मायबोली गणेशोत्सव २०२३- स्पर्धा आणि उपक्रमांची यादी

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 01:31

घरातील बाप्पाचे आणि नैवैद्याचे फोटो देण्यासाठीच धागा
मनमोहक ते रूप || अर्पितो तुज मनोभावे नैवैद्य ||

https://www.maayboli.com/node/84054

लेखन विभाग
लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे ..

https://www.maayboli.com/node/84022

लेखनस्पर्धा -२ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश .
https://www.maayboli.com/node/84023

लेखन उपक्रम-१ - मी ...... झालो/झाले तर.(तुमच्या कल्पनेतील व्यक्ती )
https://www.maayboli.com/node/84024

लेखन उपक्रम-२ - एकारंभा अनंतार्था (शशक पूर्ण करा )-१
https://www.maayboli.com/node/84025

लेखन उपक्रम-३ - एकारंभा अनंतार्था (शशक पूर्ण करा )-२
https://www.maayboli.com/node/84174

पाककृती विभाग
पाककृती स्पर्धा क्र १ - नैसर्गिक घटक (साहित्य) वापरून गोड पदार्थ

https://www.maayboli.com/node/84018

पाककृती स्पर्धा क्र २ - भाज्यांचे नाविन्यपूर्ण प्रकार -कांदा लसूण किंवा टोमॅटो वाटण न वापरता भाज्यांचे प्रकार
https://www.maayboli.com/node/84019

पाककृती स्पर्धा ३ - Milets किंवा भरड धान्य वापरून पाककृती. (गहू, तांदूळ व्यतिरिक्त)
https://www.maayboli.com/node/84020

पाककृती स्पर्धा क्र ४- चविष्ट आणि पौष्टिक पेय
https://www.maayboli.com/node/84021

चित्रकला विभाग
चित्रकला स्पर्धा-१ - मोठा गट - 'वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर'

https://www.maayboli.com/node/84037

चित्रकला स्पर्धा-२ - मोठा गट - वस्तुचित्र
https://www.maayboli.com/node/84038

चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चांद्रयान
https://www.maayboli.com/node/84011

चित्रकला उपक्रम-२ छोटा गट -वृक्षारोपण व संवर्धन
https://www.maayboli.com/node/84034

हस्तकला विभाग
हस्तकला स्पर्धा-१ - मोठा गट -पक्ष्यांची घरटी

https://www.maayboli.com/node/84039

हस्तकला स्पर्धा-२ - मोठा गट - काचेच्या बाटलीचे शोपीस
https://www.maayboli.com/node/84040

हस्तकला उपक्रम-१ छोटा गट -पताका बनविणे
https://www.maayboli.com/node/84035

हस्तकला उपक्रम-२ छोटा गट - पणती सजवणे
https://www.maayboli.com/node/84036

खेळ

खेळ-१ - बातमीचा मथळा आणि रीड मोअर
https://www.maayboli.com/node/84052

खेळ-२ - कोडे द्या- गाणे ओळखा
https://www.maayboli.com/node/84077

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पुल ( Bridge)
https://www.maayboli.com/node/84049

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-२- मेहंदी डिझाईन्स(रेखाटने)
https://www.maayboli.com/node/84076

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-३- प्रवेशद्वारावरील तोरण
https://www.maayboli.com/node/84048

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-४ - मी पाहिलेले देऊळ
https://www.maayboli.com/node/84103

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-५ - चॉकलेट,गोळ्या,लहानपणीचा खाऊ
https://www.maayboli.com/node/84118

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-६ - भाजी मंडई
https://www.maayboli.com/node/84133

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-७ - माझा पहिला विमानप्रवास ( विमानतळ परिसर)
https://www.maayboli.com/node/84146

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-८ - माझ्या घरातून दिसणारा परिसर
https://www.maayboli.com/node/84169

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी
https://www.maayboli.com/node/84188

|| गणपती बाप्पा मोरया ||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सवाचा जंगी कार्यक्रम आला. यंदा अगदी कमी वेळ होता तरीही इतके कार्यक्रम आखल्याबद्दल मंडळाचे कौतुक.

सर्व स्पर्धा आणि उपक्रमांचे विषय छान आहेत. होऊन्जाऊन्द्यात!!!

या वर्षी धाग्याच्या नावात संपूर्ण स्पर्धेचं नाव टाकण्याऐवजी फक्त धाग्याचे नाव + स्पर्धेच नाव आणि क्रमांक दिला तर बरं होईल.
संपूर्ण नाव दिल्यास एकदम लटांबरासहीत अनेक धागे तरंगताना दिसू लागतात. बरं वाटत नाही.

उदाहरणार्थ
धाग्याचे नाव समजा आशा काळे असेल तर

आशा काळे : मायबोली गणेशोत्सव २०२३ लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे ..
ऐवजी
आशा काळे : मायबोली गणेशोत्सव २०२३, लेखनस्पर्धा - १
असं असावं.

रघू आचार्य,
चांगली सूचना आहे. स्पर्धेचं नाव शब्द खूणांमध्ये देता येईल.

संयोजकांची तयारी जबरदस्त आहे.

