चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी

Submitted by संयोजक on 27 September, 2023 - 06:25

मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक माझ्या जोडीदाराचा फोटो टाकतो. पहिल्यांदाच इतकं पर्सनल शेअर करतोय.
हा जिवलग मित्र आहे. प्रणव मिश्रा !
antmb3.png

धन्यवाद _/\_
मंजूताई आणि अवल : मस्त फोटोज्.

IMG_20230927_205650.jpg
गणपतीपुळे प्रदक्षिणामार्गावरून

जे हसणार नाहीत त्या सर्वांच्या फोटोंना छान छान प्रतिसाद देणार आहे Proud

@ स्वरुप ,मागच्या पामावरचा फोटो कुठला आहे ? आवडला. जायचंय.

@ वर्णिता - एका मागो एक फोटो येत असल्याने दिसला नाही. खूप मस्त आहे किनारा, बोट...

Proud समुद्र विशेष आवडता आहे. त्यामुळे काही लाडके फोटो खरंच सेव्ह करून ठेवलेत, आचार्य. बरेचसे recent च आहेत.

Pages