Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानवअग >>>
मानव
अग >>>
आपल्याला ते पूर्ण अक्षर वगैरे वाटले तरीही तो अनुस्वार नाही हे प्राध्यापक शेखांनी ठासून सांगितले होते. 'मग' आणि 'अग' हे शब्द ज्या संदर्भात उच्चारतो आहे त्यानुसार बोलणाऱ्याने उच्चारात फरक करायचा असे त्यांनी सांगितले होते.
दोन वर्षांपूर्वी लोकसत्तात जी भाषा लेखमाला झाली तेव्हाही हा मुद्दा मी आपल्या धाग्यावर घेतला होता. तो आता शोधावा लागेल.
गोरे यांनी कोशात असे म्हटले आहे की, पूर्वीच्या काळी स्त्रीचे संबोधन गे असे होते; कालांतराने ते ग असे झाले आहे. गे आपल्याला संतसाहित्यात बरेच दिसतील
अच्छा. गे संबोधन माहिती आहे.
अच्छा.
गे संबोधन माहिती आहे.
अंत्य अकार पूर्ण
अंत्य अकार पूर्ण उच्चारण्यासाठी दर वेळी अनुस्वार लागत नाही. अनुस्वार कुठे लागतो याचे काही नियम आहेत - बहुधा यास्मिन शेख यांच्याच एका लेखात मी ते वाचले होते.
अगंअग>> चांगली सुधारणा सुचवलीत. मीही इतकी वर्षं अगं असं लिहीत होतो.दर वेळी अनुस्वार लागत नाही
दर वेळी अनुस्वार लागत नाही >>> +१
आणि त्याच अनुषंगाने पु ल देशपांडे यांचे नुसते लघुरूप ( पुल ) लिहीताना अनुस्वार वापरायचा नाही यावर पण शेखबाईंनी चांगले विवेचन केले होते.
त्यावर आपण चर्चा केलेलीच आहे : https://www.maayboli.com/node/69050
(Submitted by कुमार१ on 25 April, 2022 - 10:44)
अंत्य अकार पूर्ण
अंत्य अकार पूर्ण उच्चारण्यासाठी दर वेळी अनुस्वार लागत नाही.>> याची इतर काही उदाहरणे कोणती?
अथ
अथ
तह ?
अर्थात ही संबोधने नाहीत.
..
शिव ( = शंकर )
हो की.
हो की.
संबोधन असायलाच हवे असे नाही. दोन्ही उदाहरणे बरोबर वाटतात.
विद्युतभार दर्शविताना धन आणि ऋण हे देखील यात मोडतील.
-----
ह शेवटी असेल तरी नेहमीच पूर्ण उच्चारला जातो.
तह, सह, दाह, प्रवाह.
आनंद बक अर्थ संथ संत व
आनंद
बक
अर्थ
संथ
संत
व
काखेला कळसा झाला माझा.
काखेला कळसा झाला माझा.
गे = संबोधन ( जाईन गे माये
गे = संबोधन ( जाईन गे माये तया पंढरपुरा ) >> दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी आठवलं नाही का कोणाला
कोकणीत आदरार्थी संबोधन म्हणून गे आणि एरवी गो वापरतात . लहानपणी आम्ही भावंडांनी यात बराच घोळ घातलेला आहे
मानव
* गे चंद्रिके>>>
* गे चंद्रिके>>>
अरे खरच की ! छान.
….
गो आणि गौ या दोघांचाही अर्थ गाय आहे.
गौ चा उपहासात्मक वापर कोशात दिलेला आहे :
वनवासात निघालेल्या द्रौपदीला पाहून गौ-गौ म्हणून दुर्योधनाने तिला हिणवले.
Go! Go!! म्हणाला असेल.
Go! Go!! म्हणाला असेल.
“अगं” हे अग असावे नव्हते
“अगं” हे अग असावे नव्हते माहित.
पुलं मात्र नेहेमीच खटकायचे
Go! Go!! म्हणाला असेल.….
