शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६६४ कोकण स्वारीत मालवण बंदराच्या समुद्रात कुरटे बेट हेरले आणि इथली जागा हेरून त्यांनी इथे जलदुर्ग उभारण्याची योजना केली. मोरयाचा धोंड्यावर भुमिपुजन करुन जलदुर्गाची उभारणी सुरु झाली. दरम्यान शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जाउन कैदेत अडकले, मात्र सिंधुदुर्गाच्या उभारणीचे काम थांबले नाही. पुढे सिंधुदुर्ग पुर्ण झाला. इतक्या महत्वाच्या पाणकोटाचे संरक्षण म्हणून त्याचे उपदुर्ग म्हणून राजकोट, सर्जेकोट आणि पद्मगड असे तीन जलदुर्ग उभारले. यापैकी एक राजकोट मालवण किनार्यावर आहे. सिंधुदुर्ग जलदुर्गामुळे पोर्तुगीजांची मुंबई-गोवा हालचालीवर वचक बसला तसेच इंग्रजांच्या राजापुर-मुंबई या हालचालीवर देखील मर्यादा आल्या. सिंधुदुर्ग हा एक प्रकारे शिवाजी महाराजांची पाण्यातील राजधानी म्हणावी लागेल. सभासदाच्या बखरीत याचे वर्णन "चौर्यांशी बंदरा अशी दुसरी जागा नाही" असे वर्णन केले आहे. यावरुन शिवचरित्रात या परिसराचे महत्व जाणवून येईल.
अश्या या महत्वाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक हा पुतळा सिंधुदुर्ग जलदुर्गाच्या आत उभा केला जाणार होता, मात्र जी जागा नौदलाने निवडली होती, ती जागा देण्यासाठी मालकाने नकार दिला म्हणून राजकोटची जागा पुतळा उभारण्यासाठी निवडण्यात आली.
नौदल दिनाच्या निमित्ताने ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण झाले.. याच दिवशी नौदलाचे चिन्ह बदलून शिवाजी महाराजांची मुद्रा हे नौदलाचे अधिकृत चिन्ह केले,
यासंबधतीत काही बातम्याच्या लिंक
या पुतळ्याच्या उभारणीसाठी आलेला खर्च असा.
राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग १ या कामासाठी २४ लाख ८५ हजार २०५ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सुशोभित प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे भाग २ या कामासाठी २ कोटी ४० लाख ७१ हजार १६९ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरासाठी कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे या कामासाठी २३ लाख २३ हजार २९० रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सजावटीची भिंत बांधकाम करणे यासाठी २५ लाख ३२ हजार ३५९ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरासाठी रस्त्याचे बांधकाम करणे यासाठी २४ लाख ४९ हजार २५४ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात पदपथ बांधकाम करणे यासाठी २५ लाख ५३ हजार ७०८ रुपये, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात लँडस्केप करणे या कामासाठी १६ लाख २९ हजार ५७५, राजकोट मालवण येथील परिसरातील शौचालयाचे बांधकाम करणे या कामासाठी २५ लाख २८ हजार ६६३रुपये अशा प्रकारच्या टप्प्यांची कामे निश्चित केलेली आहेत.
मात्र इतका खर्च करुन उभारलेला आणि देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते उदघाटन झालेला पुतळा सोमवार २६ ऑगस्ट २०२४ ला दुपारी १२,३० कोसळला. अर्थातच यावरुन गदारोळ सुरु झाला. कारण स्पष्ट होते. एकतर नुकत्याच झाल्लेया लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते, विरोधी पक्ष सबळ झालेला असतानाच आणि महाराष्ट्र विधानसभेची निवड्णुक जाहीर झालेली असतानाच हा भयानक प्रकार सामोरा आला. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे काहीतरी मार्ग काढायचा म्हणून महायुतीने "लाडकी बहीण" योजना राबवली. त्यामुळे महायुतीला थोडेफार अनुकुल वातावरण निर्माण देखील झाले. इतर पक्षांनी अश्या योजना जाहीर केल्या कि त्यांना रेवडी म्हणले जाते, मात्र भाजपने केले कि ते अर्थातच देशहितासाठी असते. असो.
त्याचवेळी बदलापुर येथे भाजपशी संबधीत संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्या बालीकेंवर अत्याचार झाला आणि संतापाची लाट आली. त्यातच या राजकोट शिवपुतळ्याच्या अवमानाची घटना घडली.
सुरवातीला या घटनेचे गांभीर्य बहुधा न समजल्याने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी वार्याच्या जोरामुळे हा पुतळा पडल्याचे सांगितले.
मात्र युगपुरुष, देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय असलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे महाराष्ट्रात आणि देशात उभे केले आहेत, मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची हि पहिलीच घटना घडल्यामुळे संतापाचा उद्रेक झाला आणि या घटनेचे राजकारण सुरु झाले. सुरवातीला वारा जबाबदार आहे असे सांगण्यात आले तरी या वार्यामुळे याच परिसारातील इतर कोणतेही नुकसान झालेले नसल्यामुळे तसेच इतका वार्याचा वेग कोकणार नेहमीच असल्यामुळे हा दावा फोल निघाला. सहाजिकच नवीन लक्ष नौदलाला केले गेले.
वास्तविक नौदल भारताचे आहे, तरीही केवळ एका नेत्याची हुजरेगिरी करणे महत्वाचे वाटत असल्यामुळे सरंक्षक दलाला देखील वेठीला धरताना सताधारी पक्षाला लाज वाटली नाही. यापुर्वी देशाला पदक मिळाचे म्हणून प्रसंगी प्राण पणाला लावून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या विनेश फोगटला वाटेल त्या भाषेत ट्रोल केले गेले, अगदी कपडे काढले असते तर वजन कमी झाले असते असा निर्लज्ज सल्ला दिला गेला. राष्ट्रप्रथमच्या गप्पा मारणार्या या पक्षाचा खरा चेहरा या निमित्ताने पुढे आला. कदाचित नौदलावर जनता टीका करणार नाही या अपेक्षेने नौदलाचे नाव घेतले असावे. अर्थातच नौदलाने यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही.
मात्र यावरुन सरकारवर जोरदार टीका सुरु झाल्यावर एक पुर्ण मुख्यमंत्री आणि दोन अर्धे उपमुख्यमंत्री याना थोडेफार भान आले. यानिमीत्ताने या पुतळ्याच्या शिल्पकार जयदीप आपटे याच्यावरुन गदारोळ सुरु झाला. कल्याणचा रहिवासी असल्यामुळे याला ठाणे कनेक्शन किंवा श्रीकांत शिंदे यांच्यामुळे काम मिळाले अशी शक्यता वर्तवली जाउ लागली. त्यात आपटेच्या फेसबुक पेजचा धांडोळा घेतला गेला, त्यात त्याचे सनातन प्रभातशी संबंध असल्याचे दिसले. त्याची मुलाखत देखील सनातन प्रभातने छापलेली होती. त्यात आपटची सविस्तर माहीती काढली गेली. त्याला इतक्या मोठ्या पुतळ्याचा अनुभव नसल्याचे दिसले. अनुभव नसताना देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते उदघाटन केले जाणार्या पुतळ्याचे काम कसे दिले गेले ? असा प्रश्न उपस्थित झाला.
