Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रामानंद सागर कृत रामायण १९८०
रामानंद सागर कृत रामायण १९८० घ्या दशकातली. ते ३०+ वर्षांनी असं आवडेल? तोवर आपल्यासकट सगळं जग बदललं.
याचं दिग्दर्शकाने तानाजीत राजपूत उदयभानला मुसलमानासारखा दाखवला होता. आता दशग्रंथी ब्राह्मण रावणही तसाच.
कालाय तस्मै नमः:
मांजरेकर शिवाजी
मांजरेकर शिवाजी महाराज्यांच्या भुमिकेत नाही बघवले. तेच ते दारूडे डोळे... महाराजांची किंमत कमी केली यांनी.
अमोल कोल्हे लबाड वाटतात.
चिन्मय मांडलेकर ठिक ठाक - अगदीच वाईट नाहीत. अभिनय चांगला पण काहीतरी महाराज म्हणून काहीतरी कमी वाटते ते सांगता येत नाही.
प्रसाद ओक यांनी हिरकणी मध्ये महाराजांची भुमिका केली होती. पण काही खास वाटले नाहीत.
शरद केळकर - आत्तापर्यंत सर्वात जास्त हेच महाराज म्हणून जास्त आवडले.
(सुर्यकांत, चंद्रकांत, रवींद्र महाजनी यांनी पण महाराजांची भुमिका केली होती पण आता आठवत नाही ...)
मला खूप मजा येते रामानंद सागर
मला खूप मजा येते रामानंद सागर इफेक्टस बघायला
त्या काळात ते कठीण असणार.
ते बाण, आग, मग एका पार्टीने बाण गायब केल्यावर दुसऱ्या पार्टीची प्रतिक्रिया.
त्याच दशकात पाहिलं तेव्हा
त्याच दशकात पाहिलं तेव्हा आवडलं नव्हतं.
चांगली कलाकृती नंतरही आवडते (त्यावेळच्या मर्यादा वगैरे लक्ष्यात घेतल्या तर कौतुकही वाटते.) एक पटकन आठवलेले उदाहरण म्हणजे संत तुकाराम जुना चित्रपट.
मांजरेकर शिवाजी
मांजरेकर शिवाजी महाराज्यांच्या भुमिकेत नाही बघवले. तेच ते दारूडे डोळे... >>> अगदी!! अपमान वाटला तो महाराजांचा
ते बाण, आग, मग एका पार्टीने बाण गायब केल्यावर दुसऱ्या पार्टीची प्रतिक्रिया. >>> हे तेव्हा फार आवडलं होतं. आता हसू येतं.
हल्ली बघितलेल्यात शरद केळकरच
हल्ली बघितलेल्यात शरद केळकरच महाराजांच्या रोलमध्ये परफेक्ट वाटतो. > १०१%
मला पण शरद केळकर शिवाजी महाराज म्हणून खूप आवडला. दुसर कुणालाही आता महाराज म्हणून बघायला आवडत नाही.
चिन्मय मांडलेकर तर कायम आवेशातच असतो कि आता तलवार बाहेर काढू कि नंतर . उगाचच जोशपूर्ण काही बोलले कि झाले महाराज.
उगाचच जोशपूर्ण काही बोलले कि
उगाचच जोशपूर्ण काही बोलले कि झाले महाराज.
>>>> आणि किती अलंकारिक...
माझ्या जीवीच्या जीवलगांनो वगेरे
जर आपण रामायण मालिका टीव्हीवर
जर आपण रामायण मालिका टीव्हीवर पाहिलीच नसती आणि फक्त बिनचित्रांचे रामायण पुस्तक वाचले असते. तर रावण म्हणून एक दहा तोंडांचा राक्षस या वर्णनावरून आपल्या डोळ्यासमोर काय आले असते?
रामायणात काहीच्या काही सोफेस्टीकेटेड रावण दाखवला होता. आणि आता त्याचे तेच रुप आपल्या डोक्यात बसले आहे.
तेच रूप तुझ्या डोक्यात बसले
तेच रूप तुझ्या डोक्यात बसले आहे हे कळले. अजूनही कुणाचे असे होऊ शकते, त्यात वावगे काहीच नाही.
पण सगळ्यांच्या डोक्यात बसलेय हे सरसकटीकरण झाले.
