इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इस्रायल टेररिस्ट आणि पॅलेस्टाईन , सीरिया , लेबनॉन इराण इराक , पाकिस्तान हे सगळे शांतीवाद्याच्या हमास , इसिस , अलकायदा सारख्या एन जी ओ नी खचाखच भरलेले देश आहेत.
युनो आणि कधी कधी अमेरिका ला देखील फाट्यावर मारणारा इस्रायल देश , आजूबाजूला कट्टर अरब देशांचा गराडा पडलेला असताना झुकण्याचे नाव कधीच घेत नव्हता .
या पूर्वी एक इस्रायली नागरिकाच्या मृत्यू च्या बदल्यात १० अरब / पॅलेस्टाईन संपवण्याचा इतिहास असणाऱ्या इस्रायल देशाचे भवितव्य इथून पुढे खडतर होऊ शकते .
आता पाकिस्तान आणि चीनच्या कृपेने इराण , पॅलेस्टाईन , सीरिया , लेबनॉन , इजिप्त वैगरे शस्रसज्ज झालेले आहेत .
त्या भागात जर युद्धाचा भडका उडाला तर इस्रायल सहित युद्धाची खुमखुमी असलेले आखाती देश होरपळून निघतील.
त्यामुळे भारतीयांना इंधन दर आणि महागाई च्या समस्यांना तोंड द्यावे लागेल .
म्हणून हे युद्धच नको !!!!

20231024_091726.jpg
लोकमान्य , जनतेत आदराचे स्थान असलेल्या सतत निस्पक्ष वार्तांकन करणाऱ्या सकाळ ने देखील हमास ची रॉकेट भरकटतात याला दुजोरा दिला .
काल पर्वा तर लिब्रालस चे आवडते New York Times ने हॉस्पिटल वरील हल्ल्यास इस्रायल जबाबदार असल्याचे पूर्वी बातमी दिली होती पण आता इस्रायल चे नाव काढून हेडिंग बदलले आणि चुकीच्या वृत्ता बद्दल खेद व्यक्त केला .....
पूर्वीच सांगितले होते हॉस्पिटल वर पडलेले रॉकेट हमासचेच असू शकते , तर काही जण काय धाऊन आले होते .
एक मात्र नक्की बऱ्याचशा हमास समर्थकांना वाटते अमेरिका पाकिस्तान आणि भारताचे रॉकेट भरकटू शकतात पण हमास चे नाही ......

हे ते ट्वीट आहे जे नेतान्याहू चे पुर्व digital aid and social media advisor यांनी केले आणि repercussions लक्षात येताच लगेच डिलीट सुद्धा करुन टाकले. हामास ची रॉकेट्स अंधाधुंद जातात हे आधीही माहीत होतेच, आता फक्त संशय निर्माण करायला त्याचा उपयोग केला जातोयं...कारण संशयाचा फायदा नेहमी गुन्हेगारालाच मिळतो.

Naftali-deleted-tweet.jpeg

https://www.airandspaceforces.com/hamas-north-korea-weapons-israel-nuclear-arms/

Screenshot_20231024-115240__01.jpg

यावर दखल घेत आता जर इस्राएलच्या पार्श्वभागात दम असेल तर फक्त एक धमकी किम जॉंग ला द्यावी, खरोखरीच ते जर आपल्या मायेचे पूत असतील तर आणि स्वतःच्या जाज्वल्य देशभक्तीच्या प्रतिमेचा जो काही भक्त समुदाय त्यांनी जगभरात निर्माण केला आहे निदान त्यांच्या आवसानासाठी तरी इस्राएलने हे करावचं.

काही माध्यमांनी हमास बरोबर तुलना केल्याचे इसीस ला आवडले नाही , कारण हमास ही संघटना शिया इराण कडून मदत घेते म्हणून हमास देखील काफिर आहे .
मग त्या न्यायाने अझहर मसूद ने दाऊद ला काफिर म्हणायला पाहिजे .
हे झाले त्यांच्यात , पण काही डोकी फिरलेल्या भारतीयांच्या मते हमास ही अतेरिकि संघटनाच नाही ........

हजारोनी रॉकेट सोडायला लागणारा दारुगोळा ( गाझा मधे ) आला कुठून? चारी बाजूंनी हा छोटासा भाग तर वेढलेला भाग आहे. पाणी, विज, इंधन , औषधे , अर्थ व्यावस्था सर्व काही इस्रायलवर अवलंबून आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटनिस, अँटोनिओ गुटेरेस, यांनी अत्यंत समतोल प्रतिक्रिया दिली आहे.

हजारोनी रॉकेट सोडायला लागणारा दारुगोळा ( गाझा मधे ) आला कुठून
>>> पाणी पुरवठा करणारे पाईप वितळवून त्यांचे रॉकेटसाठी मटेरियल वापरले गेले अशी एक न्युज पहिली. आणि स्मग्लर्स कडून पाण्यात दारुगोळ्याचे ड्रॉप्स करून घेतले असे म्हणतात. मोसाद किंवा शिन बेतला अजिबात माहिती मिळाली नाही हे समजून घेणे कठीण आहे.

