भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
पडद्यावर अँग्री ॲक्शन हीरो
पडद्यावर अँग्री ॲक्शन हीरो असलेल्या सोनू सूद याला पडद्याबाहेर परोपकारी वर्तन करताना पाहून मऊसूद म्हणू शकतो.
(No subject)
>>> पडद्यावर अँग्री ॲक्शन
>>> पडद्यावर अँग्री ॲक्शन हीरो असलेल्या सोनू सूद याला पडद्याबाहेर परोपकारी वर्तन करताना पाहून मऊसूद म्हणू शकतो.
किंवा साळसूद.
स्वाती
स्वाती
किंवा दुसरा कोणता शब्द >>>>
किंवा दुसरा कोणता शब्द >>>>
मृदू, नाजूक या अर्थी
अरवार, अरवाळ किंवा अरु
हे शब्द शब्दरत्नाकरात आहेत.
काही खुसखुशीत खाद्यपदार्थांच्या बाबतीत अरवार ऐकला आहे.
अलवार हाही आणखी एक शब्द.
अलवार हाही आणखी एक शब्द.
शब्दकोशात आरळ हाही दिसतो आहे.
पुढे हरवार, हरवाळ , हळवार, हळुवार हेही आहेत.
सोनू सूद = मऊसूद / साळसूद
सोनू सूद = मऊसूद / साळसूद
अरवार, अरवाळ किंवा अरु तीनही
अरवार, अरवाळ किंवा अरु तीनही नवीन माझ्यासाठी. अलवार माहित आहे. आभार !
पण अरवार = खुसखुशीत म्हणजे मऊसूतच्या विरुद्ध होईल ना ?
अरुंधती म्हणजे काय आणि?
अरुंधती म्हणजे काय आणि?
अलवार/अरवार/हरवाळ इ. म्हणजे
अलवार/अरवार/हरवाळ इ. म्हणजे डेलिकेट टेक्स्चर.
सहज स्पर्शानेदेखील तुटेल/मोडेल/फाटेल असं नाजुक.
मग ते अती मऊपणामुळे असेल किंवा अती खुसखुशीतपणामुळे.
‘अळुमाळू’ यांचाच चुलतभाऊ.
‘फुले माझी अळुमाळू - वारा बघे चुरगळू’
Gudasta sali he pu la
Gudasta sali he pu la hyanchya kathet aahe. Asami asami madhe te Ghar shodht jat astatat. Achanak ek bayakancha gholka yeto tithe ek bai bolat yete Teva ka te patrika chhaptana mistake hote Narayan kissa sangto Teva ek mhatari gudasta sali lagna jhale asa ref dete. Farend confirm.
तीन एक आठवड्यापूर्वी
तीन एक आठवड्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स मध्ये येणारे आठवडी शब्दकोडे सोडवायचं प्रयत्न करत होते . जवळपास सोडवलेले होतेच . एक शब्द मात्र येत नव्हता लक्षात कितीही डोके खाजवले तरीही
घरधनीन / गृहिणी या शब्दाचा समानार्थी शब्द होता तो .
म्हणजे इतर शब्द जोडले असता जो शब्द तयार होत होता तो मी कधीच वाचलेला नव्हता . म्हणून मी तसेच ठेवून दिले ते पान आणि पुढच्या रविवारी आवर्जून उत्तर पाहिले.
तो समानार्थी शब्द आहे खुतखावणी
घरधनीन / गृहिणीचा पर्याय .
तर हा खुतखावणी शब्द कुठे वापरला गेला आहे ? संस्कृतमध्ये काही आहे का ?
तसेच या ही आठवड्यात चरबी या
तसेच या ही आठवड्यात चरबी या शब्दाला वसा हा पर्याय देण्यात आलेला आहे . हा ही पर्याय कधी वाचनात आलेला नाही .
खुतखावणी हा ‘ख़ुद ख़ाविंद’
खुतखावणी हा ‘ख़ुद ख़ाविंद’ (स्वतः मालक)चा अपभ्रंश आहे.
