चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदसं हसायचं.>>> टा श्रॉ. त्या वेळी करीना कपूर सारखा दिसायचा Lol
खरंच त्या दोघांत (हीरोपंक्ही) काहिही केमिस्ट्री नाही. क्रिती प्रयत्न करते, पण टायगर माती खातोय, तो अद्याप ही खातोच आहे

अनंत फ्लॉप चा सम्राट अर्जुन कपूर परत एकदा शिंघम ३ मधे व्हिलन बनून येतोय..
ह्याला वाटतयं की आपण व्हिलन बनून तरी चमकू कारण इशकजादे मधे बरा वाटलेला.. पण अभिनय (??) तो कशाशी खातात ते कळलं तर साईड अ‍ॅक्टर ही कमाल करून जातात हे त्याने शिकावं.. गेला बाजार राजपाल यादव, पं. त्रिपाठी कडे तरी ट्युशन लाव.

मनुष्यप्राण्याला सर्व प्रकारचे सिनेमे सहन करता आले पाहिजेत या सामाजिक जाणिवेतून असे चित्रपट काही जण काढत असतात. >>> Lol

नुकताच ह्रितिक चा फायटर बघून डोळे आणि पाकीट पोळल्यावर लगेच पुढच्या महिन्यात बडे मिया छोटे मिया बघण्याचे अत्याचार स्वतःवर का करून घ्यावे?

आमिर खान आणि माधुरी दिक्षित असूनही
तुम मेरे हो
>>
तुम मेरे हो मधे आमिर जूही आहेत
आमिर माधुरीचे दिल आणि दीवना मुझसा नही

मग मी दिवाना मुझसा नाही देखील बघितला का नक्कीच आणि पकलो देखील.
दोन्ही पाहिलेले आहेत ह्याचा अर्थ.
आठवत नाहीयेत पण पीळ आहे इतके आठवतेय.
दूरदर्शन वर असले अत्याचार चित्रपट लागायचे तेव्हा.

अँकी थँक्स रे

रौतु का राज थोडा थोडा बघत संपवला. कुणी पाहणार असेल तर एका बैठकीत पहायच्या तयारीनेच पहावा असे सुचवेन.

एक ऑफ बीट पोलीस इन्वेस्टीगेशन सिनेमा आहे. पोलीस तपास आहे म्हणून सस्पेन्स आहे म्हणायचं. पण सस्पेन्स राखायचं म्हणून त्याभोवती सिनेमा रचलाय असं इथे होत नाही. यातला नायक सुपरकॉप नाही, तसाच तो वेंधळाही नाही. त्याचे असिस्टंट्स सुद्धा कॉमेडीयन वाटतील असे नाही. एखाद्या गावखेड्यात किंवा दुर्गम भागातल्या पोलिसांना जी आव्हाने वाट्याला येतात ती या सर्वांना येतात. त्यातच ज्या शाळेत खून झाला आहे ती एका बड्या धेंडाची आहे. तपासात भल्या मोठ्या चुका करूनही इन्स्पेक्टर नेगी (नवाजुद्दीन सिद्दीकी) जिद्दीने तपास करत राहतो.

अलिकडे अशा चित्रपटात नायकाची एक अव्यक्त स्टॉरी असते. ती समांतर चालते. पुढे नवाज जे अनाकलनीय निर्णय घेतो त्याची या समांतर कथेशी सांगड घालण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे. हा निसरडा भाग असूनही चित्रपट घसरला नाही. तपास एक निमित्त होतं..
खूनी कोण याचा अंदाज आधीच आला होता पण ज्या कारणांमुळे खून झाला त्याचा अंदाज येत नाही.
काशी, रौतु दोन्हीही ऑफबीट सिनेमे एकापाठोपाठ चांगले निघाले.

मसुरीचा लाल टिब्ब्याचा रस्ता आणि तिथले हिमाययीन शिखरांचे सौंदर्य खूप सुंदर दिसलेय सिनेमात. मसुरी बाजार अजिबातच पाहण्यासारखे नाही. येरवडा बाजारासारखे आहे. पण आजूबाजूची गावे हेवा वाटावीत इतकी निसर्गरम्य आहेत. कॅमेरा वर्क सुंदर आहे.

आणि पकलो देखील.
>>
दी मु न मधे चौकोनी फ्रेम चा चष्मा लावणारा आमिर आहे जो मॉडेल असलेल्या माधुरीच्या प्रेमात पडतो टाईप स्टोरी होती.

