Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17
इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.
धन्यवाद !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>Submitted by फुरोगामी on 1
>>Submitted by फुरोगामी on 1 November, 2023 - 18:38<< +१
विगर्सना सापत्न वागणुक देणारी चायना, पॅलेस्टाइन्/ईराण्/रश्या यांना का सपोर्ट करत आहे याचं उत्तर हा वाद रिजनल (आणि रिलिजिनल सुद्दा) राहिलेला नसुन ग्लोबल झालेला आहे, यात सापडेल. अमेरिका इज स्लोली रिड्युसिंग चायना डिपेंडंस फ्रॉम ट्रेड स्टँडपॉइंट. व्हेन अमेरिका टेक्स इट्स बिझनेस एल्स्व्हेअर, चायना विल्बी फिनिश्ड. सो चायना इज वेल अवेर ऑफ व्हाट इज कमिंग, अँड फाइंडिंग स्ट्रटिजिक पार्टनर्स फॉर देर सर्वायवल. म्हणुन हमासला छुपा सपोर्ट, टु प्लिज इराण/रश्या अँड देर कोटरी. अमेरिका डझंट हेट इस्लाम, बट कॅनॉट स्टँड रॅडिकल इस्लाम अँड कामिज. इराण इज ऑलरेडि ऑन देर रेडार अँड दे आर पिस्ड अबाउट व्हाट इज हॅपनिंग इन युक्रेन, सो दे आर लुकिंग फॉर अॅन अपॉर्चुनिटि. नेवि डिस्ट्रॉयर कार्नी इज ऑल्ररेडि डिप्लॉय्ड इन रेड सी, अँड डुइंग व्हाट इट इज सपोज्ड टु बी डुइंग - डिएस्कलेट बाय शोइंग माइटी पॉवर...
जगात कुठेही मुस्लिम लोकांवर
जगात कुठेही मुस्लिम लोकांवर मुस्लिमेतर नी अन्याय केला , दडपशाही केली सगळे मुस्लिम वार्ल्ड एकत्र होऊन विरोध करतात .
फक्त चीन ला विरोध करत नाही !
चीन कडून मिळणाऱ्या मदतनिधी आणि कर्ज देवून उभे केलेले प्रकल्प मूळे मुस्लिम जग चीन ने उगिर् लोकांच्या केलेल्या दडपशाही कडे दुर्लक्ष करत असावे .
शेवटी काय तर त्यांच्यासाठी पैसा महत्वाचा , धर्म आणि कौम् गेली खड्ड्यात .....
काल पॅलेस्टाईन मधील नागरी
काल पॅलेस्टाईन मधील नागरी वस्तीचे before and after फोटो पाहिले , भयानक उध्वस्त केले इस्रायल ने .
मला नाही वाटत हमास पुन्हा ७ ऑक्टो सारखी डेरींग करेल म्हणून .
Kidnapped केलेल्या २०० इस्रायली लोकांना आणि हजार एक हमास अतेरीक्यांस पॅलेस्टाईनी अथोरीटी ने इस्रायल च्या हवाली केले असते तर एव्हढी दुर्दशा झाली नसती .
एका गावात दोन गटांत एकदा खूप
एका गावात दोन गटांत एकदा खूप मोठी मारामारी झाली. त्या आधी एका कुटुंबावर दुसर्या एका कुटुंबाने भयंकर अत्याचार केले होते . अत्याचारी कुटुंबाचा पाडाव झाला. जिंकलेल्या गटाने त्या अत्याचार झालेल्या कुटुंबाला (विश्वासराव) त्यांच्या मूळ ठिकाणी नेऊन वसवलं. तिथे आता कधीपासून दुसरे लोक (पालीवाल) राहत होते. पण त्यांना काय विचारायचं?
या जिं कलेल्या गटातले लोक त्यांना न आवडणार्या लोकांना काहीना काही सबब सांगून चोप द्यायचे. त्यांच्या आपसात मारामार्या लावून द्यायचे. कधीतरी त्यांनाही फटका बसे. पण मग ते याच्यामुळे मला फटका बसला असं ठरवून त्याच्या कुटुंबाची धुळधाण करायचे.
आधी त्यांच्या विरोधात एक गट होता. तो फुटला आणि कमजोर झाला. त्या गटात असलेल्या एकाला आपल्याकडे आणायला ते फितवू लागले. तेव्हा दुसर्या गटाचा दादा चिडला आणि त्याने त्या फितवल्या जात असलेल्याचं घर बळकावयला सुरुवात केली. तेव्हा या जिंकलेल्या गटाने त्याला लांबून मदत केली. दुसर्या दादाला तू चुकीचं वागतो आहेस, कोणाच्या घरच्यांना त्रास द्यायचा नाही असं सांगितलं.
आता आपण पहिल्या परिच्छेदातल्या कुटुंबांची स्टोरी पुढे नेऊ. विश्वासराव कुटुम्बाने आपल्या नव्या घरात हात पाय पसरायला सुरुवात केली. जुन्या पालीवाल लोकांची अवस्था असुनी खास मालक घरचा म्हणती चोर याला अशी झाली. विश्वासराव पालीवालांना हवे तेव्हा हवे तसे दणके देत. त्यामुळे पालीवालांकडची गरम डोक्याची पोरं भडकून कधी कधी विश्वासरावांची कुरापत काढत.
