चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल कपूर व रणबीरचा ट्रेलरमधला पहिला सीन >>>> +100000 .
तिथे प्रितीच्या मागे वेडा होता , इथे पापाच्या मागे .. त्या संदीप रैडी वांगाचे हिरो , भयानक सायको आहेत.
रश्मिका मंदाना तशीही आवडत नाही , रणबीर कपूर कधी कधी बरा वाटतो. एकट्या अनिल कपूर साठी इतका रक्तपात बघवणार नाही.

मला सुद्धा ट्रेलर आवडला !
रणबीर आणि अनिल कपूर ची डायलॉग डिलिव्हरी भारी वाटली .
पण बॉलीवूडकर एकच दिवशी दोन तीन सिनेमे प्रदर्शित करण्याचे बंद कधी करणार ?
सॅम बहादुर आणि animal एकाच दिवशी प्रदर्शित करून प्रेक्षकांची विभागणी करण्याचा शौक बॉलीवुड ला परवडणार आहेत का ?

ऍनिमल चा ट्रेलर ज्यात रणबीर, अनिल कपूर आहेत तो पाहिला. अंगावर आला तरी आवडला. रणबीर मधेच असे चमकदार काम करून जातो, अनिल कपूरचा प्रश्नच नाही. या दोघांसाठी तरी ऍनिमल पाहीन असे वाटते आहे. रश्मिका मंदानावाला ट्रेलर पाहिला तर ती एक्दम कृत्रिम वाटली.

सॅम बहादूर आणि ऍनिमल एकत्र रिलीज होणार असतील तर आधी सॅम बहादूर पाहीन, मग ऍनिमल.

झोया अख्तरचे सगळेच पिक्चर larger than life असतात
>>>>
अतिश्रीमंतांची क्रूझ स्टोरी आणि गल्ला गुडियां गाणेवाला पिक्चर तिचाच ना? मला आवडला होता. लक बाय चान्स आणि तलाश पण चांगला होता.

अ‍ॅनिमलचा ट्रेलर पाहिल्यावर फॅमिलीच्या रक्षणासाठी गुंडगिरी करणारा नायक या साऊथच्या व्हायोलन्स फॉर फॅमिली कॅटेगरीतला चित्रपट वाटला.

नवीन चित्रपटांची गाणी इतके दिवस आवडत नव्हती. आता सवय झाली. त्यावरून अ‍ॅनिमलची गाणी हिट होतील असे वाटते.
नवीन चित्रपटातली गाणी चटकन जिभेवर रूळणारी नसतात. ती लक्षात राहत नाहीत. पण खूप वर्षांनी यातली काही आवडू लागतात. अरिजितसिंग चांगली गाणी पण त्याच्या त्याच त्या बागेला पाणी देताना बोट लावल्यावर पाण्याची चिळकांडी उडते तसा सूर लावण्याच्या शैलीत म्हणतो. यातले सतरंगा हे गाणे शान किंवा सोनू निगमने म्हटले असते तर सुंदर झाले असते. एक गाणे सोनूने म्हटले आहे. सुखद आश्चर्याचा धक्का.

एक गाणे सोनूने म्हटले आहे. सुखद आश्चर्याचा धक्का.>>> हो नं. Happy

ऍनिमल चा ट्रेलर ज्यात रणबीर, अनिल कपूर आहेत तो पाहिला. अंगावर आला तरी आवडला. रणबीर मधेच असे चमकदार काम करून जातो, अनिल कपूरचा प्रश्नच नाही. या दोघांसाठी तरी ऍनिमल पाहीन असे वाटते आहे. रश्मिका मंदानावाला ट्रेलर पाहिला तर ती एक्दम कृत्रिम वाटली.
+१
---------------

रश्मिका फारच कोरे-भावहीन डोळे घेऊन वावरते, कॉर्प्स ब्राईड टाईप. ती कायम अंध मुलीचा अभिनय करतेय असं वाटतं, पुन्हा महाभारत झाले तर हिला धृतराष्ट्राचा रोल व लगोलग 'जीवनगौरव' देऊन साऊथच्या बसमध्ये बसवून पाठवून द्यावे. आपण सगळे मिळून तिकीट काढून बशीचं. तिकीटासाठी त्वरा करा. Lol