जयदीप आपटे याने रहेजामधून शिल्पकलेची डिग्री घेतली. मात्र रहेजा स्कुल ऑफ आर्टसम्ध्ये हि डिग्रीच नसल्याचे पुढे आले. म्हणजे खोटी डिग्री हे जयदीप आपटेकडे महत्वाचे क्वालिफीकेशन होते. त्यातच त्याने एक शिवपुतळ्याच्या कपाळावर जखमेची खुण दाखवली.वास्तविक शिवाजी महाराजांची अस्सल चित्रे उपलब्ध असताना आणि त्यात अशी कोणतेही खुण नसताना जयदीप आपटेला हा नसता उद्योग सांगितला कोणी ?
त्यात इतका मोठा पुतळा इतक्या कमी कालावधीत उभा करणे शक्य नसल्यामुळे जयदीप आपटेने थ्री डी प्रिंटरने तयार केल्याचे समोर आले. अर्थातच याचे कारण स्पष्ट होते. या पुतळ्याचे उदघाटन नौदल दिनाच्या दिवशीच करण्याचा प्रधानसेवकांचा अट्टाहास होता. कारण अर्थातच स्पष्ट होते. या पुतळ्याचा लाभ निवडणुकीत करुन घेणे हाच हेतु होता हे उघड आहे. त्यात आपटेला आधी वर्क ऑर्डर दिली गेली आणि मग कोटेशन काढले गेले. वास्तविक असा महत्वाचा पुतळा उभा करायचा तर एखाद्या अनुभवी शिल्पकाराला काम देणे अपेक्षित होते, तसेच याची निवीदा आधी काढणे अपेक्षित होते, पण हे झाले नाही याचा सरळ अर्थ घोटाळा हाच आहे. दरम्यान पुतळा पडल्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी राजकोटला भेट देण्यास सुरवात केली.
याचवेळी आदित्य ठाकरेनी भेट दिली असतानाच त्याचवेळी इथले खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार असलेले दोन सुपुत्र यांनी राजकोटपाशी जाउन पोलिसांच्या उपस्थितीत धमकी दिल्याचे समोरे आले. आधीच या प्रकरणावरुन वाद पेटला असताना राणे पिता-पुत्रामुळे नवीन वाद पेटला. नितेश राणे यांच्या बरोबर जयदीप आपटेचे फोटो समोर आले. आणि आपटेचे राणे कनेक्शन आहे कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला.
त्यात नेहमीप्रमाणे आपटेची जात काढण्यात आली. त्यात काहीही तथ्य नसले, दरम्यान बदलापुर प्रकरणातील आपाटे गायब असताना जयदीप आपटे देखील गायब झाला. गुन्हेगार गायब होत असताना महाराष्ट्राचे गृहखाते आणि मंत्री नेमके काय करत आहेत ? असा प्रश्न निर्माण होतो.
हा सगळा वाद सुरु असताना विरोधी पक्ष या संधीचा फायदा न घेतील तर नवल अशी परिस्थिती असल्यामुळे घटनेचे गांभीर्य समजून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जाहीर माफी मागितली. त्या आधीच उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. अर्थात लोकसभेतील दणदणीत पराभव आणि विधानसभेतील संभाव्य पराभव विचार करुन अजित पवार पुन्हा परतण्यासाठी हि खेळी करत आहेत कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला. पंतप्रधान मोदीनी मागितलेली माफी हि तोंडदेखली आहे असा अरोप विरोधकांनी केला आणि एकंदरीत त्यात तथ्य वाटते, कारण एकतर पंतप्रधानांची देहबोली वेगळीच होती, त्यात कोठेही माफी मागण्याची विनम्रता नव्हती, तसेच या प्रकरणाशी संबध नसताना त्यांनी सावरकारांचा संदर्भ आणला. सहाजिकच विरोधकांकडून सावरकारांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत वापरलेली काकतालीय स्वराज्य आणि कलयाणच्या सुभेदाराच्या सुनेबाबतील सदगुण विकृतीचे वादग्रस्त वाक्ये समोर आणली गेली. यात उपरती होउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची माफी मागितली. विशेष म्हणजे माफी मागणे हि लाजिरवाणी घटना असताना उपस्थित लोक टाळ्या वाजवताना दिसले. व्यक्तीपुजेचे हे हिणकस उदाहरण म्हणावे लागेल.
शिवाय हि माफी केवळ महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक तोंडावर आली असल्यामुळे मागितली गेली, कारण यापुर्वी मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये सप्तर्षीचे असेच उभारलेले पुतळे पडले असताना ना पंतप्रधानांनी माफी मागितली ना तिथल्या मुख्यमंत्र्यांनी !
विशेष म्हणजे इतके सर्व होत असताना दुसरे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ना खेद व्यक्त करत आहेत ना माफी मागत आहेत. याउलट त्यांनी सुरवातीला पोलिसांना धमकी देणार्या नारायण राणेना वाचविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक राणेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे तरीही कोणतीही कारवाई होत नाही.
त्यानंतर शिवाजी माहाराजांनी सुरत लुटलीच नाही, काँग्रेसने खोटा इतिहास शिकवल्याचे वक्तव्य केले. वास्तविक शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे सर्व अस्सल एतिहासिक साधनात पुरावे आहेत. अगदी मोघली कागदपत्रे आहेत. मुख्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे. असे असताना खोटा इतिहास कॉन्ग्रेसने पसरवला असे फडणवीस कोणत्या आधारे म्हणतात ? आणि हा इतिहास खोटा आहे तर गेली दहा वर्ष देशात त्यांचीच सत्ता असताना ते गप्प का होते ?
हा वाद कमी म्हणून की काय फडणवीसांनी पंडीत नेहरुंच्या "डिस्कव्हरी ऑफ इंडीया" या ग्रंथात शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य असल्याचा शोध लावला. वास्तविक अहमदनगरच्या किल्ल्यात कैद असताना सदर ग्रंथ पंडीत नेहरुंनी लिहीला. त्यावेळी उपलब्ध साधनाचा वापर करुन म्हणजे सर जदुनाथ सरकार यांच्या ग्रंथाचा संदर्भ घेउन त्यांनी हा ग्रंथ लिहीला. शिवाजी महाराजांबाबतीत जदुनाथ सरकार आणी नेहरु या दोघांचे ही मत चुकीचे होते आणि त्याची त्यांनी माफीही मागितली. त्यानंतर प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंडीत नेहरुंच्या हस्ते उदघाटनही झाले, जो प्रतापगडावरचे जोरदार वारे आणि पाउस झेलून आजही उभा आहे. तेव्हा असे नाहक वाद उपस्थित करुन फडणवीस काय साध्य करत आहेत ? समजायला मार्ग नाही. त्यापेक्षा बिनशर्त माफी मागणे हा अधिक योग्य पर्याय होउ शकतो. असो.
