Submitted by जिज्ञासा on 8 June, 2021 - 22:40
जसे “सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति” तसे आपले बहुतेक सामाजिक/आर्थिक/आरोग्याचे प्रश्न हे शेवटी जाऊन पर्यावरणाच्या प्रश्नाला भिडू लागले आहेत.
मायबोलीवर अशा पर्यावरण विषयावर होणाऱ्या अवांतरामुळे मूळ धागा भरकटू नये आणि ज्यांना या अवांतरात रस असेल त्यांना मोकळेपणी चर्चा करता यावी यासाठी हा धागा आहे.
असे diversion मीच नाही तर इतर कोणालाही करावेसे वाटले तर माझा धागा वापरता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इलेक्ट्रिक गाड्या खूप छान असे
इलेक्ट्रिक गाड्या खूप छान असे जनमत तयार केले जात आहे, पण सध्यातरी EV हा पर्याय पुरेसा नाही हे सांगणारी, एका small business owner ची एक कॉमेंट वाचनात आली, ती इथे देत आहे.
Can an EV tow 10,100 pounds? A maxed-out F150 Lightning can, in theory. The maxed-out F150 Lightning is also more expensive; has way, way less range when towing at capacity; and takes longer to refuel.
In independent towing tests, a fully-loaded F150 Lightning Platinum with maxed-out towing capacity, which is inferior to the 3500 by a few hundred pounds, could not even go 100 miles. It also takes 1.5 hours to charge at 440V, 14 hours to charge at 220V. At best, you would spend equal amounts of time charging as towing, which would be absurd (assuming you can always find a 440V charger).
I rest my case.
बॅटरी निर्मिती मध्ये अजून जग
बॅटरी निर्मिती मध्ये अजून जग खूप कच्च आहे.
लाँग लाईफ असलेल्या आणि स्वस्त बॅटरी निर्मित करण्याची कुवत आज पण जागतिक तंत्र ज्ञान मध्ये नाही.
इलेक्ट्रिक गाड्यांची बॅटरी विषयी जे काही फेकाफेक चालू आहे ती फक्त मार्केटिंग ट्रिक आहे
पण charging time असू किंवा लाईफ.
आणि त्या आहेत पण खूप महाग .
तीन वर्षांनी तरी badlavyach लागणार.
सर्व हिशोब केला तर पेट्रोल ,डिझेल गाड्या च बेस्ट.
नाही तर बायो फ्युल मध्ये संशोधन व्हावे.
EV साठी लागणार्या वीजेचा
EV साठी लागणार्या वीजेचा स्त्रोत काय आहे हे महत्वाचे आहे. विज कोळशापासून किंवा नैसर्गिक वायू वापरुन तयार होत असेल तर EV वापरल्याने काहीच फरक पडणार नाही. फरक एव्हढाच असेल- जिथे EV गाडी धावत आहे त्या ठिकाणी प्रदूषण होणार नाही.
EV तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लिथियम Li, कोबाल्ट Co, निकेल Ni, कॉपर/ तांबे Cu... लागणार आहे. हे मिनरल्स खाणीतून बाहेर काढतांना, पुढे त्यावर अनेक प्रक्रिया करुन त्यांना वेगळे करतांना होणार्या प्रदूषणाचे काय ? EV गाडी मार्केट मधे येण्या अगोदरच त्या गाडीच्या निर्मीती प्रक्रिये मधेच, पेट्रोल वाहनाच्या तुलनेत, अनेक पटींनी कार्बन फूटप्रिंट तयार झाले आहे.
हायड्रोजन टेक्नॉलॉजी बद्दल मी आशावादी आहे. पाण्याचा प्रश्न सुटेल.
ब्राझीलमध्ये बोल्सनारो पराभूत
ब्राझीलमध्ये बोल्सनारो पराभूत झाले.
https://indianexpress.com/photos/world-news/brazils-presidential-electio...
टोकाची उजवी विचार श्रेणी
टोकाची उजवी विचार श्रेणी सामान्य लोकांचे आयुष्य नरक करेल .