वारसाहक्कच्या मराठी नोंदीमधे
वारसाहक्काच्या मराठी नोंदीमधे दोन शब्दांनी ल़क्ष वेधून घेतले.
अवलाद (औलाद) = पुत्रवंश, मुलाचा वंश
अफलाद - मुलीचा वंश, कन्यावंश
मराठीत बाहेरून आलेले शब्द आहेत हे उघड आहे. अर्थात् हे शासकीय मराठीत, ते ही खूप जुने. आता वापरात असेल असे वाटत नाही.
अवलाद >>>
अवलाद >>>
ऐतिहासिक लेखनात असतो.
अवलाद, औलाद माहीत होता -
अवलाद, औलाद शब्द माहीत होता -
औलाद वालों फूलो फलो वगैरे
परंतु "अफलाद" पहिल्यांदाच वाचला आणि मुलगे, मुली ह्यांच्या साठी वेगवेगळे शब्द आहेत हे माहीत नव्हते. औलाद म्हणजे संतती असे वाटायचे.
काही जागी अफलाद ऐवजी
काही जागी अफलाद ऐवजी “अहफाद” दिसते. त्याची संगती मात्र सहज लागते कारण फारसीत हफाद/ हाफिद =जावई.
काही एकाक्षरी शब्द : 2
काही एकाक्षरी शब्द : 2 (गोरे लघुकोश)
ध = धक्का
धू = मुलगी, कन्या
ध्या (ग्रामीण) = देह
(देवानं मानसाचा ध्या दिला म्हनून त्येला मानूस म्हनायचं)
धां = धावणे
पोटिमा = आखूड पोलके
पोटिमा = आखूड पोलके
“पो टि मा” याचे गंमतीदार दीर्घरूप असल्याची नोंद गोरे लघुकोशात आहे.
काही स्त्रियांकडून मी ते दीर्घरूप पूर्वी ऐकले होते.
इथे कोण ओळखतंय ते पाहूया . . .
पोलक्याला टिचकीभर माया?
पोलक्याला टिचकीभर माया?
मानव, नाही !
मानव, नाही !
या निमित्ताने अन्य काही दीर्घरूपे इथे तयार होतील !
पोटावर टिचक्या मारा ! पोटिमा.
पोटावर टिचक्या मारा !
पोटिमा.
अस्मिता, बरोब्बर !!
अस्मिता, बरोब्बर !!
पोटावर टिचकी मारा.
“पो टि मा” हा शब्द द प खांबेटे यांनी बनवला आहे (गोरे लघुकोश).
पोट झाकेल एवढे पोलके होते द
पोट झाकेल एवढे पोलके होते द पां खांबेटेंच्या काळात?
फक्त एकच मारायची आहे तर
फक्त एकच मारायची आहे तर
द पां खांबेटें >>>
द पां खांबेटें >>>
गोरे कोशातले नाव द प खांबेटे असे आहे.
ही मुद्रणचूक असावी की दोन वेगळेच लोक असतील ?
केलेल्या दिर्घरूपावरून तरी द
केलेल्या दिर्घरूपावरून तरी द पां वाटले.
पण असतीलही वेगळे, मला नावे एवढी माहीत नसतात.
ते खरे म्हणजे द पां च असेल,
ते खरे म्हणजे द पां च असेल, पण एकाक्षरी शब्दकोश आहे ना..
म्हणून द. प. केले असेल!
ठीक.
ठीक.
पोटिमा शब्दाचा वाक्यातला वापर बृहदकोशात पाहता येईल :
. . . डेरेदार पोटिमा झंपर आणि फलकारे मारीत चालणे! . . .
पण एकाक्षरी शब्दकोश आहे ना..
पण एकाक्षरी शब्दकोश आहे ना.. म्हणून द. प. केले असेल! >> पुलंच्या पौष्टिक जीवनात पाकिटावर नीट शिक्का नसल्यामुळे झालेला घोळ - तेव्हा हपिसातले मास्तर 'गुलाबी पाकीट आहे म्हणून हलकेच उमटवला असेल' म्हणतात त्याची आठवण झाली.
Pages