आखिर, ये ट्रेन रूकती क्यूं नही है ?

Submitted by मी पुन्हा येईन on 24 July, 2024 - 14:27

द बर्निंग ट्रेन हा चित्रपट पाहताना जेव्हां बचावकार्य सुरू झाले तेव्हां न राहवून चिकवा - १० वर प्रतिसाद दिला गेला. त्यानंतर धागा पळू लागल्याने वेगळ्या धाग्यावर प्रतिसाद हलवण्याची सूचना आली. ती पटली आणि शिरसांवंद्य समजून वेगळा धागा सादर करत आहे. नवे प्रतिसाद या धाग्यावर देऊ शकता.

सुरूवात अर्थातच मुली पटवण्याच्या तेव्हांच्या स्मार्ट आयडियाज. धर्मेंद्र, विनोद खन्ना हे वयाने आताच्या किंवा दहा वर्षांपूर्वीच्या आमीर, सलमान, शाहरूख पेक्षा नक्कीच लहान असावेत. पण कॉलेजचे विद्यार्थी शोभत नाहीत. हेमा मालिनी सुद्धा यात शिक्षिका वाटते. परवीन बाबी पाच वेळा फेल झालेली विद्यार्थिनी म्हणून चालली असती.

यांचे स्वप्न ट्रेन बनवण्याचे असते, पण मुलींच्या मागे फिरणे, गाणी म्हणणे यातून वेळ मिळत नसतो.
इतक्यात एक फोन येतो आणि धर्मेंद्राच्या पिताश्रींची सगळी संपत्ती डामाडौल होऊन जाते. त्याचं वैभव सगळं कर्ज काढून कमावलेलं असतं. या बँका आपल्याकडून व्याज घेतात मग ते अशा गरजवंतांना देतात. बँक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि प्रत्येक राष्ट्रभक्ताकडे ती असायला हवी.
त्या फोनमुळे त्याचे वडील खचतात.

ठो असा आवाज करत कुठून तरी एक गोळी सुटते आणि धरमजी के पिताश्री देवाघरी जातात. धर्मेंद्र एकदम कफल्लक !
इतक्यात हेमाचं पत्र मिळतं कि तू आता गरीब झाला आहेस, मी आधीपासून गरीबच होते, तुझ्याकडे पैसा होता, दोन चार दिवस आरामात जातील म्हणून तुझ्यावर प्रेम केलं, पण आता तू काय कामाचा ?
हे पत्र पाहून मग तो सिरीयस होतो आणि इस जालीम दुनिया से दूर निघून जातो.

तो गेल्यामुळे विनोद खन्नाची गाडी रूळावर येते आणि तो सुपर एक्सप्रेस बनवायला लागतो. यांच्यात डिझाईन म्हणजे एक मोठं गोल टेबल ठेवायचं, त्यावर लहान मुलांचे ट्रेनचे खेळणे असते ते ठेवायचे आणि डबे इकडून तिकडे हाताने पळवायचे. हे डिझाईन खूपच क्लिष्ट आहे हे ठसवण्यासाठी विनोद चेहर्‍यावर त्रासिक भाव आणून जोरजोरात ते डबे दाबून ढकलत असतो. तसेच अधून मधून ड्रॉईंग बोर्डावर जाऊन ब्ल्यू प्रिंटवर उभ्या आडव्या रेषा मारत असतो. दिग्दर्शकाने ब्ल्यू प्रिंट म्हणजे डिझाईन ही माहिती जमवल्याचा हा परिणाम. अर्थात ब्ल्यू प्रिंट हे फायनल डिझाईन असते आणि त्याच्या वर रेषा मारणे हा फाऊल असतो हे त्याला कसे ठाऊक असणार ?

