कांतारा: एका आदिम संघर्षाची कहाणी चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 6 November, 2022 - 08:43

होंबाळे फिल्म्स चा कांतारा चित्रपट आज चित्रपटगृहात जाउन बघितला. ही कलाकृती मोठ्या पडद्यावर व उत्तम थिएटर साउंड मध्ये बघण्यासाठीच बनवली आहे. चित्रपटाची भरपूरच प्रसिद्धी व माहिती जालावर आहे. तथापि हा अनुभव व्यक्तिसापेक्ष आहे. लेखक दिग्दर्शक ऋषभ शेट्टी ह्यांनी अगदी अस्सल दक्षिणी मातीतली एक कहाणी संपूर्ण पणे आपल्या समोर सादर केलेली आहे. एक नितांत सुंदर अनुभव. चित्रपट बघून गोड गुलाबी प्रेमळ वलय वगैरे निर्माण होत नाही पण एक प्रकारचे आंतरिक समाधान नक्की मिळते.

तुळू नाडू म्हणजे दक्षिण कन्नडा, उडिपी हे कर्नाटका तील भाग व कासारगौड हा केरळातील भाग तुळु नाडू म्हणून ओळखला जातो. शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, व रुपसुं दरी ऐश्वर्या ह्यांची 'नेटिव्ह प्लेस.' येथील एका जंगलाच्या संरक्षणाची, त्यात राहणा र्‍या मूल निवासी लोकांची त्या जमिनीवर हक्क सांगणार्‍या दमन कर्मी व्यवस्थेची ही कथा आहे. मूलनिवासी लोकां चे जीवनच त्या जंगलावर अवलंबून आहे. ते फक्त तिथे राहतात व गरजे पुरतेच घेतात. परंतु नवीन आलेल्या व्यवस्थेनुसार ह्या जंगलाला राखीव घोषि त करायचे म्हणून आलेला अधिकारी जागेवर हक्क सांगू पाह णारा उच्चवर्णीय स्वार्थी जमीन दार व खेड्यातच राहणार्या जन्मलेल्या लोकांचा आपल्या जीवनासाठीचा संघर्ष चित्रपटात प्रभावी पणे दाखवला आहे.
जमीनदारातर्फे नागवल्या गेलेल्या जनतेच्या हिता साठी एक दैवी शक्ती उभी राहते. तिच्या सोबत क्षेत्रपाल दिक्पालही आहेत. जे दैवा व गुलिगा नावाने येतात.

शिवा हे मुख्य पात्र ऋषभ शेट्टी अक्षरशः जगला आहे. रासवट, जमीनदाराची काहीही कामे करुन देणारा , व्यसनी, तामसी प्रवृत्तीचा नायक त्याने उत्तम रेखाटला आहे व त्याच्या स्वभावातले अनेक कंगोरे सहज दाखवले आहेत. चित्रपटाचा शेवट तर थक्क करून सोडतो. कंबाला - म्हशींची शर्यत - हा सीन जरूर बघा. थ्रीडी नसले तरीही नदीतले मातकट पाणी आपल्यावर उडते कि काय असे वाट्ते . पुढील मारामारीचे प्रसंग सुद्धा त्याने लिलया पेलले आहेत. शिवाचे कैलासा म्हणून एक् ट्री हाउस आहे ते मला फार आव्डले. शिवाचे एक स्वभाव वैशि ष्ट्य म्हणजे बंडखोर पणा.

ह्याचा भाउ गुरवा हे चित्रपटा ता ले एक सुस्वभावी पात्र. सहज विश्वास टाकणारे, जीवनात नशीबी आलेले भोग पत्करुन तक्रार न करता खालमानेने जगणारे लोक असतात त्यातला एक. हा वंश परंपरागत आलेला भूत कोला दर वर्षी नाचवत असतो.

विधवा आई सर्वत्र सारखीच. ह्या रांगड्या बैलांना ती झोडपूनच रांगेत ठेवत असते. कायम कावलेली व त्रासलेली.

फॉरेस्ट ऑफिसर मुरली हे पात्र शिवा इतकेच रंगत दार रचले आहे. एकटाच पोस्टिंग वर राहणारा अधिकारी. वन वाचवायचे त्याचे प्रयत्न. खेडेगावातील लोकांचा हुच्च पणा. अनेक वाद होउन शेवटी हा शिवाच्या बरोबरीने टीम उभारतो.