पुस्तक वाचून माहीत असलेला
पुस्तक वाचून माहीत असलेला रावण महानशिवभक्त होता. त्याने शिवतांडव स्तोत्रं रचले . आकाशवाणीवर पूर्वी मंगलप्रभातमध्ये वाजायचं.
राउतांचा रावण मुजरा बघत दौलतजादा करू शकेल.
मी कुठे म्हणालो सगळ्यांच्या
मी कुठे म्हणालो सगळ्यांच्या डोक्यात बसलेय..
काहींच्या डोक्यात बसलेय. त्यांना या ट्रेलरमधील रावणाचे नवे रूप न झेपणे साहजिकच आहे.
किंबहुना माझ्या डोक्यात तर ते जुने रूप बिलकुल बसले नाहीये. मला तेव्हाही असेच वाटायचे. श्या हा कसला दहा तोंडाचा राक्षस रावण. मला ते रूप मिळमिळीतच वाटायचे.
उगाचच जोशपूर्ण काही बोलले कि
उगाचच जोशपूर्ण काही बोलले कि झाले महाराज.
हेच ते... उठा पण असाच अर्थ लावून काहीतरी बोलत असतात. गोचिड, निष्ठा, मावळे, छाताडे, कोथळा वगैरे.
शिवभक्त म्हणजे सोफेस्टीकेटेड
शिवभक्त म्हणजे सोफेस्टीकेटेड आणि व्हाईट कॉलर हे समीकरण बिलकुल पटलेले नाही.
ईथे तर भर बाजारात मर्डर करणारे गॅंगस्टर लोकं सुद्धा कुठल्या तरी देवाचे बाबा बुवाचे भक्त असतात.
राउतांचा रावण मुजरा बघत दौलतजादा करू शकेल.
>>>
त्या रावणानेही काय केलेले हे विसरला वाटते आपण.
दुसऱ्याची बायको पळवलेली. हा अत्यंत नीच प्रकार आहे.
दौलतजादा करत मुजरा बघणारे सभ्य म्हणावे ना यापेक्षा.
तरी असाच रावणवाटत असेल तर ते जास्त लॉजिकल नाही का?
मला सैफ अली खान चा रावण
मला सैफ अली खान चा रावण काहीतरी विचित्रच वाटला.म्हणजे तो मोहॉक कट काय, दाढी काय, आणि डोळ्याचा रंग काय.म्हणजे रावण न वाटता तो जिम मधला वेट लिफ्टर किंवा ट्रेनर असं काहीतरी.
काही सिरियल्स मध्ये आपल्याला पौराणिक पात्रं पौराणिक न वाटता मॉड पात्राने फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतलाय असं वाटतं तसं काहीतरी.म्हणजे लेयर कट वाली केस स्मूथ केलेली राधा, मस्कारा लावलेली द्रौपदी वगैरे.तसं या सैफ च्या रावणाबद्दल वाटलं.
मला बहुतेक नीट सांगता येत नाहीये.
भावना पोहोचल्या अनु
भावना पोहोचल्या अनु
मेकअप, गेटअप, हावभाव मॉडर्न.
मेकअप, गेटअप, हावभाव मॉडर्न. संवादाची भाषा आणि टोन सुद्धा फारतर दोनेक दशके जुना, कपडे तेवढे फार जुन्या प्रकारचे (पण कापडाची डिझाईन तेवढी जुनी असेल असेच नाही. शिवाय चांगला वाटतो म्हणून रानावनात राहणाऱ्या स्त्रीच्या गळ्यात लांब लचक रंगीबेरंगी दुपट्टा हवाच.)
हे म्हणजे जसं हिरो केवळ बारीकशी मिशी लावून आला की आपल्याला तर माहीत असतं तोच आहे पण चित्रपटातल्या पात्रांना तीळमात्र शंका येत नाही तसलाच काही प्रकार झाला.
प्रेक्षकांना कळतंय हे काही भलतेच रुपडे केलेय पण चित्रपटातील पात्रांना आणि दिग्दर्शकाना मात्र ते एकदम प्राचीन काळचे परफेक्ट रुपडे वाटतेय. हे शोभत नाहीये वगैरे तीळमात्र शंका त्यांना येत नाही.