त्याची सुपर एक्सप्रेस तयार होते आणि तिची पहिली धाव दिल्ली ते मुंबई ठरते.
त्याच्या ट्रेनला धर्मेंद्र हिरवा सिग्नल देणार असतो. दोन मुख्य हिरो ठरवतात, तर मग रेल्वेच्या जीएम वगैरेंना मम म्हणण्याशिवाय गत्यंतचर नसतं. जीएमच्या मनात रेल्वे मंत्र्याला बोलवावं दोन वर्षे वाढवून घ्यावी किंवा कलकत्याच्या बोगी बनवणार्‍या कंपनीचं टेण्डर पास करून घ्यावं असं असलं तरी सिनेमाचे हिरो म्हटल्यावर त्याला चॅलेंज कसं करणार ?

इथ पर्यंत शोले, शान प्रमाणे टाईमपास होतो.
नंतर हॉलिवूड प्रमाणे आपत्तीपट बनवायचा जितका गांभीर्याने प्रयत्न केला आहे, तितकीच त्यातून विनोद (खन्ना, मेहरा नव्हे) निर्मिती होत जाते.
ही आशियातली सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन असते म्हणे. जपान त्या वेळी आशियाचा भाग नसावा.

गुलशन रायचा सिनेमा असल्याने ट्रेन मधे तेव्हांचे सर्व सुपरस्टार्स चढतात.
इथून पुढच्या कमेण्ट्स चिकवावरून कमेण्ट बॉक्स मधे डकवत आहे.

बचावकार्यात एक लाल साडी आली त्यामुळे चिकवा धागा पेटला. त्यातून एक कष्टकरी जोडपे असल्याने ट्रेन का पेटली असावी याचा अंदाज या प्रतिसादातून येईलच. पानी मे भी आग लगाये ऐसा हुस्न तेरा अशा प्रकारची गाणी ही अजिबात अतिशयोक्ती नाहीत. पाणी पेटू शकते तर ट्रेन तर काय, जळीव पदार्थाने बनलेले एक वाहन..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द बर्निंग ट्रेन पाहतोय थोडा थोडा करून.
धर्मेंद्र, विनोद खन्ना असे दोन दोन देमार, दणकट, दणदणीत हिरोज असताना जितेंद्र त्या वेळी पानी कम चाय वाटायचा. आता खानावळीच्या जमान्यात जितेंद्रच दोघांपेक्षा चिकणा हिरो वाटतो.
परदेशी आपत्तीपटांना भारताचं हे उत्तर होतं.

Submitted by रघू आचार्य on 23 July, 2024 - 22:03

इथे बहुतेकांनी पाहिलाच असेल..

ट्रेन मधे आग लागते तेव्हां ऑल इंडीया रेडीयो द्वारा प्रवाशांशी संभाषण करण्याचा निर्णय विनोद खन्ना (चीफ इंजिनीयर) घेतो. जो मेन हिरोंपैकी असेल त्याचं पद काही का असेना, तोच अशी कामे करणार हा चित्रपटीय नियम इथेही लागू पडतो. तो सुपर एक्सप्रेसच्या प्रवाशांना आवाहन करतो कि जर तुम्हाला आमचे हे निवेदन ऐकू येत असेल तर तुम्ही पुढच्या रेल्वे स्टेशनवर लाल कपडा फेका म्हणजे तुम्हाला आमचे म्हणणे ऐकू जातेय याची खात्री आम्हाला पटेल. ( मगच आम्ही पते कि बात सांगू ).
म्हणजे हा अशा प्रसंगात सुद्धा खात्री पटली तरच महत्वाचे सांगणार. जे सांगायचंय ते सांगून टाकून, तुम्हाला हे समजले असेल तर... असे आवाहन का करत नाही याचे उत्तर पुढच्या प्रसंगात मिळते.

लाल कापड शोधायला धर्मेंद्र आणि सहकारी फिरत असतात. एका नवविवाहित जोडप्याच्या बॅगेत वधूचा लाल जोडा असतो. पण सुहाग कि निशाणी म्हणून ती द्यायला नकार देते. मग लाल साडी, लाल ब्लाऊज नेसलेली आशा सचदेव जोशात येऊन म्हणते कि " मेरा कोई सुहाग नही है, और ना ही आगे होगा , ये लीजिए " ... असं म्हणत ती साडी फेडते.