हे माहीत नव्हते . धन्यवाद
हे माहीत नव्हते . धन्यवाद स्वाती .
>>> चरबी या शब्दाला वसा
>>> चरबी या शब्दाला वसा
हे माहीत नव्हतं, पण मांसाहाराला वशाट म्हटलेलं ऐकलं आहे त्याचा काही संबंध असेल का असा विचार मनात आला.
असू शकेल . दोन अक्षरी शब्द
असू शकेल . दोन अक्षरी शब्द हवा आहे तिथे
वसा:
वसा:
१ मज्जा; मगज. २ चरबी. 'दुधांत एक प्रका- रची वसा असते.' -विवि. ८.२.२२. ३ अंतस्त्वचा. [सं.] ॰मेह-पु. लघवीचा एक विकार. मेह पहा.
दाते शब्दकोश
माहिती नव्हता हा अर्थ.
दाते शब्दकोशनुसार मग वसा वरून
दाते शब्दकोशनुसार मग वसा वरून वशाट शब्दाची व्युत्पती झाली असावी का ?
स्वातींच्या पोस्टमध्यन पण तसाच अर्थ ध्वनीत होतो .
अळुमाळू >> सुंदर! अवचिता
अळुमाळू >> सुंदर! अवचिता परिमळू आठवलं.
वशाट >> ओशट वरून असावं असा समज होता.
वसा >>>
वसा >>>
अजून एक :
वपा = चरबी
वपिन = चरबीचा मुख्य घटक
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%BE+
छान चर्चा.
छान चर्चा.
अरवार = डेलिकेट टेक्स्चर.
अरवार = डेलिकेट टेक्स्चर. सहज स्पर्शानेदेखील तुटेल/मोडेल/फाटेल असं
समजले.
@ वसा - चरबी याअर्थी हिन्दीत वापरतात. मराठीत वापरतात हे नवीन समजले. बेस्ट !
अरवारचा जुळा भाऊ सकवार.
अरवारचा जुळा भाऊ सकवार.
दोन वेळेलाच हा शब्द कानी पडला आहे - १. शिवाजी महाराजांच्या एका पत्नीचे नाव २. 'राजसा जवळी जरा बसा' या गाण्यात.
'तबक' हा पूजेबिजेशी संबंधित
'तबक' हा पूजेबिजेशी संबंधित सात्विक वाटणारा शब्द म्लेंच्छांच्या भाषेतून आला आहे हे कळल्यावर माझ्या भावना दुखल्या. तुमच्याही दुखवतो.
दुखल्या दुखल्या. हे माहीत
दुखल्या दुखल्या. हे माहीत नव्हतं.
देवापुढे ठेवलेले तबक आणि विडा
देवापुढे ठेवलेले तबक आणि विडा देण्यासाठीचे तबक जुन्या मराठी लेखनात वारंवार येते
तबक मांस ही कश्मीरी डिश फेमस आहे. (सगळा फोकस खाण्यात बघा )
रच्याकने, म्लेंछांच्या भाषेत “तबक” चे अन्य अर्थ:
- मोठे ताट / उथळ परात
- थर/ लेयर (हिन्दी अपभ्रंश = तबका, गरीब तबके के लोग वगैरे )
- एखादा प्रदेश
संपूर्ण जग, पृथ्वी (सारा तबक थरथराता है वगैरे)
तबक बद्दलची चर्चा.. >>
तबक बद्दलची चर्चा.. >>
हेतूपुरस्सर शब्दाचा उगम काय असेल?
एका तबकावर दुसरे तबक उपडे
एका तबकावर दुसरे तबक उपडे ठेवल्यावर जी तयार होते ती तबक-डी
लोखंडाला हिंदीत इस्पात
लोखंडाला हिंदीत इस्पात म्हणतात की स्पात?
कारण ते लोक अर्ध्या स ने सुरु होणार्या प्रत्येक शब्दाच्या आधी इ लावतात.
Pages