Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
की वर्ड बदललेत
की वर्ड बदललेत
झिम्मा, घुमा, मंगळागौर .
आणि योगासन स्पर्धा!
आणि योगासन स्पर्धा!
ह्
ह्या बायका आणि ह्या बायका आवडणाऱ्या बायका बघून मला आयडेन्टीटी क्राईसेसच येतात. चक्क एकाकी वाटते. महिला शब्दाशी रिलेट करता येत नाही. ते शौचालयाच्या दारावर लिहिलेलेच बरे वाटते. महिला / पुरूष व्हॉटेव्हर
की वर्ड बदललेत >>>
की वर्ड बदललेत >>>
मला पण र.आ. म्हणतात ती "फ्रेंझी" बघितल्याचे आठवते. पुण्यात प्रभात, विजय ई थिएटर्स मधे हे पिक्चर लागत. या महिलांनी "बंदिवान मी..." वगैरे बाफ बघितले तर अस्मिताच्या घरावर मोर्चा नेतील.
या महिलांनी "बंदिवान मी..."
या महिलांनी "बंदिवान मी..." वगैरे बाफ बघितले तर अस्मिताच्या घरावर मोर्चा नेतील. >>> न्या न्या ! आपण माईक घेऊन विचारूयात कि "आता तुम्हाला कसं वाटतंय ? क्या कहेंगी आप हमारे दर्शकों से ? "
या महिलांनी "बंदिवान मी..."
या महिलांनी "बंदिवान मी..." वगैरे बाफ बघितले तर अस्मिताच्या घरावर मोर्चा नेतील.>>>>
आता तुम्हाला कसं वाटतंय ? क्या कहेंगी आप हमारे दर्शकों से ? ">>>>>
सगळ्यावर एकच उत्तर असेल माझे , व्हॉटेव्हर
घरत गणपती बघ मग. बाईपण म्हणजे
घरत गणपती बघ मग. म्हणजे अजिबात बघू नकोस. बाईपण म्हणजे काय ते आजी, मुलगी, गावातली सून, शहरातील सून, गा. सुनेची मुलगी, श. सुनेची मुलगी, मुलीची लग्न झालेली ... का गा.सु ची.... कोणाची तरी लग्न झालेली मुलगी, सून होणारी (पन टोटली इंटेडेड) पण व्हायला नको असलेली नातसुन आणि कोणी राहिलं असेल तर फीमेल कॅरेक्टर ... सांगतात. इथे 'सांगतात' या क्रियापदाचं कर्म 'बाईपण' हे आहे. इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं' झालंय!
आणि मग 'हेच तर बाईपण' ह्या समेवर अनेकदा तिय्या!
महिला हा राजकारण्यांचा आवडता
महिला हा राजकारण्यांचा आवडता शब्द आहे.
सार्वजनिक जीवनात असताना या ठिकाणी बायका हा शब्द भारदस्त वाटत नसावा. राजकारणात पांढराशुभ्र ड्रेसकोड कंपल्सरी असल्याचा जसा समज आहे तसंच असावं हे.
विधानसभा जवळ आल्यापासून पुण्याच्या लगत महिलांसाठी अष्टविनायक, खंडोबाची वारी, तिरूपती बालाजी, महालक्ष्मी अशा बसेस सुटताहेत.
इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं
इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं' झालंय!>>>>
इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं
इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं' झालंय! >>
मिसली होती कमेण्ट ही.
ह्या बायका आणि ह्या बायका
ह्या बायका आणि ह्या बायका आवडणाऱ्या बायका बघून मला आयडेन्टीटी क्राईसेसच येतात >>> अगदी अगदी. मी झिम्मा, बाईपण पिक्चर अजूनही पहिलेच नाहीयेत. पाहणारही नाहीये.
इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं' झालंय! >>> घरत मधली चिडका चेहरा केलेली अश्विनी भावे त्या गाण्यात आणि प्रोमोत पाहून पिक्चरात हे असलंच काहीतरी निघेल याची शंका होतीच
इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं
इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं' झालंय! >>>
ह्या बायका आणि ह्या बायका
ह्या बायका आणि ह्या बायका आवडणाऱ्या बायका बघून >>>>>>>>>>> ++११ अस्मिता.. सेम पिंच
मला तर मी अबनॉर्मल असण्याची शंका येते कधीकधी. लोल.. ज्या गोष्टी नॉर्मली नॉर्मल बायकांना आवडतात मी त्याच्या एकदम विरुद्ध आहे
दोन समविचारी 'बायका' मिळाल्या
दोन समविचारी 'बायका' मिळाल्या, हळदीकुंकवाला या.