अवल, डॉ लाड यांचा परिचय वाचला. थॅन्क्स फॉर शेअरिंग! त्यांच्या इतर कार्याबद्दल माहिती नव्हती. त्यात पण करसन मूलजीच्या केस बद्दल उल्लेख आहेच.

हिरोपंती Lol मी नाही पाहिलाय अजून. धाडस नाही झालं.

रौतु का राज >>> थँक्यू आचार्य. बघेन हा बहुधा.

बोलणारा उंट >>> सिरिअसली? Lol

मै Happy
खरं तर जरा सविस्तर लिहायचय अजून. मग माबो वर टाकेन सगळे सुधारक हळूहळू

हिरोपंती पेक्षा त्याचा ओरिजनल पाहा. परुगू मध्ये अल्लु अर्जुन आहे. एक नंबर झालेला आहे तो पिक्चर. आणि हिरॉईनचा बाप म्हणून प्रकाश राजने मस्त अभिनय केला आहे.

हिरोपंती मध्ये तेंदुआ अगदीच नवखा होता. बागी मध्ये त्याचा हातखंडा मारामारी प्रयोग असल्याने चांगला सूट झाला.

The Peacemaker - Netflix

सिनेमा जुनाच आहे. मी पण दुसर्‍यांदा बघितला. पण दोन्ही वेळेला जे आवडलं त्यात खूप तफावत होती.

शीतयुद्धाच्या नंतरचा काळ. रशिया त्याच्याकडची १० अण्वस्त्र डीकमीशन करणार असतो. पण रशियन सैन्यातील एक जनरल ती पळवून बाहेर विकायचा बेत आखतो. त्याकरता तो न्यूक्स वाहून नेणार्‍या ट्रेनवर हल्ला करवतो, बंदोबस्ताकरता असणारे सगळे रशियन सैनीक मारतो आणि ९ न्यूक्स दुसर्‍या ट्रेनवर चढवतो. एक न्यूक स्फोट होण्याकरता ट्रेनवरच राहू देतो. ( एक न्यूक वापरायचे कारण म्हणजे रेडीएशन्समुळे तपासात अडचणी येऊन त्याला त्याच्या कामाकरता पुरेसा वेळ मिळावा. )

पुढे हिरो आणि हिरवीण मिळून न्यूक्सच्या चोरीचा छडा लावतात पण ९ पैकी १ न्यूक गहाळ असते. ते कोण आणि कशाकरता वापरणार असते ते बघण्यात मजा आहे.

पहिल्या वेळेला अ‍ॅक्शन, न्यूक्स पळवायचा आणि पकडायचे प्लॉट्स , जॉर्ज क्लूनी, न्यूकच्या स्फोटाचा शॉट हे खूप भारी वाटले होते.

न्यूकच्या स्फोटाचा शॉट आत्ताही भारीच वाटला. मला तो Oppenheimer मधल्या अणूबाँबच्या शॉटपेक्षा भारी वाटतो, अर्थात Oppenheimer मधल्या शॉटमध्ये रंग आणि साउंड इफेक्ट्स खूपच उजवे आहेत.

पण यावेळेस क्लूनीपेक्षा खलनायक उजवा वाटला, जास्त खरा वाटला. त्याला खलनायकच ठेवला आहे पण त्याची जी व्यथा आहे ती खूप खरी आहे त्यामुळे तो जास्त आवडला. शेवटी क्लूनी त्याला म्हणतो "It's not our war" तेंव्हा तर हीरोचाच राग येतो. त्याला खडसावून विचारावेसे वाटते की बाबा मग कुणाचे युद्ध आहे ते? खलनायकाच्या व्यथेपुढे क्लूनी फिका वाटला.

मागच्या वेळेस अफलातून वाटलेले प्लॉट्स या वेळेस काहीच विशेष वाटले नाहीत. हा, एक चॉपरचा सीन आहे तो आत्ताही भारी वाटला.

अ‍ॅक्शनपट आवडत असतील तर नक्कीच बघायला हरकत नाही.