एकदा अशीच पालीवालच्या एका पोराने विश्वासरावांची मोठी कुरापत काढली. काही लोकांना मारलं. काहींना पळवून नेलं. त्याबरोबर विश्वासरावांनी पालीवालांच्या घरातील म्हातार्या कोतार्यांपासून तान्ह्या बाळांपर्यंत प्रत्येकाला शिक्षा करायला सुरुवात केली. त्यांची वीज तोडली. पाणी तोडलं. भिंती छप्पर तोडू लागले. अन्न मिळणार नाही अशी सोय केली. कोणाकोणाला पकडून विवस्त्र करून मारहाण केली. उलटं टांगून मिरचीची धुरी दिली. तान्ह्या बाळांना आपटून मारलं. त्या कोपर्यात जाऊन रहा असं सांगितलं आणि ते जात असताना वरून आगीचे गोळे फेकले. त्यांची औषधं सुद्धा नष्ट केली.
गावातले सगळेच हे बघत होते. त्यातले काही पालीवालांच्या नात्यातले होते. त्यांना ग्रामसभा बोलावली. ग्रामसभेची स्थापना मागच्या मोठ्या मारामारीनंतरच झाली होती. ग्राम सभेला एक प्रमुखही असे. त्याला फार काही अधिकार नसत आणि गावातले दादा लोक त्याला जुमानतही नसत. गावात कुठे काय गैरेप्रकार होत नाही ना हे पाहण्यासाठी प्रमुखाने एक माणूस नेमला. तो सुद्धा म्हणाला की विश्वासराव कुटुंब पालीवालांना पहिल्यापासून त्रास देत आलंय आणि आता तर अति झालंय. ज्या गोष्टींवर आम्ही बंदी घातली आहे. जे गुन्हे ठरवले आहेत ते सुद्धा के विश्वासराव बिनदिक्कत करत आहेत.
तर ग्रामसभेत ठराव झाला की विश्वासरावांनी पालीवालांना त्रास देणं ताबडतोब थांबवावं. १२० कुटुम्बांच्या प्रतिनिधींनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. १४ जणांनी विरोध केला. ४५ लोक तटस्थ राहिले.
हे सगळं पाहणार्या काही अभ्यासकांचं मत पडलं की पालीवालांनी जे झालं ते झालं असं म्हणून आपली भौतिक , सामाजिक , नैतिक आणि आध्यात्मिक प्रगती करायला हवी होती. उगाच विश्वासरावांशी वैर कशाला घ्यायचं? त्यांनी असं केलं असतं तर सगळ्या गावाला त्यांच्याबद्दल आदर वाटला असता आणि त्यांनी विश्वासरावांना पालीवालांना शिक्षा न करण्याबद्दल विनवलं असतं. आता गावातल्या १८० पैकी १२० जण पालीवालांच्या बाजूने उभे होते, त्याला या अभ्यासू लोकांच्या मते काही अर्थ नाही. कारण हे १२० लोक साधेसुधे गरीबगुरीब. त्यांच्या मते त्या १४ -१५ धनदांडग्यांचं मत हेच अख्ख्या गावाचं मत. ( धनदांडगे धनाढ्य आणि बलशाली कसे झाले हे विचारू नका ).
पॅलेस्टाइनने आधी एक चांगला
पॅलेस्टाइनने आधी एक चांगला देश व्हावं मग आम्ही इस्रायलाल त्यांच्यावरचे अत्याचार बंद करायला सांगू असं म्हणणार्यांसाठी
If Independence is granted to India, power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low calibre and men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst themselves for power and India will be lost in political squabbles. A day would come when even air and water would be taxed in India.” -Winston S. Churchill
चर्चिलचं हे मत चूक असो की बरोबर. पण भारतीयांना स्वातंत्र्य मिळावं की नाही हे ठरवण्याचा त्याला अधिकार होता, हे आता आपल्याला योग्य वाटतं का? भारतात ब्रिटिश सत्ता भारतीयांच्या कल्याणासाठी असली असं मानू. तरी भारत परतंत्र होता की नाही? मग तथाकथित आधुनिक लोकशाही मूल्यांनुसार भारत कसाही असला तरी त्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे, तर तो न्याय पॅलिस्टीनला का नाही? तुम्ही चांगला देश, चांगला समाज नाही म्हणून इस्रायलने तुमच्यावर अन्याय अत्याचार केले तरी आम्ही त्याकडे डोळे झाक करू असं म्हणणं योग्य आहे का?
इथे इस्रायल गाझा ( आणि वेस्ट बँकसुद्धा) बेचिराख , मानव वसाहतीला अयोग्य करायला निघालेला असताना ( तसे तिथल्या माजी लष्करप्रमुखाचे शब्द आहेत) पॅलेस्टिनचं १९४८ पासून जरा चुकलंच हं ही चर्चा करायची ही वेळ आहे का?
इस्रायल १९४८ पासून जे करत आलाय त्यावरून ते फार उच्च मूल्य बाळगून आहेत का?
प्रतिकात्मक वर्णन बहुतांश
प्रतिकात्मक वर्णन बहुतांश जमले आहे पण सगळे अभ्यासू एकाच कॅटेगरीत टाकले आहेत.
बाकीच्यांचे मत त्यांच्याकडे. मी तुमच्याच प्रतिकात्मक भाषेत लिहीतो - पालीवालांनी विश्वासरावांशी तेव्हा वैर घेणे वेगळे व सत्तर वर्षे ते वैर धगधगत ठेवून त्यातच अडकून राहणे वेगळे. अजूनही आपले हक्क परत मिळवायचे असतील तर दोनच पर्याय आहेत. विश्वासरावांशी लढून ते मिळवावे - ते सध्या शक्य नाही. पालीवालांकडे तेवढी पॉवर नाही. मग दुसरा पर्याय पब्लिक सपोर्ट मिळवावा. फक्त ग्रामसभा उपयोगाची नाही. तिचा फोलपणा अनेकांनी पाहिला आहे. विश्वासरावांना जाब विचारू शकतील अशा लोकांचा सपोर्ट मिळवावा. गरम डोक्याच्या पोरांना आवर घालून तो मिळेल याची खात्री नाही. कदाचित काही वर्षे लागतील लॉबी तयार व्हायला. पण गरम डोक्याच्या पोरांना आवर घातला नाही तर नक्कीच मिळणार नाही.
