Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47
आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.
त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.
जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.
..... आणि
एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!
आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...
(Just चंमतग :P)
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाल review meeting सुद्धा
पाल review meeting सुद्धा होतात हल्ली हापिसात.
त्यात पालिंची परीक्षा घेतात
शाहरुख खान माझा आयडॉल आहे
शाहरुख खान माझा आयडॉल आहे
>>>>
ऐकून छान वाटले.
माझा तो देव आहे
वर विषयाला सोडून दहा पोस्ट पालीवर आल्या..
मग मी विषयाला धरून उदाहरण देताना शाहरुखचे नाव घेतले तर त्यात काही वावगे नसावे
१. अंगावर पाल पडली असेल अंघोळ
१. अंगावर पाल पडली असेल अंघोळ तर करावी
२. अपघातातून दोन वेळा वाचल्यास पुढे खूप काळजी घ्यावी कारण तिसऱ्यांदा वाचण्याची शक्यता....... (असते असते )
अंगावर पाल पडली असेल अंघोळ
अंगावर पाल पडली असेल अंघोळ करावी
>>>>>>
हे तर बेसिक आहे ना...
जेवताना ताटात पडली तरी आपण ताट धुवून घेऊ, चपाती पुसून घेऊ..
१. अंगावर पाल पडली असेल अंघोळ
१. अंगावर पाल पडली असेल अंघोळ तर करावी>>> बिच्चारी पाल. तिला अंघोळ झेपणार आहे का?
पाल चुकचुकली तर पाली भाषा
पाल चुकचुकली तर पाली भाषा जाणकाराला विचारयला पाहिजे.
घरात मोरपीस ठेवल्यास पाल येत
घरात मोरपीस ठेवल्यास पाल येत नाही असं ऐकून आम्ही मोरपिसे आणली. कदाचित मोर पाली खातो म्हणून त्यांना भीती वाटत असेल. पण आमच्या भागात वाढलेल्या पालींच्या कित्येक पिढ्यांनी उभ्या जन्मात कधी मोर नव्हता पाहिला. त्यामुळे आमच्या घरातल्या पाली त्या मोरपिसावरून आरामात जाऊन दोन मिनिटं स्वतःला गुदगुल्या करून घेत.
(No subject)
पालींवर अक्सीर इलाज.
पालींवर अक्सीर इलाज.
mi_anu ह्याच्या धाग्यावर https://www.maayboli.com/node/64886?page=16 आहे
कांची नारद राजा असं सर्वत्र लिहिलेला वॉलपेपर बनवणे अशी नवीन बिझनेस आयडिया आली यातून. >>> पण पालीना देवनागरी वाचता येत नाही. तो पाली भाषेत लिहायला पाहिजे.
मोरपीस फॉर्म्युला आम्ही
मोरपीस फॉर्म्युला आम्ही सुद्धा वापरला होता. एका बाल्कनीत सहा सात मोरपीस लावले होते. पण पाल त्यावरून सरपटत जायची बिनधास्त. कदाचित जुन्या काळातील पालीमध्ये अंधश्रद्धा असावी की मोरपिसाजवळ गेल्यास काही बरे वाईट होते. ती अंधश्रद्धा आता मिटली असावी.
मग एके दिवशी दोनेक पाली मारल्या आणि त्यांना त्या मोरपीसात ठेवल्या. तेव्हापासून पाल येणे बंद झाले. बहुधा मोरपीसात गेल्यावर आपण मरतो ही अंधश्रद्धा त्यांच्यात पुन्हा पसरली असावी.
Chukchuk Lee. >>>
Chukchuk Lee. >>>
पंजाब्यात पाल आडनाव असतंं. कारण एका पालीने त्यांचं संरक्षण केलं होतं (अशी अंश्र आहे)
आमच्या वर्गात एक क्लासमेट
आमच्या वर्गात एक क्लासमेट होती. "परीक्षेच्या आधी ती सतत चप्पल घालते. तसेच प्रत्यक्ष पेपरच्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करत नाही" अशी वदंता वर्गातील मुलामुलींच्यात तेंव्हा पसरली होती. चप्पल नाही घातले तर आपण पाठांतर केलेले डोक्यातून पायाद्वारे जमिनीत निघून जाईल, तसेच डोक्यावरून अंघोळ केली तर ते पाण्याने धुवून जाईल अशी तिची ठाम (अंध)श्रद्धा होती म्हणे. हि कदाचित तिची व्यक्तिगत मानसिक समजूत असावी असे आधी वाटले होते. पण तसे नाही. गुगलून पाहता असे लक्षात आले कि हा समज कदाचित दक्षिण कोरियातून इकडे आला असावा:
https://www.bbc.com/news/business-35614030
परीक्षे आधी बरेच मुलं केस
परीक्षे आधी बरेच मुलं केस कापत नव्हते
हे अतुल ने लिहिलेले आहे त्याच्याशी सुसंगत असावे
बेल कर्व्ह गॉड! आधी बेल कर्व
बेल कर्व्ह गॉड! आधी बेल कर्व/ हायपरबोला इकवेशन यायला म्हणून पूजा वाटलं. मनात म्हटलं, आम्ही मॅक्सवेल च्या पुतळ्याला शेवटची तीन चार सेमीस्टर नवस बोलला असता. सगळी कडे मॅक्सवेल.