ही बघा , कॉर्प्स ब्राईड -
https://images.app.goo.gl/DWz5bcWWjTycigAH6

रश्मिकाचे ते दातावर दात ठेवून डायलॉग मारायचे मीम्स फार गाजतेय सगळीकडे ! Lol

निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी चा नवीन सिनेमा जानेवारी २४
https://www.youtube.com/watch?v=38MEQG7xSUc

अ‍ॅनिमल चा ट्रेलर बघुन...शाहिदच्या प्रिथि...वाल्या पिक्चरची आठ्वण झाली...सेम तसाच वाटतोय...अनिल कपुर बरोबरच्या सिन मधे तो सन्जय दत्तच दिसतोय..म्हणजे तेवढाच सिन थेट सन्जु मधला वाटतोय...रणबिर कपुर अजिबातच आवडत नाही त्यामुळे पुढे ओटिटी वर आला आणी बरा असेल तर झकास कपुर साठी बघेल.. रश्मिकाच्या बस तिकीटाची कॉन्ट्री कुठे झेल करायची ते कळवा.
सॅम बहादुरचा ट्रेलर आवडलाच...तो नक्की बघणार इकडे आला तर..

पुन्हा महाभारत झाले तर हिला धृतराष्ट्राचा रोल व लगोलग 'जीवनगौरव' देऊन साऊथच्या बसमध्ये बसवून पाठवून द्या >>> Lol Lol

हिला धृतराष्ट्राचा रोल व लगोलग 'जीवनगौरव' देऊन साऊथच्या बसमध्ये बसवून पाठवून द्यावे. आपण सगळे मिळून तिकीट काढून बशीचं >>> Lol

मायबोलीवर पुन्हा महाभारत झाले तर

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।अंतर्बाह्य जग आणि मन।।
जिवाहि आगोज पडती आघात। करोनिया नित्य नित्य वार।।
रघू म्हणे तुझ्या नामाचिये बळे। अवघियांचे काळे केले तोंड।।

अशी परिस्थिती जिथे आहे तिथे तर हा शक्यतावाचक शब्द शोनहो Lol

अ‍ॅनिमल" खरंच बघवेल की नाही वाटतंय. नुसता व्हाय्लंस नसुन कथेत पण घुसमट आहे असं वाटतंय. तसं झालं की खूप अस्वस्थ वाटतं पहाताना. ------- perfect... असच वाटल मला बघताना.. लहान मुलं आणि वडिलांचे सीन तर.. बहुदा अतिशय सेन्सिटिव्ह असू शकतील!!
रणबीर आणि अनिल all time fav.. खूप छान acting

अनिल कपुर बरोबरच्या सिन मधे तो सन्जय दत्तच दिसतोय
+७८६
मलाही असेच वाटून मी तिथेच ट्रेलर बघणे सोडून देणार होतो..

अनिलकपूर बहरात होता तेव्हां त्याने केलेल्या वयस्कर भूमिकांत तो चिकणा दिसायचा. लम्हें, विरासत इत्यादी. ज्यात मिशा नाहीत अशा रोलमधे लक्षवेधी असायचा. आता वय झालेय पण तितके जाणवत नाही आणि तरूणही दिसत नाही अशा विचित्र स्थितीत तो असताना शारीरिक वयाला शोभेल अशा भूमिकेत पुन्हा बघताना क्युट वाटतो. बर्‍याचदा रणबीर पेक्षा तोच जास्त देखणा दिसलाय. रणबीर आता पूर्वीइतका चार्मिंग वाटत नाही.

रश्मिकाला थेट साऊथला पाठवू नये ही विनंती. हवं तर मी घेऊन जाईन घरी.
हल्ली धुण्याभांड्याला बाईच मिळत नाही.

रश्मिकाला थेट साऊथला पाठवू नये ही विनंती. हवं तर मी घेऊन जाईन घरी.
हल्ली धुण्याभांड्याला बाईच मिळत नाही.
>>
Lol Lol

अनिल कपुर बरोबरच्या सिन मधे तो सन्जय दत्तच दिसतोय>>>>>>>>>>> हो सेम तसंच वाटलंय. अजूनही त्याने ते झाड (बेरिंग) सोडलं नाही काय?

