आजचा विषय:- माझं झाड माझी आठवण
चिंगीनं लावलं एक झाड,
झाडाला म्हणाली लवकर वाढ.
आठवतायत ना बालभारतीतल्या या ओळी
सकाळी उठल्या उठल्या किंवा दमूनभागून आल्यावर हातात चहा/कॉफीचा कप घेऊन जेव्हा आपली नजर गॅलरीतल्या/ अंगणातल्या झाडाकडे जाते तेव्हा किती प्रसन्न वाटतं! ताजी, टवटवीत पानं ,फुलं बघून सगळा शीणवटा निघून जातो. जागा आणि आवड असेल तशी आपण झाडंझुडं लावतो. त्यांना ओंजारतो - गोंजारतो. ती पण भरभरून रंगीत, सुंगंधी दान आपल्या पदरात टाकतात. पूर्वी चाळीत डालडाच्या डब्यात एखादी तुळस तरी नक्की डोलत असायची. मग आता उचला कॅमेरा आणि करा क्लिक. तुम्ही लावलेल्या, तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही झाडाचा फोटो आणि माहीत असेल तर त्याचं नाव इथं द्या आणि हो झब्बूशी निगडित असेल तर तुमची आठवण/प्रसंग/गंमत लिहायला विसरू नका.
मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
६.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
पुलाखालून बरंच पाणी वाहून
पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. बर्याच दिवसांनी त्या दोघी (मगरींना) निवांत वेळ मिळाला होता. इतक्यात एकीचे लक्ष तिकडे गेले. हे काय ?! चक्क Brachiosaurus झाडाची पानं खातो आहे! .......
हजार तुकड्यांचं हे झाड चालेल
हजार तुकड्यांचं हे झाड चालेल का

मै
मै
पुलाखालून बरंच पाणी वाहून
पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. बर्याच दिवसांनी त्या दोघी (मगरींना) निवांत वेळ मिळाला होता. इतक्यात एकीचे लक्ष तिकडे गेले. हे काय ?! चक्क Brachiosaurus झाडाची पानं खातो आहे! ...... >>>
मै
(No subject)
(No subject)
मैत्रेयी..... too good!
मैत्रेयी..... too good!
ब्रिस्बेनच्या स्प्रिंगब्रूक
ब्रिस्बेनच्या स्प्रिंगब्रूक नॅशनल पार्क मध्ये हे ऋषितुल्य झाड आहे. ह्याचे वय वर्षे २०००(+) , नाव 'अंटार्क्टिक बीच'. ह्या झाडाला मिठी मारून शांत उभं राहिले काही क्षण, घनदाट, गर्द राईतून झिरपणारा सूर्यप्रकाश, पानांची सळसळ, पक्षांचे आवाज, स्वत:चाच ऐकू येणारा श्वास आणि ह्या सगळ्याला व्यापून उरलेली शांतता. भन्नाट अनुभव होता.
पुण्याजवळ मुळशी च्या एका
पुण्याजवळ मुळशी च्या एका देवराईमध्ये अशी एक वेळ होती. आता आहे कि नाही माहित नाही. ही आहे ब्रिस्बेनच्या जवळ असलेल्या मलेनी (Maleny ) मधील मेरी क्रेनक्रॉस बागेतील वेल .
(No subject)
कंपोस्ट मधून आलेलं हे झाड,
कंपोस्ट मधून आलेलं हे झाड, खूप वर्ष कशाचं असेल ही उत्सुकता होती.
झाडाच्या पानांचा फोटो घेउन गुगल करायच्या ऐवजी त्याला फुलं/फळ धरे पर्यंत वाट पहायचं ठरवलं.
आणि काही वर्षांनंतर हे झाड पेअरने लगडलं.
झाडाने केलेली पेअरची कमान
ssj कसलं झाड आहे?
ssj कसलं झाड आहे?
पल्वली सही
पुणेकर जबरीच पेशन्स
एकसे एक फोटो.
एकसे एक फोटो.

कोल्हापूरच्या कण्हेरी मठातील एक झाड
रेडवुड ट्रेलवर काढलेला फोटो.
रेडवुड!
अवल,
अवल,
कसले झाड आहे माहित नाही. सॅन दिएगोच्या झू मधल्या कॅक्टस गार्डन मधे फोटो काढलाय.
अरे कसले मस्त फोटो आलेत वर..
अरे कसले मस्त फोटो आलेत वर..
घनदाट जंगलात गेल्याचा फील आला या पानावर..
(No subject)
अनामिका मस्तच
अनामिका मस्तच
पुण्याजवळ भोरच्या पुढे एका
पुण्याजवळ भोरच्या पुढे एका मोकळ्या माळरानावर हे एकच झाड डौलाने उभे आहे
आहाहा एकदम.
आहाहा एकदम.
कुठलेही फोटो झब्बु खेळ मनाला फार आनंद देतात.
मायबोलीकर गणेशोत्सव टीम आणि भाग घेणारे मायबोलीकर सर्वांना धन्यवाद.
हिमालयातील एका डोंगर
हिमालयातील एका डोंगर उतारावरची वृक्षराजी
अवलताई एकदम हिरवागार फोटो.
अवलताई एकदम हिरवागार फोटो.
अवल ताई - थँक्यु. चुकलेला तो
अवल ताई - थँक्यु. चुकलेला तो फोटो.
आता बदललाय.
(No subject)
अगदी घरासमोर असलेलं आणि
अगदी घरासमोर असलेलं आणि स्प्रिंग मध्ये अतिशय सुंदर दिसणारं माझं फेव्हरेट झाड

सगळेच फोटो फार सुंदर
सगळेच फोटो फार सुंदर
मीपु, पेअरचं झाड सहीच!
मीपु, पेअरचं झाड सहीच!
माधुरी आहा
माधुरी आहा
बर्फाचे झाड
बर्फाचे झाड
Pages