मायबोलीवर लेखन करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांशी संबंधीत अनेक ग्रूप आहेत. या ग्रूपमध्ये, तुमचे लेखन तुम्ही स्वत:च प्रकाशीत करू शकता. मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.
१. मायबोलीवरच्या ग्रूपमधून योग्य तो ग्रूप निवडा.
२. तुम्ही त्या ग्रूपचे सभासद नसाल तर सभासद व्हा. सभासद झाल्यावरच ग्रूपमधे लेखन करण्याची सुविधा तुम्हाला दिसायला लागेल.
३. ग्रूपच्या मेनू मधून योग्य तो पर्याय निवडून लेखन करा. ते साठवल्या वर (सेव्ह केल्यावर) लगेच प्रकाशीत होईल.
उदाहरणः
मायबोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर सदस्य नामाखाली 'नवीन लेखन करा' असा पर्याय दिसेल.
त्यावर टिचकी मारली असता नवीन लेखनाचे पान येईल
यातील योग्य तो पर्याय निवडा आणि त्यावर टिचकी मारा. आता तुम्ही त्या ग्रुपच्या पानावर जाल.
तुम्ही ग्रूपचे सभासद नसाल तर आधी सभासद व्हा. सभासद झाल्यावर तुम्हाला लेखनाचे पर्याय दिसू लागतील.
येथे नवीन लेखनाचा धागा हा पर्याय निवडून त्यावर टिचकी मारा की नवीन लेखनाचे पान समोर येईल.
नवीन लेखनाचा धागा, गप्पांचे पान, कार्यक्रम, पाककृती या पर्यायांविषयी अधिक माहिती मदतपुस्तिकेतल्या या धाग्यावर उपलब्ध आहे.
तुमच्या लेखनाला योग्य ते शीर्षक दिल्यावर "गुलमोहर"च्या पर्यायांमधून आपल्या लेखनाला पूरक व योग्य तो साहित्यप्रकार निवडा. (उदा. कथा, कविता, मराठी गझल इत्यादी).
हितगुज विभागात विविध ग्रुपमध्ये त्या त्या विषयानुसार लेखन करता येते.
रंगीबेरंगी ह्या विभागात लिहीण्यासाठी तेथील सभासदत्व विकत घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतला हा धागा बघा.
कृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.
मला लेखन कसे करायचे ते अजुन
मला लेखन कसे करायचे ते अजुन समजलेले नाही..
एका गृहनिर्माण सौंस्थे मध्ये
एका गृहनिर्माण सौंस्थे मध्ये गेल्या 5 वर्षे पासून माझा रूम आहे सोसायटी मेंबर आणि काही लोक मिळून असा निर्णय घेतला आहे की एकूण 4 विंग चा पूर्ण कचरा माझ्या रूम खाली कोपऱ्यात कायमस्वरूपी शेड करून कचऱ्याच वेवस्थापणं करायचं पण माझ्या रूम च्या गॅलरी चा कचऱ्याच्या ठिकाण मध्ये फक्त 5 ते 6 फूट अंतर आहे कुठली ही सभा न घेता मला विचारणा न करता निर्णय घेण्यात आला आहे lockdown मुळे मी तिथे जाऊ शकत नाही कारण मी रूम rent वर दिला आहे कोणते ही कमेटी फोन वर बोलण्यास तयार नाहीत सोसायटी ग्रुप वर मी अर्ज देखील पाठवला आहे काही प्रतिसाद मिळाला नाही
काही दिवसानंतर फोटो दिसणे का
काही दिवसानंतर फोटो दिसणे का बंद होते. बऱ्याच लेखात असे होते असा अनुभव आहे.
मूळ सोर्स साइटमधूनच लेखक फोटो
मूळ सोर्स साइटमधूनच लेखक फोटो डिलीट करतात. किंवा त्या साइट्स बंद होतात / किंवा शेअरिंग फक्त पेडसाठी ठेवतात/ फेसबुकच्या cdn server मधून फेसबुक उडवते.
Thank you SRD but I usually
Thank you SRD but I usually download on my phone and then upload in the Lekh. I have to delete it from personal space if it exceeds the memory. I am still not sure what I should do
मी लाॅग ईन/ लाॅग आउट कसे
मी लाॅग ईन/ लाॅग आउट कसे करावे?
@ मी_अस्मिता ,
@ मी_अस्मिता ,
बेस्ट मार्ग - अपलोड टु गूगल फोटोज किंवा गूगल ड्राइव. खूप म्हणजे १५ जीबी स्टोरेज आहे.