पॅलेस्टिनचं १९४८ पासून जरा
पॅलेस्टिनचं १९४८ पासून जरा चुकलंच >>> हे कोण म्हंटले? मी तरी नाही. जेव्हा ते ताजे होते तेव्हा लढणे साहजिकच होते. भारताचाही सपोर्ट होताच की.
आता ७० वर्षे झाली. ते मिळायची शक्यता कमी आहे. मग पिढयानपिढ्या लढतच राहावे त्यांनी? की मूव्ह ऑन करून दुसरीकडे नवीन सुरूवात करावी.
आत्ता त्यांनी काय करावे प्रॅक्टिकली याबद्दल लिहीले आहे. १९४८ साली काय केले त्याबद्दल नाही.
पॅलेस्तीनी जिनोसाइड नावाच्या
पॅलेस्तीनी जिनोसाइड नावाच्या ज्वालामुखीच्या कड्यावर असताना (हे युनोच्या एका संस्थेच्या पॅलेस्टिन संबंधित अधिकारी व्यक्तीचे सुद्धा मत आहे) पॅलेस्टिनने काय चुका सुधारायला हव्यात हे सांगून काय उपयोग?
इस्रायलबद्दल काय मत? तो गुंड आहे की स्वसंरक्षणासाठी करतो आहे? पॅलेस्टीन गुणी बाळ झालं तर इस्रायल त्याला नीट राहू देईल?
त्या १०-१२ दांडग्या गावकर्यांवर विश्वास ठेवावा अशी स्थिती आहे? ते दुटप्पी - रेसिस्ट आणि हिपोक्रिट्स नाहीत असं मानायला वाव आहे?
यापूर्वी अशा वॉर क्राइम्सचं समर्थन कधी झालं होतं?
<आता ७० वर्षे झाली. ते मिळायची शक्यता कमी आहे. मग पिढयानपिढ्या लढतच राहावे त्यांनी? की मूव्ह ऑन करून दुसरीकडे नवीन सुरूवात करावी.> भारतासकट अनेक देशांचा स्वातंत्र्यलढा किती काळ चालला? पॅलेस्टिनींनी दुसरीकडे का जावं? Two states या तोडग्याचं काय झालं?
मी लिहीले आहे ते प्रॅक्टिकल
मी लिहीले आहे ते प्रॅक्टिकल काय आहे ते. "योग्य" काय आहे ते नाही.
योग्य बद्दल मागच्याच पानावर हे लिहीले होते:
आंतरराष्ट्रीय दबाव आणून इस्त्रायलला पॅलेस्टिनी लोकांना त्यांची जमीन परत द्यायला लावणे शक्य असेल (अगदी १९४८ ची स्थिती नाही पण किमान एक सर्वमान्य तोडगा) तर ते नक्कीच करावे.
ओके.
ओके.
म्हणजे मग सध्याची जागतिक व्यवस्था न्याय्य नाही (कधी होती?) आणि जे लोकशाही , मानवता इ. मूल्यांचा कैवार घेतात तेच अन्यायकर्त्याच्या बाजूने उभे आहेत तेव्हा अन्य काही मार्ग नाही असा निष्कर्ष मला लागतो. fair enough. पण मग मी ते तसंच लिहीन. एकट्या पॅलेस्टिनवर सोडणार नाही.
म्हणजे मग सध्याची जागतिक
म्हणजे मग सध्याची जागतिक व्यवस्था न्याय्य नाही (कधी होती?) आणि जे लोकशाही , मानवता इ. मूल्यांचा कैवार घेतात तेच अन्यायकर्त्याच्या बाजूने उभे आहेत तेव्हा अन्य काही मार्ग नाही असा निष्कर्ष मला लागतो>>> तेच मी मागे म्हणालो होतो, जर बळी तो कान पिळी हाच न्याय वारंवार समोर येत असेल तर शस्त्रे उचलली जाणाच, इव्हन ऑन डेथ वॉंरंट...आज इस्राएल चे लोक जरी पॅलेस्टाईनच्या तुलनेत खुपच सुरक्षित असतील तरीही मनात असुरक्षिततेची भावना घेऊनच जगतील आणि त्या सावटा खालीच मरतील.... निश्चित मरणारचं आहे हे ठरलं तर बर, पण अधांतरी भविष्याची टांगती तलवार डोक्यावर घेऊन जगणं त्याहून वाईट. आजवर इस्राएल ची ईतकी मनुष्यहानी कधी झाली नव्हती आणि आता पाच पन्नास हजार भुकेकंगाल पॅलेस्टाईन इस्राएल ने मारले म्हणून पुन्हा इस्राएलच्या दिड दोन हजार सुखवस्तू नागरीकांना हमास मारणारचं नाही याची काही शाश्वती नाही.
डॅनियल डे लुइसचा २००५ मध्ये
डॅनियल डे लुइसचा २००५ मध्ये गाझा भेटीनंतर लिहिलेला वृत्तान्त.