तसेच टोकाची डावी विचार श्रेणी पण सामान्य लोकांचे आयुष्य नरक करेल.
टोकाची उजवी,डावी भूमिका असणारे सर्व राजकीय पक्ष जनतेने पराभूत च केले पाहिजेत.
आणि अशा टोकाची भूमिका असणाऱ्या लोकांवर बहिष्कार पण टाकला पाहिजे.
ही लोक लोकांसाठी धोकादायक आहेत.
खूप छान झाले ब्राझील मध्ये कडव्या उजव्या विचाराच्या नेत्याचा पराभव झाला.
पुण्यातले नागरिक सध्या दोन
पुण्यातले नागरिक सध्या दोन गोष्टींकरता एकत्र येऊन चळवळ करत आहेत.
वेताळ टेकडी फोडून रस्ता तयार करण्या विरोधात आणि नदी सुधार कार्यक्रमा अंतर्गत केलेल्या वृक्षतोडी विरोधात.
https://www.punekarnews.in/chalo-chipko-protest-planned-in-pune-against-...
नदी सुधार कार्यक्रमासंदर्भात वाचनात आलेली एक रोचक पोस्ट
आमची आई... वर्षानुवर्षे आम्हाला जीवापाड संभाळून लहानाचं मोठं केलं. आमची सर्व पापं पदरात घेतली, आमची दुखणी स्वतःवर घेतली पण आमचं पोषण करत राहिली. आम्ही मात्र तिला गृहीत धरून अत्यन्त असंवेदनशील होत गेलो. आज ती जर्जर अवस्थेत आहे. पार खंगुन गेली आहे, नाना प्रकारच्या रोगांनी शरीराची पार चाळण झाली आहे.
आता तिला श्वास घेणं ही अवघड झालंय, जीव घुसमटतो तिचा. तिची फुफ्फुसे दिवसेंदिवस थकत चालली आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की अजून ही वेळ गेलेली नाही, योग्य उपचार केले तर ती अगदी ठणठणीत बरी होऊ शकते.
म्हणून आम्ही तिच्या सर्व अपत्यांनी बराच विचारविनिमय करून निर्णय घेतला.
आम्ही तिला ब्युटी पार्लर ला नेणार आहोत. फेशियल, मॅनिक्युअर आणि हेअर स्टाइल करू. मग तुळशीबागेत शॉपिंगला – छान नाकातलं, कानातलं, बांगड्या वगैरे घेऊ, म्हणजे तिची प्रकृती नक्की सुधारेल.
आहे की नाही झकास आयडिया?
(या गोष्टीचा आणि पुणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित 5500 कोटी रुपये किमतीच्या नदी’सुधार’ प्रकल्पाचा काहीही संबंध नाही. काही साम्य आढळल्यास योगायोग समजावा)
'नदी सुधार प्रकल्प' नक्की काय
'नदी सुधार प्रकल्प' नक्की काय आहे ह्या बद्दल अधिकृत माहिती कुठे मिळू शकेल. मला जाणून घेण्यात रस आहे.
नदीचे पाणलोट क्षेत्र मोकळे
नदीचे पाणलोट क्षेत्र मोकळे करणे. म्हणजे नदीच्या पात्रात किंवा नदी ल येवून मिळणाऱ्या ओढ्या च्या पात्रात उभी राहिलेली बांधकाम जमीनदोस्त करणे.
सांडपाणी,कचरा, रासायनिक कचरा जो नदीत सरळ सोडला जातो त्या वर नियंत्रण आणने.
नदिकडच्या पान वनस्पती,बाकी वृक्ष वल्ली ह्यांचे रक्षण करणे.
हेच असणार नदी सुधार प्रकल्प म्हणजे .
पण हे यशस्वी होत नाही.
गंगा नदी ची गटार गंगा झाली आहे किती तरी करोड खर्च झाले पण स्थिती आहे तशीच आहे.
कारण राजकीय लोक, बडी थेंड ह्याचीच अनधिकृत बांधकाम असतात.
राजाचं च आरोपी असेल तर शिक्षा कोण देणार
"न्यायासन पेशव्यांना ओळखत नाही"
असे ठणकावून सांगणारे रामशास्त्री पण आता नाहीत.
