Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण एक डार्क अंधारलेला लूक आहे
पण एक डार्क अंधारलेला लूक आहे जो मला अजिबात नाही आवडत.>>. +१,
मला स्त्री चित्रपट कथा, अभिनय खूप आवडला होता पण जो काय अंधार पाचवीला पुजलेला ..वैताग आला डोळे ताणुन!
कलाकार सगळे घोगऱ्या आवाजाचे दाखवलेत हा अजून एक डोक्याला शॉट.>>> म्हणजे?
होय, मलापण अंधारा लुक आवडला
होय, मलापण अंधारा लुक आवडला नाही. रामायण: लिजेंड ऑफ प्रिन्स राम हे मला सर्वात आवडणारे रामायणाचे स्क्रीनवर रूपांतर आहे. ते एकदम रंगीबिरंगी आणि व्हायब्रंट आहे. पंचवटी मधले मनोहर दृश्य दाखवायला धुके आणि सिजिआय पण नाही आवडला.
प्रभास १० वर्षांपूर्वी ह्या भूमिकेस शोभला असता असे सुद्धा वाटले.
मला सर्वात हनुमान हा देवदत्त
मला सर्वात हनुमान (मारुती) हा देवदत्त नागेच वाटत होता, मारुती वाटण्याऐवजी ते खटकलं. दारासिंगने भुमिका केली तेव्हा तो दारासिंग आहे हे माहीती असूनही मारुती म्हणून आवडला तसं इथे होईल असं वाटत नाहीये. सीताच आवडली जास्त असं म्हणायला हरकत नाही. मारुती देवदत्त असायला हरकत नाही, योग्य आहे पण मेकअप कमी पडला की काय असं वाटलं. एनिवे सांगता येत नाहीये मला नीट.
बाकी हा प्रभास, हा सैफ असं लगेच जाणवलं पण फार खटकलं नाही.
तुम्ही लोकांनी कोणतं ट्रेलर
तुम्ही लोकांनी कोणतं ट्रेलर पाहिलत ??? मी जे बघितल त्यात अर्ध्या पेक्शा जास्त वेळ सगळी माणसं अॅनिमेशन सारखी दिसत होती . व्हीएफेक्स जास्तच दिसत होता . . एक क्रिती आवडली पण तिच्यासोबत कोणीतरी ऊन्च उमदा पुरुष हवा होता . प्रभास नाही आवडला . सैफ व्हीलन च्या रोल्समध्ये नेहमीच आवडतो .
कलाकार सगळे घोगऱ्या आवाजाचे
कलाकार सगळे घोगऱ्या आवाजाचे दाखवलेत हा अजून एक डोक्याला शॉट.>>> म्हणजे?
>>>
म्हणजे तो वाणीतला गोडवा मिसिंग आहे. ट्रेलर बघताना ॲंग्री यंग मॅन का बदला असे ॲक्शन मूवी फिलींग येत होते. रामाची जी शालीन सुसंस्कृत प्रतिमा आहे तिला साजेसा फिल आला नाही. महाभारताला हे चालले असते. रामाची डोक्यातली ईमेज वेगळी आहे.
सहमत !
सहमत !
क्रिती सध्याची सर्वात सुंदर
नवीन ट्रेलर मधेही 'प्लॅनेट ऑफ एप्स' अबाधित ठेवले आहे.
क्रिती सध्याची सर्वात सुंदर नटी वाटते. उंची, बांधा, रूप, अभिनय सगळं पर्फेक्ट आहे. प्रभास राम म्हणून आवडला नाही. लक्ष्मण तो 'बम डिगी बम बम' गाण्यातला आहे. सैफ क्रितीपेक्षा बुटका व अचपळ आहे, सीताहरण होताना बघणं गंमत होईल. CGI मुळें believable वाटेल कदाचित पण एकंदरीत कठीण वाटतंय. करेल कसतरी ,आपल्याला काय....
