Submitted by द्वैत on 30 May, 2023 - 09:49
जिथे नेईल रस्ता त्या दिशेने जायचे होते
जिथे नेईल रस्ता त्या दिशेने जायचे होते
लकेरीसारखे कोठेतरी उमटायचे होते
नको देऊ नशा आता इथे रेंगाळण्यासाठी
मला घोटात एका जीवनाला प्यायचे होते
जरी ओढून नेई लाट पायाखालची वाळू
कळेना पावलांना का तिथे थांबायचे होते
धुळीची वादळे आली धुळीची वादळे गेली
मला माझ्यातले माझे असे राखायचे होते
कवडसा एक सोनेरी कधी हातांस स्पर्शावा
मलाही दीप मातीचे पुन्हा उजळायचे होते
तुझ्यामाझ्यातले काही नको सांगूस कोणाला
तुला बहरायचे होते मला वेचायचे होते
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमीप्रमाणेच अतिव सुंदर.
नेहमीप्रमाणेच अतिव सुंदर.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
धुळीची वादळे आली धुळीची वादळे
धुळीची वादळे आली धुळीची वादळे गेली
मला माझ्यातले माझे असे राखायचे होते
जबरदस्त शेर..
सुंदर रचना!!
>>>>जिथे नेईल रस्ता त्या
>>>>जिथे नेईल रस्ता त्या दिशेने जायचे होते>>>
किसी के वास्ते राहें कहाॅ बदलती हैं
तुम अपने आपको खुद ही बदल सके तो चलो
सफरमें धूप तो होगी जो चल सके तो चलो...
तुमची पहिलीच गझल वाचली...छान
सुरेख कविता.
सुरेख कविता.
प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिसादांसाठी धन्यवाद