The late Lieutenant-General Rafael Eitan, the former chief of staff of the Israel Defense Forces (IDF), once likened the Palestinian people to "drugged cockroaches scurrying in a bottle". In 1980 he told his officers: "We have to do everything to make them so miserable they will leave." He opposed all attempts to afford them autonomy in the occupied territories. Twenty- five years on, it seems to me that his attitude and policy have been applied with great gusto. Every movement here in any of the so-called sensitive areas, which account for a large, ever-increasing proportion of the Strip (borders, settlements, checkpoints), is surveyed and reacted to by a system of watchtowers.
इस्रायली सैनिक एका पॅलेस्टिनीच्या घरात शिरले . त्याला मारहाण केली आणि वरचा मजला बळकावून बसले. ते इतके दयाळू की त्यांनी त्या पॅलेस्टिनीला ठार केलं नाही. आणि तो इतका चिवट की त्याच घरात कुटुंबासोबत राहतोय.
पेप्सी आणि कोका कोला या
पेप्सी आणि कोका कोला या कंपन्या इस्रायली नागरिकांच्या मालकीच्या आहेत की नाही याची खात्री करून त्या ब्यान करायला पाकिस्तानी हमास समर्थकांना कोणी तरी सांगा हो !
आधीच खायचे वांदे आणि त्या शीतपेयाच्या बाटल्या खरेदी करून रस्त्यात ओतायच्या हा शुद्ध बावळट नाही का ?
पाकिस्तान ची स्वतःची पोट
पाकिस्तान ची स्वतःची पोट भरायची लायकी नाही चालले हमास ला पाठिंबा द्यायला.
.पहिले स्वतः स्वतच्या पायावर उभे रहा.
अंतर राष्ट्रीय मदत बंद झाली तर उपाशी राहावे लागेल
२००० वर्षा आधी जेरूसलेम नी
२००० वर्षा आधी जेरूसलेम नी आजूबाजूची जमीन ज्यूंची होती नंतर रोमननी अरबआले नी त्यांनी भूमी बळकावली. परत जर ज्यू ती भूमी मिळवत असतील तर चुकीचे काय करताहेत?? ती भूमी पॅलेस्टीनींची कधी होती??
थोडी अवांतर गंमत
थोडी अवांतर गंमत
UN General Assembly ADOPTS resolution “necessity of ending the economic, commercial and financial embargo imposed by the United States of America against Cuba”
IN FAVOUR: 187
AGAINST: 2 (Israel, US)
ABSTAIN: 1 (Ukraine)
अमरेंद्र बाहुबली, युरोपीय
अमरेंद्र बाहुबली, युरोपीय वंशाचे लोक ऑस्ट्रेलियात प्रथम सतराव्या शतकात आले. उत्तर अमेरिकेतही त्याच वेळी आले. दक्षिण अमेरिकेत पंधराव्या शतकाच्या अखेरीस आले. या लोकांनी हे खंड / देश काबीज केले ती भूमी त्यांची नव्हती. त्यांनी . तिथले मूलनिवासी जवळपास नामशेष केले. त्यांना युरोपात परत जाऊ दे आणि तिथे जागा नसेल तर समुद्रांत उड्या मारून जीव देऊ दे. चालेल ना?
२००० वर्षा आधी जेरूसलेम नी
२००० वर्षा आधी जेरूसलेम नी आजूबाजूची जमीन ज्यूंची होती नंतर रोमननी अरबआले नी त्यांनी भूमी बळकावली. परत जर ज्यू ती भूमी मिळवत असतील तर चुकीचे काय करताहेत?? ती भूमी पॅलेस्टीनींची कधी होती??>>>> अपण सर्व मंगळावर जाउयात, पृथ्वीवर फक्त आफ्रिकन लोकांचा हक्क आहे कारण सर्वात पहिली मानव जमात तेथेच उदयाला आली होती...आता उगाच चूक आहे, चूक आहे केकटू नका...चला बॅगा पॅक करायला घ्या...
२००० वर्षा आधी जेरूसलेम नी
२००० वर्षा आधी जेरूसलेम नी आजूबाजूची जमीन ज्यूंची होती नंतर रोमननी अरबआले नी त्यांनी भूमी बळकावली. परत जर ज्यू ती भूमी मिळवत असतील तर चुकीचे काय करताहेत?? ती भूमी पॅलेस्टीनींची कधी होती?? >>>>> +१११११११११११११११
मुंब्र्याची जागा कोळ्यांना
मुंब्र्याची जागा कोळ्यांना परत द्या.
ज्यांच्या मनगटात ताकद आहे
ज्यांच्या मनगटात ताकद आहे त्यांनी परत मिळवावी. ज्यूंच्या होती त्यांनी मिळवली.भारताच्या मनगटात ताकद नाहीतर पाकिस्तान नी अफगानीस्तान ह्या मूळ भारतीय भूमी आपण मिळवू शकतो का?? साध पाक व्याप्त कश्मीर मिळवू शकत नाहीत नी चालले शूर ज्यूंना न्यान शिकवायला. आहे ती भूमी वाचवा…
त्याच न्यायाने पॅलेस्टाइन
त्याच न्यायाने पॅलेस्टाइन च्या मनगटात ताकत असेल तर ते इस्रायल चा माज जिरावतील !
आपण का त्रास करून घ्यायचा ?
मग हिटलरने केलं तेसुद्धा चूक
मग हिटलरने केलं तेसुद्धा चूक नाही ना?
काहीच्या काही !
काहीच्या काही !
हिटलर ने लाखो ज्यू मारले पण नंतर बदला घेण्यासाठी ज्यू नी जर्मन नागरिक मारले का ?