हे राजकारण सुरु असताना सोशल मेडीयावर याची प्रतिक्रीया उमटली नसती तरच नवल. विशेष म्हणजे जरा खुट्ट वाजले कि तातडीने त्यावर व्यक्त होणारे अंधभक्त या प्रकरणी मिठाची गुळणी घेउन गप्प आहेत. अंधभक्तांच्या व्हॉटस अॅप ग्रुपवर यावर एक शब्द ही निघत नाही. एकाचाही फेसबुक पेजवर यावर अवाक्षर ही लिहीलेले नाही. यु ट्युब चॅनेल चालवणारे गोदी मेडीयाचे पाळीव पत्रकारही चिडीचुप आहेत. मालकाच्या विरोधात ब्र ही काढायचा नाही हे कटाक्षाने पा़ळले जात आहे. काही भक्त मंडळीनी विरोधी पक्षाच्या लोकांनी पुतळ्याच्या पायथ्याशी अॅसिड ओतून बोल्ट मुद्दाम गंजतील अशी व्यवस्था केल्याचा शोध लावला. वास्तविक अलिकडे उदघाटन झालेले अनेक प्रकल्प वादाच्या भोवर्यात सापडले असताना तिथेहि विरोधकांनीच या गोष्टी केल्याचे यांना म्हणायचे आहे काय ? त्यात काही जणांनी मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार असताना छिंदवाडा जिल्ह्यातील सौसरमध्ये शिवाजी महाराजांचा बेकायदेशीरपणे उभा केलेला पुतळा पाडल्याचा व्हिडिओ शेअर करुन जाब विचारायला सुरवात केली. अर्थात असे बेकायदेशीर पुतळे कोणत्याही महापुरुषाचे उभारणे चुकीचेच आहे. शिवाय संसदेच्या आवारात असलेले शिवाजी महाराज,गांधीजी यांचे पुतळे लँडस्केपिंगच्या नावाखाली बाजुला केले , त्यावर हे भक्त चिडीचुप रहातात.
एकंदरीत पुढील बराच काळ या दुर्दैवी घटनेचे पडसाद उमटत रहाणार हे निश्चित . कृपया आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि या घटनेसंदर्भात ताजे अपडेट ही इथे पोस्ट करत रहा.
अशक्य ते शक्य करून
अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न अंगाशी आला का ?
कमी वेळात एव्हढा मोठा पुतळा उभारण्याचे आव्हान स्विकारणे यात शहाणपणा अजिबात नाही. अननुभवी व्यक्तीच असे धाडस करू जाणे.
जयदीप आपटेने जे आव्हान स्विकारले ते कुठल्याही अनुभवी शिल्पकाराने स्विकारले नसते, कदाचित यामुळेच जयदीप आपटेला विचारणा झाली असेल.
त्याच्या आधीच्या मुलाखतीत साईटवर पुतळा न्यायला जागा नाही असे त्याने म्हटले. त्यामुळे जागेवर पुतळा उभारायचे नवे आव्हान पुढ्यात ठाकले. तसेच एव्हढा मोठा पुतळा साईटवर उभारणे शक्य नव्हते आणि तितका वेळही नसल्याने थ्रीडी प्रिंटींगने असंख्य पार्ट्स बनवून ते जोडले.
इथे खूप गोष्टींची उत्तरे मिळायची आहेत.
अखंड पुतळ्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि तुकडे जोडून उभारलेल्या पुतळ्याची स्टॅबोलिटी याचा अभ्यास झाला होता का ? हे काम स्ट्रक्चरल इंजिनियरचे असते. स्ट्रक्चरल इंजिनियरचे म्हणणे आहे कि चबुतर्याचेच काम आम्ही केले. चबुतर्याचे स्ट्रक्चरल अॅनालिसिसचे काम दिले आणि त्यात पुतळा नव्हता हे कसे काय शक्य आहे ?
स्थानिकांनी सांगितले कि तुकडे जोडताना जे वेल्डिंग केले त्याच्या आजूबाजूला गंज पकडला होता. पुतळा अधून मधून हलायचा.
सरदार पटेल पुतळ्याचे स्ट्रक्चरल अॅनालिसीस नेटवर उपलब्ध आहे. राजकोटच्या पुतळ्याचे असे काहीही उपलब्ध दिसत नाही.
या सर्व गोष्टी पोलीस तपास, प्रशासनाचा अंतर्गत तपास, नौदलाचे रिपोर्ट्स आणि स्ट्रक्चरल ऑडीट मधून समोर येतील. तोपर्यंत या विषयावर काहीही मत देणे अशक्य आहे.
अशक्य ते शक्य करून
डपो
बरोबर प्रश्न आहेत र.आ. २२-२३
बरोबर प्रश्न आहेत र.आ. २२-२३ वर्षाच्या मुलाला हे काम देण्याचा थोर निर्णय कोणाचा आहे काय माहीत. बरं उद्घाटन, तो सगळा शो हे प्राधान्य असेल तर ते झाले. मग त्यानंतर तरी सगळे काम नीट करून घ्यायचे, ते ही केलेले दिसत नाही.
DRDO मधे उच्च पदावर काम
DRDO मधे उच्च पदावर काम करणार्या प्रदिप कुरुलकरने संरक्षण विषयक महत्वाची गुप्त माहिती पाक एजंटला दिली या प्रकरणाची आज पुन्हा एकदा आठवण झाली.
प्रदिपसाठी " हनी ट्रॅप " सारखे गोंडस शब्द वापरला गेला होता. प्रदिप आपलाच म्हणजे संस्कारी परिवारांतला आहे म्हणून आजही त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही. सोईनुसार कुरुलकर प्रकरण विस्मृतीत गेले आहे.
पुतळा बांधण्याच्या आधी Structural Analysis व्हायला हवे होते. तसे झाले नाही. ते आता करायला हवे. वरातीमागून घोडे. पुतळा पुन्हा उभा रहाणार नाही.
आपटेच्या जागी अब्दुल असता किंवा आरक्षित राखिव जागेतून डिग्रीसाठी प्रवेश मिळविणारा असता तर माझी प्रतिक्रिया अगदी वेगळी आली असती. या भ्रष्टाचार्यांना चाबकाने फोडायला हवे, भर चौकांत...
प्रदिपसाठी " हनी ट्रॅप "
प्रदिपसाठी " हनी ट्रॅप " सारखे गोंडस शब्द वापरला गेला होता. प्रदिप आपलाच म्हणजे संस्कारी परिवारांतला आहे म्हणून आजही त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही. >>> या धाग्यावर काय संबंध ? कुरूलकर आजही पोलीस कोठडीत आहेत. त्यांना सगळी कलमे लागलेली आहेत . हनी ट्रॅप हा हेरगिरीचा एक प्रकार आहे. जगभरात तो याच नावाने ओळखला जातो.
पुतळा बांधण्याच्या आधी Structural Analysis व्हायला हवे होते. तसे झाले नाही. ते आता करायला हवे. वरातीमागून घोडे. पुतळा पुन्हा उभा रहाणार नाही. >>> पुन्हा या धाग्यावर याचा काय संबंध ? आता करायला हवे वरातीमागून घोडे कशासाठी म्हटले आहे याचा अर्थ समजला आहे का ? पोलीस तपास करायचा कि नाही ? प्रशासनाचा तपास करायचा कि नाही ? स्ट्रक्चरल अॅनालिसीस का झाले नाही याचा तपास करायचा कि नाही ? हे प्रतिसाद इथे कुणाला उद्देशून दिले आहेत ? जर या धाग्याशी संबंधित नसतील तर कुणाला उद्देशून रडगाणे गायले जात आहे त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
आपटेच्या जागी अब्दुल असता किंवा आरक्षित राखिव जागेतून डिग्रीसाठी प्रवेश मिळविणारा असता तर माझी प्रतिक्रिया अगदी वेगळी आली असती. या भ्रष्टाचार्यांना चाबकाने फोडायला हवे, भर चौकांत... >> असंबंद्ध आहे. या विषयी वेगळ्या धाग्यावर प्रतिक्रिया देता येतील. राखीव जागेबद्दल कळवला असेल तर सर्वोच्च न्यायालयाने परिशिष्ट नऊ मधे समाविष्ट असलेल्या आरक्षणाला धक्का लावला तेव्हां कुणीच का कळवळले नाही ? तेलंगणा आणि कर्नाटकात आम्ही लागू करू म्हणून आनंदोत्सव साजरा झाला, त्यानंतर देशभरात भारत बंद झाल्यावर राहुल गांधी मौनात गेलेले आहेत. राखीव जागेचा मुद्दा या विषयाशी जोडून काय साध्य करायचे होते ?