जमी न दारही जगभर असे आहे रे वर्गातले लोक असतात तसाच आहे आतून कृर जनते बदल थोडीही सह अनुभूती नसलेला, स्वार्थी, बाईबाज
जातिवादी व ढोंगी. गोड बोलुन नुकसान करणारे असतात त्यातला हा व्यक्ति. निळ्या चिमणीच्या मालकाची च आठवण आली मला तर ह्याला बघुन. अश्या लोकांची पापे त्यांच्या संततीला भोगावी लागतात ह्या देशी समजातून ह्याचा मुलगा मनोदुर्बल दाखवला आहे. ते बघून वाइट वाट्ते. बिचारे पोर. जमीनदाराची बायको सर्व बघुन गप्प.नवरा परस्त्रीला भेटायला चालल्यावर शिवाच्या हातात टॉर्च देणारी.

चित्रपटातील कोणतीही स्त्री बंड करून उठत नाही. सर्व कामाने पिचलेल्या, गप्प बसलेल्या, नायिका पण मेहनतीने ट्रेनिन्ग पूर्ण करुन आलेली गार्ड बनलेली व नोकरी करणारी पण जमीन दार हिला ही वापरून घेत अस्तो कारण वशिल्याने नोकरी मिळवून दिली. त्यामुळे हिचा बॉस हिला कमी लेखत अस्तो. ( हिला दोन्हीकडून शिव्या बसतात पण तिची बाजू कोणीही समजून घेत नाही.) हिचे व शिवाचे सीन्स फार क्युट आहेत.
शिवा तिला मासे आणून कोर्ट करतो. दोघे काही करत असतात व घरचे लोक येतात तर शिवा नारळ खोवत साळसूद पणे बसलेला असतो. हे चित्रप टातले थोडे हलके क्षण आहेत. ही पारंपारिक मुलगी व स्त्रीच दाखविली आहे. तुलने साठी न्युटन सिनेमातील इलेक्षन अधिकारी मुलगी बघा. एकदम स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ,सुशिक्षित . दोघी भारतीयच.

चित्रपटाची कथा व त्यासाठी केलेले संशोधन, संवाद एकदम उच्च कोटीचे आहे. व ते पूर्ण चित्रपटात दिसते. भूतकोलाचा ड्रेस व दागिने हेच एक स्वतंत्र प्रकरण आहे. ह्यावर एक डॉक्युमेंतरी तो बनता है.

अरविंद एस कामत ह्यांनी केलेले चित्रिकर ण नेत्र सुखद आहे. रात्रीच्या शॉट्स मध्ये सुद्धा जंगल आपली जादुई क्वालिटी राखुन ठेवते.
क्लायमॅक्स मध्ये घेतलेले शॉट्स रजनीकांतची आठवण करुन देतात पण शिवा आपल्या बल्क व अ‍ॅग्रेसिव पणे तारून नेतो तो पहिल्यापासूनच तसा दाखवला आहे. बी अजनीश लोक नाथ ह्यांचे संगीत मस्त आहे. वराह रूपम आपण ऐकलेच असेल एव्हाना . इतर गाणीही छान आहेत.
वराह रूपम ला चांगला रॉक बेस आहे व पुढे एक चांगली गिटार रिफ कि कायती टाकली आहे. थेटरात जायचे कारण म्हणजे पार्श्वसंगीत. हे तिथेच अनुभवायची बाब आहे. एकदम अंगावर काटा येतो काही क्षणी. चित्रपटात क्रिटिकल क्षणी मूळचे कन्नडा संवादच ठेवले आहेत. हे एकदम पैसा वसूल आहे. शिवाय पांजुर्लीची ती किंकाळी जबरी ऐकू येते. पण संगीत नुसतेच लाउड नाही आहे. साउंड डिझाइन पक्के केले आहे.
सर्व ओरि जिनल साउंड ट्रॅक स्पॉटिफाय प्रिमीअम वर उपलब्ध आहे. चांगले हेडफोन किंवा म्युझिक सिस्टिम वर बाहेर नक्की ऐका. अमेरिकेतला शेजारी नक्की बाहेर येउन बेल दाबेल.