शूर इस्रायलचा पराक्रम
शूर इस्रायलचा पराक्रम
Israel has just:
1. Bombed a highway with civilians fleeing to the south of Gaza. Dead bodies of men, women and children strewn across the road.
2. Airstrike on the main gate of Al Shifa Hospital. Many dead.
3. Airstrike on All Quds Hospital gate.
जर्मनीसमोर इस्रायलचा शूरपणा
जर्मनीसमोर इस्रायलचा शूरपणा टिकला नसेल. तो पॅलेस्टिनसमोरच चालतो.
मुंब्र्याची जागा कोळ्यांना
मुंब्र्याची जागा कोळ्यांना परत द्या.
ह्या असे तर्कट बिनडोक विचार फक्त भारतात आणि भारतीय च व्यक्त करतील.
असेच मागे मागे गेले तर जगातील सर्व माणसांना सर्व देश सोडून त्यांचे मूळ उगम स्थान आफ्रिकेत गेले पाहिजे.
डार्विन नी हेच सांगितले आहे माणसाचे उगम स्थान तेच आहे.
त्याच्या ही मागे गेले तर पृथ्वी वर माणूस च परका आहे इथे हक्क दाखवण्याचा त्याला काहीच नैतिक अधिकार नाही.
इतिहासात फक्त १००० वर्ष पर्यंत मागं जाता येईल.
भारत हा फक्त हिंदू न चाच देश आहे .जे अग्निपुजक आहेत हिंदू व्यतिरिक्त बाकी लोक पण अग्नी पूजक असतील तर ते पण ह्याच देशातील आहेत
मुस्लिम हे इथे परकेच आहेत
सिंधू संस्कृती आणि बौद्ध संस्कृती जुळत नाही.
बौद्ध पण नंतर च इथे निर्माण झले आहेत.
सर जरा मागचं पुढचं वाचत जावा
सर जरा मागचं पुढचं वाचत जावा निबंध लिहिण्याआधी
होमो सेपियन हे इतिहासात येत
होमो सेपियन हे इतिहासात येत नाहीत
पुराणात असावेत कदाचित
जर्मनी मध्ये ज्यांनी ज्यु वर
जर्मनी मध्ये ज्यांनी ज्यु वर अत्याचार केले त्यातील काही महायुद्धात मारले गेले , काहींना इस्रायल ने kidnap करून नेवून फासावर लटकवले तर काही वृद्धापकाळाने संपले .
मग इतर निरपराध जर्मन लोकांस इस्रायल का टार्गेट करेल ?
इतिहासातील तो काळाकुट्ट अध्याय विसरून इस्रायल पुढे आला होता .
सगळं व्यवस्थित चालेल होते .
सौदी , कतार सारखे देश इस्रायल बरोबर शांततेच्या वाटाघाटी करत होते.
पण ७ ऑक्टोंबर ला हमास ने १४०० निरपराध सामान्य इस्रायली नागरिक मारून आ बैल मुझे मार केले आणि आता बसले आहेत बैलाच्या शिंगावर .....
पुरोगामी अगदी योग्य आहे
पुरोगामी अगदी योग्य आहे
होमो सेपियन
होमो सेपियन
इतकेच नाहीत लय आहेत
अजून पक्क काही माहीत नाही .
मानव प्राणी पृथ्वी वरील नाहीच हे एक दिवस नक्की सिद्ध होईल.
सर्वांनी पृथ्वी सोडायची तयारी ठेवा.
उगाच .
आर्य,कोळी ह्यांच्या लफड्यात पडू नका.
ह्यांच्या लफड्यात पडला तर
सिंधू संस्कृती,अग्नी पूजन करणारा समाज, हे पण विचारत घ्या.
त्या पुढे जावून ज्ञात मानवी उत्क्रांती चा मार्ग पकडुन आफ्रिका खंडात जावून पोचा.
क्रमवारी तुम्ही करताय की हिंदूत्व वादी लोकांनी करावी अशी इच्छा आहे
फुरोगामी, तुम्ही मस्त स्वतः
फुरोगामी, तुम्ही मस्त स्वतः:च्याच जाळ्यात अडकलात.
१.ज्यांनी ज्यूंवर अत्याचार केले त्यांना जर्मन जनतेनेच निवडून दिले होते. ते लोक ज्यूंवर अत्याचार करताना हे लोक मजा बघत होते. हिटलर मरेपर्यंत त्यांच्यासाठी तो देवच होता.
मग हमासच्या कृत्याची शिक्षा जशी सामान्य पॅलइस्टिनींनाना मिळते , तशीच नाझींच्या कृत्याची शिक्षा सामान्य जर्मनांना का नको?
२. जसं नाझी लोकांना किडनॅप करून आणलं, कोर्टात खेचल़ं, तेच हमासच्या अतिरेक्यांबाबत करायचं.
ते सोडून हॉस्पिटल्स, रेफ्यूजी कॅंप , ambulances वर हल्ला का?
कारण इस्रायल ही नाझी जर्मनीची ज्यू आवृत्ती आहे. हिटलर = नेत्यानखहू + बिडेन, इ.
३ हमासने जसे १४०० सामान्य इस्रायली ना मारले ( असे इस्रायल म्हणते) तसेच नाझींनी लाखो सामान्य ज्यू लोकांनाच मारले.
कॉमी, हे सर , मुद्द्यांवर
कॉमी, हे सर , मुद्द्यांवर नाही, माणसांवर गोळ्या मारत सुटतात.
भरत ह्यांनी हे सांगावे.
भरत ह्यांनी हे सांगावे.