अ हा एक क्रूर दरोडेखोर आहे आणि ब हा खूनी बाहुबली आहे. यांना सगळे घाबरून असतात. हे लोक कुठल्याही विषयामधे अ आणिब अशी बायनरी आणत असतील, क ही सामान्य जनता आहे आणि त्यांना या बायनरीत कसलाही इंटरेस्ट नाही, त्यांना अ आणि ब ही बायनरी वगळून या विषयाकडे पहायचं असेल, तर अ क ला ब चे हस्तक किंवा ब हा क ला अ चा एजंट म्हणून तो विषय त्याच बायनरीकडे ढकलू पाहत असेल, आणि हे वारंवार होत असेल तर ? जे कुणी म्हटलेलंच नाही ते म्हटलेलं आहे असा जाणीवपूर्वक ग्रह करून स्ट्रॉ मॅन ऑर्ग्युमेण्ट करणे हा आवडीचा छंद करून पुढे त्याचीच री ओढणे ही कलाकुसर कुठल्याच विषयाला वर्ज्य नाही हा प्रकार उबगवाणा आहेच, पण आपण ज्यांच्या कल्याणाचा आव आणतो, त्यात आपला रोल काय यावर जर शंका घ्यायची म्हटली तर ते कुठे जाईल ?
हा विषय पुतळा का पडला यावरच मर्यादीत ठेवावा.
<< प्रदिपसाठी " हनी ट्रॅप "
<< प्रदिपसाठी " हनी ट्रॅप " सारखे गोंडस शब्द वापरला गेला होता. प्रदिप आपलाच म्हणजे संस्कारी परिवारांतला आहे म्हणून आजही त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही. >>> या धाग्यावर काय संबंध ? कुरूलकर आजही पोलीस कोठडीत आहेत. त्यांना सगळी कलमे लागलेली आहेत . हनी ट्रॅप हा हेरगिरीचा एक प्रकार आहे. जगभरात तो याच नावाने ओळखला जातो. >>
------ ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी निगडीत महत्वाची माहिती (डिझाईन, drawings, पुढचे नियोजन) पाकला दिल्यावर एखाद्या उच्चपदस्थाला केवळ Officials Secrets Act लागतो पण देशद्रोह नाही. सगळी कलमे आणि मिळमिळीत कलमे यात असलेला फरक.
अब्दुल असता तर हनी ट्रॅप हा शब्द आठवलाही नसता सरळ देशद्रोह आणि फाशीची मागणी आणि दररोजच्या बोंबा. कलम कुठले लावायचे या संबंधातले निर्णय पोलीसांना घ्यावे लागतील, तसे वरुन आदेश असतील.
आपला लाडका परिवारातला कुरुलकर - Officials Secrets Act , हनी ट्रॅप. काही वर्षानंतर संस्कारी म्हणून सोडतीलही. तेव्हा तुरुंगाच्या गेटबाहेर पेढे आणि आरती ची थाळी घेतलेले शेकडो भक्त असतील.
<< हा विषय पुतळा का पडला यावरच मर्यादीत ठेवावा. >>
------ आधी केले मग सांगितले असे आचरण कायम असावे. धाग्यातला शेवटचा परिच्छेद हा भक्ताच्या भक्तीरसावर आहे. मी त्यावरच लिहीत आहे.
पुतळा पडला हे वाईट झाले. पुतळा का पडला हे ( सुरतेची बेसुरत कुणी केली यातून फुरसत काढून ) गृहमंत्री फडणविस सांगतील आणि त्यावरही चर्चा होत राहिल. मी आपटे किंवा पाटील यांना बळीचे बकरे समजतो, ते केवळ निमीत्त आहे.
आपटे नसता तर दुसरा कुणी तरी
आपटे नसता तर दुसरा कुणी तरी तयार झालाच असता.
विविध प्रकल्पाचे उद्घाटन करायला मोदी जातात, नव्हे लोकाग्रहास्तव स्टार प्रचारकाला जावेच लागते. एखादा बांधकाम प्रकल्प पूर्ण व्हायला किती वेळ लागतो याचा अभ्यास कुणी करत नाही का?
एखादा पुतळा, इमारत, होर्डिंग्ज, पूल, शाळा, रामाचे मंदिर, संसदेची नवी इमारत किंवा कुठलेही बांधकाम उभारायचे असेल तर किमान काय काय गोष्टी (साहित्य, ingredients ) आवश्यक आहे याचा विचार प्रकल्पाच्या कुठल्या टप्प्यात व्हायला हवा?
पुतळा पडल्यावर त्याचे Structural Analysis झाले तरी त्यातून आज काय निष्पन्न होणार आहे? सिल्क्यारा बोगदा पडल्यावर Geological Analysis, GeoTechnical Analysis सुचणे हे परवडणारे नाही. या गोष्टी सर्वात आधी व्हायला हव्यात. सर्वेक्षण आधी झाले असेल, जाणकारांनी सतर्क केले असेल पण त्याला केराची दाखविली असा प्रकार झाला का? कोट्यावधीचे प्रकल्प आहेत शेवटी पैसा बोलतो.
सर्वस्वी दोष हा बांधकामाचा आहे हे गृहितक आहे. पडझडीसाठी तो एक भाग असू शकतो. पण निर्णय प्रक्रियेतले मोठे दोष कसे शोधणार? निर्णय प्रक्रियेतला दोष दाखविणारे एखादे तरी उदाहरण आहे का?
उदय तुम्ही बदमाषी करता.
उदय तुम्ही बदमाषी करता. भक्तांवर टीका केली म्हणजे मी नाही त्यातली कडी लावा आतली असा पातिव्रत्याचा तुम्हाला सोयीचा आव आणता येतो. तुम्ही मूळचे भाजपचे असून विश्वंभर चौधरींप्रमाणे कधी अण्णांबरोबर कधी निर्भय बनो या छपरी प्रकारात मोडता. तुमच्यासारख्या भंपक माणसाला यात कसला भक्ती रस दिसला माहिती नाही. तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा पण माणूस म्हणून तुम्ही लोक दळिंद्री आहात, माझ्यावरच्या दु:खात इथल्या अनेकांनी आपापली विचारसरणी बाजूला ठेवून मानसिक बळ दिले. तुमच्यासारखे लोक त्यात कधीही नसतात.