तो गुटेरीयस म्हणजे दात नसलेला वाघ !
अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये कमी नरसंहार झाला आहे का? आर्मेनियन लोकांना टर्की कोंबडी च्या मदतीने चिंचोळ्या भागात राहायला अझरबैजान मजबूर केले तेंव्हा गुटेरियास झोपा काढत होता का ?
अख्खे जग त्या ग्यूटरीयस् ला फाट्यावर मारते हे कित्तेक वेळा बघितले आहे .
बर झाले इस्रायल च्या प्रतिनिधीने त्याची नशा उतरवली ....

>>> पाणी पुरवठा करणारे पाईप वितळवून त्यांचे रॉकेटसाठी मटेरियल वापरले गेले अशी एक न्युज पहिली. >>>>>>
हमास च्या कथित योध्यानी त्या पाईप चे रॉकेट कसे बनवले याचा व्हिडिओ हमासच्याच मीडिया प्रमुखांनी बनवले आणि ते व्हिडिओहमास प्रेमींनी मात्र आज पर्यंत पाहिले नाही Happy
https://youtu.be/XEEr5OxezfQ?si=A-aBg3B0ioMjHb4B
हमास प्रमाणेच हमास प्रेमींना त्या पाईप रॉकेट वर बिलकुल विश्वास नसावा म्हणून ते हॉस्पिटल ब्लास्ट मध्ये इस्रायल चा हात असल्याचे ओरडुन ओरडुन सांगत होते .......

संयुक्त राष्ट्रसंघाच्या General Assembly (UNGA) मधे मानवतावादी दृष्टीकोनातून मांडलेला प्रस्ताव ( Protection of civilians and upholding legal and humanitarian obligations ) १४० विरुद्ध १४ अशा मताधिक्याने मंजूर झाला.

या प्रस्तावांत "... Condemning all acts of violence aimed at Palestinian and Israeli civilians, including all acts of terrorism and indiscriminate attacks, as well as all acts of
provocation, incitement and destruction.... " असे लिहीलेले असतांना स्तावाच्या बाजूने मतदान न करण्याचे काहीच ठोस कारण दिसत नाही. कॅनडा, भारत अशा ४५ देशांनी मतदानात भाग घेतला नाही. Sad

इस्रायल - पॅलेस्टाईन विषयावर सुरक्षा परिषदेत दोन प्रस्ताव आणले गेले. एक अमेरिकेचा आणि दुसरा रशिया, अपेक्षेप्रमाणे दोन्ही प्रस्ताव नामंजूर झाले.

UNGA मधे ठराव बहुमताने मंजूर झाल्याने किंवा सुरक्षा परिषदेत दोन्ही ठराव नामंजूर झाल्याने निरपराध्यांचे हत्या सत्र थांबणार नाही. पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिणामकारकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारताला हमासचा स्पष्ट निषेध त्यात हवा होता असे रीडिफवर वाचले. ८८ देशांनी तो आग्रह केला होता. पण तो भाग मंजूर झाला नाही. हा ठराव "सर्व संबंधितांस सूचना दिलेल्या आहेत" टाइप वाटतो.

भारताचा पॅलेस्टाइनबद्दलचा स्टान्स गेली काही वर्षे जो होता तो भारताच्या दृष्टीने योग्यच होता. पण हा आग्रहही काही चुकीचा नाही. "गेली काही वर्षे" म्हणजे २०१४ नव्हे. अराफतची भाषा नरमल्यानंतर आणि पीएअओ वगैरे शांततापूर्ण तोडग्याची भाषा बोलू लागल्यानंतरची वर्षे.

>>संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिणामकारकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.<<
संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिणामकारकते बाबत सोडा, तिच्या पोलिटिकल क्लाउटवर तुमचा विश्वास आहे?..

IMG_20231030_091000.jpg

जर सुरुवातीची लिडींग इच्छा सिझफायर असेल तर हमास बद्दल न बोलणे हे मत थांबवण्यासाठी काहीच्या काही कारण आहे. आधीपासून मनात सिझफायर नसेल तर काहीतरी कारण मिळतेच.

ज्यावेळेस हमास चे अतिरेकी इस्रायली लोकांना kidnap करून गाझापट्टीत घेऊन गेले होते त्यावेळी सामान्य गझाकर टाळ्या वाजवत होते. फोटो घेत होते, सेल्फी घेत होते, अतिरेकी लोकांच्या गाड्यांवर बसून फोटो सेशन करत होते. त्यामुळे सामान्य गझकर आणि हमास यांना वेगळे करणे अवघड आहे.

भारतासह इतर काही देशांनी ठरावात सुधारणा सुचवली होती कि हमास आणि दहशतवाद्यांचा स्पष्ट निषेध करावा. तसेच सर्व ओलीसांची बिनशर्त व तातडीने सुटका करावी.