हावभाव मॉडर्न >>> कुठले
हावभाव मॉडर्न >>> कुठले हावभाव मॉडर्न वाटले? रावणाने मिडल फिंगर दाखवले की हिरोने शाहरूखसारखे दोन हात पसरले
संवादाची भाषा आणि टोन सुद्धा फारतर दोनेक दशके जुना >>> हा कुठला ट्रेलर पाहिला? मी पाहिले त्यात संवादच नाहीयेत रावणाला? वा कुठल्याच पात्राला..
मी हा ट्रेलर पाहिला
https://www.youtube.com/watch?v=jF5rJAXUY4A
उलट तो दहा तोंडाचा रावण प्रकट होतो तेव्हा खराखुरा कपटी रावण प्रकट झालाय असे वाटते. न की तो उदात्तीकरण केलेला मालिकांतील.
तेच सुरुवातीलाही प्रभास पूजा करताना दाखवलेले त्याचे सात्विक रुप विरुद्ध हिमालयात ते काळे घोंगडे की काय ओढून पूजा करणारा पण तरीही चेहर्यावर विखार स्पष्ट जाणवणारा सैफ अली खान हे राम आणि रावण यातील फरक स्पष्ट करतात. नुसते शिवभक्त आहे, विद्वान आहे म्हणून कोणी राम होत नाही. त्यासाठी तसेच चरीत्र असावे लागते हे दाखवणारे द्रुश्य !
मी सजेस्ट करेन की लोकहो पुन्हा पुन्हा बघा ट्रेलर.. हळूहळू त्याच्याशी समरस व्हाल.. थोडा वेळ द्या आपल्या डोक्यातील आधीची रावणाची ईमेज काढायला.
मी पुन्हा पुन्हा बघतोय ट्रेलर
मी पुन्हा पुन्हा बघतोय ट्रेलर, आधी आली तितकीच मजा येत आहे
सिनेमॅटीक लिबर्टी मला मान्य
सिनेमॅटीक लिबर्टी मला मान्य आहे.
पण हा रावण GoT मधले कॅरॅक्टर + पद्मावतमधला खिल्जी वाटला. अजिबात नाही आवडला.
अरविंद त्रिवेदींचा रावण आवडला होता. नुसता शिवभक्त दिसायला राकट असू शकतो पण रावण दशग्रंथी ब्राह्मण, लंकेचा राजा होता. विद्वत्तेचं तेज व राजस (गोंडस नाही) रूप अपेक्षित आहे मला तरी. वाईट कर्म करणार्याचा अवतार सोफिस्टिकेटेड असूच शकतो ना? वेशभुषेतून तो इफेक्ट द्यायची गरज नाही.
प्रभास कुणाला त्या जय मल्हार सिरीअलच्या हिरोसारखा नाही वाटला का?
बाय द वे, P S चे लूक्स मला आवडले आहेत. ऐश्वर्या व हेमा मालिनी क्वचितच मद्रदेशीय वाटतात. यात ऐश्वर्या वाटते आहे ( चांगल्या अर्थाने)
मी सजेस्ट करेन की लोकहो
मी सजेस्ट करेन की लोकहो पुन्हा पुन्हा बघा ट्रेलर.. हळूहळू त्याच्याशी समरस व्हाल.. थोडा वेळ द्या आपल्या डोक्यातील आधीची रावणाची ईमेज काढायला.>>
सरांना लाईन सापडली आहे
आता जसं लाल सिंग चद्धा चे केलं तसच सर आता हा आदीपुरुष कसा चांगला आहे हे आता मायबोली करांच्या माथी मारणार
त्यासाठी त्यांच्या वाट्टेल त्या लॉजिक ने अविरत युक्तीवाद करत रहाणार, नवा धागा काढणार
काहीही करणार पण आता ते आदीपुरुष च्या मदतीने सगळ्यांना पिडणार एवढं निश्चित
आदिपुरुषमध्ये राम (प्रभास) हा
आदिपुरुषमध्ये राम (प्रभास) हा रावण (त्रिवेदी) सारखा दिसतोय आणि रावण तर तैमुर दिसतोय! पण हाही मुव्ही जर भम्मास्त्रच्या प्रेक्षकांसाठी काढला असेल तर त्यांची बौद्धिक पातळी बघता त्यांना आवडेल आदिपुरुष.