निव्वळ भाजप, संघ परिवार यावर टीका केली म्हणजे तो माणूस समोरच्यावर शंका घेण्याची पात्रता कमावतो, सर्टफुकटं वाटण्या लायक होतो यावर काही चमनच्यु लोकांचा विश्वास बसत असेल. तुम्ही मूळचे भाजपच्या विरोधात पण पूरक भूमिका घेणार्यातले आहात यात शंकाच नाही. राखीव जागेचा जो उल्लेख तुम्ही केला आहे त्यांच्या भारत बंद बद्दल एक शब्दही तुमच्या पोस्ट मधे नाही. भारत बंद करणारे सगळे भक्तीरसात न्हाले होते का ? तुम्हाला जे जे गरसोयीचे ते भाजपचे का ? तुम्हाला एव्हढाच कळवळा असता तर तेलंगणा आणि कर्नाटक सरकारचा निषेध केला असता. राहुल गांधींनी मतं मागितली ती आरक्षण, संविधान धोक्यात आहे या मुद्द्यावर. आणि आता मूग गिळून गप्प बसले आहेत. हा परिच्छेद भक्तीरसात न्हाऊन निघालेला आहे हे तुमच्या आयटी सेल ने शिकवले आहे तसेच लिहीले आहे. तुमच्या सारख्या दळभद्री ट्रोलला उत्तर दिले हेच चुकले.
पुतळा का पडला यावरच चर्चा मर्यादित ठेवा पुन्हा एकदा सांगतो. तुम्हाला जे ट्रोलिंग करायचे त्यासाठी वेगळे धागे काढा. किंवा तुमच्याकडे पुतळा का पडला याचे शास्त्रीय कारण असेल तर द्या.
पुन्हा हलकटपंणा केल्यास फाट्यावर मारण्यात येईल function at() { [native code] }हवा भाषेचा मुलाहिजा न राखता उत्तर देण्यात येईल.
बायनरी नको हे जालीय
बायनरी नको हे जालीय चर्चांच्या दीघ अनुभवानंतर म्हणत आहे. तरीही मुद्दामून समोरच्याला तुम्ही माझ्या सोबत कानामात्रेसहीत नसाल तर त्याच्यासोबत आहात असा बळबळंच जुलमाचा रामराम करायला लावणार्यांसाठी.
पोहोचली.
भाजप आणि काँग्रेस यांचे उघड मुद्दे एकमेकांच्या विरोधात असले तरी आर्थिक मुद्दे सारखेच आहेत आणि त्याचा फायदा फक्त मूठभरांना होतो. हे फक्त एकमेकांवर टिका करून तो वाईट आहे म्हणून मी चांगला असा आरडाओरडा करत असतात. प्रत्यक्षात दोन्हीही ओरबाडून खाणारे आहेत. हे सत्य मांडले कि मग दोन्ही मिळून त्याला कॉर्नर करतात यामुळे या गोष्टी न लिहीता फक्त सध्याच्या विषयावर लिहावे ही माझी भूमिका आहे.
तरी पण उदय सारखे बदमाष लोक दरवेळी छुपा संघी वगैरे म्हणत असतात. त्यांना त्यांची पात्रता दाखवण्यासाठी या पोस्टवर हे लिहावे लागले. त्यांनी भाग पाडले. जोपर्यंत उदय आणि त्या मानसिकतेचे लोक आपल्या हलकटपणात सुधारणा करत नाहीत तोपर्यंत त्यांना थुत्तरफोड उत्तराची हीच पोस्ट कॉपी पेस्ट करून दिली जाईल. तुमचे राजकारण तुमच्याकडेच राहू द्या. प्रत्येक विषयात राजकारण आणता. मी गेले कित्येक दिवसात अशा पोस्टवर लिहीलेले नाही.
आज लिहीले कि लगेच शंका घेणारे तुम्ही कोण ? काय लायकी तुमची ? शंका घ्यायला तुम्ही कोण धुतल्या तांदळाचे लागून गेलात ?
पुन्हा एकदा आवाहन करतोय कि विषयाला धरून लिहा. जमत नसेल तर निव्वळ विषयापुरतेच ज्यांना लिहायचे आहे त्यांना त्रास देऊ नका. तुमचा हलकटपणा आवरा.
माझी मूळ पोस्ट ही आहे
माझी मूळ पोस्ट ही आहे
"अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न अंगाशी आला का ?
कमी वेळात एव्हढा मोठा पुतळा उभारण्याचे आव्हान स्विकारणे यात शहाणपणा अजिबात नाही. अननुभवी व्यक्तीच असे धाडस करू जाणे.
जयदीप आपटेने जे आव्हान स्विकारले ते कुठल्याही अनुभवी शिल्पकाराने स्विकारले नसते, कदाचित यामुळेच जयदीप आपटेला विचारणा झाली असेल.
त्याच्या आधीच्या मुलाखतीत साईटवर पुतळा न्यायला जागा नाही असे त्याने म्हटले. त्यामुळे जागेवर पुतळा उभारायचे नवे आव्हान पुढ्यात ठाकले. तसेच एव्हढा मोठा पुतळा साईटवर उभारणे शक्य नव्हते आणि तितका वेळही नसल्याने थ्रीडी प्रिंटींगने असंख्य पार्ट्स बनवून ते जोडले.
इथे खूप गोष्टींची उत्तरे मिळायची आहेत.
अखंड पुतळ्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि तुकडे जोडून उभारलेल्या पुतळ्याची स्टॅबोलिटी याचा अभ्यास झाला होता का ? हे काम स्ट्रक्चरल इंजिनियरचे असते. स्ट्रक्चरल इंजिनियरचे म्हणणे आहे कि चबुतर्याचेच काम आम्ही केले. चबुतर्याचे स्ट्रक्चरल अॅनालिसिसचे काम दिले आणि त्यात पुतळा नव्हता हे कसे काय शक्य आहे ?
स्थानिकांनी सांगितले कि तुकडे जोडताना जे वेल्डिंग केले त्याच्या आजूबाजूला गंज पकडला होता. पुतळा अधून मधून हलायचा.
सरदार पटेल पुतळ्याचे स्ट्रक्चरल अॅनालिसीस नेटवर उपलब्ध आहे. राजकोटच्या पुतळ्याचे असे काहीही उपलब्ध दिसत नाही.
या सर्व गोष्टी पोलीस तपास, प्रशासनाचा अंतर्गत तपास, नौदलाचे रिपोर्ट्स आणि स्ट्रक्चरल ऑडीट मधून समोर येतील. तोपर्यंत या विषयावर काहीही मत देणे अशक्य आहे."
यात प्रदीप कुरूलकरचा संबंध जोडून हनी ट्रॅप हे गोंडस नाव आणि राखीव जागेवरचा असता तर त्याला काय न्याय दिला असता हा प्रश्न विचारण्याचा संबंध कुठून आला ? हे मला उद्देशून लिहीलेले नसते तर तसा उल्लेख अपेक्षित होता. आता ती वेळ निघून गेली आहे. कारण हलकटपणा करूनही तुम्ही पडलो तरी नाक वर करत आहात. राज्यात सत्ताबदल होणार नाही का ? मग स्ट्रक्चरल ऑडीट होणार नाही का ? कि सत्ताबदल होऊन काँग्रेस आली तरी फरक पडत नाही ?
मध्यंतरी महाराष्ट्रात मविआचे सरकार आले तेव्हां खितपत पडलेल्या पाच लोकांची सुटका का झाली नाही ? भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांचा अहवाल हा दोषपूर्ण होता ( असे माझेही मत आहे) हे शरद पवार म्हणत होते, तर मग सत्ता येताच स्वतंत्र चौकशी का झाली नाही ? अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एन आय ए कडे तपास वर्ग करण्याच्या निर्णयाला काँग्रेसने मान्यता का दिली ? एरव्ही तर केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांवर विश्वास नाही असे हे म्हणत असतात.
मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यावर राहुल गांधींनी रान उठवले होते. दीड वर्षे कमलनाथांची सत्ता असताना त्या घोटाळ्याची चौकशी का झाली नाही ? यादी मोठी आहे.
कोणते डील भाजपसोबत केले होते ?
पुन्हा आवाहन , विषयावर मर्यादीत रहा. हलकटपणाला आवर घाला. तुमची लायकी काय आहे तपासून घ्या.
समोरच्याला ओळखत नसताना आरोप करणे हा नालायकपणा आहे.
उदय पोस्ट पुन्हा वाचा आणि
उदय पोस्ट पुन्हा वाचा आणि कशावर वाद घालावा याची अक्कल असेल तरच बोला. तुम्ही काय मुद्दे उपस्थित करता त्याचा पहिल्या पोस्टशी संबंध असावा कि नाही ?
कि मी आज गिरणीतून पीठ आणले असे कुणी लिहीले कि पीठ आणले तरी तुम्ही जिवंत आहात अब्दुल असता तर त्याला गोमांस आणले या संशयावरून ठार मारले असते असेच बडबडणार ?
पुतळ्याचे स्ट्रक्चरल अॅनालिसीस झाले कि नाही यावरच वाद आहे. त्यामुळे झाले कि नाही याबद्दल मी बोलूच शकत नाही. तुम्ही तिथेच दबा धरून बसला असाल, मंत्रालयात तुमचे दोन हेर फिरत असतील तर लिहा ना तसे.
तुम्ही स्पष्ट शब्दात लिहा कि स्ट्रक्चरल अॅनालिसीस झाले होते कि नाही ?
या विषयावर अनेक अनुभवी शिल्पकारांच्या मुलाखती आहेत. त्यातले मुद्दे मी पोस्टमधे मांडलेले आहेत. तुम्ही जर थोर शिल्पकार असाल तर तसे सांगा. शिल्पकार असण्याचा आणि सर्टिफिकेटचा तसाही संबंध नाही. कलेच्या क्षेत्रात डिग्रीला महत्व नसते. ते एक अॅड ऑन म्हणूनच महत्वाचे असते. तुमची कामगिरी हेच तुमचे सर्टिफिकेट. गणपतीची मूर्ती बनवणारे किती जण जे जे मधे शिकतात ?
मी या घटनेनंतर सरदार सरोवराचे स्ट्रक्चरल रिपोर्ट्स शोधत होतो. ते तपशिलात जरी मिळाले नसले तरी तसे काम झालेले आहे हे कळते. मी काही स्ट्रक्चरल इंजिनीयर नाही, पण शिकलेलो आहे. या विषयात जेव्हढे काम कराल तितकेच प्राविण्य मिळत जाते एव्हढे शहाणपण तरी शिकल आहे. म्हणूनच ते रिपोर्टस आल्याशिवाय यावर बडबड निरर्थक आहे एव्हढे मला समजते. तुम्ही तिथे सूक्ष्म देहाने जाऊन आलात किंवा कसे कल्पना नाही. डोळ्यात एक्सरे मशीन बसवलेले असेल किंवा असे काही तंत्रज्ञान असेल तर इथे आम्हाला मूर्ख लोकांना माहिती द्या.
<< उदय तुम्ही बदमाषी करता.
<< उदय तुम्ही बदमाषी करता. भक्तांवर टीका केली म्हणजे मी नाही त्यातली कडी लावा आतली असा पातिव्रत्याचा तुम्हाला सोयीचा आव आणता येतो. तुम्ही मूळचे भाजपचे असून विश्वंभर चौधरींप्रमाणे कधी अण्णांबरोबर कधी निर्भय बनो या छपरी प्रकारात मोडता. तुमच्यासारख्या भंपक माणसाला यात कसला भक्ती रस दिसला माहिती नाही. तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा पण माणूस म्हणून तुम्ही लोक दळिंद्री आहात, माझ्यावरच्या दु:खात इथल्या अनेकांनी आपापली विचारसरणी बाजूला ठेवून मानसिक बळ दिले. तुमच्यासारखे लोक त्यात कधीही नसतात. >>
----- व्यक्तीगत टिकेला मी उत्तर देत नाही. तुम्हाला तुमची मते आहेत आणि मला माझी.
<< पुन्हा आवाहन , विषयावर मर्यादीत रहा. हलकटपणाला आवर घाला. तुमची लायकी काय आहे तपासून घ्या.
समोरच्याला ओळखत नसताना आरोप करणे हा नालायकपणा आहे. >>
----- आरशात पहावे. आधी केले मग सांगितले असे केल्यास सल्ला जास्त शोभेल.
काँग्रेस पक्षाने भाजपच्या
काँग्रेस पक्षाने भाजपच्या घोटाळ्यांची चौकशी केली नाही हा तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे हे नव्यानेच समजले
तुम्ही केली कि ती व्य्कतीगत टीका नाही का ?
प्रत्येक वेळी दळभद्रीपणा करायचा थोबाड फोडलं कि वैयक्तिक टीकेला मी उत्तर देत नाही.
राखीव जागेचा मुद्दा आणलाच आहे तर या मुद्द्यावर मतं मागून जो पक्ष जिंकला त्याने मतं मागतानाच वर्गीकरणाचा निर्णय आम्ही घेणार हे सांगून मतं का घेतली नाहीत ? वक्फ बोर्डाच्या निर्णयाला पाठिंबा देणार हे का सांगितले नाही ? तीन तलाक, बुरखा या प्रकरणात राज्यसभेत बहुमत असताना गैराजर राहून पाठिंबा देणार हे का सांगून मतं घेतली नाहीत ?
पुन्हा माझ्यावर कुणाचा एजंट असल्याची वैयक्तिक टीका नको हे सभ्य भाषेत सांगत आहे. तुम्ही मायबोली विकत घेतली आहे का ? इतरांनी त्यांची मतं लिहायची नाहीत का ? माझ्या पोस्टमधे एकही राजकीय मुद्दा नाही. हकलटपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या म्हणून आणि सध्या वाईट अवस्थेतून जात असल्याने सहन न होऊन तुमचे थोबाड फोडले गेले. पण त्याबद्दल सॉरी नाहीच.
<< हकलटपणाच्या सर्व मर्यादा
<< हकलटपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या म्हणून आणि सध्या वाईट अवस्थेतून जात असल्याने सहन न होऊन तुमचे थोबाड फोडले गेले. पण त्याबद्दल सॉरी नाहीच. >>
----- सॉरी साठी आग्रह कधी केला. माझी तशी अपेक्षाही नाही. तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे. माझ्या व्यक्त केलेल्या मताबद्दल टिकेचाही ( म्हणजे थोबाड फोडण्याचा ) तुम्हाला अधिकार आहे. कुठली टिका किती स्विकारावी हे मी ठरवितो. मस्त दिलखुलास पणे लिहा.
आरशात पहावे. आधी केले मग
आरशात पहावे. आधी केले मग सांगितले असे केल्यास सल्ला जास्त शोभेल. >>हलकट माणसा, सुरूवात कुणी केली इथे ? मी केली का ? माझ्या पहिल्या पोस्टवर तू काय लिहिले आहेस? दर वेळी का ऐकून घेऊ? हा नीचपणा आहे साल्या. ही पहिली वेळ आहे का ?
