Submitted by साक्षी on 29 September, 2023 - 01:20

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्य -
सारण -
खजूर : ४-५
काजु - ७-८
बदाम - ७-८
अक्रोड - ५-६
तूप - १ चमचा
आवरण -
१) उकडून सालं काढून मॅश केलेले बटाटे - २ छोटे
२) आरारूट / साबुदाणा पीठ / उपवास भाजणी (जिरे विरहित) - १ किंवा २ चमचे
तळणीसाठी तेल (फोटोत नाहिये)
क्रमवार पाककृती:
कृती
१) तूप घालून सगळी ड्राय फ्रुट्स मिक्सरवर भरड वाटून घ्या.
२) मॅश केलेल्या बटाट्यात आरारूट / साबुदाणा पीठ / उपवास भाजणी घालून हलक्या हाताने मळून घ्या. (उपासासाठी करायच्या नसतील तेंव्हा ब्रेड क्रम्स घातले तरी चालतील)
३) बटाट्याचे आणि सारणाचे गोळे करून घ्या.
४) बटाट्याच्या गोळ्याची वाटी करून त्यात सारण भरून बॉल्स करून घ्या.
५) मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
६) तयार कचोरी वाढा.
दुसर्या अॅंगलने
वाढणी/प्रमाण:
१ किंवा २
अधिक टिपा:
तेल कमी पुरेल म्हणून कचोर्या आप्पेपात्रात तळल्या.
माहितीचा स्रोत:
नेहमीची उपासाची गोड कचोरी असतेच, तिचं सारण बदलून
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माफ करा पहिल्या प्रतिसाद
माफ करा पहिल्या प्रतिसाद चुकून मानवजीचं नाव लिहिले होते..!>> no worries
आज ह्या कचोऱ्या करून पाहिल्या
आज ह्या कचोऱ्या करून पाहिल्या. मस्तच झाल्या.
सारणात खालीलप्रमाणे जरा बदल केले:
गोड फार आवडत नसल्याने, ओल्या नारळाचा खव, त्यात बारीक वाटलेली हिरवी मिरची व थोडे काजू तुकडे व बेदाणे घातले.
आप्पेपात्रात, कमी तेलात मस्त झाल्या.
योगायोग !
योगायोग !
खोबरं नक्को, तिखट पदार्थात गोड नको असे नखरे असल्याने कॉर्नच्या केल्या. उपास करत नाही सो पनीर, मक्याचे दाणे, रोस्टेड बदाम, तीळ, चिली फ्लेक्स असे सारण. डीप फ्राय केल्या
मला २ मिळाल्या - पैकी एक “हसरी परी”
Pages