लेखन उपक्रम २- उडदामाजी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 28 September, 2023 - 01:31

उडदामाजी
-------------
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता.तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ...
ती एक प्रतिक्रिया होती , माबोवर प्रसिद्ध होणं म्हणजे- या वाक्यावर आलेली .
त्याला ते वाक्य अन प्रतिक्रिया दोन्ही आवडलं . अन त्याच्या डोळ्यांपुढे अनेक प्रतिक्रिया फिरू लागल्या .
खऱ्या- बऱ्या, तिरकस - जोरकस, वेचक - वेधक, खोचक - भोचक, भ्रम तोडणाऱ्या - तंगड्या ओढणाऱ्या...
एखादा डुप्लिकेट स्वतःची पाठ थोपटतोय, कोणी बुद्धीची धार दाखवण्याच्या नादात गंज दाखवतोय, मराठीचा अभ्यासक साहित्य सोडून कारल्याच्या कटलेटचं कौतुक करतोय अन असं सगळ्याच धाग्यांवर .
पण कुठे प्रेमळ , आश्वासक , दिलखुलास , मनमोकळ्याही प्रतिक्रिया !
त्याने मोबाइलच बंद केला अन तो म्हणाला - उडदामाजी काळे गोरे !...
पण तरी , त्याचं माबोवरचं प्रेम आणखीच दाटून आलं .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मंडळी खूप आभारी आहे

ही कथा लिहिताना मला खूप मजा आली .
आणि खरं तर खूप गोष्टी मांडायच्या राहिल्या . पण असो