खेडेगावातील जातीय उतरंड, स्नेह संबंध, गरीबांना पायाखालीच ठेचण्याचा व त्यांचा पूर्ण फायदा करून त्यांना नामशेष करून टाकायचा प्रस्थापित वर्गाचा प्रयत्न दाखवला आहे हे सिनेमाचे यश. चित्र पटाचा शेवट पॉझिटिव्ह दाखवला आहे व तोक्षण बघताना भरून येते. एक अस्सल भारतीय मातीतला सिनेमा म्हणून ह्याला रेझोनन्स भेटला आहे हेच त्याच्या यशाचे गमक. माझ्या तर्फे साडेपाच स्टार्स.

========================================================================================
अवांतर व्हिवीआना मॉल ठाणे येथील व्हीआयपी थिएटर व्यव स्था चांगली आहे. उत्तमच. तिथे गेल्यावर मेन्यू हातात ठेवतात. व तुम्ही चित्रपट बघत असताना सर्व्ह करतात. आम्ही मागील वेळी ग्रीक सलाड, मोमोज, ह्यावेळी एक हॉटडॉग व एक चायनीज राइस बोल, कॅफे फ्रापे घेतले होते. कोक पण उपलब्ध आहे. स्टाफ एकदम विनम्र हात जोडूनच बोलतो. खुर्च्या दोन दोन च्या सेट मध्ये व एकेका साइडला लँप शेड. अन्न ठेवायला ट्रेटेबल, पाणी काँप्लिमेंटरी( फुकट) एक वेट वाइप व टिशूज मिळते. मी ह्यावेळी शोधून( शेल्डन सारखी )बेस्ट सीट निवडली होती
शेजारच्या लोका नी तुम्ही मागे बसाल का विचारल्यावर नाही सांगितले. पण ह्या मुळे मला सर्वात बेस्ट अनुभव मिळाला. एफ रो ५. सीट घ्या शक्यतो. आस्च्रर्य म्हणजे एक लोड सारखे ठेवले होते त्यावर ब्लँकेट असे लिहिले होते व आत खरेच ड्राय क्लीन केलेले मौ ब्लॅके ट होते. मी थंडी वाजलीतर म्हणून ब्यागेतुन माझे डोक्याला बांधायचे चिरगुट नेले होते पण त्या ममव पणा ची गरज पडली नाही. तापमान जस्ट राइट होते. व समोर टेस्टो स्टेरोन - एड्रेनलीन मिश्रीत खेळ बघून थंडी विसरुनच जाता तुम्ही. शेवटचा अर्धा तास तर फिल्म इज फायरिन्ग ऑन ऑल
सिलिंडर्स.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप लहान मुले आली होती. माझ्या शेजारीच दोघे बसले होते. व क्षणो क्षणी दचकत होते. त्यांना एक तर समजणार नाही व कथानक लहान मुलांच्या साठी नाही. माझे अज्ञान वयाचे मूल असते तर मी नक्कीच नेले नसते. मी अगदी न राहावुन आईबापांना सांगणार होते पण मुंबई रूल नंबर वन टु हंड्रेड डोंट एंगेज. मग गप्प बसले.

आदिपुर ष चे ट्रेलर बघितले सीजी रावणा ला आता तीन बोटे आडवे गंध लावले आहे राखेचे व एक कुंकुम तिलक. त्याने घंटा फरक पडत नाही. इट इज बॅड अ‍ॅज एव्हर.

एक उं चाई सिनेमाचे ट्रेलर पाहिले. चार म्हातारे एवरेस्ट बेस केंपला जातात अशी हृद्य पीळ स्टोरी आहे. सूरज बरजात्या फिल्म!! म्हणजे कार मध्ये मागे नीना गुप्ता नवर्‍याबरोबर रोमान्स करत असते. व ह्यांना एवरेस्ट वर माधुरी दिक्षीत नाच करुन दाखवेल बहुतेक. पठाणचा पन ट्रेलर आला पण तेव्हा मी बाजुची मुले दंगा करत होती तो बघत बसले.

आलियाला मुलगी झाली म्हणून लेकीचेच अभि नंदन करुन टाकले. ती त्यांच्या बॉसची मानस कन्या नं. कांतारा सारखे सिनेमे बघितले की आपले जीवन अगदीच साधे वाटू लागते. मला तो यलो फेस मेक अप करुन बघायचाच आहे एकदा.

