Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56
हो,
तो परत येतोय...
एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.
एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.
एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.
आणि आता तो पुन्हा आलाय...
हजाराचे सव्वा हजार करायला...
पठाण आता जवान बनून आलाय
सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..
राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..
थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या
https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आतापर्यंत जवान बद्दल ऐकून जे
आतापर्यंत जवान बद्दल ऐकून जे समजले त्यावरून मी लोकांना प्रामाणिक सल्ला हाच देईन
साऊथ इंडियन मसाला मूवी किंवा शाहरुख आवडत असेल तर जा बिंदास्त बघायला.. पैसा वसूल आहे..
पण जर दोन्ही आवडत नसेल तर नका जाऊ.. कदाचित डोक्याला शॉट असेल..
कोणाला कसा वाटला विचारायच्या भानगडीत पडू नका, जो तो आपल्या आवडीनुसार सांगणार..
बाकी आतापर्यंत व्होटस्प मित्र आणि फेसबूक सिनेमा गल्ली ग्रूपवर ऐकलेले रिव्ह्यू ऐकून मी सुद्धा जायचा विचार करतोय पुढच्या आठवड्यात.. आणि मी कितीही कट्टर शाहरूख चाहता असलो तरी त्याचे काहीही बंडल सिनेमे थिएटरमध्ये बघत नाही..
<< आणि मी कितीही कट्टर शाहरूख
<< आणि मी कितीही कट्टर शाहरूख चाहता असलो तरी त्याचे काहीही बंडल सिनेमे थिएटरमध्ये बघत नाही.. >>
---------- शाहरुखचे चित्रपट बंडल नसतात हा भाग वेगळा.
त्यातला शाहरूख बंडल नसतो. पण
त्यातला शाहरूख बंडल नसतो. पण बाकीच्यांना झेलने अवघड होते बरेचदा. लेखक दिग्दर्शक सुद्धा मुळातूनच वाट लावतात बरेचदा.. एका शाहरूखला साईन केलं की झाले असे नसते ना..
(No subject)
सिनेमा पाहिला.जनरल मध्ये
सिनेमा पाहिला.जनरल मध्ये आवडला.लॉजिक चे बरेच प्रश्न डोक्यात आहेत पण डोकं बाजूला ठेवून पाहिला तर चांगला आहे.सर्व मुलींना,त्यांच्या बॅक स्टोरीज ना अजून चांगला वेळ द्यायला हवा होता.
खूप जणं खूप जणांचा खून करतात आणि तरी कोणालाही विशेष काही परिणाम भोगावे लागलेले नाहीत.
,
,
“Jawan creates History.
Sold a Record 2875961 tickets
from tracked shows alone in India on the 4th day. Biggest ever for a Bollywood film.
#ShahRukhKhan
मी नाही पण माझ्या घरच्यांनी
मी नाही पण माझ्या घरच्यांनी जवान पाहिला. रात्रीचा शो होता. थेटर मध्ये आत शिरताना प्रत्येकाला शिट्ट्या दिल्या की शाहरूखच्या सिनच्या वेळी वाजवा म्हणून. लोकं मग आत मध्ये उगाचच शिट्या वाजवत होते.
एरवी शाहरूखचे डाय हार्ड फॅन असलेले घरचे मात्र ह्या चित्रपटाला वैतागले होते पण चेहर्यावर मात्र बळजबरी आनंदी भाव आणले जात होते.उल्लू बनलोय हे न दाखवण्याचा आटापिटा . झिरो, रईस पासून शाहरूख त्यांच्या मनातून उतरू लागला होता. पठाणने त्यावर शिक्कामोर्तब केले. हो-नाही करत शेवटी सोसायटीतल्या बायका जाणार म्हणून मिसेस व मुलगी हा जवान चित्रपट पहायला गेले. चेहर्यावर बळजबरी आनंद आणत मोजक्याच प्रतिक्रिया दिल्या गेल्या की पठाणपेक्षा थोडा बरा आहे पण खूपच मारामारी आहे ज्याचा कंटाळा येतो. गिरीजा ओक कधी येते व जाते तेच कळत नाही. फाशी दिल्या जाणार्या दिपिकाची केवळ नस पाहून ती गरोदर आहे असे निदान केले जाते ह्या सिनला माझ्या डॉ. असलेल्या बायकोने शिट्टी फेकून दिली असे मुलीने हळूच माझ्या कानात सांगितले.