तर यासाठी विनोद खन्नाने सगळी "बात" एकदम न सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो.
साडीचा पदर फाडून दिला असता तरी चाललं असतं, पगडी पण लाल असते, प्रवाशात कुणाकडे लाल शर्ट असेलच. पण छे !
नशीब यांचं आपत्ती व्यवस्थापनाचं राष्ट्रकार्य साडीवरच भागतं.

एकूणच बचावकार्यावर स्वतंत्र धागा निघू शकतो.

Submitted by रघू आचार्य on 24 July, 2024 - 07:49

हो.बर्निंग ट्रेन अश्या बऱ्याच बाबीत विनोदी आहे.ते नवविवाहित जोडपं मरतं तो सीन पण.

Submitted by mi_anu on 24 July, 2024 - 07:53

ते नवविवाहित जोडपं मरतं तो सीन पण >> अरेरे ! इथपर्यंत अजून पोहोचलो नाही. पण चित्रपटीय विधीलिखितानुसार सुहागच्या रक्षणासाठी तिने बहुमताचा आदर केला नाही तर तिचा सुहागच राहणार नाही हा अंदाज आलाच होता.

Submitted by खंग्री बालक on 24 July, 2024 - 07:56

ते जोडपे ट्रेनमध्येच हनिमुन करते ते मला तेव्हा विनोदी वाटलेले पण नंतर त्यांना मरताना पाहुन कळले की शादीका मक्सद पुरा केल्याशिवाय मेले असते तर भुत बित झाले असते त्यामुळे भरधाव ट्रेनमध्ये त्यांना घाईघाईत काम उरकावे लागले.

Submitted by साधना on 24 July, 2024 - 09:04

Lol
'सलाम ए इश्क'(?) मधे अरबाज आणि ईशा कोप्पीकर नवीन लग्न झालेले असूनही घरी 'उपासमार' झाल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेत प्रत्येक बोगद्याखाली एक याप्रमाणे तीन 'हनिमून' उरकतात. मग त्यांच्या जीवाला गारवा मिळतो. बोगद्याखाली अंधार..!

Submitted by अस्मिता. on 24 July, 2024 - 09:10

अस्मिता हसून लोळले मी

Submitted by दक्षिणा on 24 July, 2024 - 09:2

तर भुत बित झाले असते >>> Lol
भूतपूर्व या इच्छा राहिलेल्या असतात त्यांची भूतं सॉलीड खंग्री बनतात.

बोगद्याखाली अंधार..! >> Lol
अरबाज म्हणजे तोच ना सिद्धार्थ कपूरचा हमदर्द?

Submitted by खंग्री बालक on 24 July, 2024 - 09:28

ब ट्रे सारखा यांनी सेपरेट कुपे बुक केला असेल तर ठिकाय पण जनरलमधुन जात असतील आणि बोगदा आला की काम करायचे असेल तर कठिण आहे…