तू कोण लागून गेला सर्टिफिकेट देणारा? भाजपचा कॉंग्रेस मधला एजंट आहेस तू. असे अनेक भाजपाई काँग्रेसमधे होते. एव्हढं रामायण सांगितलं ते डोस्क्यात घुसलं नाही का ? भाजपावर टिका केली म्हणजे तू शहाणा असा माझा कोणताही समज नाही.
या निमित्ताने माझा आयडी उडाला तर हवेच आहे. पण जाताना आरसा दाखवून गेलो याचे समाधान आहे.
<< आरशात पहावे. आधी केले मग
<< आरशात पहावे. आधी केले मग सांगितले असे केल्यास सल्ला जास्त शोभेल. >>हलकट माणसा, सुरूवात कुणी केली इथे ? मी केली का ? माझ्या पहिल्या पोस्टवर तू काय लिहिले आहेस? दर वेळी का ऐकून घेऊ? हा नीचपणा आहे साल्या. ही पहिली वेळ आहे का ?
तू कोण लागून गेला सर्टिफिकेट देणारा? भाजपचा कॉंग्रेस मधला एजंट आहेस तू. असे अनेक भाजपाई काँग्रेसमधे होते. एव्हढं रामायण सांगितलं ते डोस्क्यात घुसलं नाही का ? भाजपावर टिका केली म्हणजे तू शहाणा असा माझा कोणताही समज नाही.
या निमित्ताने माझा आयडी उडाला तर हवेच आहे. पण जाताना आरसा दाखवून गेलो याचे समाधान आहे.
नवीन Submitted by रघू आचार्य on 6 September, 2024 - 02:46 >>
---- रघू आचार्य - तुमच्याच काय, इतर कुणाचाही आयडी उडावा असे मला कुठल्याही काळात वाटणार नाही. कुणाची आय डी उडविण्याबाबत कधी तक्रार केली नाही. तक्रार करावी असे वाटल्यास मीच थांबेल.
लिहीण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य येथे प्रत्येकालाच असायला हवे. वैयक्तीक टिका असेल, टोकाच्या प्रसंगी कदाचित शिव्या असतील पण म्हणून लेखन स्वातंत्र्याची गळचेपी नकोच. असो.
तुम्ही छान लिहीता हे आधी पण सांगितले आहे आणि आताही सांगतो. सहमती नेहेमीच असते असे नाही आणि तशी अपेक्षाही नाही. आता रजा घेतो.
बायनरी वगळून पुतळा का पडला
बायनरी वगळून पुतळा का पडला याकडे एका अभियंत्याच्या दृष्टीने पाहणे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? त्याचा आदर करायला कधी शिकणार ? त्यात प्रदीप कुरूलकर, अब्दुल, राखीव जागा हे विषय घुसडून भक्तीरसात न्हालेले अशा मल्लिनाथ्या कुणी केल्या ? स्वतःवर आले कि सुविचार आठवतात, ते दुसर्यावर शंका घेताना आठवत नाहीत का एव्हढाच विषय आहे.
स्ट्रक्चरल ऑडीट या विषयात तुम्हाला रस नसेल तर इग्नोर का मारत नाही ? आताच का करायचं तेव्हांच का केलं नाही हे विचारायला मी मुख्यमंत्री आहे कि प्रधानमंत्री आहे ?
इतरांनी तुमच्या परवानगीने मतं मांडायची का ? थोडा विचार करून व्यक्त झाला असतात तर ?
प्रदीप कुरुलकर, हनी ट्रॅप,
प्रदीप कुरुलकर, हनी ट्रॅप, ब्रह्मोसशी संबंघीत माहिती बाहेर पाठविण्याच्या अपराधासाठी गुळगुळीत officials secrets act याचा मेळ लागत नाही. हे तुमच्यासाठी लिहीले होते का?
इग्नोरचा सल्ला तुम्ही आधी स्वत : ला दिला होता का?
हे मी आधी विचारले तेव्हां का
हे मी आधी विचारले तेव्हां का नाही उत्तर दिले ? माझ्या पोस्टनंतर हा प्रतिसाद आल्यानंतर साहजिकच विचारण करणारच. कारण तुमचा इतिहास तसा आहे. ज्या अर्थी त्या वेळी हे उत्तर दिले नाही आणि भक्तीरसात न्हालेला परिच्छेद वगैरे वगैरे तुणतुणे वाजवले...
माझ्या पोस्टी नीट वाचत नसाल किंवा तेव्हढी बुद्धी नसेल समजण्याची, पण स्वतः काय ओकून ठेवले ते तर वाचता येत असेल ना ?
रजा घेणे याचा अर्थ हा आहे का ?
मी इग्नोरचा सल्ळा स्वतःला देण्याचा काय संबंध ? तुमच्या कुठल्याच पोस्टवर माझी मल्लिनाथी नाही. तुम्ही स्ट्रकचरल अॅनालिसीसचा स्पष्ट उल्लेख करून माझ्यावर आरोप करत आहात. तुम्ही पुन्हा असे केले तर सोड्णार नाही. तुम्ही एक माणुसकी नसलेला आयडी आहे.
भाजप आणि काँग्रेस यांच्यात काय डील झाली यावर का नाही तोंड उचकटत ?
दहा वेळा मी अपील केले कि केवळ पुतळ्याच्या विषयावर आपण मर्यादीत राहूयात. त्ञाच्यावर सुद्धा हलकटपणा केलाच ना ?
जज्ज लोयाच्या खून किंवा
जज्ज लोयाच्या खून किंवा संशयास्पद मृत्यूप्रकरणात आरोपांची राळ उठवून दिली त्याची चौकशी मविआच्या कार्य़काळात झाली का ? तुम्ही त्याबद्दल कधी प्रश्न उपस्थित केलेत का ? नसतील केले तर का नाहीत केले ? असे अनेक प्रश्न आहेत. धागाच भरकटवायचा ठरवलं तर ..
पुतळा पडायच्या आधी अनेक वेळा
पुतळा पडायच्या आधी अनेक वेळा मी Structural Engg, Structural Design हे शब्द वापरले ( सिल्क्यारा, होर्डिंग पडणे, बिहारमधले पूल पडणे) आहेत. कुठलिही पडझड झाल्यावर हे आधी सुचते. असे सुचणे काही ' रॉकेट सायन्स ' नाही आहे.
सर्वात आधी व्हायला हवे होते आणि ते तसे करणे तेव्हा महत्वाचे होते हे मला माहित आहे.
पुतळा पडल्यानंतर - असे अॅनॅलिसीस आता काहीच उपयोगाचे नाही. त्याने सिस्टीम मधला महादोष दिसणार नाही. केवळ आताचे वेळ मारुन नेता येईल. म्हणून तर सुरत-लूट असे विषय चाचपडून पाहिले..
पुतळा तिथे उभारला जावा , विक्रमी वेळेतच उभारला जावा अशी स्थानिक जनतेनी जोरदार मागणी केली होती का?
Submitted by उदय on 6
Submitted by उदय on 6 September, 2024 - 10:38
ही तुमची पोस्ट आहे. याउप्प्पर दहा पैसे, वीस पैसेची लायकी असलेल्या या आयडीशी वाद घालायचा नाही. मूर्खपणाला सुद्धा सीमा असते.