मनोज वाजपेयीचा "सिर्फ एक बंदा
मनोज वाजपेयीचा "सिर्फ एक बंदा काफी है" चा ट्रेलर पाहिला. मनोज वाजपेयी आवडतोच.
झी ५ घ्यावं लागेल.
सैफ क्रितीपेक्षा बुटका व अचपळ
सैफ क्रितीपेक्षा बुटका व अचपळ आहे, सीताहरण होताना बघणं गंमत होईल. CGI मुळें believable वाटेल कदाचित पण एकंदरीत कठीण वाटतंय. करेल कसतरी ,आपल्याला काय....>>>
करेल कसतरी ,आपल्याला काय>>>
करेल कसतरी ,आपल्याला काय>>> अस्मिता
अचपळ. :हहगलओ:
अचपळ.
करेल कसतरी ,आपल्याला काय....
करेल कसतरी ,आपल्याला काय.... >>
अचपळ = गेदल्या , जडभदक,
अचपळ. Rofl Rofl
अचपळ = गेदल्या , जडभदक, मच्चड
पण तुम्ही अचपळ शब्दाचा अर्थ
पण तुम्ही अचपळ शब्दाचा अर्थ बदलला का?
मला प्रभास आणि क्रिती दोघही
मला प्रभास आणि क्रिती दोघही नाही आवडले , व्ही एफ एक्स चांगले आहेत.
सैफ करेल बहुदा चांगल काम, पण रावण म्हणून साउथ मधला राणा दगुबट्टी किंवा हिन्दीत रणवीर सिंग चांगला वाटला असता कादाचित पण मग तोच हिरो झाला असता
राम म्हणून कोणी डोळ्यासमोरच येत नाहीये , मला अक्षय खन्नाचा भाऊ राहुल खन्ना फार आवडतो , एकदम पौराणिक राजबिंडा चेहरा आहे, कुणाल कपुर सुद्धा !
सीता म्हणून त्रिशा/आदिती राव हैदरी/ साउथची एखादी पारंपारीक चेहर्याची हिरॉइन चालली असती .
क्रिती सॅनन कि मेनन एखाद्या
क्रिती सॅनन कि मेनन एखाद्या कॉर्पोरेट ऑफीस मधली सेक्रेटरी वाटते.
मराठीत पूर्वी मृणाल देवला ऐतिहासिक भूमिकांसाठी पर्याय नव्हता त्याचप्रमाणे पौराणिक / राजेशाही भूमिकांसाठी सध्या अनुष्का शेट्टीला पर्याय नाही.
क्रिती सॅनन ऑर्डिनरी वाटते
क्रिती सॅनन ऑर्डिनरी वाटते मला. सामान्य. नॉट मच ग्लॅमरस.
अचपळ= लवचिकता नसलेला.
अचपळ= लवचिकता नसलेला.
डीजे, राणा डुग्गुबत्ती अगदी हेच वाटलेलं. पण पुन्हा बाहुबली झाला असता.
आचार्य, क्रितीला काही म्हणायचं नाही. प्रभासला काही म्हणा.
छान आहे ट्रेलर. मला प्रभास
छान आहे ट्रेलर. मला प्रभास आवडतो, त्याच्याकडे राम म्हणुन बघायला थोडा वेळ लागेल. क्रिती मात्र नाही आवडली सीता म्हणुन. ती अती म्हणजे अतिचशय पॉलिश्ड दिसते, गाव की गोरी असो, शहरातली अत्याधुनिक मुलगी असो किंवा सीता असो. एकदम चकाचक.
आजकाल अंधारा लूकची फॅशन आहे, मी आपला brightness वाढवत बसते तेव्हा कळतं हे सगळं अंधारातच आहे.
मला आवडते क्रिती सॅनन, सिता
मला आवडते क्रिती सॅनन बरेली की बर्फी,मीमी दोन्हीत आवडली होती.तीला पाहुन सोनाली बेन्द्रेची आठवण येते, लुक मधे साम्य नाही पण सोनाली पण सेम सोफिकीस्टेड, पॉलिश्ड, इन्लिश मेम वाटायची.