जनता तर वेगळ्याच दुनियेत असते त्यांस वाटते ह्याच्या शी आमचा काय संबंध
ह र्पेन मी धागा काढलाय
ह र्पेन मी धागा काढलाय शनिवारी चिपको आंदोलन आहे संभाजी बाग, जंन्गली महाराज रोड कला संध्याकाळी ५ वाजता.
https://www.maayboli.com/node/83363
मी एक व्हॉटसअॅप गृपची लिंक पाठवते तिथे सगळे डिटेल्स मिळतील. किंवा फोनवर पण बोलू शकतो.
(No subject)
हा प्रकार माझ्यातरी ऐकिवात अजून आला नव्हता. याचा डोस किती वापरला पाहिजे आणि किती वापरला जाईल हे देवालाच ठाऊक. या तणनाशकाचा रेसिड्युअल माशामार्फत खाणार्यापर्यंत पोहचू शकतो , असे मला वाटते.
जानेवारी महिन्यात हजारो मासे मेले होते नदीपात्रात. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पण बातमी आली होती.
https://www.google.com/search?q=panchaganga+fish+death&rlz=1C1GIGM_enIN8...
अजून पण पाणी फुकट मिळत आहे(
अजून पण पाणी फुकट मिळत आहे( १००ते १५० रुपये चार्ज महिन्याला म्हणजे फुकट च)
ऑक्सिजन फुकट मिळत आहे.
पिकांना पाणी फुकट मिळत आहे.
त्या मुळे माणूस सहज जीवन जगात आहे.
पर्यावरण किती महत्वाचे अशे ह्याची जाणीव निसर्गाने अजून तरी करून दिली नाही.
जेव्हा पावूस च बंद होईल.
ऑक्सिजन हवेतून घेणे धोकादायक होईल तेव्हा त्याचे डोळे उघडतील.
२४ तास साठी एका व्यक्तीला २००० रुपयाचा ऑक्सिजन लागतो.
तो सध्या फुकट आहे.
१ltr पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते.
एका व्यक्ती दहा ते १५, लिटर पाणी लागेल.
म्हणजे रोज चे २५० रुपये प्रति व्यक्ती.
लवकर च ही वेळ येणार आहे
निपा, जलपर्णीवर उपाय म्हणून
निपा, जलपर्णीवर उपाय म्हणून हे ग्लायफोसेट वापरणे पहिल्यांदाच ऐकले.
रोगापेक्षा उपाय भयंकर अशातला प्रकार होउ नये म्हणजे मिळवली.
जलपर्णी इतकी असेल तर मासे
जलपर्णी इतकी असेल तर मासे मुळात ( सॉरी ... पंचगंगेच्या त्या भागात तरी) नसतील ना? अर्थात रेसिड्यू पाण्यात एकदा गेला की तो जमिनीत आणि प्रवाहाच्या खालच्या बाजुला परिणाम करेलच. होप अभ्यास करुन करत असतील.
ग्लायफोसेटचे रेसिड्यु राहात
ग्लायफोसेटचे रेसिड्यु राहात नाहीत असे संशोधन आहे व सगुना
राइस टेज्ञिक वापरणार्या लोकांचे त्या संशोधनावर आधारीत मत आहे. इतक्या वर्षात त्यांच्या शेतात न दिसणारे गांडुळ एस आर टी मुळे दिसायला लागले. एस आर टी मध्ये ग्लायफोसेट मारावे लागते, ते मारुनही गांडुळ मेले नाहित असे विडेओ आहेत.
अर्थात मी नैसर्गिक शेती करत असल्यामुळे ग्लस्य्फोसेट न वापरता एस आर टी कसे जमवावे ह्या धडपडीत मी आहे.
सर्व वातावरणात इतके प्रचंड प्रदुषण आहे की मी आता तो विचार सोडुन दिलाय. मी नैसर्गिक शेती करतेय पण पाणी नदीचे वापरतेय, पावसाळ्यात शिवार जलमय होते तेव्हा शेजार्याची रसायने माझ्या शेतात पसरतात.. व व बरेच काही आहे. यात कसली डोम्बलाची नैसर्गिक शेतीहोणार,? तरी आपल्या बाजुने प्रयत्न करायचे. आलेल्या पिकात रेसिड्यु किती हे लॅबमध्ये चेक करता येते.
