मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतरत्र वाचलेला संदर्भ - "अडकून सीताराम" ही कोल्हापूरी प्रचलित वाक्यरचना आहे. नसत्या भानगडीत अडकण्याबद्दल.

घेतला असेल त्याला यॉर्कशायर कडुन, आपल्याला काय माहित...आता तो सचिन तेंडुलकर का कोणसा नाही खेळला काउंटी >>> Lol

अदित्य सिंग - धमाल वर्णन आहे. सुपरलोल. हा काउंटी क्रिकेट खेळायला चाललाय की बघायला अशी मला शंका आली. असे मनात येईल तेव्हा संघात घुसायला एखाद्या स्थानिक हार्ड टेनिस टुर्नामेण्टच्य संघात ट्राय करून बघा म्हणावं आधी. तेथेही असे एकदम घेत नाहीत Happy

तीन अडकुन?
हे सिनेमाचे नाव? काय विचार अडकले का काय नाव ठरवणार्‍याचे? Sad कायतरीच नाव.

वर फा म्हणतोय तशी 'अडकुन सीताराम होणे' ही कोलपुरासाईडला म्हण आहे.
आपल्या पुण्यामुंबईच्या पब्लिकला वेगळं वाटतं, पण तो मामलाच नाहीये. कथा, आणि सगळा प्रकारच ओढून ताणून काहीतरी आहे ही नाव काहीही असतं तरी डब्बा पिक्चरच असता.

माझं सासर कोल्हापूर चं आहे, आणि तरीहि अशी काही म्हण अस्तित्वात आहे हे मी ऐकलं नव्हतं, त्यांना विचारलं तर त्यांना पण माहीत नव्हती.ही काही असभ्य म्हण आहे का, फक्त हॉस्टेलस मध्ये वापरली जाणारी वगैरे?

अडकून सिताराम फार कमी वापरली जाते.
पण अर्थ असभ्य नसणार.
नसत्या गोंधळात अडकणे असा अर्थ.
चित्रपट पाहिला नाही , पाहणार नाहीये. त्यामुळे तिथे ते योग्य आहे का ते नाही माहीत.

मानव Lol
मी पण एकदा लाल एसटीने कोल्हापूरला गेलो होतो तेव्हांचं कोल्हापूर वेगळंच होतं. वडाप वगैरे शब्द कानावर पडले. चालतंय कि पाठ झालं. रस्त्यातून वाहन जाताना एखादा तालेवार पैलवान मधून चाललेला असायचा. हॉर्न दिल्यावर सावकाश वळून आधी गाडीचा नंबर वाचायचा. पाठ करायचा. मग खाली उतरायला सांगायचा. मग विशिष्ट भाषेत प्रेमळ संवाद व्हायचा. यानंतर त्याला वाटलं तर साईड द्यायचा.

एकदा लक्झरी बसने गेलो तर ते वेगळंच कोल्हापूर होतं . रिक्षावाल्याने हात जोडून नम्रपणे "आपणास कोणाकडे जावयाचे आहे ? " असा प्रश्न विचारला तेव्हां मी अरेच्चा बस पुन्हा पुण्याला पोहोचली का असा प्रश्न त्याला विचारला होता. त्यावरून दोन कोल्हापूर आहेत हे नक्की. बहुतेक टी अक्षाला पीळ पडलेला असावा.

Kolhapur Village
The Kolhapur village is located in Deoli taluka of Wardha in Maharashtra, India. The census code of this vill is 534266. The total geographical area of Kolhapur village is 351.63 Hectares / 3.51 KM2. The nearest police station is located in Deoli tahsil.

इथली असावी म्हण.

मला आधी वडाप म्हणजे वडापाव किंवा मराठी साहित्य परिषद सारखी कोणत्या तरी परिषदेचा शॉर्टफॉर्म वाटायचा.

त्या वाहनाइतकी नावं दुसऱ्या कुठल्याही वाहनाच्या नशिबात नसतील.
वडाप, टमटम, विक्रम, डुगडुगी (हे पाली-खोपोली परिसरात ऐकलंय) डुक्कर (हे कुठे ते आठवत नाही) सिक्स-सीटर (हे अगदीच सभ्य.) अजूनही असतील.

त्या शेअर जीप मध्ये 15 ते 20 जण कोंबतात आणि इकडून तिकडे झूम झूम जणू काही फेरारी चालवतोय
त्यात लागलेली गाणी तर आहाहा
इतरत्र कुठेच न ऐकलेली.
लिंबू मला मारीला वै वै आणि दिल तुटलेला ड्रायव्हर असेल तर मग 90 मधील दर्द इ दिल गाणी कॅसेटीत भरून घेतलेली.
Lol
केया जरा घरच्यांनाही आणि सिनियर मंडळींना विचारून बघा, त्यांनी तरी नक्कीच ऐकला असेल कुठेतरी. फार प्रचलित शब्द नव्हेच तो.

ह्यावरून आज लडतर शब्द आठवला फार फार वर्षांनी.