काही जणांचे प्रतिसाद काय
काही जणांचे प्रतिसाद काय।असतील हे आयडी पाहुन।ओळखता येणं ही कला केवळ शाहरुखच्या चित्रपटांच्या धाग्यामुळे मला साध्य झाली
Jawan creates History.
Jawan creates History.
Sold a Record 2875961 tickets
from tracked shows alone in India on the 4th day. Biggest ever for a Bollywood>>>>>>>>>>>
यातील निम्मे रेड चीली ने खरेदी केले असतील
मित्रांनो scam 2003 बघा..
मित्रांनो scam 2003 बघा.. जवान आणि scam 1992 विसराल .. एक नंबर आहे.. बिंजे वोच केला आज...
जवान भारी पिक्चर आहे. पठाण
जवान भारी पिक्चर आहे. पठाण पेक्षा जास्त आवडला. SRK is spectacular!
यातील निम्मे रेड चीली ने
यातील निम्मे रेड चीली ने खरेदी केले असतील >> मोदींच्या अमेरिका दौर्यापासुन प्रेरणा घेतली असेल
आज रात तुम लोग का भाई जा
आज रात तुम लोग का भाई जा रहेला है पिक्चर देखने..
आज रात तुम लोग का भाई जा
आज रात तुम लोग का भाई जा रहेला है पिक्चर देखने..
मला शाहरुख खूप आवडतो पण जवान
मला शाहरुख खूप आवडतो पण जवान थेट्रात बघण्याची इच्छा होत नाहीये.
मला शाहरूख खूप आवडतो असं नाही
मला शाहरूख खूप आवडतो असं नाही. पण त्याने ज्या चांगल्या सिनेमात सुसह्य काम केलंय ते पहायला काहीच अडचण येत नाही.
चेन्नई एक्सप्रेस संपूर्ण सिनेमा आवडला. दिलवाले आणि हॅपी न्यू इयरला पैसे वाया गेले. त्यातल्या त्यात हॅपी न्यू इयर मधला शाहरूखचा प्रेझेन्स सुसह्य होता. एका विशिष्ट वयानंतरचा त्याचा प्रेझेन्स अमिताभ सारखाच प्रगल्भ आहे. पठाण अजिबात आवडला नाही. जवान आवडेल असे वाटत नाही.
थेट्रात अजिबात बघू नका !
थेट्रात अजिबात बघू नका !
पब्लिक ने मारलेल्या शिट्ट्यानी डोके दुखायला सुरुवात होईल .
जब्बरदस्त जब्बरदस्त जब्बरदस्त
जब्बरदस्त जब्बरदस्त जब्बरदस्त
शाहरूख वुई लव्ह यू...
आताच जवान बघून आलो.. थोडे माझे मन शांत होऊ द्या...
उद्या लिहितो.. नवीन धाग्यात...
नाही तर दोन्ही आयडी चा मालक
नाही तर दोन्ही आयडी चा मालक एकच असल्याची शक्यता अजून बळावेल
>>>
मला वाटते मी आणि ते एकच आहोत हे सगळ्यांना माहीत आहे. त्यात शक्यता कसली?
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 September, 2023 - 23:01
मला वाटते मी आणि ते एकच आहोत हे सगळ्यांना माहीत आहे. त्यात शक्यता कसली?
घ्या.. आयडी बदलून पण लिहिले... अजून काही पुरावा हवाय का Happy
Submitted by च्रप्स on 9 September, 2023 - 23:48
आता स्वताहून कबूल केले तर लोकं आपण दोघे वेगळे आहोत हे दाखवायला धडपडतील...
कुठून येतो इतका वेळ मायबोलीवर खर्च करायला..
आपले ठिक आहे. आपण तर admin च आहोत
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 September, 2023 - 23:56
हे समजले नाही. नेमके काय म्हणायचे आहे ?
जवान बघा
जवान बघा
सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत
जवान बघा >>> पैसे पाठवताय का
जवान बघा >>> पैसे पाठवताय का ?
दोघे एकच आहात का या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल. नाही मिळाले तरी अडत नाही.