माशांच्या अंगात न दिसणार्या कणांच्या रुपात प्लॅस्टिक
आहे असे परवाच कोकण बचाव चळवळीच्या कार्यकर्त्याकडुन ऐकले. त्यामुळे काय काय बघायचे, किती संभाळायचे हा प्रश्न आहे.
तसे अगदीच अवांतर नाही (काय
पर्यावरण पत्रकारांकरता संधी
तसे अगदीच अवांतर नाही (काय सांगावे योग्य व्यक्ती पर्यंत पोचेलही)
भारतात अक्षय - नूतनीकरणक्षम ऊर्जेबद्दल (ररन्युएबल एनर्जी ) जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती व प्रसारण करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.
https://earthjournalism.net/opportunities/content-production-and-distrib...
रोगापेक्षा उपाय भयंकर अशातला
रोगापेक्षा उपाय भयंकर अशातला प्रकार होउ नये म्हणजे मिळवली.>>
अगदी तसेच वाटत आहे.
जलपर्णी इतकी असेल तर मासे मुळात ( सॉरी Wink ... पंचगंगेच्या त्या भागात तरी) नसतील ना? >>
जलपर्णी आणि मासे नसण्याचा काही संबंध नाही लक्षात आला.
होप अभ्यास करुन करत असतील.>>
सर्वसामान्य लोकांच्या या होप मुळेच पर्यावरणाची वाट लागत आहे.
ग्लायफोसेटचे रेसिड्यु राहात नाहीत असे संशोधन आहे>>
प्लिज डिटेल्स द्याल काय?
जनरली तणनाशक मारताना ते जमिनीवर पडू देऊ नये , फक्त तणांवर मारावे अश्या सूचना असतात. इथे सरळ सरळ नदीवर असलेल्या जलपर्णी वर फवारले जातेय, नंतर सगळं बाहेर काढताना ते पाण्यात धुवून येणार आहे.
जलपर्णी वाढते त्या भागातील
जलपर्णी वाढते त्या भागातील पाण्याची ऑक्सिजन पातळी आणि इतर न्युट्रियंट पातळी खालावल्याने जलचर आणि इतर पाण वनस्पती जगत नाहीत. https://stopaquatichitchhikers.org/hitchhikers/plants-water-hyacinth/#:~....
इथिओपिया वर ची documentry
इथिओपिया वर ची documentry बघितली पावूस नाही त्या मुळे पाणी नाही.
माणसं वणवण भटकत आहेत पाण्यासाठी .
पिण्यासाठी पाणी नाही तर शेती साठी सोडून च ध्या.
आणि आपल्याला निसर्गाचे इतके पाण्याचे दान दिले आहे.
तर इतकी मस्ती आपल्या लोकांना आली आहे जी बिन्धास्त नद्या प्रदूषित करत आहेत.
पाणी जगण्यासाठी किती महत्वाचे आहे ह्यांची जाणीव आपल्या लोकणा नाही.
अशी च मस्ती राहिली तर एक दिवस आपली मस्ती निसर्ग नक्की जिरवणार आहे.
पिण्याचे पाण्याचे सोर्स प्रदूषित करणे ही कृती अतिशय गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत केली पाहिजे
https://www.ncbi.nlm.nih.gov
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6918143/#:~:text=Glyphosate....
ह्या लेखात फायदे तोटे दोन्ही आहेत. ज्यांना फायदे बघायचे ते तोट्यांकडे दुर्लक्ष करतात..
एस आर्टी तन्त्र पुरस्कर्ते ग्लायफोसेट कसे व किती वापरा हे निट समजाऊन सांगतात. सांगितले तसे वापरले नाही तर अपेक्षित फळ मिळणार नाही हेही सांगतात.