या मागण्या करण्यात किंवा तसा ठराव करण्यात निषेधार्ह काहीच नाही. ओलीस इझ्राएली नागरिकांत अगदी २-३ वर्षे वयाची लहान मुले आणि वयोवृद्ध असताना, त्यांच्या सुटकेची मागणी महत्वाची आहे. ती नाकारणे म्हणजे एकांगी ठराव कबूल करणे.
भारत विविध प्लॅटफॉर्मवर दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका घेण्याची मागणी करत असताना अशा ठरावाच्या बाजूने मतदान करेल अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.

काही दिवसांपूर्वी भारताने गाझाच्या पीडित लोकांसाठी मानवतावादी दृष्टीकोनातून इजिप्त रेड क्रॉस च्या माध्यमाने एक छोटी मदत पाठविली होती. छान निर्णय होता.

https://www.hindustantimes.com/india-news/india-sends-over-38-tonnes-of-...

आता संमत झालेल्या ठरावांत हमासचा स्पष्ट निषेध यायला हवा होता, तो नसल्यामुळे ठरावाला गैरहजर रहाणे या लंगड्या सबबी आहेत. मग वरच्या मानवतावादी मदतीला काहीच अर्थ नाही. गैरहजर रहाणार्‍या देशांनी इस्रायलची बाजू घेतली आहे आणि हे भारताच्या neutral स्टँड मधे बसणारे नाही.
संमत झालेल्या ठरावांत इस्रायल करत असलेल्या हिंसक कारवाईचा पण निषेध नव्हता.
"... Condemning all acts of violence aimed at Palestinian and Israeli civilians, including all acts of terrorism and indiscriminate attacks, as well as all acts of provocation, incitement and destruction.... "

हमासने हल्ला केला आणि १४०० निरपराध नागरिक मारले आता इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ८००० पेक्षा जास्त जिव मारले गेले आहेत. नेत्यानाहू म्हणतात यापुढे हल्ल्यांची तिव्रता/ दाहकता वाढवली जाणार आहे. अनेक जिवांना मारुन गाझा संपूर्ण जमिनदोस्त करतील.... हा सर्व हिंसाचार डोळ्यांनी बघणार्‍यां लहान/ तरुण पिढीच्या मानसिक स्थितीची कल्पना करवत नाही. त्यांच्या मनांत अन्याय खद्खदणारच... आज आई- वडिल गमावलेला ९- १० वर्षाचा मुलगा काही करु शकत नाही... पण असे हजारो अन्यायग्रस्तांच्या मनांत प्रतिशोधाची भावना सलत राहिल त्याला अंत नाही.
" An eye for an eye will leave the whole world blind. "

<< भारतासह इतर काही देशांनी ठरावात सुधारणा सुचवली होती कि हमास आणि दहशतवाद्यांचा स्पष्ट निषेध करावा. तसेच सर्व ओलीसांची बिनशर्त व तातडीने सुटका करावी.
या मागण्या करण्यात किंवा तसा ठराव करण्यात निषेधार्ह काहीच नाही. सीझफायर असो व नसो सर्व ओलीसांची सुटका अतिशय महत्वाची आहे. तसे जर नसेल तर ठराव एकांगी आहे हे सिद्ध होतेच.
भारत विविध प्लॅटफॉर्मवर दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका घेण्याची मागणी करत असताना अशा एकांगी ठरावाच्या बाजूने मतदान करेल अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.
Submitted by MazeMan on 30 October, 2023 - 00:09 >>

------ ओलिसांची सुटका हा प्रश्न महत्वाचा आहे. दोनशे पेक्षाही जास्त लोक हमासच्या ताब्यात आहेत. इस्रायलच्या ताब्यात पण अनेक पॅलेस्टिनी आहेत, हमास ने त्या सर्वांच्या सुटकेची मागणी केली आहे.
पण हे सर्व युद्धबंदी असतांनाच शक्य आहे. ओलिस ठेवलेल्या लोकांचे नातेवाईक पण आधी आपल्या लोकांची सुटका करुन घ्या हेच म्हणत आहेत.

ओलिसांचा ठाव ठिकाणा माहित असेल तर सर्जिकल कारवाई करण्याची क्षमता इस्रायल कडे मजबूत आहे. ४० कि मी x ६ ते १२ कि मी गाझामधली दोनशे ठिकाणे मोसादला माहित नाही हे अजून न उलगडलेले कोडे आहे.

ओलिसांचा ठाव ठिकाणा माहित असेल तर सर्जिकल कारवाई करण्याची क्षमता इस्रायल कडे मजबूत आहे
>>> नॉर्मल परिस्थितीत इझ्राएलने हे केले असते. पण आत्ता मोसादच काय कुणालाही हे शक्य नाही. सर्व ओलीस एकत्र असतील, सेफ असतील हे ही शक्य नाही. किमान या बाबतीत इझ्राएलचे हात बांधलेले आहेत.