पुतळा तिथे उभारला जावा , विक्रमी वेळेतच उभारला जावा अशी स्थानिक जनतेनी जोरदार मागणी केली होती का? >> पुन्हा हे कुणाला उद्देशून आहे ? माझ्या पोस्टमधे या बद्दल काहीही उल्लेख नाही. मला उद्देशून नसेल तर कुणाला उद्देशून बडबड आहे ही ? मी गेली काही वर्षे अडचणीतून जात आहेच, पण गेल्या काही महीन्यात जगात काय चालू आहे याचीही माहिती नाही. मला त्याबद्दल बोलायचेच नाही.
तुम्ही माझ्या पोस्टीतली वाक्ये कोट करून त्यावर भक्तिरसात न्हाऊन निघालेले अशी मल्लिनाथी करत आहात आणि तुम्हाला तुम्ही ज्या पक्षाचे तुणतुणे वाजवता त्याचे भाजपधार्जिणे गुण दाखवले कि असंबद्ध बडबड करताय. अक्कल कमी आहे कि मेंदू तिरका बसलाय ?
भाजप आणि काँग्रेस हे एकमेकां ना विरोध करत सांभाळून घेत असतात. त्याचा हा सज्जड पुरावा.
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/nitin-gadkari-bats-for...
त्यामुळे पुन्हा कुणा तिसर्याला भाजपाई, संस्कारी, छुपा संघी म्हणत असाल तर थोबाड फोडणारच.
सॉरी नाही याचा अर्थ तुम्ही मागणी केली नाही असे नाही. तुमची लायकी नाही म्हणून सॉरी नाही. दुसरा कुठला संवेदनशील आयडी असता तर थोडीही कडक भाषा वापरताना पश्चात्ताप झाला असता.
<< Submitted by उदय on 6
<< Submitted by उदय on 6 September, 2024 - 10:38
ही तुमची पोस्ट आहे. याउप्प्पर दहा पैसे, वीस पैसेची लायकी असलेल्या या आयडीशी वाद घालायचा नाही. मूर्खपणाला सुद्धा सीमा असते. >>
----- सिमा नाही आहे हे दिसत आहे, नव्हे तसे ते दाखविले जात आहे.
सिमा नाही आहे हे दिसत आहे,
सिमा नाही आहे हे दिसत आहे, नव्हे तसे ते दाखविले जात आहे >> हे माहिती नव्हते. कबुलीजबाबद्दल आभार.
आताच राजकोट पुतळा उद्घाटनाचा
आताच राजकोट पुतळा उद्घाटनाचा व्हिडीओ पाहिला, तिथे फक्त विश्वगुरूच होते अस नाही तर विश्वगुरूंच्या बगलबच्यांसह महाराष्ट्रात भाजपची सत्ता यावी म्हणून रात्री २ वाजता राष्ट्रपती राजवट उठवनारे भाजपप्रेमी महामाहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. राष्ट्रपती पदाला तरी काहीतरी मानसन्मान असावा? २०१४ पर्यंत तरी राष्ट्रपतीपद हे पक्षनिरपेक्ष होतं.
उद्घाटनाच्या फोटो मधे माजी
राष्ट्रपती का असतील ?
उद्घाटनाच्या फोटो मधे माजी राष्ट्रपती कोविंद नसावेत ( हा अंदाज आहे). त्यावेळेचा फोटो.
https://www.thehindu.com/news/national/maharashtra/shivaji-maharaj-statu...
देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तर महत्वाच्या अशा नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभापासून पण लांब ठेवले होते. लोकशाही मधे संसद, पवित्र मंदिरच. मग होते कोण तर भगवे वस्त्रधारी, संगोल, आणि यांच्यासमोर नतमस्तक होणारी फोटोजिवी वृत्ती.
https://www.pmindia.gov.in/en/news_updates/pm-blessed-by-the-adheenams-b...
राजकोट पुतळा कोसळणे आणि फोटोजिवी वृत्ती यांचा काय संबंध आहे?
नवीन काय आहे? भाजपची एकूण एक
नवीन काय आहे? भाजपची एकूण एक सर्व कामं अल्पायुषीच असतात. अगदी ज्याच्या जोरावर निवडून आले ते अयोध्या मंदिर असो की अटल सेतू, फेकाड्या च्या फोटोंच्या अट्टहासापायी कुणाच्या भावना दुखावल्या तर दुखावल्या... निवडणुकीआधी कथा जमवली म्हणजे झालं.. बाकी त्याला काय देणं घेणं आहे?
उदय बरोबर. ते रमेश बैस
उदय बरोबर. ते रमेश बैस राज्यपाल आहेत. हा राज्यपाल कोश्यारी सारखा विखारी नव्हता. मविआच सरकार येणार राज्यात हे लक्षात घेऊन तातडीने बैसना हटवून “संस्कारी” परिवारातला राज्यपाल आणलाय म्हणे आता. ( भविष्यात त्रास द्यायला?)
देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तर महत्वाच्या अशा नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभापासून पण लांब ठेवले होते.
दूर ठेवले? अहो राष्ट्रपतींचा फॉर्मही भरताना ह्यांच्या हातात होता. एका कार्यक्रमात तर विश्वगुरू खुर्चीवर बसून होते नी बाजूला महामहीम राष्ट्रपतीना उभे करुन ठेवले होते. तसेच आई मेल्यानंतर सुतकातच त्यानी संसदेचे भूमीपूजन की काय केले होते, डोक्यावरचे केसही काढले नव्हते, तेव्हा अंधभक्तांचा हिंदूधर्म कुठे गेला होता काय माहीत. संगोल तर हातात घेऊन दांडेवाले बाबा बनून फिरत होते.
भैया पाटिल, विश्वगुरुणी कधीही सांगितले नाहीये की भ्रष्टाचार करू नका. “भ्रष्टाचार करा, पण भाजपात येऊन” अस विश्वगुरूंच धोरण आहे.
धाग्यामधे इतर (परिसर
धाग्यामधे इतर (परिसर सुशोभिकरण, प्रवेशद्वार, कंपाऊंड वॉल, परिसर सजावट, रस्ता तसेच पदपथ बांधकाम, लँडस्केप, शौचालय बांधकाम ) यांचे आकडे ) खर्चाचे आकडे दिले आहेत पण पुतळा बांधकामासाठी किती कोटी खर्च झाले होते हे नाही. सर्वांची बेरिज ३.०२ कोटी रु होत आहे.
भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण म्हणतात , पुतळा स्थापनेसाठी राज्य सरकारने २.३६ कोटी रु दिले होते. नौदलाने किती पैसे खर्च केले होते ?
रिबेरो यांच्या लेखांत पुतळ्यासाठी ८३ कोटी रु. खर्च आला होता. सुरवातीला योजनेत, पुतळ्याची उंची सहा फूट असणार होती, नंतर उंची वाढवली. हा बदल कुणी केला?
https://www.tribuneindia.com/news/comment/crumbling-statues-falling-stan...
पहिले कंत्राट २४ वर्षाच्या
पहिले कंत्राट २४ वर्षाच्या आपटे / पाटील यांना देतांना काय चूका झाल्या होत्या, आपटेची शिफारस कुणी केली होती, पात्रता काय होती हे अजून कळायचे असले तरी टोलेजंग पुतळा नव्याने बांधणार आहेत. ६० फुट म्हणजे आधी पेक्षाही उंच, मजबूत, शंभर वर्षांची गॅरेंटी आणि सहा महिन्यांत तयार करावा अशी अट.
https://www.esakal.com/maharashtra/60-feet-tall-statue-of-chhatrapati-sh...
Pages