दुधीचे मुठीय
साहित्य:
एक छोटा दुधी भोपळा. आल् लसूण मिरची पेस्ट, तीळ, ओवा, हळद, तिखट, बेसन, ज्वारी पीठ, एक चमचा तांदुळ पीठ (आवश्यक नाही), दही, तेल.
कृती:
१. साल काढून दुधी किसून घायचा
२. त्यात, बेसन (१ वाटी) , ज्वारीपीठ (अर्धा वाटी), तांदुळ पीठ, रवा (१ चमचा),
आल लसणाची पेस्ट, तीळ, ओवा, दही, हळद, तिखट घालून एकत्र करायचं.
३. प्रेशर कुकर मध्ये पाणी घालून उकळत ठेवायचं.
४. कूकरच्या भांड्याला तेलाचा हात फिरवून, ते तयार ठेवायचं.
५. हवं असेल तर चिमुटभर खायचा सोडा, चमचाभर तेलात मिक्स करायचा. आणि मिश्रणात घालून हलकेच मिक्स करायचा.
६. मिश्रण भांड्यात पसरवून, भांड कुकरमध्ये ठेवायचं. त्याच्यावर ताटली ठेवायची
७. कुकरच झाकण बंद करायचं पण शिट्टी काढून ठेवायची
८. १५-२० मिनिट वाफवायच
९. गार झाल्यावर त्याच्या वड्या कापायच्या
१०. आता फ्राय Pan मध्यें तेल घ्यायचं, त्यात मोहोरी,हिंग, तीळ परतायचं.
११. आता त्यात वड्याचा एक थर लावायचा.
पाचेक मिनिटांनी त्या पल्टवयच्या.
दोन्ही बाजू एकदम छान खरपूस झाल्या की गॅस बंद करायचा.
१२.वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळायच.
पौष्टिक दुधीचे मुठिय तयार.
सकाळी नाश्त्याला, किंवा जेवणात बाजूला चटपटीत पदार्थ म्हणून अतिशय उत्तम पर्याय
---
.
---
--
मस्त एकदम
मस्त एकदम
मस्त!
मस्त!
आहा काय खमंग फोटो आहे. तील
आहा काय खमंग फोटो आहे. तील बीळ सुपरकुल!
मस्त!! उचलून खावे वाटत आहे .
मस्त!! उचलून खावे वाटत आहे . मी असे कोबीचे पण करते .
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मी असे कोबीचे पण करते . >>> हो कोबिचे पण करतो
ज्याना दुधी आवड्त नाही ते लोक पण मुठीय मिट्क्या मारत खातात.
खमंग फोटो >>> आवड्ल
खमंग फोटो >>>
आवड्ल
मस्त आहे
मस्त आहे
दुधीला माझा नेहमी पास असतो.
दुधीला माझा नेहमी पास असतो. निसर्गाने तो फक्त हलवा करायला निर्माण केलाय, लोकं भाजी वगैरे का करतात समजत नाही.. पण हा फोटो खरेच खमंग दिसत आहे
जाई आणि ऋन्मेऽऽष धन्यवाद!
जाई आणि ऋन्मेऽऽष धन्यवाद!
ही रेसिपी दुधी न खणाऱ्यांसाठी विशेषतः टाकलीय.
किती तरी जण मिटक्या मारत खातात आणि नंतर त्यांना कळतं की दुधी होता.. तेव्हा मजा येते
मस्तच. अशा सर्व वड्या जाम
मस्तच. अशा सर्व वड्या जाम आवडतात.
भाजणी घालून तर अजून खमंग होतात. आई नेहेमी सर्व प्रकारचे मुटके भाजणीचे करायची. मी बेसन आणि इतर पीठं मिक्स करुन करते. क्वचित भाजणी.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
अंजू आणि मामी प्रतिसादा बद्दल
अंजू आणि मामी प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
मी बेसन आणि इतर पीठं मिक्स करुन करते.≥>>+१
एकदा कोथिंबीर वड्यात भाजणी घातलेली तर खमंग लागायच्या ऐवजी विचित्र लागत होत्या... तेव्हापासून भाजणी फक्त थालीपीठ किंवा धिरडी करायला वापरते.
ओके मला आवडतात भाजणीच्या
ओके मला आवडतात भाजणीच्या कोथिंबीर वड्या.
छान रेसिपी..
छान रेसिपी..
मुठीय दिसतात पण मस्त..