Submitted by साधना on 24 July, 2024 - 09:30

असे बोअर युजर एक्सपिरियन्स घेण्यापेक्षा ते न घेतलेले बरे Happy

Submitted by mi_anu on 24 July, 2024 - 09:32

अरबाज ऐवजी सोहेल असेल कदाचित पण हे नगाला नगच आहेत. शेवटी 'हनिमून' महत्त्वाचा Lol

बोगदा आला की काम करायचे असेल तर कठिण आहे…
>>> कामेच्छा इच्छा तेथे मार्ग... Lol

Submitted by अस्मिता. on 24 July, 2024 - 09:44

Lol
शंभर मैल (ब ट्रे वाले ब्रिटिश मानके वापरतात) वेगाने धावत्या ट्रेनमधून लाल कपडा फेकायचा तर ट्रेनचे वस्तुमान, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची स्पेसिफिक डेन्सिटी, ट्रेनचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि कापडाचे वस्तुमान, घनता, स्पेडे इ. विचारात घेऊन न्यूटनच्या नियमाप्रमाणे ट्रेन किती अंतर पुढे गेल्यावर कापड फेकले असता ते वाऱ्याच्या शक्तीने उडून बरोब्बर फलाटावर पडेल हे सुद्धा चीफ इंजीनियर सांगायला हवे होते. किंवा नेहमी अशा प्रसंगात कुणी डॉक्टर आहे का च्या चालीवर कुणी मेकॅनिकल इंजिनिअर आहे का असा प्रश्न विचारायला पाहिजे.
त्याचे गणित होईपर्यंत प्लॅटफॉर्म कुठल्या दिशेला येईल हे इंजिनिअर नसलेल्या व व्यवहारज्ञान तुंबळ असलेल्या कुणीही पाहून ठेवायला हवे नाहीतर सगळे मुसळ (इथे साडी) अक्षरशः केरात!!

Submitted by खंग्री बालक on 24 July, 2024 - 10:13

साडी, दुपटं, फडकं जे काही फेकलं ते नीट जड बॉल करून फेकायला हवं. एकंदर भौतिकशास्त्र सगळं संशयास्पद आहेच.तो स्लोप वेगाने बांधला तेही.

Submitted by mi_anu on 24 July, 2024 - 10:21

जड बॉल करून फेकायला >> सुपर एक्स्प्रेसचा पहिला बळी फलाटावर उभा असलेला प्रवासी झाला असता.
फेकणारा धर्मेंद्र असल्याने आणि अनेक सिनेमात त्याने पूलावरून खाली धावत्या रेल्वे वर अचूक उडी मारलेली असल्यानेच कार्य सिद्धीस जाते. म्हणतात ना, त्याच्या अंगातच गाणे आहे, तसे त्याच्या अंगातच पदार्थ विज्ञान आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरला दुसरे काम देता येईल.
हनुमान कपलला बोगद्यात लांबी, ट्रेन चा वेग याचे गणिते करून कपलला सांगायचे कि, आपके पास... सेकंदस है और आपका समय शुरू होता है अब...
टिक टिक १.२,३............

Submitted by खंग्री बालक on 24 July, 2024 - 10:44

'सगळे बोगदे पारसिक बोगद्याच्या लांबीचे का नाहीत, सरकार नक्की काय करतंय?इतके छोटे बोगदे बनवून पैसे नक्की कोणी खाल्ले?संतप्त जोडप्याचा सवाल'

Submitted by mi_anu on 24 July, 2024 - 11:02

Rofl
मोदीजींनी Skill development नावाचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे.

Submitted by खंग्री बालक on 24 July, 2024 - 11:04

ट्रेनपेक्षा तुफान सुटलेत इथे सगळे Biggrin Biggrin

बोगद्याखाली अंधार >>> फारच फाष्ट काम दिसतंय.
आउट ऑफ द बॉक्स आयडिया म्हणतात त्या ह्याच. नाहीतर आमची कोकण रेल्वे...एवढे बोगदे आहेत. पण एक्काला सुचलं नाही की नवी स्कीम डिक्लेअर करावी - गोव्याचं तिकीट काढा नी प्रवास व हनिमून एकाच तिकिटात उरका. २०२४ पासून काश्मीरही अव्हेलेबल.

अरबाज नाही, सोहेल आहे तो. पण काय फरक पडतो? आमची आज्जी म्हणाली असती "थोडा आचरट आहे पण भारी कामसू हो पोरगा."

