लेखन उपक्रम २ - प्रतीक्षा - rmd

Submitted by rmd on 23 September, 2023 - 11:26

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...

तो स्वतःशीच हसला.
आसपास तुरळक लोकांची ये-जा चालू होती.
त्याने सहजच माणसं मोजली. १३.
त्याने आजुबाजूला नजर टाकली. एक सिक्युरिटीवाला उभा होता. बंदूक होती त्याच्याकडे.
ही सकाळची वेळ तशी शांतच असते. जास्त रहदारीही नव्हती रस्त्यावर.
त्याने घड्याळ पाहिले. गाडीची वेळ झाली होती. आता कुठल्याही क्षणी त्याचे मित्र येणार होते.
"फक्त चार दिवस!" तो मनात म्हणाला. "शुक्रवारी याच टायमाला दरोडा टाकायला हवा या बँकेवर"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
आखेचा अमिताभ बच्चन डोळ्यासमोर आला..

मस्त जमलीयं..
ती म्हणजे बँक हे दोनदा वाचलं तेव्हा लक्षात आलं.