हमास म्हणा किंवा पॅलेस्टाईन दोन्ही एकच आहेत आणि इस्त्रायल ह्यांच्या मधील मतभेद दूर होण्यासाठी.
कोणता मार्ग आहे
Jews लोकांची ती त्यांच्या धर्माची मातृ भूमी आहे बाकी इतिहास नंतर चा आहे.
त्या मुळे इस्त्रायल आहे त्याच भूमीत असणार.
तो हटणार नाही.
मग हमास का atangvadi हल्ले करत आहे.
सर सर, हे इथे आणि इतरत्र
सर सर, हे इथे आणि इतरत्र अनेकांनी लिहिलं आहे. सांगितले आहे. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी सुद्धा. आता त्यांनी ते तुमच्या घरी येऊन तुम्हांला समजावून सांगायला हवं का?
अडगी भूमिका आहे हमास आणि
अडगी भूमिका आहे हमास आणि पॅलेस्टाईन ची दोन्ही एक च आहेत.
ख्रिस्त,मुस्लिम,ज्यू ह्यांचे धर्म एकच भूमी मधून उगम पावले आहेत.
ती भूमी म्हणजे आता जिथे इस्त्रायल,पॅलेस्टाईन आहे ती.
ती भूमी फक्त मुस्लिम लोकांची बिलकुल नाही.
मुस्लिम लोकांस gulf सोडले तर कोणत्याच भूमीवर त्यांचा हक्क नाही
भरत यांना नम्र विनंती आहे की
<< तुमच्या घरी येऊन तुम्हांला समजावून सांगायला हवं का? >>
भरत यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सरांना नाउमेद करू नये. दोन सरांमुळेच मायबोलीचा टीआरपी टिकून आहे.
दोन्ही सर नाउमेद होणाऱ्यातले
दोन्ही सर नाउमेद होणाऱ्यातले नाहीयेत
त्यांच्याशी बोलून आपला स्वतःवरचा विश्वास उडेल एकवेळ पण ते ठाम राहणार म्हणजे राहणार
मी ना उमेद कधीच होत नाही.
मी ना उमेद कधीच होत नाही.
.
पॅलेस्टाईन आणि हमास वेगळी नाव असली तरी ते एकच आहेत.
आणि इस्त्रायल स्व स्व रक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे.
त्याला मर्यादा नाही.
ह्या मतावर मी ठाम आहे.
.भारताने इस्त्रायल पाठिंबा देणे हे राजकीय दृष्टी नी भारताच्या फायद्याचे आहे.
उगाच निती मत्ता बघत बसू नका.
मुस्लिम अरब देश पण पहिला स्वार्थ आणि नंतर निती मत्ता असेच वागतात
(No subject)
@आशुचँप
माझा प्रश्न चुकीचा असेल तरी
माझा प्रश्न चुकीचा असेल तरी मला पडतो.
काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित लोकांचे हत्यासत्रे झाले हे धार्मिक आधारावर वर च झाले.
विघातक शस्त्र ,स्फोटक लोकांकडे जो पर्यंत राजकीय लोकांचा पाठिंबा नसतो,सरकारी यंत्रणेचा पाठिंबा नसतो तो पर्यंत ती पोचत च नाहीत.
काश्मिरी पंडित लोकांचे हत्याकांड झाले त्यांना ती भूमी सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला त्याला पूर्ण पाठिंबा पाकिस्तान
चा होता आणि ही हत्याकांड धार्मिक द्वेषाने च झाली.
किती मुस्लिम राष्ट्रांनी नीतिमत्ता समजून पाकिस्तान चा निषेध केला .
ह्याचे उत्तर द्यावे .
ही हत्याकांड अतिरेकी लोकांनी केली आणि पाकिस्तान चे त्याच्या शी संबंध नव्हता ही बकवास च ऐकायला मिळेल.
ती लॉजिक मध्ये पण बसत नाही.
त्या मुळे निती मत्ता सोडा आणि स्वार्थ बघा.
इस्त्रायल ला पूर्ण पाठिंबा ध्या
पण आता पॅलेस्टाइन मधील
पण आता पॅलेस्टाइन मधील रक्तरंजित संघर्ष बघवत नाही .
हे कुठे तरी थांबायला हवं .
रस्त्यावरील सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना गोळ्या घातल्या गेल्या आहेत . हमास म्हणते ते कृत्य इस्रायल चे तर इस्रायल म्हणतोय हमास चे .
>>>>>>>२. जसं नाझी लोकांना किडनॅप करून आणलं, कोर्टात खेचल़ं, तेच हमासच्या अतिरेक्यांबाबत करायचं.
ते सोडून हॉस्पिटल्स, रेफ्यूजी कॅंप , ambulances वर हल्ला का? >>>>>>>
भरत ,
सामान्य पॅलेस्टिनी लोकांच्या आडे हामास एन जी ओ चे कार्यकर्ते लपले असल्या मुळे सामान्य नागरिक मारले जात आहेत.
आणि त्या हामासी कार्यकर्त्यांना इस्रायल च्या ताब्यात देण्याची मागणी करण्यासाठी तेथे लीब्री गँग चे अस्तित्वच नाहीये हा खरा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे !
पण पॅलेस्टाइनच काय कोणत्याही मुस्लिम देशात लीब्री, कमुनिस्टे गँग ची वैचारिक संस्कृती सुजलाम् सुफलाम् झालीच नाही .
अन्यथा तेथील लिब्रि आणि कमुनिस्ट्याना या रक्तरंजित युध्दात इस्रायलचीच भूमिका योग्य वाटली असती , सामान्य नागरिकां बरोबर आपलाही जीव जाऊ नये म्हणून तेथे हमास विरोधात मोर्चे निघाले असते .