गूगल फोटोजमधून फोटोला शेअरिंग करून घेतलेला फोटो १)डिवाइसमधून काढला की क्लाउडमधूनही जातो आणि इथे लेखात दिसत नाही.
२)गूगल ड्राईवमध्ये टाकलेला फोटो नंतर डिवाइसमधून काढता येतो.
धन्यवाद srd...
धन्यवाद srd...
फोटो drive वर अपलोड
फोटो drive वर अपलोड झाल्यावर तो वर दिसेल.
त्यामधल्या मेनूतून 'share' क्लिक करा.
शेअरिंग लिंकचे दोन पर्याय दिसतील त्यातील
"anyone with this link can view" select करा.
जी लिंक येइल ती कॉपी करा. याला आपण मेन लिंक म्हणूया. ती साधारण
https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxxxx/view?usp=sharing
अशी दिसेल.
पण ही लिंक वेबसाइटवर चालत नाही. त्यात बदल करावा लागतो.
फोटो शेअरिंगचे Template
<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxxxxxx" width="80%" /><br /><br />
मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका.
मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल.
>> मी लाॅग ईन/ लाॅग आउट कसे
>> मी लाॅग ईन/ लाॅग आउट कसे करावे?
Submitted by dipak pawar >>>
माझे खाते - सदस्यत्व -
- जाण्याची नोंद == log out
मी लॉगीन केल की
मी लॉगीन केल की
नविन लेखन करा ऐवजी
"नवीन लेखन करायचं आहे? " असा पर्याय दिसत आहे
काय कराव लागेल ??
Not able to save.....Error
Not able to save.....Error येतेय सारखी...। कला विभागात लिहू इच्छिते
ज्या विभागात लेखन करायचंय
ज्या विभागात लेखन करायचंय त्यातला कुठलाही लेख दिसत असेल तो उघडून त्याखाली शेवटी असलेल्या विभागाचे प्रथम सभासद व्हा. तो विभाग तुमच्या सदस्यत्वात दिसला पाहिजे. तो उघडून त्या खाली असलेल्या पर्यायात 'लेखनाचा धागा' निवडा। मग लेख लिहून प्रकाशित करायला काहीच अडचण येणार नाही.
हा धागा अप्रकाशित करायची गरज
हा धागा अप्रकाशित करायची गरज आहे.
आता सगळं लेखन हितगुज मनाशी ग्रूप्स मध्येच होतं
नमस्कार. नवीन लिखाण
नमस्कार. नवीन लिखाण करण्यासाठी मला 'मदत' पानावर दिलेले पर्याय दिसत नाहीयेत. कृपया कोणी याबद्दल सांगू शकेल का? (वाहते पान करायचा पर्याय निवडावा का?)
मला गझल आणि विनोदी लिखाण यांत लिहायचं आहे, त्या दोन क्षेत्रांचा मी सभासद झालो आहे.
- कुमार
ता. क. मायबोलीवर जवळजवळ १५-१६ वर्षांनी आलो. मजा येते आहे.
मला नवीन लेखन करताना अडचण येत
मला नवीन लेखन करताना अडचण येत आहे.
स्मायली टाकल्या आहेत का?
स्मायली टाकल्या आहेत का?
नविन लेखनात कलाकृतीचा युट्युब
नविन लेखनात कलाकृतीचा युट्युब व्हिडीओ देता येतो का? आणि येत असेल तर कसा द्यायचा?
अॅडमिन / वेमा,
अॅडमिन / वेमा,
पाककृती आणि आहारशास्र विभागात नवीन लेखन करताना पाककृती किंवा प्रश्न असे दोनच पर्याय आहेत. . युक्ती सुचवा आणि पाककृती माहिती आहे का याचे दोन नवे धागे गेल्या काही दिवसात सुरु केले ते प्रश्न पर्याय निवडून केले. प्रत्येक प्रतिसादावर 'सर्वोत्तम पर्याय ' असा दुवा दिसतो. ते अनाठायी वाटते. या विभागात साधा लेखनाचा धागा उघडण्याची सोय करता येईल का ? आणि मी उघडलेले दोन नवे धागे प्रश्नाऐवजी साध्या धाग्यात बदलता येतील का ?
Tumhi vachleylya kontya
Tumhi vachleylya kontya pustakavar cinema kinva web series baghayla aavdel??
मी ग्रुप कसा चालू करू शकतो ?
मी ग्रुप कसा चालू करू शकतो ?
Pages