उपक्रम २ - एकारंभ अनंत अर्थम् - तिचं आयुष्य तेवढंच - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 19 September, 2023 - 14:55

उपक्रम २ - एकारंभ अनंत अर्थम् - तिचं आयुष्य तेवढंच - बिपीन सांगळे

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले..."
आणि तो एकदम शहारलाच. ती एक बदामी रंगाची कुत्री होती. रस्त्यावर आडवी पडलेली. अचेतन ! रक्ताचा एक छोटासा ओघळ होता तिच्या शेजारी. कोणी गाडीवाल्याने धडक दिली होती तिला.
रोज अशी कितीतरी माणसं मरतात आणि प्राणीही. तशीच हीसुद्धा ! त्यात वेगळं ते काय? तिचं आयुष्य तेवढंच -नशीब असं कोणी हसत बोललं नव्हतं. पण ... तिच्यामागे तिची पिल्लं होती. तान्ही ! ती रस्ता ओलांडून पिल्लांकडेच येत होती खरंतर.
शेवटी बिचारी पिल्लंच आली तिच्याकडे. तिला शोधत. आपली आई गेलीये, हे त्या कोवळ्या जीवांना काय ठाऊक... ती तिला भुकेने लुचू लागली ... त्याच्याही डोळ्यांत पाणी .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Sad छान

करुण शशक.
कमी शब्दात इम्पॅक्ट्फुल आहे.

Sad कथा वाचून वाईट वाटले.
आमच्या कॅालनीमधली एक कुत्री अचानक मेली. तिच्या पिल्लांचं काय होणार म्हणून माझ्या नंदेने त्यांना रोज खायला देणे सुरू केले. नंतर त्यांना सगळ्याच भटक्या कुत्र्यांबद्दल प्रेम वाटायला लागले. गल्लीतल्या बऱ्याच कुत्र्यांना नगरपालिकेने पकडून नेऊ नये म्हणून त्यांनी PETA तून परवाणगी आणली/घेतली. सोसायटीत कुत्र्यांना त्रास नको म्हणून त्यांची इतरांशी भांडणे सुद्धा झालीत. बाहेर पडताना पेडीग्रीचा पुडा कायम त्यांच्या पिशवीत असतो.
आता त्या किंवा त्यांची मुलगी दिसली कि लगेच पूढे २ मागे ३ कुत्रे त्यांचे रक्षक असल्यासारखे चालत असतात. Happy

जमलीय..
आमच्या सोसायटी जवळच्या रस्त्यावर अशीच एक कुत्री गाडीखाली गेली तर रात्रभर कितीतरी कुत्री रडत होती..

करुण शशक.
कमी शब्दात इम्पॅक्ट्फुल आहे. >>>> +1
Sad

सामो
रघू

आपण दोन दोन वेळा ही कथा वाचलीत .
खूपच आभार

कारुण्यमय कथा.!

तिचं आयुष्य तेवढंच ->> अमेरिकेत पोलिसांच्या गाडीखाली येऊन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीची बातमी पेपरात वाचली होती.. त्याची आठवण झाली.