शेतात पिकाचे झालेले नुकसान शेतकर्याला कळते. पर्यावरणाचे नुकसान त्याला कळत नाही.
बिना नांगरटीची शेतीचा प्रचार व स्वतःच्या शेतीत त्याचा प्रयोग करणार्या कोल्हापुरच्या एका शेतकर्याच्या मी संपर्कात आहे. तो उसाची शेती करतो आणि नवी लागवड करताना जुना खोडवा काढुन न टाकता तणनाशकाने जमिनितच मारतो. जुना खोडवा जमिनीतच ठेवल्याने जमिनीतिल सेन्द्रिय कार्बन वाढतो पण त्यासाठी जे तणनाशक वापरावे लागते त्याचे काय? हा शेतकरी गेली दहा वर्षे विना नांगरट शेती करतोय, उसाच्या खोडव्यावर आधी तणनाशक जसे काम करायचे तसे आता करत नाही हे त्याच्या लक्षात आलेय. म्हण्स्जे उसाने स्वतःला तेवढे मजबुत केले. :). आता तो काहितरी नवे शोधण्याच्या मागे आहे.
( सेंद्रिय कार्बन कमी असेल्/नसेल तर कितीही खते घातली तरी परिणाम शुन्य. हा २ % इतका तरी हवा, महाराष्ट्रात तो ०.२ % इतका खालावलेला आहे. ह्यावर उपाय करण्यापेक्षा खते देण्याचा उपाय सोपा आहे. पण यामुळे दर्वर्षी खताची मात्रा वाढवावी लागते. ही वाढीव खते जमिनीत मुरुन, पिकांच्या अंगात मुरुन, पाण्यात मिसळुन पर्यावरण व त्यावर अवलम्बुन असणारे सजीव या सगळ्यांचा सत्यानाश करत आहे. सेंद्रिय कार्बन वाढवायचे उपाय कोणीही शेतकर्यांना सांगत नाहीत, याचा शेतीत एकुण रोल काय हेही शेतकर्यांना माहित नाही. अडाणीपणे शेती सुरु आहे. आपले अन्न हे अडाणी
पिकवत आहेत, त्यांना शहाणे करायचे कोणीही मनावर घेत नाहीत कारण खतांचे कारखाने बंद व्हायचा धोका यात आहे.)
जलपर्णी आणि मासे नसण्याचा
जलपर्णी आणि मासे नसण्याचा काही संबंध नाही लक्षात आला.>>>
तुम्ही पाण्यात वाढलेली जलपर्णी पाहिली नाही काय? ही कमी वेळात फोफवते, पुर्ण तलाव भरुन टाकते. त्यामुळे सुर्यप्रकाश खाली पोचत नाही. माशांचे पाण्यातले अन्न बनत नाही, खायला काहीही न मिळाल्याने ते उपाशी राहतात.
पृष्ठभागावर दाट वाढ पसरल्यामुळे पाण्यात प्राणवायु मिसळत नाही. मासे श्वासही घेऊ शकत नाहीत. शेवटी मरतात बिचारे.
आपल्या आजुबाजुला डोळसपणे पाहिले तर सगळे प्राणीमात्र माणसाला कसे घाबरुन राहतात ते कळते. त्यांची दया येते आणि माणसांबद्दल तिरस्कार वाटतो.
ग्लाय्फोसेटचे पाण्यावर व माशांवरील दुष्परिणाम यावर हा लेख आहे. सहा ते आठ महिन्यात ग्लायफोसेट नष्ट होते असे म्हटलेय.
http://npic.orst.edu/factsheets/glyphogen.html#env
‘जगभरात आजवर जितकं प्लॅस्टीक
‘जगभरात आजवर जितकं प्लॅस्टीक निर्माण केलं गेलं आहे, ते सर्वच्या सर्व आजही पर्यावरणात कुठे ना कुठेतरी अस्तीत्वात आहे. आणि त्यातले कित्येक लक्ष टन प्लॅस्टीक हे समुद्राच्या पोटात आहे’
आदिती देवधर यांनी लिहिलेली एक गोष्ट 'माझ्या आजोबांचा डबा'
https://aditideodhar.com/stories/?fbclid=IwAR0-EQ0LMVcGbn46yv_-2g3b0_bLd...
downtoearth नावाच्या
downtoearth नावाच्या नियतकालिकाला ह्या महिन्यात ३० वर्षे पुर्ण होउन ३१ वे लागेल.
https://www.downtoearth.org.in/blog/environment/human-empathy-is-our-pol...
