या इथक्या कमेंटी वाचुन हा कुणी दुसरा गश्मीर आहे का असा प्रश्न पडतो.

नवरा माझा नवसाचा २ बघितला.
अतिशय रटाळ. ओव्हर ॲक्टिंग. छोटीशी स्टोरी.
अशोक मामा खूप दमलेत ते बघवत नाही अजिबात.

स्व जो आणि सचिन दोघेही बोर.
निर्मिती सावंत ला वाया घालवलं आहे.
नवीन अभिनेत्री सो-सो.

शेवटी अशोक सराफच स्वजो चे हरवलेले बाबा आणि निर्मितीचा हरवलेला नवरा आहे हे दाखवलं असतं तर सुखाने डोळे मिटले असते. अगदीच सोपं होतं तसं दाखवणं त्यांना. फक्त ' ही पोरगी कोणाची ' आणि ' दुनियादारी ' यांची किंचितशी कॉपी झाली असती. पण चालून गेलं असतं. तेवढीच हॅपी एंडिंग.

फुलवंती पळवत पळवत पाहिला...
गश्मीर जे काही वाक्य पुटपुटतो ते नाचता नाचता वाद्यांच्या आणि घुंगरांच्या इतर आवाजात.. स्वत: गाणे गात नाचणार्‍या फुलवंती ला इतकं स्पष्ट कसं काय ऐकु येतं ?
मुघल दरबारात फुलवंती शुद्ध मराठी बोलते आणि पेशव्यांच्या पुण्यात आल्यावर अशुद्ध मराठी का बोलते ?
एडीटींग करताना पण या चुका सुधारता आल्या असत्याच की....
नृत्य ओके ओके..
प्राजक्ता माळी गर्ल नेक्स्ट डोअर म्हणुन गोड आहे पण संपुर्ण भारतातली सौदर्यवती नृत्यांगना म्हणुन कमी वाटते...पण असो...
पहिल्या गाण्यातला कोरस आवडला...
मस्तानी सोबत नाचायचा सीन आवडला..
स्नेहल तरडे सगळ्यात बेस्ट.. स्वयंपाकघरातला सीन मस्त केला आहे.. तुळशीजवळचा सुद्धा...

बाय द वे....फुलवंती ज्या लग्नासाठी पुण्यात आलेली ते लग्न झालं की नाई ?

प्राजक्ता माळीने फक्त महाराष्ट्राची हास्यजत्राचं अँकरींग करावं. ते तिला जमतं (अधे मधे घोड्यासारखं खिंकाळत हसते ते सोडलं तर). बाकी तिच्या इन्स्टावर तिचे दागिने विकणं किंवा बाकी ब्रँड्स एन्डॉर्स करणं वगैरे साईड बिझनेस चालू आहेच तिचा.

फुलवंती बघितला. प्राजक्ता माळी अजिबात म्हणजे अजिबातच रुपगर्विता नृत्यांगना वाटत नाही. ना नाच ना अभिनय. अमृता खानविलकर किंवा अगदी सोनाली कुलकर्णी ज्युनियरही शोभली असती फुलवंती म्हणून, प्राजक्ताच्या तुलनेत. गश्मीर ठोकळा वाटतो. स्नेहल तरडेंनी त्यातल्या त्यात चांगलं काम केलं आहे. संगीतही सो-सो आहे, एकही गाणं नंतर लक्षात राहात नाही Sad

स्नेहल तरडे दिग्दर्शिका ही आहे. तिला अ‍ॅक्टिंग चे थोडे मार्क दिले तरी भन्साळीची आंधळी कॉपी करण्याबद्दल ते सगळे कापायला हवेत. उदा. तिचा रोल बाजीराव मस्तानीमधल्या प्रिचो वरून इन्स्पायर्ड आहे. पण पेशवेकाळातल्या सौभाग्यवती स्त्रिया पांढरी साडी कदापि नेसणार नाहीत, घरात केस मोकळे सोडून फिरणार नाहीत हे भन्साळि ला नसेल माहित पण हिला माहित असायला हवं होतं ना!

तसं तर ह्यांना बरम्च काही माहित असायला हवं होतं. वेल्वेटचे जरदोझी एम्ब्रॉयडरी ब्लाऊज वगैरे सुद्धा. पण एवढे कष्ट कोण घेईल? कॉपी करणं सोप्पं नाही का?

नवरा माझा नवसाचा २ बघितला.
अतिशय रटाळ. >>>>>> +++१११ कित्ती वेळा तो सुप्रियाचा वेडगळ डायलॉग... मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा Lol

एकेकाळी हलके फुलके विनोदी चित्रपट देणाऱ्या सचिनला ही अवदसा का आठवावी? मला तर पहिला भागच बोर झाला होता.

पियू आणि अंजली , अगदी. +१
अंजली, १०८ वेळा झाले असेल. त्यापेक्षा भयानक होते, स्वजोला शर्टलेस बघणे.

Good Night Take Care

असा एक सिनेमा होता. त्यांचाच आहे का Like & Subscribe ?

Pages