स़ंयोजक, मायबोलीकरांच्या घरचे बाप्पा आणि प्रसाद , नैवेद्य यांच्या प्रकाशचित्रांसाठी धागे काढताय ना?

बाप्पाचे फोटो, प्रसाद, नैवैद्य यांचे फोटो देण्यासाठी धागा थोड्या वेळातच काढतोय, इथेसुद्धा तुम्हाला कळवले जाईल.

संयोजक बरोबरच होते अस्मिता. इस्रोने स्वतःच्या साईटवर चंद्रयानच लिहिलं आहे.

https://www.isro.gov.in/ISRO_HINDI/Chandrayaan3_Details.html

तोच न्याय मंगळयानालाही आहे. तिथेही मांगळयान होत नाही.

मी सुद्धा अस्मिताची पोस्ट वाचून गूगल केले होते. मला दोन्ही शब्द सापडलेले बातम्यांमध्ये. तुलनेत चंद्रयान लिहिलेले जास्त शब्द सापडले होते. अर्थात त्या बरेच बातम्या हिंदीच होत्या. मराठी-हिंदी मध्ये अश्या शब्दात फरक असूही शकतो आणि व्याकरण हा माझा प्रांत नसल्याने शांत राहिलो. पण ईथे काय योग्य शब्द निघतो यावर नजर ठेवून होतो Happy

तशी व्याकरणाची काही चूक नाही. दोन्ही शब्द बरोबरच आहेत. चंद्राशी संबंधित ते चांद्र. आणि दोन्हींची स्पेलिंग एकच आहेत. त्यामुळे गोंधळ होणं साहजिक आहे. त्या यानाच्या आत्याबाईंनी काय नाव ठेवलं आहे त्यांनाच माहीत. त्यामुळे इस्रोची लिंक शोधून पाहिली.

समजा हे चंद्रयान हे ठेवलेले दिलेले (ठेवलेले नाव म्हटले तर कोटी विनोद (कोटी म्हटले तर त्यावरही कोटी करतील म्हणुन विनोद) करतील म्हणुन दिलेले ) नाव नसते
चंद्रावर जाणारे / जा ये करणारे यान या अर्थी चांद्रयान असेच म्हणायला हवे का?

तर चंद्रयान दिलेले नाव असताना चंद्रयान हे एक चांद्रयान आहे असे म्हणता येईल.

Lol माझंच चुकलं होय .. ! क्षमस्व संयोजक.

मांगळयान Lol
हपा, हो का ? मला तरी वाटलं, तुम्ही का नाही सुचवलं. Happy
ऋ म्हणतोय तसं चंद्रयान-हिंदी, चांद्रयान- मराठी असं डोक्यात होतं. मला हे पंतप्रधान आणि प्रधानमंत्री टाईप वाटलं. बरं झालं खात्री करून घेतली.

तर चंद्रयान दिलेले नाव असताना चंद्रयान हे एक चांद्रयान आहे असे म्हणता येईल. >>> Lol यानाचं नाव 'चंद्रयान' आहे, पण ते चांद्रयान आहे.
विमानाचं नाव 'हवाईजहाज' ठेवल्यासारखं. कोणी तरी म्हटलं 'हवाईजहाज उतरलं' की आपण म्हणणार 'विमान म्हणावं रे' आणि त्यानी म्हणावं 'विमानाचं नाव 'हवाईजहाज' आहे'. Lol

धन्यवाद तिघांनाही. मी गूगल केलं नव्हतं पण आता खात्री पटली. Happy

Lol
---
समाजात एकता आणण्यास पुढचा झब्बू "माझ्या घरात दिसणारा पसारा" घेण्यात यावा.
सगळ्यांना सहभागी होता येईल आणि सगळ्यांना दुसऱ्यांचे झब्बू बघुन आपण सारे एक आहोत याची जाणीव होईल.

Lol Lol मानवदादा, एकात्मताभाव आवडला.
सगळे गणेशोत्सवात रमलेले असता मांडवामागे पत्ते खेळणारे कार्यकर्ते असल्याचं फील येतंय. Lol

चांद्रयान तेव्हांच वाचलेले होते. त्याच वेळी हपा येणार हे पण कळून चुकलं होतं. Happy
काही काही गोष्टी आपण थांबवू शकत नाही Lol

मानव Lol

सोन्याचं नाणं नव्हतं दिलं मला, नाहीतर हस्तर आयेगाच्या चालीत वाचलं असतं.
पुढे कधी असे शब्द वाचले की 'आयेगा आनेवाला' गाणं लावा. Wink

समाजात एकता आणण्यास पुढचा झब्बू "माझ्या घरात दिसणारा पसारा" घेण्यात यावा.
सगळ्यांना सहभागी होता येईल आणि सगळ्यांना दुसऱ्यांचे झब्बू बघुन आपण सारे एक आहोत याची जाणीव होईल. >> हे फार आवडलं Lol

पसारा >> हे एक आठवडा आधीच जाहीर केलं की सहभागी होणं सोपं होईल. घरामध्ये गणपती येणार असतील तर त्यापूर्वी आवराआवर करणं शास्त्र असतंय ना. Wink