पण पॅलेस्टिनी लोकांचे दुर्दैव !
त्यांच्याकडे लीब्री आणि कमूनिस्टे सारखे मासिहा नाहीत....
हदिस हे कुराणाच्या खालोखाल
हदिस हे कुराणाच्या खालोखाल पवित्र समजले जाणारे साहित्य/लेखन आहे. त्यातही सही हदिस म्हणजे अस्सल हदिस जास्त वरच्या दर्जाची समजली जाते. आता सही बुखारी हदिस 2926 काय म्हणते ते पहा
अल्लाचा प्रेषित म्हणाला तोपर्यंत कयामत येणार नाही जोपर्यंत तुम्ही ज्यूंशी लढाई करत नाही आणि जोवर ज्याच्या मागे एक ज्यू लपला आहे तो दगड म्हणत नाही, "अरे अल्लाच्या सेवका, माझ्या मागे एक ज्यू लपलेला आहे त्याला तू मारून टाक"
आता बोलणारा दगड वगैरे अतीरंजित हास्यास्पद म्हणून सोडून द्या. पण ज्यू लोकांशी शत्रुत्व हे थेट इस्लाम धर्मात सांगितले आहे.
हे हदिस वगैरे साफ खोटे आहे असे म्हणण्याची हिंमत कुठला मुस्लिम दाखवू शकत नाही. त्यामुळे मुस्लिमांच्या बाजूने असणारे ज्यू वैर हे इस्लामचा अविभाज्य घटक आहे असे खेदाने म्हणावे लागते.
उलट ज्यू धर्म हा इस्लामच्या कितीतरी आधी जन्मला त्यामुळे त्यात मुस्लिमांबद्दल चांगला वाईट काहीही उल्लेख नाही. बोलणारी झाडे, दगड वगैरे असले तरी मुस्लिमाला मार वगैरे सुवचने उच्चारत नाहीत.
आणि हे लोक पुस्तकात लिहिलय
आणि हे लोक पुस्तकात लिहिलय तेच खर मानतात आणि त्याच प्रमाणे राहण्याचा प्रयत्न करतात. शेजारी हिंदू असो की ज्यू काही फरक पडत नाही. मुस्लिम शेजारी असला तरीही वागणूक तीच.
मुस्लिम आणि ख्रिश्चन
मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांमध्ये ज्यूंचा धार्मिक द्वेष आहे हे खरे आहे. पण ह्याचा अर्थ पॅलेस्टिनी लोकांचे हक्क संपले असा नाही. अनेक ज्यू अमेरिकन सुद्धा इजरायल ने हत्याकांड थांबवावे, not in our name असे म्हणत आहेत.
Evangelist christian हे anti semitic पण असतात आणि सोबत त्यांचा इजरायलला सपोर्ट पण असतो. कारण त्यांच्या मते ख्रिस्त तेव्हाच परत येईल जेव्हा इजरायल मध्ये ज्यू प्रस्थापित होतील. त्यामुळे Christian Zionism सुध्दा जुनी चळवळ आहे.
Balfour declaration मधला ब्रिटिश कॅबिनेट मधला Balfour होता तो ख्रिस्ती ज्युद्वेष्टा होता. युरोपातल्या ज्यूंना इकडून जायचे असेल तर जाऊद्या, पिडा टळली, आपण झायोनिस्ट मुमेन्टला सपोर्ट करू अशी त्याची भूमिका होती. रशियातून ज्यूंच्या हत्याकांडामुळे ब्रिटन मध्ये ज्युईश शरणार्थिंचा लोंढा येत होता. तेव्हा ह्याच माणसाने कायदा करून त्यांना ब्रिटन मध्ये येण्यापासून प्रतिबंध घातला. झायोनिस्ट चळवळीवरच्या पुस्तकामध्ये प्रस्तावनेत त्याने युरोपातल्या ज्यूनबद्दल काय लिहिले वाचा :
the Zionist movement would “mitigate the age-long miseries created for Western civilization by the presence in its midst of a Body which it too long regarded as alien and even hostile, but which it was equally unable to expel or to absorb.”
खेरीज Balfour हा white supremacist सुद्धा होता. सगळेच गुण एकवटलेले दिसतात ह्या नरपुंगवात.
हे हदिस वगैरे साफ खोटे आहे
हे हदिस वगैरे साफ खोटे आहे असे म्हणण्याची हिंमत कुठला मुस्लिम दाखवू शकत नाही
>>>> आं? एम्बीएस अलिकडेच म्हणाला ना असं की हदिस प्रॉफेटच्या मृत्यूनंतर काही शतकांनी एकत्रित केल्या आहेत. तर आपण त्यांना १००% मानू शकत नाही.
केवळ तो होता म्हणून फतवा निघाला नाही.