माधवजी धन्यवाद.
एखादा हटके स्पाय मूव्हीज सुचवा कुणी तरी (शायनिंग थ्रू सारखा)

माधवजी धन्यवाद.
एखादा हटके स्पाय मूव्ही सुचवा कुणी तरी (शायनिंग थ्रू सारखा)

कल्की 2898.
महाभारतातले संदर्भ वापरून सांगितलेली ही भविष्यात घडणारी गोष्ट आहे. डिस्टोपिया आहे.
ॲक्शन सीन्स महामूर आहेत. एकदम हॉलिवूड स्टाईल खर्चिक काम. मध्ये मध्ये मॅट्रिक्स ची आठवण होईल असे साधर्म्याचे सीन्स बरेच आहेत.
बच्चन ना बघावं हीच माफक इच्छा ठेवून गेलतो. तर ते नेहमीसारखे दमदारच आहेत म्हणजे. कुठंही नेऊन बसवलं तरी त्यात ते झळकूनच उठतात. यातपण तसंच आहे. प्रभास प्रभास म्हणतात लोक, पण बच्चनपुढे कुणाचं काय चाललंय की त्याचं चालावं?
महाभारतात मानवी जीवनांची, पात्रांची एवढी व्यामिश्र फिलॉसॉफी आहे.‌! पण प्रॉब्लेम असाय की व्यास काय पुन्हा पुन्हा होत नाहीत. तो सगळा पट पुन्हा नव्याने कालसुसंगत पद्धतीने उलगडून दाखवायला नवीन अल्ट्रामॉडर्न हायटेक व्यास कुठून मिळणार?
त्यामुळे सिनेमात बच्चन आणि कमल हसन च्या तोंडचे थोडेफार डायलॉग सोडले तर फिलॉसॉफी काही मिळत नाही. मानवी जीवनाबद्दलची, सत आणि असत यांतील चिरंतन झगड्याबद्दलची समजूत वाढेल, असे काही संवाद फारसे हाताला लागत नाहीत.‌ बऱ्यापैकी भर ॲक्शन आणि हायफाय तंत्रज्ञान दाखवण्यावर आहे. अर्थात तरीही सादरीकरण, गोष्ट सांगण्याची पद्धत, फ्लो, सुसूत्रता चांगली वाटली. दिपिका, ब्रह्मानंदम, शाश्वत चॅटर्जी यांसारखे दिग्गज आहेत. म्हणजे तीन तास एका जागी बसून बघू शकण्यासारखं आहे. पण ते तेवढंच आहे म्हणजे. त्यातलं सोबत काही आणण्यासारखं वाटलं नाही नंतर. पण एकूण एंटरटेनिंग आहे. वन टाईम वॉच वगैरे.

सिनेमा - झी ५
रौतु - मसुरीपासून २५ किमी

हाहाहा सहीच. थँक्स.

पहिलं उत्तर अपेक्षित होतं, झी 5 नाहीये म्हणजे पैसे भरून नाही घेतलंय. सिरियल्स दिसतात.

मी ते मनोज वाजपेयीच्या एक बंदा काफी है साठी घेतलेलं होतं. आत्ता ११ जूनला ऑटो रिन्यू झालं ,हे आजच समजलं. Proud
झी ५ वर षडयंत्र हे हिंदी नाटक सुद्धा छान आहे.

महाराज ठीक ठाक आहे, सगळे फुटेज जयदीप म्हणजे महाराज खाऊन जातो, काय बेअरिंग पकडलं आहे त्याने लाजवाब
पातललोक चा हथीसिंग, ब्रेकिंग न्यूज मधला दीपाकर, थ्री ऑफ अस
आणि इथं महाराज, कसली सॉलिड रेंज आहे या माणसाची
ओम पुरी सारखा दिसतो थोडासा
महाराज मध्ये अतिशय कमी संवाद असूनही फक्त चेहऱ्याने बोललाय

आणि उलट तो अमीर खान चा मुलगा, अरर, भयानक वाटतं त्याच्याकडे बघूनही, संवाद ही भीषण पध्दतीने म्हणतो
या हिरोपुतांना कुणी सांगत नाही का की त्यांना जमलं नाहीये रिटेक करू
का ते नसतील तर प्रोड्युसर पैसे देणार नाहीत म्हणून चालवून घेत असतील

त्यांचे पहिले एकदोन पिक्चर 'हा घास भुताचा'(आठवा आर्चीज) म्हणून सोडून दिले जात असतील.ओळखीतून पुढे मिळतीलच याची खात्री असल्याने फार जोखीम नसते.
र आ, हे सर्व ओटीटी वाले चोर 'ऑटो रिन्यू' हा एकच पर्याय देतात पहिल्यांदा घेताना.आपल्याला लक्षात ठेवून ऑफ करावे लागते.कोणी विसरले तर त्यांना लक्षात येऊन ऑफ करेपर्यंत त्यांचा तितकाच फायदा.

Pages