सुरुवातीच्या २-३ दिवसांत जागतिक प्रेशर आणून हे केले पाहिजे होते. पण त्यावेळी इझराईलला अंदाजच आला नसेल कि किती ओलीस आहेत. आणि हमास समर्थक तर हे कबूल करणार नव्हतेच. युद्धाच्या धुमश्चक्रीत ज्यूंच्या सर्वनाशाची अपेक्षा ठेवणाऱ्या हमासने लिव्हरेज म्हणून का होईना ओलीसांना जपले असेल अशी सुतराम शक्यता वाटत नाही.

आपण ज्या भौगोलिक भागांत रहातो तिथे रहाण्याचा हक्क केवळ आपलाच आहे असे मानणारा आणि दुसर्‍याबाजूचा सर्वनाश करायची भाषा करणारे दोन्ही बाजूला आहे. पण हे केवळ अशक्य आहे.

हमासने लहान बाळांची डोकी उडवली हा अपप्रचार आहे. जो बिडेननेसुद्धा हे विधान केलं आणि त्यावर व्हाइट हाउसला स्पष्टीकरण द्यावं लागलं.
पॅलेस्टिनी लोकांनी हमासचं स्वागत केलं, हमास सामान्य पॅलेस्टिनींना ढाल बनवतात हे सगळे बहाणे आहेत. इस्रायलला पॅलेस्टिनी लोक त्या भूमीवर नको आहेत, हे त्यांच्याकडूनच अनेकदा सांगितलं गेलंय. नेत्यानाहूच्या खाजगी संभाषणाच्या क्लिप्स आहेत. इस्रायली मिलिटरी, सरकार, लोकप्रतिनिथींची वक्तव्य आहेत. हिटलरच्या जर्मनीने जे ज्यू लोकांबाबत केलं तेच नेत्यानाहूचा इस्रायल पॅलेस्टिनीबाबत करत आहे. ह्युमन अ‍ॅनिमल, चिल्ड्रन ऑफ डार्कनेस हे शब्द वापरले आहेत.
आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव म्हणाले तसं ७ ऑक्टोबरच्या आधी इस्रायल पॅलेस्टिनींना जसं काही चांगलंच वागवत होता.

मुळात नेत्यानाहूलाच त्या ओलिसांची काही पडलेली नाही. ओलिसांच्या नातलगांनीच इस्रायलमध्ये नेत्यानाहू विरोधात निदर्शने केली होती. नेत्यानाहूनेच हमासला बळ दिलं.

खुद्द अमेरिकेत शेकडो ज्यु इस्रायल करीत असलेल्या वंशसंहाराविरोधात रस्त्यावर आले.

भारत आणि पॅलेस्टाईनची परिस्थिती एका अर्थाने सारखी आहे. बाह्य हस्तक्षेपांमुळे देशाची फाळणी झाली. फाळणीमध्ये धार्मिक ओळख हा महत्वाचा मुद्दा होता. साधारण एकाच कालखंडात दोन्ही फाळण्या झाल्या. एका मोठ्या भूभागावरचे लोक विस्थापित झाले (भारताच्या केसमध्ये तर फक्त अंगावरच्या कपड्यानिशी). धार्मिक, प्रादेशिक व राजकीय ओळखीपासून लोक दुरावले.

दोन्ही देशांचा ट्रॉमा कंपेरेबल आहे. पण फाळणीनंतरची भारताची आणि पॅलेस्टाईनची भूमिका आणि ७०-७५ वर्षानंतरची दोन्ही देशांची परिस्थिती यात महदंतर आहे.

भारतीय राज्यकर्त्यांनी फेट अकम्प्लाय म्हणून स्वीकारलेली फाळणी, भारतीय जनतेची सहिष्णू वृत्ती व 'जिओ और जिने दो' अटीट्युड, भारतीय समाजात शिक्षणाला असलेले अफाट महत्व, राज्यकर्ते व जनता या दोन्हीची भविष्यकाळावर नजर ठेवून मार्गक्रमण करायची आणि जनतेची स्वार्थ(चांगल्या अर्थाने) पाहण्याची सवय या गोष्टींचा फायदा आज भारताला होतो आहे.

नेमक्या याच गोष्टींचा अभाव, कट्टर धार्मिकता व नैसर्गिक संसाधनांनी युक्त अशा देशांकडून मिळालेले पाठबळ या गोष्टींचा परिपाक म्हणजे आजचे पॅलेस्टाईन. पॅलेस्टाईनने स्वतःच्या भविष्याचा नीट विचार करण्याची गरज आहे. वेळ खरे तर निघून गेलीय. But it is never too late..