छान आणि मुद्देसूद परीक्षण लिहिले आहे. मी आजवर कोणता चित्रपट थियेटरला दोन वेळा पाहिला नाही. पण हा दोनवेळा पाहिला Happy

थ्रीडी चा मुद्दा अगदी माझ्याही मनात तेंव्हाच आला होता जेंव्हा चिखलातल्या पाण्यातली शर्यत दाखवली आहे. किंबहुना हा सगळाच चित्रपट थ्रीडी हवा होता असे काल तीव्रतेने वाटले. कारण पूर्ण जंगलातले चित्रीकरण खूप प्रभावी झाले आहे आणि तो थ्रीडी अनुभव विलक्षणच झाला असता. पण जे आता 2D आहे ते सुद्धा कमी नाही. मी सर्वाना सांगतो आहे कि ओटीटीवर बघू नका हा. पहायचा असेल तर थियेटरलाच पहा. जंगलातली नाईट सफारी, व्होआऽऽऽआआआऽऽऽव ची आरोळी आणि शेवटचा अंगावर येणारा सीन हे घरात बसून ओटीटीवर काय अनुभवणार?

शेवटच्या सीन बद्दल तर शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके परिणामकारक आहे. आणि विशेषत: जेंव्हा कळले कि कोणतेही कॉम्प्युटर इफेक्ट (व्हिएफएक्स) न वापरता तो चित्रपट बनवला आहे तेंव्हा अक्षरशः विश्वास न बसून डोळे विस्फारले. व्हिएफएक्स शिवाय कस्से काय केले असेल ते शेवटच्या दृश्यांचे चित्रीकरण असे राहून राहून वाटत होते. सिम्पली अन्-बिलीव्हेबल!!!

संगीत सुद्धा खरंच फार प्रभावी आहे. तुम्ही लिहिले आहे तितके तपशील मला कळत नाहीत. पण शेवटी क्लायमॅक्सच्या दृश्यात जे संगीत वापरले आहे ते काय वर्णावे! तो अखंड सीनच अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी या सगळ्यातच "देवा रे देवा!" झाला आहे. त्या सीन च्या वेळी अनेक प्रेक्षक थक्क होऊन तोंडावर हात बांधून घट्ट बसलेले पाहिले.

कांतारा हा सिनेमा पाहण्याचा नाही अनुभवण्याचा आहे!

ओटिटिवर आल्यावरच पाहणे होईल.. मुलांना घेऊन जाणं होत नाही.

तुम्ही लिहिले आहे तितके तपशील मला कळत नाहीत.>>>+१११
जमल्यास PS-1 वर पण लिहाल का अमा, नवा धागा काढून?

अमा, चित्रपट अनुभवून येतात आणि इथे तोच अनुभव छान शब्दबद्ध करतात.
धन्यवाद परीक्षण लिहिल्याबद्दल.
उत्तम रसिक प्रेक्षक आहात.

कांतारा बघायला हवा.

चित्रपट कसा पहावा याचा वस्तुपाठच लिहिलात.
आणि परीक्षण कसे लिहावे याचाही.
वैयक्तिक गोष्टी शेवटी आणि वेगळ्या प्रतिसादांत लिहिल्याचे हेही आवडले.

माझा सगळा फोकस खाणेपिणे आणि ते ब्लॅंकेट यावरच राहिला
मी आजतागायत असल्या थेटरला कधी सिनेमा पहिला नाहीये
काय तिकीट असते साधारण? आणि खाण्यापिण्याचे?

500.00 ते 1000.00 वार वेळ आणि चित्रपटावर अवलंबून आहे
डिशेस @ 250/- onwards.
Odd Day Morning Shows 350/- ला ही असतात.

छान परीक्षण
अर्थात बहुतांश मते पटली नाहीत.
मला हा चित्रपट अगदीच बंडल नाही पण ओवरहाईप वाटला.
म्हणजे ठिकठाक आहे पण बरेच गोष्टी न रुचणाऱ्या असून आपल्याईथल्या पब्लिकला कश्या आवडताहेत हा प्रश्न पडतोय.