कोणते हादिस मानायचे व कोणते
कोणते हादिस मानायचे व कोणते नाही ह्यावर नेहमी चर्चा होत असतात. कोणतेही न हदिस न मानणारे मुसलमान सुद्धा आहेत
<सामान्य पॅलेस्टिनी लोकांच्या
<सामान्य पॅलेस्टिनी लोकांच्या आडे हामास एन जी ओ चे कार्यकर्ते लपले असल्या मुळे सामान्य नागरिक मारले जात आहेत>
फुरोगामी, खुद्द इस्रायल आणि त्यांचे ते १४-१५ मित्र देश आणि त्या देशांतल्या मीडियासुद्धा असं म्हणत नाहीएत. तुम्ही कशाला उगाच सारवासारव करताय? इस्रायलने पॅलेस्टिनींना ह्युमन अॅनिमल, चिल्ड्रन ऑफ डार्कनेस असं काय काय म्हटलंय. एका बाजूने ते घोषणा करतात की सिव्हिलियन्सनी दक्षिण गाझाकडे जावं आणि मग त्या रस्त्यावर बॉम्ब हल्ला करतात, रॉकेट सोडतात. आता तर काय पॅलेस्टिनी लोकांची हॉस्पिटल्समध्ये गर्दी झाली आहे हे बघून हॉस्पिटलच्या गेट्सपाशी , अॅम्ब्युलन्सेसवर बॉम्ब टाकलेत. हे काय नाइलाज म्हणून का? आता तर पॅलेस्टाइन सोडून जाणार्या अमेरिकन नागरिकांच्या काफिल्यावरच बाँब टाकला.
ही जागा आम्ही कोणाही माणसाला राहण्याच्या लायकीची राहणार नाही अशी करून सोडू , असं इस्रायली अधिकार्याचं वक्तव्य आहे.
बरं, वेस्ट बँक मध्ये हमास नाही. तिथे का बाँब टाकताहेत.
या सगळ्याचं उत्तर एकच - इस्रायलला आपल्या भूमीवर एकही पॅलेस्टिनी नको. त्यासाठी त्यांचा वंशसंहार - जिनोसाइड करणं हे तर आणखीनच मस्त.
तुम्हांला माहीत आहे का नेत्यानाहू म्हणाला की बिचार्या हिटलरला ज्यूंना मारायचं नव्हतंच मुळी. त्याला ज्युंना फक्त हाकलून द्यायचं होतं. पण एक पॅलेस्टिनी मौलवी हिटलरला भेटला आणि त्याने हिटलरच्या डोक्तात ज्यूंचा वंशसंहार केलाच पाहिजे असं भरवलं. नाहीतर हिटलर तसा कनवाळू हो. हे मी नाही, नेत्यानाहू म्हणतो. यावर खुद्द जर्मनीनेच All Germans know the history of the murderous race mania of the Nazis that led to the break with civilization that was the Holocaust, असं उत्तर दिलं. म्हणजे बघा.
आता आपण वादासाठी मान्य करू की हमास लपून बसल्यामुळे इस्रायलच्या हल्ल्यात सामान्य पॅलेस्टिनी मारले जात आहेत. यावर एका मुलाखतीत ऐकलेला प्रतिप्रश्न विचारतो. अमेरिकेत सारख्या शूटिंगच्या (गोळीबार - सिनेमाचं नव्हे) घटना होत असतत, अगदी शाळांत सुद्धा. असा माणूस गोरा असेल तर त्याचं वर्णन टीनेजर, गनमॅन असं म्हणतत. टेररिस्ट हा शब्द फक्त मुस्लिमांसाठी असतो. तर समजा एका शाळेत असा गनमॅन घुसला , मस्त गोळीबार करून लपून बसला, तर त्याला ठार करण्यासाठी तुम्ही शाळेवर बाँब टाकाल का?
त्याने तुमच्या वृद्ध आईला ओलीस धरलं आणि तिची ढाल करून तो पळत असेल तर त्याला मारताना तुमच्या आईलाही गोळ्या लागल्या तर चालेल का? अर्थात इतर देशातले , इतर वंशाचे लोक आणि मुस्लिम / पॅलेस्टिनी यांच्या जिवाची किंमत सारखी असलीच पाहिजे असं तुम्हांला वाटायला हवं असं काही नाही.
<तेथील लिब्रि आणि कमुनिस्ट्याना या रक्तरंजित युध्दात इस्रायलचीच भूमिका योग्य वाटली असती , सामान्य नागरिकां बरोबर आपलाही जीव जाऊ नये म्हणून तेथे हमास विरोधात मोर्चे निघाले असते .> खुद्द इस्रायलमध्ये ज्यू लोक युद्धबंदी करा म्हणून मोर्चे काढताहेत. अमेरिकेतही काढताहेत. इस्रायलमधले पोलिस त्यांना मस्त जमिनीवर आदळतात. शोधून बघाच तुम्ही. हे युद्ध चुकीचं आहे , पॅलेस्टिनींना सुद्धा तिथे राहायचा हक्क आहे असं म्हणणार्या ज्युंची संख्या लक्षणीय आहे.
नेदरलँड्स (ज्यांचा संघ सध्या क्रिकेट विश्वचषक खेळतो आहे) मधल्या Henk Zanoli या व्यक्तीने नाझी काळात ज्यु लोकांना वाचवलं म्हणून इस्रायलने नंतर त्याचा सन्मान केला. त्याने गाझामधला इस्रायलचा पराक्रम पाहून अवॉर्ड वापसी केली आहे.
बरं पण इस्रायलने सामान्य जर्मन नागरिकांना नाझी लोकांच्या पापात सहभागी असण्याची शिक्षा का दिली नाही, ते तुम्ही सांगत नाही. अरब लोकांना शिक्षा दिली तर चालते. इतर कोणाला नाही, असं काही आहे का?
टेररिस्ट हा शब्द
टेररिस्ट हा शब्द मुस्लिमांसाठी असतो हे मान्य पण ह्याला मुस्लिमच जबाबदार आहेत. मुस्लिम बहुल काश्मीर मध्ये आजही हिंदूंना वेचून मारले जातेय. पाकिस्तानमध्ये काल/आज दोन मोठे दहशतवादी हल्ले झालेत. हिंसा त्यांना व्यर्ज नाही.
Pages