माझ्यासारख्या काहींच्या
माझ्यासारख्या काहींच्या डोक्यात सागर आणि चोप्रांच्या रामायण आणि महाभारतातल्या व्यक्तीरेखांपेक्षा भारत एक खोज मधील ओम पुरी, नसीर, सलीम ह्यांनी साकारलेले सामान्य मानव असे राम, कृष्ण, रावण, शिवाजी, औरंगजेब जास्त चपखल बसले असतील.
अरविंद त्रिवेदींचा रावण आवडला
अरविंद त्रिवेदींचा रावण आवडला होता. नुसता शिवभक्त दिसायला राकट असू शकतो पण रावण दशग्रंथी ब्राह्मण, लंकेचा राजा होता. विद्वत्तेचं तेज व राजस (गोंडस नाही) रूप अपेक्षित आहे मला तरी. वाईट कर्म करणार्याचा अवतार सोफिस्टिकेटेड असूच शकतो ना? वेशभुषेतून तो इफेक्ट द्यायची गरज नाही. >>> बरोबर
प्रभास कुणाला त्या जय मल्हार सिरीअलच्या हिरोसारखा नाही वाटला का? >>> मला आधी तोच वाटला.
प्रभास तसा दिसतो आणि जय
प्रभास तसा दिसतो आणि जय मल्हार चा हिरो इथे हनुमान आहे ना बहुतेक.
मला आधी देवदत्त नागे ला इतकी मोठी भूमिका मिळाली रामाची म्हणून भरून आलं
मग बारकाईने पाहिल्यावर प्रभास आहे कळलं
ही सीता 'मेरी चुनर उड उड जाए'
ही सीता 'मेरी चुनर उड उड जाए' मधली लॅव्हेंडर साडी रिसायकल करून घालते. राम एक्सट्रॅक्शन मधल्या हेम्सवर्थ भाऊ सारखा पाण्याखाली तप करतो. राक्षस इ मार्व्हलच्या शांग-ची मधले उरले-सुरले ऑडिशन न पास झालेले आहेत. आणि एवढ्या सगळ्याला लंकेतील सोन्याच्या विटांनी फायनान्स केलं म्हणून काळी लंका नशीबात. ह्या सिनेमाचे नाव "राम रक्षा" हवे... राम आणि त्याची राखरांगोळी!!!!
ट्रेलर कसा वाटला धाग्यात काही
ट्रेलर कसा वाटला धाग्यात काही लोक टिझर पाहून चर्चा करत आहेत.
पूर्वीची मायबोली राहिली नाही खरंच.
एवढे बोलून माझ्या पुरते आदिपुरुष पुराण समाप्त.
<<"राम रक्षा" हवे... राम आणि त्याची राखरांगोळी!!!!>>
एवढे बोलून माझ्या पुरते
एवढे बोलून माझ्या पुरते आदिपुरुष पुराण समाप्त. >> अगदी अगदी! हे मुकूट-शेपटी ऑप्शनल असलेले हणमंत-सुग्रीव नि पुष्पक विमान ऐवजी कॉम्प्लान बळजबरी पाजलेलं वटवाघूळ केवळ अस्मिताच बघू जाणे. ती लिहील तो रिव्ह्यू वाचेन. माझ्यापुरतेही समाप्त!!
सीतेचे कपडे ऑथेंटिक दाखवा
सीतेचे कपडे ऑथेंटिक दाखवा म्हणणाऱ्यांनो, पुराण काळात भारतीय स्त्रिया कुठले कपडे घालायच्या ( रादर घालायच्या नाहीत ) याचा विचार करा. राजा रविवर्मा यांची चित्रं विसरा आणि अजंता मधली ऑथेंटिक वेशभूषा असलेली चित्रं बघून या. मग आपल्या मताचा पुनर्विचार करा.
पुष्पक विमान ऐवजी कॉम्प्लान
पुष्पक विमान ऐवजी कॉम्प्लान बळजबरी पाजलेलं वटवाघूळ >>>
म्हणजे युद्ध संपल्यावर राम/सीता/लक्ष्मण्/हनुमान इ. वटवाघळावर बसून अयोध्येत येणार ?
कॉम्प्लान बळजबरी पाजलेलं
कॉम्प्लान बळजबरी पाजलेलं वटवाघूळ >>>
उंदीरमिश्रीत वटवाघूळ म्हणायचंय का तुम्हाला?
बिचारं पुष्पक विमान…. त्याला कुणी वालीच नाही वाटतं.
Pages