सविस्तर ईथे लिहिले आहेच
कांतारा - अपेक्षापुर्ती आणि अपेक्षाभंग !
https://www.maayboli.com/node/82580
त्यामुळे पुन्हा तेच नाही लिहीत.

पण,
@ अवांतर - हे आवडले .
चित्रपट बघणे हा अनुभव हल्ली फार आरामदायी असतो.
मागे एके ठिकाणी तर दोघांत एक सोफा होता. मला ईतके हसायला आले. म्हणजे छानपैकी आपल्या जोडीदाराला सोफ्याच्या एका कडेला बसवून त्याच्या मांडीवर डोके ठेऊन झोपून चित्रपट बघावा. होम थिएटरच जणू Happy

कांतारा मधील फेमस किंकाळी चे अ‍ॅक्चुअली चार प्रकार आहेत. मूळ वराह अवतार असल्याने चार वेगवेगळ्या प्रकारचे आवाज घेतलेले आहेत. एक मोठी जी टेरिटोरिअल आहे जिथ परेन्त माझा आवाज जाईल तिथपरेन्त ची जमीन जनतेची. हे एस्टाब्लिश करून टाकणार. मग तुमच्या आथोरिटी ते मानोत की न मानोत. बाकीचे तीन आवाज थोड्या फार फरकाने कमी कमी इंटेन्सिटी चे आहेत. प्राण्यांबरोबर राहिल्या वर त्यांच्या आवाजाचे फरक कळून येतात.

जंगल- तेथील मूल निवासी त्यावर च जीवन अवलंबून असलेले, वन अधिकारी व डिपार्ट मेंट - जंगलातले वनस्पती व प्राणी - ह्यांचे नैसर्गिक हॅबिटॅटच विध्वंसक रीती ने संपत चालले आहे. - वेगवेगळ्या शक्तिमान माफिया टोळ्या - जंगल कापून तिथली जमीन शेतीखाली आणणे/ तिथे डेवलपमेंट्च्या नावाखाली रस्ते इमारती, रेल्वेमार्ग रिझॉर्ट बांधणे. लाकूड विकणे त्यातून पैसे कमव णारा वर्ग - अ‍ॅक्टिवि स्ट वर्ग - घरबसल्या जालावर वाचून हळ हळणारा एक वर्ग असे अनेक पैलू ह्या जटिल प्रश्नाला आहेत. सर्वांना एकत्र आणून जंगलाचे व जनतेचे हित पुढे ठेवणारा एक मार्ग ह्या सिनेमाने दाखवला आहे. पन दर वेळी दैवी शक्ती मदतिला असतेच असे नाही.

अमेझॉन जंगलातील मूल निवासी लोकांची अशी धारणा आहे की वारलेल्या लोकांचे आत्मे नदीत आत पाताळात राहतात. तिथेच काही देवी देवता ही आहेत. ह्यांना फार नदी डेव्हलप झाल्यास धक्का पोहोचेल म्हणून अमेझॉन नदीच्या विकासाला त्यांचा विरोध असतो.

अमा, चित्रपट अनुभवून येतात आणि इथे तोच अनुभव छान शब्दबद्ध करतात.
धन्यवाद परीक्षण लिहिल्याबद्दल.
उत्तम रसिक प्रेक्षक आहात. >> +1

मायबोलीवर मोजक्या लोकांचे लिखाण आवर्जून वाचते त्यातलेच तुम्ही एक आहात अमा. विशेषतः: माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर तुम्ही फारच उत्तम लिहिता, ते विषय म्हणजे चित्रपट आणि संगीत . तुम्ही कांतारा पाहाल का आणि जर पहिला तर तुम्हाला तो आवडेल का हे मला इतके महत्वाचे कधी झाले हे मलाच समजले नाही Happy . खूप सुंदर शब्दांत तुम्ही परीक्षण केले आहे. छान वाटलं वाचून ! धन्यवाद

>> सर्वांना एकत्र आणून जंगलाचे व जनतेचे हित पुढे ठेवणारा एक मार्ग ह्या सिनेमाने दाखवला आहे. पन दर वेळी दैवी शक्ती मदतिला असतेच असे नाही.