पण बेल कर्व ग्रेडिंग मधला बेल कर्व आहे.
सोनाली ०४, लहानपणी परिक्षेला
सोनाली ०४, “ उगाच लोकांना irritate होतं.” - लहानपणी परिक्षेला जाताना आई सांगायची, प्रश्न नीट वाच, प्रश्नातच उत्तर लपलेलं असतं. त्याची आठवण झाली.
लिंबू मिरची मी अजूनही ओलांडत
लिंबू मिरची मी अजूनही ओलांडत नाही.आहट मध्ये अश्या लिंबावर पाय ठेवून भूत झालेल्या मुलाची एक कथा होती.शेवटी ते भूताचे डेड लॉक(आपल्यातलं भूत घालवायला) काढायला दुसऱ्याला लिंबावर पाय द्यायला लावून ते भूत डाटा ट्रान्स्फर करायचे. मग शेवटी एका अलरेडी मरणाऱ्या वृद्धाने लिंबावर पाय देऊन संसर्गसाखळी तोडली.
मी असले जंतरमंतरलेले
मी असले जंतरमंतरलेले लिंबूमिरची कोणी दाखवून सावध केले की मुद्दाम चिरडतो. आजवर काही झाले नाही. अर्थात कश्याला काय होतेय म्हणा. उगाच अन्नाची नासाडी असते ती..
बाकी मी जेव्हा आस्तिक होतो, म्हणजे देवावर विश्वास होता तेव्हाही असेच चिरडायचो. श्रद्धा ठेवायची असेल तर सकारात्मक गोष्टीवर ठेवा. जसे की देवावर श्रद्धा असणे काही वाईट नाही. पण अश्या नकारात्मक गोष्टींवर कशाला..
बाकी ही शीर्षकनुसार लहानपणीची बाळबोध अंधश्रद्धा नाहीये.. आजही निम्मे जग लिंबू मिरचीवरच चालू आहे
ऑफिसमध्ये मी जेवायला सहा सात
ऑफिसमध्ये मी जेवायला सहा सात बायकांमध्ये बसायचो. तेव्हा त्यांच्यात या गाडीला लिंबू मिरची लावायची चर्चा चालू होती. ही कशी अंधश्रद्धा आहे म्हणून खिल्ली उडवत होत्या. एकीच्या लॉजिकनुसार पूर्वी लांबचा प्रवास असेल तर लिंबू सोबत असावा म्हणून तसे करायचे. आता त्याला असे नजर लागू नये वगैरे अंधश्रद्धेचे रूप आले आहे.
जवळपास सर्व विवाहीत बायका होत्या. मी त्यांना विचारले की याला अंधश्रद्धा म्हणून हसत आहात. पण घरी तुम्ही आपल्या मुलांची नजर काढता का.. तर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते.
मग मी विषय ताणला नाही. कारण लोकांच्या अंधश्रद्धावर हसणाऱ्याना जेव्हा तुम्ही ते पाळत असलेल्या अंधश्रद्धा दाखवतात तेव्हा ते निरुत्तर आणि इरीटेट होतात.
लिंबू मिरची मी अजूनही ओलांडत
लिंबू मिरची मी अजूनही ओलांडत नाही. >>> मी ही.
पालथी मांडी घालून बसत नाही.
फ्रांस मध्ये पण राफेल ला
फ्रांस मध्ये पण राफेल ला लिंबू मिरची. इकडून खास घेऊन गेले होते.
कौटिलीय अर्थशास्त्रात
कौटिलीय अर्थशास्त्रात चाणक्याने नमूद केल्याप्रमाणे अफवा पसरवणाऱ्याला फाशीची शिक्षा होती.