मानव Lol
झकासराव विचारले होते..नाही माहिती त्यांना पण

मलाही हृषीकेश जोशींची मुलाखत बघून मोह झालेला हा सिनेमा बघायचा, त्यातनं त्यात प्राजु

पण ट्रेलर पहिला आणि आरारा असं झालं
इथली पिसे काढलेली पाहून तर आता तर नाहीच Happy

जोशींचाच तीन अडकून सीताराम झालाय Happy

डुक्कर रिक्षा कल्याणपेक्षा उल्हासनगरमध्ये रूढ झालेला शब्द आहे आणि तिथे अक्षरश: रस्त्यावरची डुकरे दिसतात खूप (आता इतक्यात पाच एक वर्षात परीस्थिती बदलली असेल तर माहीती नाही, पुर्वी दिसायची). डोंबिवलीत सिक्स सिटर म्हणतात मोस्टली. वडाप शब्द मी श्रीरामपुरला ऐकला पहिल्यांदा, तेव्हा मला समजलं नाही, मी वडा पाव शोधू लागले होते, हाहाहा.

बाकी कोल्हापुर मध्ये राहून को पुची टिपिकल भाषा बऱ्याच जणांना येत नाही. सिरियलमध्ये काम करते ती शर्वरी जोग सांगत होती एकदा की तिला येत नाही. त्यांच्याकडे बोलत नाहीत आणि बाहेरही ती फार तिथली भाषा शिकली नाही, हे बऱ्याच लोकांसाठी shocking होतं म्हणाली.

आत्मपॅम्प्लेट पाहिला
धमाल आहे. एक नॉर्मल स्टोरी सुरू असताना बॅकग्राऊंड ला अनेकवेळा सटल भाष्य आहे. ते तर उच्च. ट्रीटमेंट अफलातून.
मेंढुरपाक आणि भावांनो फार फार भारी.
एकाच वेळी 2 वेगळ्या समजल्या जाणाऱ्या विचार सरणीची पुस्तके हातात असे 2 वेळा आहे.
Timeline सोबत घडलेल्या घटना आणि त्याचे निरागस बालमनावरील परिणाम कॉमेडी पध्दतीत दाखवणे अफाट आहे.
अर्थात एलिजाबेथ असो की हरिशचंद्राची फॅक्टरी त्यात जसे कथानक विनोदी शैलीत पुढे सरकते. ह्यात व्हिलन नाहीये अथवा नकारात्मक लोकं नाहीयेत. पण हीच शैली मोकाशी आणि टीम ची आहे.
दिग्दर्शक बेंडे आहेत. ते मोकाशी सोबत काम करतच होते.
त्यांच्या आयुष्यातील काही किस्से घटना आधारित स्टोरी आणि चित्रपट असे कुठेतरी मुलाखतीत वाचले होते.
संवाद फार भारी वाटले.
चिमटा लागून तयार झालेल्या चिन्हाला विष्णू चे की शंकराचे अशी चर्चा करणारी फॅमिली निवेदकाला आजपासून तू अजातशत्रू म्हणते तो प्रसंग आवडला.
त्याच्या मावशीचे आंतरजातीय प्रेमप्रकरण आणि लग्न,
मुंजीचा प्रसंग बरंच काही आवडलंय.
आता निबंध बास Happy

झकास +१
मला त्यातील खूप खूप गोष्टी आवडल्या आहेत. बर्‍याच गोष्टी दिसत असून पहिल्यांदा बघताना स्टोरी आणि वरचे विनोद यावर हसुन घेतलं. परत बघताना आणखी एकेक नग दिसतील. त्यातल सटल भाष्य तर अफलातून आहे.
दिवस जाताहेत हे बर्फाच्या गोळ्यातून दाखवणे, दिवस हळू जात आहेत ते एसटी स्लो स्पीड मध्ये दाखवणे... असे अनेक बारके बारके प्रकार दिसत होते. ते परत बघुन नोट्सच काढल्या पाहिजेत. इतका ब्रिलिअंट सिनेमा मराठीत केला याचा फारफार आनंद झालेला आहे.

होय अमित परत पाहिला की अजून काही गोष्टी लक्षात येतील.
बर्फ़ाचा गोळा, स्लो मोशन सुट्टी, रिटर्न येतानाची फास्ट ST,
वर्गात ती न दिसल्याने झालेले फुस्स एकेक भारीच आहे

हो परत नीट पहायला हवा आहे. मुलं काम छान करतात. तो बारा तेरा वर्षाचा आशिष मस्त चुणचुणीत, स्मार्ट दाखवला आहे.

आत्मपँफ्लेट आणि वाळवी दोन्ही एकेच दिवशी बघून मी बॅकलॉग पूर्ण केला आहे. दोन्ही जबरदस्त , मोकाशींच्या प्रेमात..!
झकासराव, अमित आणि सर्वांनाच अनुमोदन, वाळवीचंही वा-वा,छान- छानसाठीचं लेट अनुमोदन घ्या.

मोकाशींचा फोटो उत्सुकतेने पाहिला. एका स्विडीश कंपनीत माझ्यासोबत एक ट्रेनी इंजिनिअर परेश मोकाशी होता. चेहरा असाच, फक्त डोक्यावर कुरळे केस होते. त्याला नाटकं आणि सिनेमाची आवड होती. हाच तर तो नाही असा सारखा प्रश्न छळतोय. उंचीने कमी होता. यांची माहिती नाही. तेच हे असतील तर जाउन भेट घेईन. दोघे एकदा नाटकाच्या आवडीपायी दांडी मारून थेट मुंबईला गेलेलो. Happy

मोकाशीं चा फैन त्यान्चे "मुक्काम पोस्ट बोम्बिल्वाडी" आणि "समुद्र" ही नाटके बघितली तेव्हाच झालो . समुद्र तर खुप आवडलेले... दोन पात्री हे नाटक खुप भारी आहे.

Pages