तुम्ही एकप्रकारे तारच छेडलीत. "अखेर हिरोचा विजय होतो" हे त्या हिरोशी कनेक्ट झालेल्या प्रेक्षकांना खुश करण्यासाठी असते. अनेक चित्रपटांत हिरो अमानवीय करामती करून खलनायकी प्रवृत्तींवर विजय मिळवताना दाखवला जातो, ते ह्यासाठीच. इथे सुद्धा धैव मदत करतो म्हणून अमानवीय शक्ती अंगात संचारून शिवा खलनायकी प्रवृत्तींचे निर्दालन करतो हे केवळ सिनेमाचे गणित विचारात घेऊन दाखवलेय. पण वास्तवाचा विचार करता या चित्रपटातून शोकांतिका मांडली आहे. अखेरच्या सीन मध्ये शिवा संपलेला आहे. वास्तव जीवनात हाच अंत आहे.

अमा.. सुंदर परिक्षण. बघण्या पुर्वी ऋन्मेषचा धागा ही वाचला तो होता, त्यातली काही मतेही पटली होती, जर जसे की हो हिरोचा आगाऊपणा, त्या हिरोईनला असला हीरो आवडणे ई. तरीही कांतारा आवडलाच! अतुल यांनी म्हटल्याप्रमाणे तो अनुभवायचा भाग आहे. सिनेमॅटोग्राफी सुंदर.

वर सग़ळे मुद्दे कव्हर झालेत लेख आणि प्रतिसाद मिळून त्यामुळे जास्त लिहीत नाही.

परीक्षण छान लिहिलंय , ३८ दिवस झालेत तरी कांतारा गर्दी का खेचतोय हे बघण्यासाठी आज गेलो होतो.
जंगलातील सुदंर छायाचित्रण आणि थेटर मधील थंडावा मुळे जंगल भ्रमंती छान जमून आली .
पण ......
३८ दिवस गर्दी खेचण्या इतके भारी या सिनेमात काय आहे ते नाही समजले .जंगलातील आदिवासी आणि सरकारी सिस्टीम मधील संघर्ष छान दाखवला आहे .
तो के जी एफ देखील इतका का चालला ते देखील शेवट पर्यंत समजले नव्हते .

शिवा साठी वारंवार याव्ह !!!!! करून ओरडण्याचे आवाज प्रेक्षकांना नक्कीच रोमांचित करत असेल.....
क्लायमॅक्स मध्ये शिवा पण त्याच्या बापासारखाच अदृश्य होतो का ?
का दुसऱ्या भागाची तयारी आहे?

काल पाहिला
आम्हाला खूप चांगली ऑफर मिळाली एका डेबिट कार्ड ची(200 रु मध्ये 2 रिक्लायनर तिकिटं, अर्थात हे वर्किंग डे असल्याने)
मला लाऊड वाटला.नवऱ्याला आवडला. पिक्चर त्यातलं जंगल आणि त्या हिरो चा अभिनय बघायला नक्की बघावा.
फॅमिली मॅन मधला पाशा अर्थात इथला इन्स्पेक्टर खूप आवडला.
अभिनय सर्वांचा चांगला.शेवटच्या 15 मिनिटांनी अगदी हलवून सोडलं नाही तरी हिरोचं कौतुक वाटलं.इतकी अवार्ड का आहेत त्याला आधीची ते पटलं.नाचाच्या वेळी कन्नड बोलणं ओरिजिनल म्हणून आवडलं असलं तरी सबटायटल पटापट वाचता न आल्याने 60% संवाद गेस केले.
(शेवटी नाच आहे त्यात ते डुक्कर इन्स्पेक्टर आणि बाकीच्यांपाशी येऊन लहान मुलांसारखे माया माया करतंय वाटलं.एकंदर व्हॉव बद्दल ऐकल्याने भीती वाटली नाही, पण ऐकलं नसतं तर किंचाळले असते पहिल्या वेळी.नंतर सारखं आल्यावर ते लहान मुलं 'लायनचा आवाज काढ' केल्यावर करतात तसं वाटलं)
हिरोईन ला वाईट वागवणे, अब्युज, तिच्या आजूबाजूच्याना ते अगदी नेहमीचं असल्यागत चालणे याबाबत बोलत नाही.बॉलिवूड मध्ये पण हे आहेच.अगदी आताआता कमी होतंय.