इतके कर्ते आलेत की 'कर्म माझं' झालंय! >>
घरत गणपती वाचून मराठी लोकांचे हिंदी वरील ही गंमत आठवली.-
भैय्या, हळूहळू रिक्षा चलावो ना, नहीतो घरात गणपती और मैं आडवी
हा चित्रपट बघून आडवे होण्याची शक्यता आहेच की..!
आपल्याला एरवी आवडणारी कलाकार
आपल्याला एरवी आवडणारी कलाकार एखाद्या आक्रस्ताळ्या रोल मधे बघुन फार यातना होतात तस नाच ग घुमा मधे मुक्ताला बघुन झाल, घुमावर आधिच बरच लिहुन झालय त्यामुळे अजुन काही लिहित नाहि.. पण मुक्ताची अखन्ड चिडचिड, नमाला केलेल मॅनहॅन्डलिन्ग, हाताला धरुन ओढणे-चिडणे ...पुर्ण मुव्हि भर हेच आहे. ऑब्सेस असल्यासारखी वाटते.
फॅमिलि मॅन मधला मवाचा झिन्गुरपसली बॉसची आठ्वण झाली.
नम्रताने त्या वाळवित एवढी ओव्हर अॅक्टिन्ग केली होती त्यामूळे यात जरा तिच्याविषयी साशक होते तर तीने एकटिनेच उत्तम काम केलय..शेवटची १५ मिनिट सुसह्य आहेत.
सगळ्यावर एकच उत्तर असेल माझे
सगळ्यावर एकच उत्तर असेल माझे , व्हॉटेव्हर
>>
मी ते व्हेंटिलेटर वाचलं चुकून
सुटला गं बाई सुटला
सुटला गं बाई सुटला
हिंदीनंतर हा बाफ सुटला
गं बाई सुटला उं उं उं उं
हळदीकुंकवाला या >>> गॉगल
हळदीकुंकवाला या >>> गॉगल लावून, नथी घालून, आणि हवंतर फेटेही बांधून येतो
बापरे! रॉयल एनफिल्डवर या मग.
बापरे! रॉयल एनफिल्डवर या मग.
पर्फेक्ट, अमितव!
पर्फेक्ट, अमितव!
गॉगल लावून, नथी घालून, आणि
गॉगल लावून, नथी घालून, आणि हवंतर फेटेही बांधून येतो
>>>>
मुहूर्त चुकला. परवाच १५ ऑगस्ट होऊन गेला. असू दे आता तुम्ही गणपतीत जा बरं.
Harley Davidson please...
Harley Davidson please...
हे घ्या, छबिदार छबीचे रिमिक्स, न पाहिलेल्या लोकांनी तर पहाच. आग्रह आहे.
बांगडी हातात लाली व्हटात, भरली तरी मरदानी मी
माझेमन
माझेमन
अस्मिता, एखादं थीम साँग तयार करून ठेव बरं का आपल्यासाठी
मस्तंय ते रिमिक्स. आजवर ऐकलं
मस्तंय ते रिमिक्स. आजवर ऐकलं होतं.
आता पहायला दिल्याबद्दल धन्यवाद.
मलाही माहीत नव्हते ते, मी
मलाही माहीत नव्हते ते, मी 'टेस्ला गं बाई टेस्ला' लिहिला तेव्हा प्रतिक्रियेत मिळाले, आणि आवडले.
प्राजक्ता, वाचली बरं पोस्ट.
नै नै, इंड्यात बुल्लेट!
नै नै, इंड्यात बुल्लेट! हार्ले वगैरे तुम्च्या आम्रविकेत.
मी जे सांगतेय ऐका शेट, हे
मी जे सांगतेय ऐका शेट, हे वागणं बरं नव्हं
रिमिक्स जमलंय पण मी अशी अर्धी
रिमिक्स जमलंय पण मी अशी अर्धी जीन घालून येणार नाही बरं
छबिदार छबीचे रिमिक्स
छबिदार छबीचे रिमिक्स
>>>>>>
आता माझ्या मनात ओरिजिनल गाणं आणि नाचाविषयी अपार आदर दाटून आलेला आहे.
ना… इंडियातल्या मर्दानी हे सगळे प्रकार ॲक्टिवावर बसून करतात.
संध्याच्या स्प्रिंगडान्सबद्दल
संध्याच्या स्प्रिंगडान्सबद्दल ?
Pages