शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, तुम्ही म्हणताय ते तूस का?
कारण धान्याचे, गवताचे, लाकडाचे बारीक कण जे डोळ्यात, बोटात वैगेरे जातात त्यांना तूस म्हणतात.
काही ठिकाणी गदळ असे म्हणतात. आमच्या गावी एक आजी डोळ्यातील गदळ सुईने काढायची

हो..आम्हीही तूस च ऐकले आहे..
अगदी हमखास लाकडाच्या खोक्याचे अथवा लाकडी ओबडधोबड पट्टीवरून हात फिरवला की तूस जायचे बोटात...डोळ्यांत पाणी येईपर्यंत वेदना व्हायची..

तूस +१

आपण जसू शब्द ऐकला आहे तसू तो वापरतो.

माधव, तुम्ही म्हणताय ते तूस का? >>> हो. मी पण त्याला तूसच म्हणतो. मातृमराठीत ते तूस आणि पितृमराठीत ते तसू आहे माझ्याकरता.

हपा Rofl

वृथापुष्ट

बंगालीत वृथापुष्ट उडाणटप्पू / यूसलेस माणसांना म्हणतात. आज सहज मराठी शब्दकोशात बघितले तर चक्क सेम शब्द सेम अर्थ !!

संस्कृतोद्भव शब्दांचा असा विविध भाषांत संचार ही एक गंमतच आहे.

वृथापुष्ट >>> 'खायला काळ आणि भुईला भार' तंतोतंत.

संस्कृतोद्भव शब्दांचा असा विविध भाषांत संचार ही एक गंमतच आहे.>>> अगदी. Happy

आभार !
* * * * *
मुका मुलगा होणे / मुका जावई येणे
= मुलीला प्रथम न्हाण येणे
हे ग्रामीण वाक्प्रचार आहेत.

यात ‘मुक्या’चा काय संबंध असावा ?

१. पान नंबर पर्यँत URL दिसतेच, ती लिंक कॉपी करून नोटबूक मध्ये (किंवा ती वेगळी विंडो ओपन केली असेल आणि कॉपी जिथे करायचीय ती वेगळी विंडो असेल तर सरळ तिथे) पेस्ट करायची.
२. मग हव्या त्या कॉमेंवर राईट क्लिक करून inspect वर क्लिक करायचे. आणि जे काही उघडते ते पाहुन न घाबरता धीर करून बघायचे. सेंटरला हायलाईट केलेली पट्टी दिसेल.
कॉमेंट छोटी असेल तर त्यात कॉमेंटही दिसेल, किंवा मोठी असेल तर त्या ऐवजी लंबगोलात चार डॉट्स दिसतील. (त्या आधी असलेल्या भरीव त्रिकोणी ऍरोवर क्लिक करून कॉमेंट तिथे उघडता येते, खात्री करण्यास.)
मग त्या मध्य भागापासून वरच्या ओळी पहात जायचे. १० -१५ ओळींच्या वर a id="comment-1234567" असा कॉमेंट नंबर दिसेल.
तो सरळ कॉपी करता येत नाही. त्यावर राईट क्लिक करून "edit attribute" वर क्लिक करायचे आणि मग परत राईट क्लिक केले की बरोबर comment-1234567 एवढे हायलाईट होते ते कॉपी करायचे.
३. आधी पेस्ट केलेल्या लिंक पुढे # चिन्ह देऊन तिथे पेस्ट करायचे.

या पेक्षा सोपी पद्धतही असेल. कुणाला माहीत असेल तर सांगा.

शोध सुविधेतून काही शोधल्यास तिथे योग्य ती कॉमेंट सापडून ती उघडल्यास UR कॉमेंट आयडी सकट उघडते आणि आयती URL मिळते. मग सरळ कॉपी पेस्ट.

छान माहिती!
किती हुशार लोक!!

पण हे मोबाईल वरून नाही ना जमणार?

शाहीर रामजोशी यांच्या सुप्रसिद्ध "सुंदरा ..." लावणीचा शोध घेत असताना "शब्दयात्री" ह्यांच्या ब्लॉगवर
“पाटील” शब्दाचा रोचक इतिहास आढळला.
https://shabdyatri.com/blog/history/patil-history/
तसेच त्यांनी शब्दांच्या व्युत्पत्ती वर काही लिखाण केले आहे. ते
https://shabdyatri.com/marathi-etymology/
इथे मिळेल.

मोबाईलवरून कीचकट काम आहे.
दुसऱ्या कुठल्या धाग्यात लिहेन, इथे अस्थानी होईल.

(थोडक्यात: कॉमेंट आहे त्या पेजची URL edit करून URL च्या आधी (https च्या आधी) view-source: एवढे लावायचे स्पेस न देता. आणि मग ती मॉडीफाईड URL उघडायची. मग त्यात ती कॉमेंट शोधायची, आणि ती दिसली की त्याच्या वरील कॉमेंट आयडी शोधायचा.)

विस्मृतीत गेलेले मराठी शब्द :

सोमवार ला इंदुवार आणि चंद्रवार असे एका जुन्या मराठी दीर्घलेखात वाचले. आधी तो लेखकाचा आगावूपणा असेल असे वाटले. पण पुढे वाचतांना वारांची खालील नावे पुन्हापुन्हा आलीत :

सोमवार = चंद्रवार, इंदुवार
मंगळवार = भौमवार
बुधवार = सौम्यवार !! (काय लॉजिक?)
गुरुवार = बृहस्पतिवार/ बृहस्पतवार
शुक्रवार = भृगुवार
शनिवार = मंदवार !!
रविवार = आदित्यवार, ऐतवार

एके जागी शनिवाराला “स्थिरवासर” असे लिहिलेले होते. लेखन वर्ष १९६२. आता कुणी वारांसाठी ही नावे वापरत असेल असे नाही वाटत, म्हणून इथे लिहितोय Happy

अनिंद्य, छान.
वि स खांडेकरांच्या कादंबरीत आदितवार अस वाचलेय बरेचदा.
ऐतवार हे आदित्यवार याचेच अपभ्रंश रूप.
उत्तरेकडे बृहस्पतिवार अजून वापरतात.
शनीची गती/ विशेषण मंद (slow) असल्याने मंदवासर असे नाव आहे.
शनी एकच राशीत बरच वेळ (स्थिर) राहत असल्याने स्थिरवासर असे नाव असावे.

Pages