शब्दखेळ उखाण्यांचा

Submitted by संयोजक on 3 September, 2022 - 00:28

उखाणा - नावातच सगळं आहे .
कविता, लावण्या, विडंबन करण्यात मायबोलीकर माहिर आहेतच. आता होऊदे जल्लोष गमतीदार उखाण्यांचा.

कुणी खावा पेरू, कुणी खावा डाळिंब
माबोवर मात्र सोलून द्यावं लागतं संत्र
डू आयडी हाताळायचं एकदा जमलं तंत्र
की मिळतो धागा भरकटवायचा मंत्र

कुणी म्हणा भारी पुण्याची मिसळ
कुणी म्हणा भारी मुंबईचा वडापाव
चला घ्या पटकन उखाणा, जास्त खाऊ नका भाव

नियमः

१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) उखण्यात मायबोलीचे नाव येणे अपेक्षित आहे.
३) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साता डोंगरांपलिकडे सात तळी
सात तळ्यांमधे सात कमळे
सात कमळांवर उडती सात भुंगे,
केवळ मायबोलीकरच रसिक
बाकी सगळे लुंगेसुंगे

मायबोलीवर function at() { [native code] }त टंकताना होतो प्र्वाब्लेम! >> हपा ... Lol

सी, भारी आहेत उखाणे.

सणासुदीची लगबग, दरवळला फुलांचा सुवास
मायबोलीवर आलो अन माझ्या बिजागऱ्या गंजून खल्लास

धमाल चाललीय इथे.

संयोजक , हा धागा सार्वजनिक करा. ग्रुपपुरताच मर्यादित आहे.

सकाळ झाली
कंप्यूटरवर बोटं फिरली
नेहेमी प्रमाणे पहिली
मायबोली उघडली.

मायबोलीची घेतली अलाबला
मोहरी अन मीठ ओवाळून टाकलं
देखण्या मायबोलीला निरखून पाहिलं अन् मग
ड्युआय अन् राजकारणाचं तीट तिच्या गालावर लावलं

सगळेच उखाणे मस्तच.

माबो वर बागडण्याचा वेळ जात नाही व्यर्थ ।
रच्याकने आणि दिवे घ्या चा फक्त इथेच कळतो अर्थ ।।

मायबोली गणेशोत्सवाचे आहेत उपक्रम आणि स्पर्धा
त्यासाठी लिहीताना जीव होतो अर्धा

काहीच कंमेटस् आल्या नाही तर
जीव होतो खाली वर

कोणी केल्या कंमेटस् तर बरं का
जीव होतो पिसासारखा हलका

माबोच्या पाळण्यात आल्याआल्याच दिसतात काही आयडींचे पाय
सकाळ पासुन कुठ दिसत नाहीयेत वेमांना प्यारे झाले की काय?

वार्‍यात वारा थंडगार वारा
चार्‍यात चारा हिरवा चारा
सर्वच मायबोलीकर तसे महान पण
सर्वात स्पेशल आहे आयडी तिनशेच्यापुढे तेरा

सगळेच Lol

मामीने केला 'मी मी' पणा, मग मागे कशी राहू, Light 1
मायबोलीवर आयडी स्पेशल साडेतीनशे शून्य नऊ.

गवळ्याने आणला चिक की त्याचा करतात खरवस
मायबोलीकरांना का आठवेना कॉलेजचे मोरपिशी दिवस

निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे, काढते जुने लेख वर
रेसिपी स्पर्धक आहेत कमी, घाबरले सर्व फूड ब्लॉगर

निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे, काढते जुन्या कथा वर
शशकच लिहीले कुणी शंभर, अरे आता तरी आवर....

निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे, काढते जुन्या कविता वर,
इतर उपक्रम अवघड मात्र उखाण्यात वावर इज अवर...

चाफ्याच्या झाडाखाली टपटप पडती साडीवरती प्राजक्ताची फुले (संदर्भ : साडी धागा .रचना.)
मायबोलीच्या गणेशोत्सवाला भरभरून प्रतिसाद देती लहानथोर औssssर मुले

Pages