मेरा कोई सुहाग नही है, और ना ही आगे होगा >>> सुहाग नाही ठीकाय. पण दिल्लीवरून रेल्वेने मुंबईला येताना लगेज नाही? लाल ब्लाउज आणि पेटीकोटवर पुढचा प्रवास? का मॅचिंग साडी नसेल तर नेसणार नाही असा बाणा होता? बरं नाही तिच्याकडे लगेज. गरीब घरची, अंगावरच्या वस्त्रानिशी प्रवास करतेय समजू. पण बाकी अक्ख्या रेल्वेत एकाही बाईकडे एखादी एक्सट्रा साडी, ओढणी, शाल, सलवार कमीज नाही जो आशा सचदेव वापरू शकेल? कलंक आहेत या बाईपणाच्या नावावर. आणि पुरुष इतर ठिकाणी बायांना अगदी आपल्या अंगातले जॅकेट काढून देतात मग हिला का नाही? मेल्यांनो वर जायची वेळ आलेय पण मोह सुटत नाही का? दूरवरच्या जंगलात रात्र काढायला सापडलेल्या झोपडीत अंगावर गुंडाळायला चादरी बऱ्या सापडतात. रेल्वेत झोपायच्या चादरी राष्ट्राची संपत्ती म्हणून तिजोरीत ठेवल्यात की काय?
लाल कपडे की अनाउन्समेंट ज्याच्या रेडिओवर ऐकू येते त्या मुलाच्या अंगात लाल स्वेटर, शाळेच्या ट्रीपच्या मुलांच्या अंगावर लाल ब्लेझर्स आहेत बरं का.

मुळात ऐकू येतंय की नाही हे कळण्यासाठी लालच कपडा कशाला हवाय? पांढरी रेल्वेची चादर मेसेज लिहून फेकली तर चालणार नाही? पुढच्या बजेटात कम्युनिकेशन सेस वाढवा हवं तर...

Submitted by माझेमन on 24 July, 2024 - 12:19

बोगद्याखाली अंधार>>> Lol
माझी मैत्रिण सोहेल खान च्या नाकाला रेल्वे चा बोगदा म्हणायची ते किती लागू होतय इथे Rofl

Submitted by aashu29 on 24 July, 2024 - 11:30

लाल ब्लाउज आणि पेटीकोटवर पुढचा प्रवास? का मॅचिंग साडी नसेल तर नेसणार नाही असा बाणा होता? > अगदी अगदी Lol

Submitted by aashu29 on 24 July, 2024 - 11:33

आता आले का पुन्हा सलाम-ए-इष्क बघणे. Lol

Submitted by दक्षिणा on 24 July, 2024 - 11:46

आमची कोकण रेल्वे...एवढे बोगदे आहेत. >>>>

काय कामाचे??? एक तो उक्शीचा सोडला तर बाकिचे आले आले म्हणताना संपतात पण… हनिमुन मधला ह म्हणेपर्यंत बोगदा संपला आणि मनातले मांडे मनातच राहिले असे व्हायचे..

Submitted by साधना on 24 July, 2024 - 11:48

ऑल इंडीया रेडीयो द्वारा प्रवाशांशी संभाषण करण्याचा निर्णय विनोद खन्ना (चीफ इंजिनीयर) घेतो. >>>>
तो बरोबर करतोय. अ गुड लीडर नोज स्ट्रेंथ ॲन वीकनेसेस ऑफ हिज टीम.
त्याला माहितेय अटेंडंट जीव गेला तरी पांढरी चादर फेकू देणार नाही. तशीच खात्री त्याला ‘यात्रींयों से निवेदन है। यात्रीगण कृपया ध्यान दे, दिल्ली से मुंबई जानेवाली ११४७८ डाऊन आज निर्धारित समय &~<>>%^^कचटतप &>>$£ प्लॅटफॉर्म क्रमांक &~<>>%^ किर्र से जाएगी’ असल्या उद्घोषणा करणाऱ्या अनाउन्सरबद्दल आहे. म्हणून तो करतो अनाउन्समेंट.

Submitted by माझेमन on 24 July, 2024 - 12:17

हनिमुन मधला ह म्हणेपर्यंत बोगदा संपला आणि मनातले मांडे मनातच राहिले असे व्हायचे..
>>>
साधना असं आपल्याला वाटतं. सोहेल खान 'आज करे सो अब' वर विश्वास ठेवतो. तो ख्रिस्तोफर नोलनसारखाच काळ, काम वेगाच्या बंधनांना मानत नाही.

Submitted by माझेमन on 24 July, 2024 - 12:28

सगळे धमाल सुटलेत Lol
माझेमन काय ऐकत नाय आज. Happy

Submitted by mi_anu on 24 July, 2024 - 12:28

Lol धमाल लेख/वर्णन व प्रतिक्रियाही.