अमा, मस्त लिहिले आहे.आता पूर्ण परत वाचले.
तुमचं परीक्षण वाचून चित्रपट बघण्याचा रंग वेगळाच असतो.

(शेवटी नाच आहे त्यात ते डुक्कर इन्स्पेक्टर आणि बाकीच्यांपाशी येऊन लहान मुलांसारखे माया माया करतंय वाटलं.>> त्याचा अर्थ असा आहे की. एका साइडला करेक्ट आथोरिटी वन विभाग अधिकारी, त्याला सपोर्ट करणा रे सरकारी अधिकारी - साध्या सिविल ड्रेस मधील. शर्ट पेंट वाले, मूलनिवासी आदिवासी लोक. ह्यांना एकत्र आणून त्यांचे एक गटबंधन तो तयार करतो. वनाची काळ जी घ्या त्यात जीवनोपयोगी वस्तू झाडे प्राणीच राहात नाहीत तर तो आपला एक सांस्कृ तिक वार सा आहे. वन संवर्धन करा. धनदांड ग्यांना दूर ठेवा. असा संदेस तो देतो व काम झाल्या वर वड्लां च्या आत्म्यात विलीन होतो.

(शेवटी नाच आहे त्यात ते डुक्कर इन्स्पेक्टर आणि बाकीच्यांपाशी येऊन लहान मुलांसारखे माया माया करतंय वाटलं.>> >>>>>>
त्या वेळेचे वराह रूपंम हे गाणे खूपच श्रवणीय वाटते ,खास करून त्यात दिलेले संगीत !!!!!
You tube वर चेक केले असता , फक्त चार पाच वाद्या मध्ये संगीत तयार केलेले दिसत आहे .....

ती सगळी त्यांची पारंपारिक वाद्ये घेण्यावर भर दिला आहे असे वाचले आणि वराह रुपम पण जुनेच पारंपारिक गाणे घेऊन नवीन केलय असे काहीतरी आहे. मस्त वाटत ऐकायला.
ते दैवाचे संवाद पण कळाले असते तर अजून नीट कळाले असते असे मला पण वाटले.

वन संवर्धन करा. धनदांड ग्यांना दूर ठेवा. असा संदेस तो देतो व काम झाल्या वर वड्लां च्या आत्म्यात विलीन होतो. >> +११

स्पॉयलर
म्हणजे शेवटी वाईट लोकांनी बदडलयावर गळा दाबल्यावर त्या रिंगणात पडला तो मेलाय ना?मला असं वाटलं.आणि नंतर रिंगणातून उठून वराह रूप अंगात येऊन सर्वाना बदडलं?
आणि मग नंतर वराह रूपम च्या कोला च्या वेळी त्याचा तो आत्माच आहे का?माया माया करणारा?

<<म्हणजे शेवटी वाईट लोकांनी बदडलयावर गळा दाबल्यावर त्या रिंगणात पडला तो मेलाय ना? >> हो. मग त्याच्या शरीरात गुलिगा संचारतो आणि तो साहेबाचा खातमा करतो. मग इतर सोपस्कार झाल्यावर पंजुरली येतो आणि गुलिगाला घेउन जातो. (एके ठिकाणी मी गुलागी येतो आणि पंजुरलीला घेउन जातो असे चूकीचे लिहिले आहे.)

नवरसम हे गाणं वराह रूपंमच्या आधीच आहे का ? बघून मन द्रवले त्या आर्टिस्टच्या मुलाला इतर मुल कशी बुली करतात आणि तो विहिरीत पडल्यावर त्याला न वाचवता तसेच नारळाच्या झावळीनी विहीर झाकून निघून जातात। त्याचे आई वडील शोकाकुल होऊन एकमेकात विलीन होऊन गुडूप होतात। जसे शिवा आपल्या वडिलांना भेटल्यावर फेर धरून गायब होतो।

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/malayalam/movies/news/...

फुरोगामी व अजनबी कृपया त्या वरील लिंक काढून टाका. गाण्यासंबंधाने कॉपीराइट वाद चालू आहेत. माबो ला त्याचा त्रास नको.

गाणी स्पॉटिफाय वर उपलब्ध आहेत. तिथेच ऐका. वराह रुपम वर एक पोस्ट लिहायची आहे. सवडीने.

Pages