काही पर्सनल अॅटॅक च्रप्स या आयडीकडून झालेत. त्याबद्दल विचारणा करायची होती. बाकि काही नाही.
दोघे एकच आहात का या प्रश्नाचे
दोघे एकच आहात का या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल.
>>>>
जवान बघा उत्तर मिळेल
गल्लाभरू सिनेमा बघायची फीस
गल्लाभरू सिनेमा बघायची फीस घेतो. निर्मात्याने तुला माझ्याशी संपर्क साधायला सांगितले असेल तर मानधनाचे बोलायला त्यांना सांग. शक्यतो थेट संपर्क साधला तर बरे. एजंटस नकोच.
त्या कॅन्सर ग्रस्त मुलीला मदत कर थोडीशी. सिनेमा पहायला पैसे आहेत तर असे चांगले काम केले तर बरे होईल.
जवान बघा
जवान बघा
सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत Happy
>>> रोफल
काही पर्सनल अॅटॅक च्रप्स या
काही पर्सनल अॅटॅक च्रप्स या आयडीकडून झालेत. त्याबद्दल विचारणा करायची होती. बाकि काही नाही.
>>> पर्सनल अट्याक दाखवा.. जवान चे तिकिट मिळवा...
कॅन्सर ग्रस्त मुलीच्या
कॅन्सर ग्रस्त मुलीच्या धाग्याची लिंक देऊ का? स्क्रीनशॉट टाक मदत पाठवली कि. जवान बघण्यापेक्षा चांगले काम आहे ते.
मी यासाठी विचारले कि च्रप्स हा आयडी बोस्टन मधे राहतो असे कळाले होते. खरं खोटे काही असो, आपल्याला त्याने फरक पडत नाही. पोटापाण्यासाठी पुरेसे आहे. त्यातून करमणूक, दानधर्म जमेल तसे करता येते. मर्जीचे मालक आहे. जे सिनेमे आवडतात ते स्वतः जाऊन बघतो. फ्री मधे रिव्ह्यूज लिहीतो.
कुणी दलाल मागे लागले तर फीस घेतो.
कुठेही चित्रपटाची अवास्तव
कुठेही चित्रपटाची अवास्तव जाहिरांत नाही पण किती सहजपणे पहिल्याच आठवड्यांत ५०० कोटी रु. चा टप्पा पार केला. एकाच वर्षात दोन super hit चित्रपट.
कुठेही चित्रपटाची अवास्तव
कुठेही चित्रपटाची अवास्तव जाहिरांत नाही
>>>
हे काम शाहरूख हेटर फुकटात करून देतात
या धाग्यावर वेळ
या धाग्यावर वेळ घालवण्यापेक्षा 'बंदिवान मी या ...' धाग्यामध्ये जास्त पोटेन्शियल आहे।
शाहरूख हेटर >> उजव्या
शाहरूख हेटर >> उजव्या विचारसरणीच्या आयटी सेल वाल्यांनी भाषा आहे ही. जर तुम्ही मोदींना मानत नसाल तर तुम्ही द्वेष करता. तुमच्यात नकारात्मक भावना आहे असा आरोप करण्याची ही पद्धत आहे.
त्यासाठी असंख्य पेड लोक नेमले जातात.
ज्यांना मोदी आवडत नाही त्यांनी तसे सांगितले तर तो द्वेष कसा होईल? मग लोकशाहीला अर्थ नाही.
आता हे लोण कलाकारांच्या बाबतीत आले आहे का?
एखादा कलाकार न आवडणे हा चॉईस असू शकत नाही का? आपण त्याची लग्नाची बायको असल्याप्रमाणे शाहरूख न आवडणार्या प्रत्येकाच्या अंगावर हेटर हेटर म्हणत धावून गेलेच पाहिजे का?
मी तीन वेळा विनंती करूनही च्रप्स आणि हा असे दोन्ही आयडी लोचटाप्रमाणे माझ्या कमेंट्स वर काड्या करत आहेत.
करायला हरकत नाही. पण उत्तर दिले कि शेखचिल्ली सोडून इतर गोष्टींचा आनंद घ्या असं भोकाड पसरलं जातं.
आता चालू द्या.
Pages