मी काल चिकवावर हे वरवर चाळले होते पण लिंक देण्याआधी सर्वांना लिहू दे म्हणून थांबलो. May be a little presumptuous, पण मी आधीच लिंक दिली तर खुद्द धागालेखक व प्रतिक्रिया देणारे लोक त्यांची स्वतंत्र धमाल निरीक्षणे लिहीणार नाहीत असे मला वाटले. म्हणून थांबलो Happy त्या लिंक्स चिकवावर टाकत आहे.

इथली बोगदा-हनिमून चर्चा किंवा विना लगेज प्रवास करणारी आशा सचदेव ई अँगल्स धमाल आहेत Happy

आणि मूळ लेखातील एकूणच बचावकार्य, डिझाइन म्हणजे टेबलावर मॉडेल ट्रेनचे डबे इकडून तिकडे फिरवणे, पाच वेळा फेल, आशियात जपान नसणे वगैरे फार चपखल आहे Happy Happy

अजून लिहा र.आ. ("खंबा"?) आणि लोकहो. पाहिजे तर त्या लिन्क्स नंतर बघा.

आणि मूळ लेखातील एकूणच बचावकार्य, डिझाइन म्हणजे टेबलावर मॉडेल ट्रेनचे डबे इकडून तिकडे फिरवणे, पाच वेळा फेल, आशियात जपान नसणे >> Lol मी हा सिनेमा थिएटर ला पाहिलेला आहे त्यामुळे वाचायला फारच मजा येते आहे.

मी एक छोटुकला क्विक ब्रशअप केला बट्रे वर यानिमिताने. त्या स्फोट सीनच्या आधी धर्मेंद्र चालत्या गाडीच्या दाराला लटकत असतो. आत बसलेला टीसी(?) त्याच्याकडे अगदी कॅज्युअल लूक टाकतो की काय विशेष नाही, अशी लटकतातच माणसं Proud

बाकी तो लाल रेडिओ आणि मुलाचा लाल स्वेटर पण बघितला. पण त्याव्यतिरिक्त बहुतेक आशा सचदेव सोडून कोणाच्या अंगावर लाल कपडे दिसले नाहीत. बॅग्ज बहुतेक ट्रेनच्या टपावर टाकल्या असाव्यात म्हणून बॅगेत लाल काही आहे का बघूया असा विचार कोणाच्या डोक्यात आला नसणार. शिवाय विख प्रवाशांसोबत 'टिपि टिपि टिप टॉप' खेळत असावा त्यामुळे सापडायला अवघड रंगाचं नाव सांगणं हे ओघाने आलंच Wink

हसून हसून मेलो.
आता यात नमूद केलेले सर्व परत पाहणे आले.
कामेच्छा इच्छा तेथे मार्ग>>>>> Proud
कामातुरां न भयं न लज्जा...
भारतीय सिनेमा - आगगाडीतील मधुचंद्र यावर निबंध लिहू शकतो.

बाकी ब ट्रे आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला धीराने कसं सामोरं जावं याचा धडा देतो.
उदा. कॅथे पॅसिफिकसाठी कामाला जात असताना सिमी गरेवालला पकडून आणून मॉंटेसरी टीचर केलंय. पण ती मनावर घेत नाही. उलट धार्मिक सद्भावना यात्रेतंर्गत ख्रिश्चन मागे रहायला नको म्हणून ‘प्रे माय चाईल्ड’ म्हणत हातासरशी फादरचा रोल पण करून टाकते.
तो नविन निश्चल दिसेल त्याला बॅंडेजेसमध्ये गुंडाळून टाकतो. बहुतेक केईमला बॅंडेजेस सप्लाय करायला जात असावा.