मुंबई,महाराष्ट्र मध्ये ह्या
मुंबई,महाराष्ट्र मध्ये ह्या वर्षी भयंकर तापमान होते.
हे पर्यावरण बदलाची चिन्ह आहेत.
उष्माघात नी अनेक लोक आजारी होती
अजून एक दोन डिग्री तापमान वाढले तर रोज चे जगणे पण अवघड होईल.
गवत्या मासा (Grass Carp)
गवत्या मासा (Grass Carp) जलपर्णी निर्मूलनात मदत करू शकतो. जिथे तिथे केमिकल इराडीकेशन पद्धत वापरण्या पूर्वी शक्य होईल तिकडे बायलॉजिकल इराडीकेशनचा पर्याय शोधला गेला तर अनेक प्रश्न आपसुक निकालात निघतात.
केमिकल पद्धतच वापरायची तर डायरेक्ट एल्गी/हर्बीसाइड न वापरता क्षारता वाढवली असता जलपर्णी / वॉटर हायसेंथ टिकाव धरु शकत नाही. ह्या बदललेल्या ईकोसिस्टिममध्ये तिलापीआ सारखे मासे (शक्यतो मोनोसेक्स कल्चर) व्यवस्थित वाढू शकतात. ज्याने वॉटर बॉडी शुद्ध राखण्यास मदत होऊ शकते.
Down to earth चालवणार्यांचे,
Down to earth चालवणार्यांचे, पत्रकारांचे आणि मुख्य म्हणजे वाचकांचे अभिनंदन. फार मोलाचे काम करत आहे हे नियतकालिक.
मागचे काही आठवडे, जून
मागचे काही आठवडे, जून महिन्याच्या सुरवाती पासून, कॅनडा मधे सर्व प्रांतात wild fire ने धुमाकूळ घातला आहे.
किती ठिकाणी आगी लागल्या आहेत हे फक्त आकडे बघत रहायचे ....६०००, ७००, ९००. काही नियंत्रणांत असतात, काही नियंत्रणाबाहेर आहेत.
या काळांत Air Quality Index AQI बघणे नित्याचे झाले आहे. काही वेळा २४- ४८ तास अगदी घरांत कोंडून घ्यावे लागते, खिडक्या दारे बंद, बाहेर पडता येते पण जास्त वेळ बाहेर राहिल्यास त्रास होतो. हवा कुठल्या दिशेने वहात आहे हे पण महत्वाचे आहे.
कॅनडाच्या जंगलातील आगीचा धूर अगदी अमेरिका, युरोप पर्यंत गेला आहे. इतर देशांतून (अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिय, द अफि अफ्रिका, स्पेन, पोर्तुगाल, चिली, कोस्टा रिका, न्यूझीलँड) अग्निशामक दलाचे जवान मदतीला आहेत.
पृथ्वीवरचा सर्वात उष्ण महिना म्हणून जून २०२३.... मग जुलै २०२३ ने पण नंबर लावला आहे. climate change आणि त्यामुळे होणारे परिणाम अगदी दाराशी आले आहे.
बापरे
बापरे
पृथ्वीवरचा सर्वात उष्ण महिना
पृथ्वीवरचा सर्वात उष्ण महिना म्हणून जून २०२३.... मग जुलै २०२३ ने पण नंबर लावला आहे. climate change आणि त्यामुळे होणारे परिणाम अगदी दाराशी आले आहे.
ह्या उदय यांनी लिहिलेल्या पोस्ट च्या शेवटच्या वाक्याला धरून पुढे लिहितोय.