हमासने लहान बाळांची डोकी उडवली हा अपप्रचार आहे. जो बिडेननेसुद्धा हे विधान केलं आणि त्यावर व्हाइट हाउसला स्पष्टीकरण द्यावं लागलं. >>>>>>
नक्कीच !
इस्रायल चुकीच्या बातम्या पसरवून पॅलेस्टिनी विरोधात जनमत भडकवत आहेत.
लहान मुलांच्या डोक्यात गोळ्या घातल्या गेल्या याचे पुरावे सापडले नाहीत , त्यांना जाळले गेले पण डोकी उडवेलेली बिलकुल नाही , उगीचच खोट्या बातम्या कशाला द्यायच्या ? डोकी उडवणे आणि जाळण्यात कमालीचा फरक आहे !
एक मात्र नक्की इस्रायली लोकांनी इस्रायली पीडितांच्या शवाचे प्रदर्शन करण्याचे प्रयत्न टाळले असे दिसले.
जे काही फोटो , व्हिडिओ आहेत ते ब्लर केलेले दिसतात.
पॅलेस्टाईन लोकांच्या ताब्यात असलेल्या निरपराध सामान्य इस्रायली लोकांच्या बदल्यात इस्रायली सरकारने पकडलेले पॅलेस्टाईनीना सोडण्याची मागणी ५७ इस्लामी मुलुख का करत नसावेत बर ?

कदाचित exactly डोकी उडवलीही नसतील पण लहान मुलांना मारल तर आहे. १४०० इस्रायली मेलेत तेही १-२ दिवसात म्हणजेच त्यांनी दिसेल त्याला गोळ्या घतल्या असणार.
पॅलेस्टाईन लोकांनी हमासच स्वागत केलेले व्हिडीओ आपले चॅनल्स दाखवत तर होते.

भारत आणि पॅलेस्टाईनची परिस्थिती एका अर्थाने सारखी आहे. बाह्य हस्तक्षेपांमुळे देशाची फाळणी झाली. फाळणीमध्ये धार्मिक ओळख हा महत्वाचा मुद्दा होता. साधारण एकाच कालखंडात दोन्ही फाळण्या झाल्या. एका मोठ्या भूभागावरचे लोक विस्थापित झाले
>>>>
पालेस्टाईन मध्ये बाह्य हस्तक्षेपाने स्थानिक लोकांचा राष्ट्रीयत्वाचा हक्क हिरावून घेतला आणि स्थानिकांच्या मनाविरुद्ध विशिष्ठ धार्मिक गटाला जगभरातून त्या भूखंडात राष्ट्रीयत्वाचा हक्क दिला.

हमास काय मूर्ख नाहीये. सोडलेल्या ओलीस महिलेने आमची व्यवस्थित काळजी घेतली असे सांगितले आहे. हे काय हमासचे कौतुक नाही. शेवटी त्यांना ओलीस एक्सचेंज करायचे आहेत, त्यांना जपण्यात हमासचे हितच आहे.

बाह्य हस्तक्षेपाने स्थानिक लोकांचा राष्ट्रीयत्वाचा हक्क हिरावून घेतला आणि स्थानिकांच्या मनाविरुद्ध विशिष्ठ धार्मिक गटाला जगभरातून त्या भूखंडात राष्ट्रीयत्वाचा हक्क दिला. >>>
आत्ता पाकिस्तान असलेल्या भूभागात काय वेगळे झाले? स्थानिक लोकांचा राष्ट्रीयत्वाचा हक्क नॉमीनली हिरावून घेतला नसेलही, पण जे तिथे थांबले त्यांचे काय झाले? एक तर त्यांची धार्मिक ओळख पुसली किंवा दुय्यम नागरिकत्व नशिबी आले.

सोडलेल्या ओलीस महिलेने आमची व्यवस्थित काळजी घेतली असे सांगितले आहे
>>> सोडलेली महिला अमेरिकन नागरिक होती ना? आणि ८५ च्या वर्षाच्या महिलेला ओलीस ठेवण्यात काही चूक नाही?
बाकी कळेलच किती ओलीस सुखरूप सुटतात आणि हेच सांगतात.

चूक बरोबर कुठून काढले ? ओलीस घेणे हे बरोबर नाहीच. चर्चा ओलीस घेणे चूक की बरोबर होती का हमास ओलीसांची काळजी घेत आहे की नाही ही होती ?

आत्ता पाकिस्तान असलेल्या भूभागात काय वेगळे झाले? स्थानिक लोकांचा राष्ट्रीयत्वाचा हक्क नॉमीनली हिरावून घेतला नसेलही, पण जे तिथे थांबले त्यांचे काय झाले? एक तर त्यांची धार्मिक ओळख पुसली किंवा दुय्यम नागरिकत्व नशिबी आले.
>>>
पाकिस्तान म्हणूनच तर मानवी हक्कांचा आदर्श मापदंड समाजाला जात नाही. तुलना पचली नाही.

जगभरातल्या पॅलेस्टिनी रेफ्युजी- निर्वासितांची संख्या ७० लाख. इस्रायलमध्ये असलेल्या पॅलेस्टिनींची संख्या २० लाख. आणखी काही सांगायला हवं?