अनिल कपुर बरोबरच्या सिन मधे तो सन्जय दत्तच दिसतोय>>>+१
इतर सिनमधे रणबीर फारच देखणा दिसलाय, उजेडच पडतो एकदम. पण मधेच रश्मिका येऊन कृष्णविवरासारखा प्रकाश गिळून टाकते. अनिल कपूर फारच चार्मिंग आहे. नुसताच देखणा नाही तर अंगात चपळाई व एनर्जी आहे.

बरा असेल तर झकास कपुर साठी बघेल.>>> Lol प्राजक्ता

पुन्हा महाभारत झाले तर हिला धृतराष्ट्राचा रोल व लगोलग 'जीवनगौरव' देऊन साऊथच्या बसमध्ये बसवून पाठवून द्या>>> लॉल मी तिला ध्रुतराष्ट्राच्या ड्रेसात इमॅजिनलं Lol जाने भी दो यारो सारखं, ये क्या हो रहा है?

अनिल कपुर बरोबरच्या सिन मधे तो सन्जय दत्तच दिसतोय> अगदीच. मला तर त्याची चाल ही तशीच वाटते आता. Sad
अनिल कपूर त्या वरून धवन चित्रपटात त्याचा बाप असून ही त्याच्या हून आकर्षक दिसलाय, ग्रेस्फुली एजिंग! नाहितर शाखा..डीजीटाइज करतोय लहान होतोय.

ग्रेस्फुली एजिंग! नाहितर शाखा..डीजीटाइज करतोय लहान होतोय.
>>>>>>

हे डांकी चित्रपटातले गाणे.
यातील नाच, स्पेशली हूक स्टेप बघा.

https://youtu.be/9Z79T_o4v8c?si=A5j9WmcJjVXF0AAN

शाहरूख ऊर्जेने ओतप्रोत भरलेले एक वेगळेच रसायन आहे. त्याला इतक्यात गरज नाही सेकंड इनिंग सुरू करायची Happy

अ‍ॅनिमल चा मराठी रिमेक आपण मायबोलीकर मिळून बनवूयात.
चित्रपटाचे नाव - प्राणी
कथा - रघू आचार्य
पटकथा - फारेण्ड किंवा नियमित लेखक.
निर्माता - मिळून सर्वजण
दिग्दर्शक - इथे ओरिजिनल आयडीचं नाव द्यावे लागेल म्हणून हेमंत ढोणे किंवा परेश मोकाशी . जास्तीत जास्त केदार शिंदे एव्हढीच सूट.

कलाकार -
रणवीर कपूरच्या जागी अर्थातच स्वप्नील जोशी ( जास्तीत जास्त ललित प्रभाकर. ज्यांचा आग्रह असेल त्यांनी दुप्पट काँट्री करायचं)
अनिल कपूरच्या जागी - महागुरू सचिन पिळगावकर
बॉबी देओलच्या जागी कमबॅक अजिंक्य देव किंवा जास्तीत जास्त सिद्धार्थ जाधव नाहीतर सुभा आहेतच.
रश्मिका मंदाना च्या जागी राज्यस्तरीय तुडवणी म्हणून कुणाला घ्यावं ? इथे सिलेक्शनला फुल्ल वाव आहे.

अ‍ॅनिमलचं ट्रेलर आवडलय , रणबीरचं अ‍ॅक्टिंगही आवडलय पण तो अजुनही संजय दत्त मोड मधे का आहे कळलं नाही !
दिसतोय संजय दत्त सारखा आणि आवाजही तसाच !
ओरिजिनल स्टारकास्ट संजुबाबा-सुनील दत्त अपेक्षित होती का?

रश्मिका मंदाना च्या जागी राज्यस्तरीय तुडवणी म्हणून कुणाला घ्यावं >>>> छोटी सोकु. अशी चित्रविचित्र तोंडं करण्यासाठी दुसरा पर्यायच नाही…

https://youtu.be/komnC2EPIBc?si=errz2BMBggmh7TK4
"मिसेस" - हा बहुधा ग्रेट इंडीयन किचन वरून घेतला असावा ? मुख्य भूमिकेत सान्या मल्होत्रा आहे.

हा अजून एक - झी ५ वर ८ डिसे. ला येतोय. इन्टरेस्टिंग वाटतो आहे - पंकज त्रिपाठी. " कडक सिंग"
https://youtu.be/RryFB9nXC8s?si=8bbJ9t7Oqm9FqvDw

Pages