पनामामधील ऐतिहासिक दुष्काळ, समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान याचा फटका पनामा कालव्यातून होणाऱ्या वाहतुकीला बसला आहे. पनामा येथे यंदा तीव्र दुष्काळ पडल्यामुळे कालव्याचा जलस्तर घसरला आहे. त्यामुळे मालवाहतूक खोळंबली आहे. पनामा कालव्याच्या दोन्ही बाजूंना २०० पेक्षा जास्त जहाजे अडकून पडली आहेत. जागतिक मालवाहतूक व्यापाराचा ८० टक्के वाटा उचलणाऱ्या या कालव्यातील ही आतापर्यंतची सर्वात वाईट वाहतूक कोंडी आहे.
मालवाहतुकीला होणाऱ्या विलंबाचे परिणाम संपूर्ण जगावर पडणार आहेत. तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या वाहतुकीसाठी पनामा कालवा हा एक प्रमुख मार्ग आहे. त्यांची वाहतूक थांबल्यास किंवा त्याला उशीर झाल्यास इंधनाचे जागतिक दर वाढू शकतात. त्याचा सर्वाधिक फटका अविकसित आणि विकसनशील देशांना बसू शकतो. त्याबरोबरच मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांनाही आर्थिक भुर्दंड बसू शकतो. मालवाहतुकीला एका दिवसाचा उशीर झाल्यास, प्रत्येक जहाजाचा खर्च जवळपास दोन लाख डॉलरने वाढत आहे. यामुळे अमेरिका आणि चीनच्या जहाजांच्या मालवाहतुकीचा खर्च जवळपास ३६ टक्क्यांनी वाढला आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. खुद्द वाहतुकीत अडकलेल्या जहाजांसमोर उद्भवलेल्या समस्या वेगळ्या आहेत. जहाजांना होणारा अन्न आणि पाण्याचा पुरवठा कमी होत आहे. हा पुरवठा पूर्णपणे आटला तर त्यामुळे त्यावरील कर्मचाऱ्यांसाठी गंभीर परिस्थिती होऊ शकते.
दुष्काळाचा जागतिक मालवाहतुकीवर काय परिणाम होईल?
सर्व जहाजे दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाहीत. त्यांच्यासमोर लांबचा मार्ग निवडण्याचा पर्याय आहे. मात्र त्यामुळे इंधनाचा खर्च आणि कार्बन वायू उत्सर्जन दोन्ही वाढतील. त्याशिवाय मालाचे वितरण उशिरा होईल. परिणामी जगभरात गृहोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील. याचा फटका जागतिक व्यवसाय आणि ग्राहक या दोघांनाही बसेल.
मूळ बातमी
https://www.loksatta.com/explained/traffic-snarls-near-the-panama-canal-...
कॅनडातली परिस्थिती आजही भयानक
कॅनडातली परिस्थिती आजही भयानक आहे, असा एकही प्रांत नाही ज्याला आग , धुराचा त्रास झालेला नाही. हजारोंनी लोकांना हलवावे लागत आहे.
AQI : आमच्याकडे १ (चांगला) ते १० (वाईट) या स्केलवर ९ AQI आहे. पुढचे दोन दिवसही धुरकटच आहेत. डोळे चुळचुळणे, लाल होणे, घशांत खव खव.... असे परिणाम मला स्वत: ला जाणवले. दुरगामी वाईट परिणाम आहेतच.
नेहेमीच्या वार्षिक सरासरीच्या १३ ते १५ पट जास्त कार्बन उत्सर्जन झालेले आहे, २०२३ फायर सिझन अजून संपलेला नाही.
१५१, ६१४ चौरस कि मी चे क्षेत्र नष्ट झाले आहे.
https://ciffc.net/statistics
AQI : आमच्याकडे १ (चांगला) ते
AQI : आमच्याकडे १ (चांगला) ते १० (वाईट) या स्केलवर ९ AQI आहे. पुढचे दोन दिवसही धुरकटच आहेत. डोळे चुळचुळणे, लाल होणे, घशांत खव खव.... असे परिणाम मला स्वत: ला जाणवले. >>
अरे बापरे ९ AQI!
काळजी घ्या उदय.
काय काय उपाय करावे लागत आहेत त्याबद्दलही लिहाल का?
Pages