@अस्मिता >>> चाणक्यच अफवा आहे अशी अफवा ट्विटरवर उठलीय.. . कपाळ बडवणारी इमोजी
बाकी आमच्याकडेपण पालथी मांडी घालून बसणे, विशेषतः जेवणे अब्रह्मण्यम्, तसेच उंबऱ्यावर उभे राहून शिंकणेदेखिल.
आजही कोणी घराबाहेर पडला की लगेच कचरा काढत नाही आमच्याकडे.
हो, कोणी बाहेर पडल्यावर लगेच
हो, कोणी बाहेर पडल्यावर लगेच केर नाही काढत, लादी नाही पुसत.
अश्या प्रकारामागे बहुतांशवेळा
अश्या प्रकारामागे बहुतांशवेळा काहीतरी लॉजिकल कारण असते जे ठराविक स्थळकाळाला लागू असते. नंतर संदर्भ बदलले तरी लोकं वापरतात त्यामुळे ती अंधश्रद्धा बनते.
कोणीतरी जमल्यास एक धागा असा काढा ज्यात अशी कारणे काय होती किंवा असू शकतील याची चर्चा करा.
कोणी गेल्यावर लगेच केर काढणे,
कोणी गेल्यावर लगेच केर काढणे, लादी पुसणे हे संस्कार घरातून प्रेत नेल्यावर केले जातात.त्यामुळे इतर कुठल्या नॉर्मल प्रसंगी हे करून काही अप्रिय आठवणी येऊ नयेत हा यामागे उद्देश असू शकेल.
सोमवारी पोळीबरोबर तेल तिखट(चटणी/कांदा लसूण मसाला) खायचं नाही, सोमवारी डोक्यावरून अंघोळ करू नये, शनिवारी हेअरकट करू नये असे बरेच संकेत आहेत.आताच्या रूटीन मध्ये बरेचदा पाळले जात नाहीत(म्हणजे सोमवारी घामाने,व्यायामाने केस भिजले तर केस धुतले जातात.शनिवारी सुट्टी असल्यास महत्वाचे हेअरकट नीट सावकाश वेळ देऊन करता येतात.
मी शनिवारी रविवारी दाढी करत
मी शनिवारी रविवारी दाढी करत नाही.
कारण या वारी पुरुषांच्या सलोनमध्ये गर्दी फार असते. त्यामुळे मी तरी आवर्जून टाळतो हे दिवस. तसेही मी कुठे श्री नरेंद्र मोदी आहे जे इतर दिवशी मला वेळ नसेल..
शनिवारी नखे कापू नयेत हे
शनिवारी नखे कापू नयेत हे माहीत होते. केसांचे माहीत नव्हते.
आमच्या घरी केस न कापायचा वार
आमच्या घरी केस न कापायचा वार सोमवार आणि नखांचा मंगळवार होता.
आंघोळ मात्र रोज करायला लावायचे.
आमच्या एरियात सोमवारी केस कापायची दुकाने सुद्धा बंद असायची.
अरे हो, वरच्या चाणक्य
अरे हो, वरच्या चाणक्य चर्चेवरून आठवले
त्याने पुन्हा जन्म घेतला आहे अशी देखील अफवा(?) आहे .
काल भुतांबाबत एक मजेशीर
काल भुतांबाबत एक मजेशीर ऍनिमेशन व्हिडिओ पाहिला. केरळच्या एका एनिमेटरने आपल्या वृद्ध वडिलांच्या तोंडच्या लोकल भुतांच्या कथा त्यांच्याच आवाजात वापरून एक छान भूत कथा तयार केली आहे. आपल्या भागातील कोकणी भुतांची (मुंजा, हडळ, समंध, चेटकीण) आठवण होते हा व्हिडिओ पाहून.
लिंक : https://youtu.be/DxYbfJUOOMQ
मी अमुक करू नये वगैरे
मी अमुक करू नये वगैरे सांगितले की ते आवर्जून करून बघायचो. कुणाला डिवचायला नव्हे तर कुतूहलापोटी, आणि मग त्याने काही होत नाही हे सांगायला. पुढे जसं लक्षात आलं की अशा गोष्टींत काही अर्थ नसतो 'काहीतरी कारण असेलच, असे सांगणारे काय मूर्ख होते का' याशिवाय दुसरे कुठले लॉजिक नसते मग कुतूहल मेले. कुणी चॅलेंज केले तर करून दाखवायचे हे मग कॉलेजपर्यंत चालले.
Pages