As a result, Gaza will become a place where no human being can exist, and I say this as a means rather than an end. I say this because there is no other option for ensuring the security of the State of Israel. We are fighting an existential war.” - former head of the Israeli National Security Council

पॅलेस्टिनी लोक इस्रायली हल्ल्यात मारल्या गेल्या आपल्या आप्तपरिवारांची प्रेतं उचलत असताना इस्रायली पहा काय करताहेत
https://twitter.com/theIMEU/status/1525115272843169792

७ ऑक्टोबरपासून कालपर्यंत इस्रायलने ३०००+ पॅलेस्टिनी मुलांना ठार मारलं. त्या आधीच्या ७० वर्षांत किती मारली असतील?
hamas.jpg

१४०० इस्रायली मेलेत तेही १-२ दिवसात म्हणजेच त्यांनी दिसेल त्याला गोळ्या घतल्या असणार.>>>>>>>>>>>>>>
छ्या ! ही सुध्दा खोटी बातमी असणार .
निरपराध लोकांना मारायचे नाही अशी शिकवण त्यांच्या धर्माची आहेच आणि हे ती लोकं प्रत्येक देशात , शहरात , गावात ते पाळतात .
शिवाय भारतातील पूर्वीच्या सरकारांनी पॅलेस्टाईन बरोबर सलोख्याचे संबंध ठेवल्यामुळे आंख के बदले में आंख हि वृत्ती न ठेवता एका गालावर थापडले की दुसरा गाल पुढे करून गांधीच्या वाचनाला हमासी सभ्य नागरिक जागत होते .
त्यामुळे हमास ने इस्रायल वर क्रूरतेने हल्ला करून १४०० नागरिक मारले हा मुद्दा बाद !
या पूर्वी अख्खे जग आणि हमासच्या कौमवाल्या ५७ मुलुखानी हमास ची साथ दिली नाही , तरीही हमास ने सहिष्णुता सोडली नव्हती !
मग जगभरात इस्रायल च्या विरोधात निदर्शने करणारी लोकं येडी आहेत का ? त्यांना बरोब्बर कळत कोणाची साथ द्यायची ते !
कौतुकाची गोष्ट म्हणजे दिल्लीत एक बुरखा धारी महिला हमासच्या मदतीला जाण्यासाठी व्हिसा मागायला गेली होती , पण तिला तिथून सन्मानपूर्वक माघारी पाठवण्यात आले .
तिच्या वैचारिक स्वातंत्र्याला सरकारने यत्किंचितही किंमत दिली नाही .
तीव्र निषेध !
युद्धमय परिस्थिती निर्माण झाली असताना भारत सरकारने वेगाने हालचाली करून तेथे असलेल्या भारतीयांना त्वरेने भारतात आणले , या उलट तेथे काही लोकं जाऊ असतील केरळ मधील इसीस पॅटर्न प्रमाणे ,
तर त्यांना
सरकारी खर्चाने स्पेशल प्लेन ने पाठवायला हवे .

अडाणी ,अशिक्षित,भारतीय लोक आहे है नेहमीच सिद्ध होते
डाव्या न मुळे आणि उजव्या न मुळे पण .
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन नरकात जावू ध्या...
भारताचे हित कशात आहे इतकाच स्वार्थ आपल्या साठी आहे.
हमास ही मुस्लिम atangvadi संघटना आहे.
बाकी अतिरेकी संघटना हमास शी जोडलेल्या आहेत
आणि भारताला सर्वात मोठा धोका मुस्लिम अतिरेकी संघटना न पासून आहे
त्या मुळे आपल्या स्वार्थ साठी हमास च अंत हेच योग्य आहे.

हा प्रश्न गेली ७० वर्षे चिघळत आहे. त्यात इस्त्रायलने काय चुका केल्या व पॅलेस्टिनी लोकांनी काय चुका केल्या यावर मतभेद असू शकतात.

पण हमासने अतिरेकी हल्ला केल्यावर युनोच्या पत्रकात किमान हमासचा निषेध असावा ही अपेक्षा चूक नाही.

आरररर!
डावे , सेकुलर्स आणि कमुनिस्टी लोकांच्या बुडाला डायरेक्ट आग l
Happy
हमास ने मारलेल्या १४०० इस्रायली लोकांचे हत्याकांड
दुर्लक्षित करून त्या हत्याकांड पश्चात पॅलेस्टाईनी लोकांच्या
हलाखीच्या परिस्थिती बाबत उमाळे फुटत असताना कसला बॉम्ब टाकताय हेमंत !
इस्रायली लष्कर प्रमाणेच हेमंत देखील निर्दयी आहे !

तुम्ही कोणत्याही साइडला असाल. तुमची राजकीय मते काहीही असोत. एक व्यक्ती खून करते. एखादी संघटना लोकांना घाउक मारते, इतर गंभीर गुन्हे करते. तेव्हा पहिल्यांदा त्याचा नि:संदिग्ध निषेध त्याला कसल्याही "अहो पण" च्या कंडिशन्स न लावता करणे - ज्याला कायद्याची व माणुसकीची चाड आहे त्याने/तिने हे पहिल्यांदा करणे महत्त्वाचे आहे. मग त्यात हल्लेखोर कोणीही असोत व बळी कोणीही असोत. त्याची पार्श्वभूमी व कारणे काहीही असोत.