ब ट्रे आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला धीराने कसं सामोरं जावं याचा धडा देतो.>> मोटिव्हेशनल गुरूंच्या लक्षात आणून देऊ नका ओ. नाहीतर त्यांना कशात काय दिसेल नेम नाही. Lol

बाकी ब ट्रे आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला धीराने कसं सामोरं जावं याचा धडा देतो.
उदा. कॅथे पॅसिफिकसाठी कामाला जात असताना सिमी गरेवालला पकडून आणून मॉंटेसरी टीचर केलंय. पण ती मनावर घेत नाही. उलट धार्मिक सद्भावना यात्रेतंर्गत ख्रिश्चन मागे रहायला नको म्हणून ‘प्रे माय चाईल्ड’ म्हणत हातासरशी फादरचा रोल पण करून टाकते.
तो नविन निश्चल दिसेल त्याला बॅंडेजेसमध्ये गुंडाळून टाकतो. बहुतेक केईमला बॅंडेजेस सप्लाय करायला जात असावा. Submitted by माझेमन on 25 July, 2024 - 01:37 >>>>>>>>>>> भारी एकदम . हा हा हा हा

हहपुवा....... Rofl

तो सोहेल की अरबाज बोगद्याच्या वेळातच सर्व उरकून टाकू शकत असेल तर मुक्कामी पोचल्यावर बायको डिवोर्स फाईल करेल. बरं यावर उपाय म्हणून वायग्रा वगैरे घेण्याचीही पंचाईत. आदमी करे तो करे क्या.

आयुष्य कोणते गहन प्रश्न तुमच्यासमोर उभे करेल याचा नेम नाही.
ते अग्निशामक दलाचे बंब ट्रेन पास होत असताना साईडला उभे राहून पाण्याचा फवारा मारतात - आकाशाच्या दिशेने. कशासाठी? रेन डान्स करायचा आहे?

एकीचा नवरा तिला विचारतो की "मौत से डर लगता है?" ती म्हणते "नही हमारे बच्चे..." इथे तुम्हाला वाटेल तिला काळजी वाटतेय की 'बच्चे अनाथ होंगे. उनको कौन सम्भालेगा?' मोठे असतील तर "जायदाद के लिये झगडा तो नही करेंगे ना? मेरी बनारसी साडी भाभी को तो नही देंगे ना?" छे, तिला प्रश्न पडलाय "हमारे बच्चे किसकी लाशों से लिपटके रोयेंगे?" पॉईंट आहे. त्यावेळी डी एन ए टेस्ट नव्हत्या ना. कसं कळणार?

मुळात इतक्या गंभीर प्रसंगी असा 'आपको अब कैसा लग राहा है' टाईप कॅज्युअल प्रश्न का? Happy ती काय 'यस यस, आय ऍम सो एकसायटेड अँड थ्रील्ड टू बी हियर टुडे! लव्ह यु ऑल!' म्हणून उडता किस देणारे का?

आय ऍम सो एकसायटेड अँड थ्रील्ड टू बी हियर टुडे! >>> Lol Lol

एका खिशात डायनामाईट, दुसऱ्या खिशात वाती आणि अंगावर कुठेतरी आगपेटी बाळगणाऱ्या नरपुंगवाला काय म्हणावे हा अजून एक महत्वाचा प्रश्न.

बाकी डिझेल इंजिन असेल तर ट्रेन थांबलीच नसल्याने (पर्यायाने रिफ्युएल न झाल्यामुळे) कशाच्या आधारावर एवढ्या वेगात दौडत होती? आणि त्या टेक्नॉलॉजीचे आपण पेटंट का घेतले नाही? इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक सप्लाय बंद करण्याचा विचार का नाही केला गेला? वगैरे मायनर प्रश्न आपण सोडून देऊ.

कॉम्प्युटर शट डाऊन केल्याशिवाय बंद केला तर रॅम डॅमेज होते तसे थेट इलेक्टरीक सप्लाय बंद करून डबे एकमेकांवर चढले असते इंजिन ने ब्रेक मारल्याचं डब्यांना कळलं नाही म्हणून.

ट्रेन च्या शेवटच्या डब्यातल्या लोकांनी मोठ्या आवाजात हे गाणे गायले असते तरी ट्रेनचे पुढचे डबे आणि इंजिन.... पर्यायाने आख्खी ट्रेन थांबलीच असती कि

उगीच एवढी स्टंट बाजी कशाला ती

Pages