सिता म्हणुन कुन्दवै सुचवणार होते पण तीच काय सान्गता येत नाही नविन रामायणच घडायच..
अंधारात युद्ध दाखवली आहेत.
अंधारात युद्ध दाखवली आहेत. रामायण काळात सूर्यास्त झाल्यावर युद्ध थांबत असे म्हणतात.
'अचपळ मन माझे नावरे आवरीता'
'अचपळ मन माझे नावरे आवरीता' यात अचपळ म्हणजे अतिशय चपळ असा अर्थ आहे ना? आमच्या घरी एक पुस्तक होतं, रामदासांच्या लेखनातल्या शब्दांचे अर्थ असलेलं. त्यात हा अर्थ होता.
हो वावे, भरत यांनी योग्य अर्थ
हो वावे, भरत यांनी योग्य अर्थ सांगितला. त्या ओळी माहिती आहेत.
अचपळ म्हणजे खोडकर.
ठीक आहे. बदलूयात सीता.
ठीक आहे. बदलूयात सीता.
आलिया भट, श्रद्धा कपूर, अनन्या पांडे, दिशा पटणी , अमृता राव यांच्यापैकी एकीला घेऊन पुन्हा शूटींग करू.
प्रभासच्या ऐवजी कुणाला घ्यावे ?
पटकन कळवावे नाहीतर कार्तिक आर्यनला घेतो.
चपळ-चंचल च्या विरूद्ध
चपळ-चंचल च्या विरूद्ध सुस्तच्छस्थर
प्रभासच्या ऐवजी कुणाला घ्यावे
प्रभासच्या ऐवजी कुणाला घ्यावे ?
अल्लू अर्जुन
शाकुंतलम् चा ट्रेलर बघितला.
शाकुंतलम् चा ट्रेलर बघितला. अजिबात आवडला नाही. स्पेशल इफेक्ट्स सो सो आहेत. शकुंतलेच्या डोक्यावर बाजूला तिरका चुडा नाही. अभिनय फारसा खास वाटत नाही.
सगळ्यात डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे अनुपमा चोप्रा, जॅमी पँटस वगैरे सगळे उ भारतीय समीक्षक चित्रपटाचं नाव 'शकुंतलम्' असं उच्चारत आहेत. अरे बाबांनो, तुम्हाला कलिदासाचं महाकाव्य माहीत नाही, हे ठीक आहे, तेलगू लिपी वाचता येत नाही हे पण ठीक आहे, पण चित्रपटाचं नाव इंग्रजीत Shaakuntalam असं लिहिलं आहे, त्यात aa हे numerology साठी वापरलेत असं वाटलं की काय?
प्रभासच्या ऐवजी कुणाला घ्यावे
प्रभासच्या ऐवजी कुणाला घ्यावे ?
>>> आदित्य रॉय कपूर
कार्तिक आर्यन छान वाटेल राम
कार्तिक आर्यन छान वाटेल राम म्हणून
अक्षय कुमारही कृष्ण म्हणून शोभलेला ओएमजी मध्ये.
क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यनची जोडीही छान वाटते.
कियाराशीही छान वाटते. ती सुद्धा सीता म्हणून शोभू शकते. तसेही सीतेला अभिनयाबाबत जास्त स्कोप नाहीये रामायणात. एकच एक्सप्रेशनमध्ये वावरणे आणि तरीही छान दिसणे तिला जमते.
सीतेला अभिनय येत नव्हता हे
सीतेला अभिनय येत नव्हता हे टीव्हीवर पाहिलेय. श्रीराम, लक्ष्मण यांना सुद्धा येत नव्हता. रावण आणि त्या खालोखाल हनुमान यांनी चांगला अभिनय केला होता.
Pages