बहुतांश लोक आपली सहानुभूती असलेले धर्म, जात, देश यात कोठे आहेत यावर तो निषेध अनक्वालिफाइड करायचा की त्याबरोबर इतर उदाहरणे शोधून त्यात इक्विव्हॅलन्स शोधून- कधी तर संबंध नसताना उकरून काढून - याचे जनरलायझेशन करावे हे ठरवतात. मायबोलीवर व इतर सोमिवर असंख्य उदाहरणे आहेत. पण टेररिस्ट संघटनेचा निषेधही न करणे ही त्याच्याही वरची लेव्हल झाली.

हमासचे समर्थन करू नये इथपर्यंत मान्य आहेच. पण पहिला अनकवालीफैड निषेध करा हे नेहमी हमासच्या बाबत कसे ? २०१८ मध्ये पिस्फुल प्रोटेस्टर मारले गेले, हजारो लोक आयुष्यभरासाठी पांगळे झाले तेव्हा ना ग्लोबल न्युज होती ना कोणी निषेध करण्याची मागणी केली. आत्तासुद्धा हजारो पॅलेस्टिनी नागरिक मेले आहेत. असे असताना आधी निषेध करा मग पुढे बोला हे नाही पटले.

हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने त्याहीपेक्षा भयानक हल्ले गाझा आणि वेस्ट बँकवर केले. तिथल्या लोकांचे अन्नपाणीवीज तोडले. त्यानंतर इंटरनेट आणि फोन नेटवर्क बंद पाडले आणि हवाई, समुद्री आणि जमीन अशा तिन्ही मार्गांनी हल्ले केले. हे हल्ले सामान्य नागरिकांनाच लक्ष्य करीत होते. घरे , इस्पितळे, बेकर्‍या , प्रार्थनास्थळे इ.वर बाँब हल्ले झाले. युद्धाचेही काही नियम असतात. ते सगळे धुडकावून लावले.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडलेला प्रस्ताव अशा परिस्थितीत आला . त्यात युद्धविरामाचे आवाहन होते.

जर इस्रायलने हे war crimes केले नसते तर हमासच्या हल्ल्याचा नि:संदिग्ध निषेध कराय ला कोणी आडकाठी केली नसती. खरं तर ७ ऑक्टोबरनंतर या हल्ल्यांचा स्पष्ट निषेध जगभरातून झाला होता. आमसभेत हमासचा निषेध सुचवणारा बदल पुरेश्या मतांअभावी फेटाळला गेला. बहुधा या बदलाच्या विरोधात मतदान करणार्‍या देशांना इस्रायलला हे एक निमित्त हवेच होते, असे वाटले असावे.

संयुक्त राष्ट्रांच्या सेक्रेटरी जनरलचे सुरक्षा परिषदेतील हे निवेदन मुळातून वाचण्या आणि समजून घेण्यासारखे आहे.
The situation in the Middle East is growing more dire by the hour.

The war in Gaza is raging and risks spiralling throughout the region.

Divisions are splintering societies. Tensions threaten to boil over.

At a crucial moment like this, it is vital to be clear on principles -- starting with the fundamental principle of respecting and protecting civilians.

I have condemned unequivocally the horrifying and unprecedented 7 October acts of terror by Hamas in Israel.

Nothing can justify the deliberate killing, injuring and kidnapping of civilians – or the launching of rockets against civilian targets.

All hostages must be treated humanely and released immediately and without conditions. I respectfully note the presence among us of members of their families.

It is important to also recognize the attacks by Hamas did not happen in a vacuum.

The Palestinian people have been subjected to 56 years of suffocating occupation.

They have seen their land steadily devoured by settlements and plagued by violence; their economy stifled; their people displaced and their homes demolished. Their hopes for a political solution to their plight have been vanishing.

But the grievances of the Palestinian people cannot justify the appalling attacks by Hamas. And those appalling attacks cannot justify the collective punishment of the Palestinian people.
Even war has rules.

We must demand that all parties uphold and respect their obligations under international humanitarian law; take constant care in the conduct of military operations to spare civilians; and respect and protect hospitals and respect the inviolability of UN facilities which today are sheltering more than 600,000 Palestinians.

The relentless bombardment of Gaza by Israeli forces, the level of civilian casualties, and the wholesale destruction of neighborhoods continue to mount and are deeply alarming.

I mourn and honour the dozens of UN colleagues working for UNRWA – sadly, at least 35 and counting – killed in the bombardment of Gaza over the last two weeks.

I owe to their families my condemnation of these and many other similar killings.

The protection of civilians is paramount in any armed conflict.

Protecting civilians can never mean using them as human shields.

Protecting civilians does not mean ordering more than one million people to evacuate to the south, where there is no shelter, no food, no water, no medicine and no fuel, and then continuing to bomb the south itself.

I am deeply concerned about the clear violations of international humanitarian law that we are witnessing in Gaza.

Let me be clear: No party to an armed conflict is above international humanitarian law.

UNRWA चे काही कर्मचारी इस्रायली हल्ल्यात मारले गेले. त्याची माहिती देताना UNRWA नेही इस्रायलचे नाव घेतले नव्हते.

आमसभेच्या रिझोल्युशनमध्ये हमासच्या हल्ल्याचा निषेध आणि ओलीस लोकांना सोडायची मागणी केली असती आणि समजा हमासने सगळ्या ओलिसांना सोडून दिलं तरी इस्रायल हल्ले थांबवणार आहे का? हल्ल्याचा निषेध झाला नाही म्हणून शाब्दिक खेळ करत त्यांचं अंतिम उद्दिष्ट काय आहे याकडे राहून दुर्लक्ष करायचे का?

इस्रायलच्या तुरुंगांत सध्या किती पॅलेस्टिनी कोंडून घातले आहेत? त्यांची काय अवस्था आहे?
Hamas says it would release all Israeli hostages in exchange for the #Palestinians imprisoned by Israel.

But what do we know about these imprisoned Palestinians?

जगभरातील ठराविक कौम ने हमास च्या निंदनीय कृत्यांचा वेळीच निषेध केला असता तर आत्ता संपूर्ण मानवजात पॅलेस्टाईन च्या पाठीशी उभी राहिली असती !
या उलट इजिप्त इराण ,पाकिस्तान लेबनॉन आणि तुर्कस्तान मध्ये इस्रायल मधील ७ तारखेच्या नृशंस हत्याकांड च्या समर्थनार्थ मिठाई वाटली गेली .
आणि आता तेथीलच लोकं इस्रायल च्या बदलापुर्ण कारवाईच्या निषेधार्थ उग्र मोर्चे काढत आहेत , हा दुटप्पीपणा क्लिअर दिसतोय !
युरोपियन देशात अमेरिका ब्रिटन मध्ये रिफूजी नीहमास समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाना काहीही किंमत नाही .
गमंत म्हणजे भारतातील कमुनिस्ट्यांच्या आवडत्या चीनमध्ये पॅलेस्टाइन समर्थनार्थ मोर्चे निघाल्या बद्दल चीन मधून एक ही बातमी प्रसवली नाही याचे आश्चर्य कमुनिस्ट्याना कसे वाटले नाही ?

भविष्यात हमास ह्या अतिरेकी संघटना पासून भारताला धोका आहे की इस्त्रायल पासून .
इतकेच आपल्याला ठरवायचे आहे.
.आणि त्या नुसार आपले धोरण ठरवायचे आहे.
बाकी गप्पा ना काही अर्थ नाही.
भारतातच च रोज अगणित अत्याचार निरपराध लोकांवर होतात ते आपल्याला कमी करता येत नाहीत आणणे चालले antrashtriya स्तरावर अन्यायाचे निर्मूलन करायला

जगभरातील ठराविक कौम ने हमास च्या निंदनीय कृत्यांचा वेळीच निषेध केला असता तर आत्ता संपूर्ण मानवजात पॅलेस्टाईन च्या पाठीशी उभी राहिली असती !>>> Rofl Rofl Rofl

हो, आणि इस्राएल ने त्याची दखल घेऊन पॅलेस्टाईनला त्यांचा प्रांतही देउन टाकला असता एवढ्यात, इतका फायदा जगाच्या पाठींब्याचा झाला असता...उगाच शस्रे हातात घेतली त्यांनी...१९४८ ला इस्राएल च्या स्थापनेपासून जगाने आपल्या सर्वशक्तीनिशी पॅलेस्टाईनला जो पाठिंबा दिला ते पहाता त्यांनी असे काही करणं म्हणजे खाजवून खरुज काढण्याचाच प्रकार झाला. काहीही असो या प्रकरणात इतिहास काळापासून पॅलेस्टाईनच एका हाताने टाळी वाजवत आलेली आहे.

https://www.newindianexpress.com/states/kerala/2023/oct/28/shashi-tharoo...

त्या ठराविक कौम चा थरूर ला देखील फटका !
इस्रायल वर हमास ने केलेल्या हल्ल्याला terrorist attack म्हणून थरूर ने शांतीवाद्यांच्या भावना दुखावल्या ना !

हिंदू द्वेष ह्या एकमेव कारण मुळे भारतातील डावे, communist अत्यंत क्रूर अशा atangvadi संघनान चे खुले आम् समर्थन करतात
त्यांना देश हिताचा पण विसर पडतो

पण पहिला अनकवालीफैड निषेध करा हे नेहमी हमासच्या बाबत कसे ? >>> जे कोण करतात त्या सर्वांबद्दलच हे आहे. फक्त हमास बद्दलच नाही. माझ्या नंतरच्या पोस्टमधेही तोच मुद्दा आहे.

Pages