Submitted by संयोजक on 3 September, 2022 - 00:28
उखाणा - नावातच सगळं आहे .
कविता, लावण्या, विडंबन करण्यात मायबोलीकर माहिर आहेतच. आता होऊदे जल्लोष गमतीदार उखाण्यांचा.
कुणी खावा पेरू, कुणी खावा डाळिंब
माबोवर मात्र सोलून द्यावं लागतं संत्र
डू आयडी हाताळायचं एकदा जमलं तंत्र
की मिळतो धागा भरकटवायचा मंत्र
कुणी म्हणा भारी पुण्याची मिसळ
कुणी म्हणा भारी मुंबईचा वडापाव
चला घ्या पटकन उखाणा, जास्त खाऊ नका भाव
नियमः
१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) उखण्यात मायबोलीचे नाव येणे अपेक्षित आहे.
३) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साता डोंगरांपलिकडे सात तळी
साता डोंगरांपलिकडे सात तळी
सात तळ्यांमधे सात कमळे
सात कमळांवर उडती सात भुंगे,
केवळ मायबोलीकरच रसिक
बाकी सगळे लुंगेसुंगे
मायबोलीवर function at() {
मायबोलीवर function at() { [native code] }त टंकताना होतो प्र्वाब्लेम! >> हपा ...
सी, भारी आहेत उखाणे.
मामी उखाण्याला भारी म्हणाली,
मामी उखाण्याला भारी म्हणाली, आनंद झाला असा अनावर,
सकाळ आणि विबासं चे गारूड, अजून मायबोलीच्या मनावर.
सगळेच एक से एक आहेत
सगळेच एक से एक आहेत
सणासुदीची लगबग, दरवळला
सणासुदीची लगबग, दरवळला फुलांचा सुवास
मायबोलीवर आलो अन माझ्या बिजागऱ्या गंजून खल्लास
मजा आली. मस्त उखाणे सगळ्याचे!
मजा आली. मस्त उखाणे सगळ्याचे!
धमाल चाललीय इथे.
धमाल चाललीय इथे.
संयोजक , हा धागा सार्वजनिक करा. ग्रुपपुरताच मर्यादित आहे.
सगळेच
सगळेच
सकाळ झाली
सकाळ झाली
कंप्यूटरवर बोटं फिरली
नेहेमी प्रमाणे पहिली
मायबोली उघडली.
भारी आहेत सगळेच उखाणे
भारी आहेत सगळेच उखाणे
नताशाला मम.
नताशाला मम.
ध मा ल
ध मा ल
मायबोलीची घेतली अलाबला
मायबोलीची घेतली अलाबला
मोहरी अन मीठ ओवाळून टाकलं
देखण्या मायबोलीला निरखून पाहिलं अन् मग
ड्युआय अन् राजकारणाचं तीट तिच्या गालावर लावलं
सगळेच उखाणे मस्तच.
सगळेच उखाणे मस्तच.
माबो वर बागडण्याचा वेळ जात नाही व्यर्थ ।
रच्याकने आणि दिवे घ्या चा फक्त इथेच कळतो अर्थ ।।
मायबोली गणेशोत्सवाचे आहेत
मायबोली गणेशोत्सवाचे आहेत उपक्रम आणि स्पर्धा
त्यासाठी लिहीताना जीव होतो अर्धा
काहीच कंमेटस् आल्या नाही तर
जीव होतो खाली वर
कोणी केल्या कंमेटस् तर बरं का
जीव होतो पिसासारखा हलका
माबोच्या पाळण्यात आल्याआल्याच
माबोच्या पाळण्यात आल्याआल्याच दिसतात काही आयडींचे पाय
सकाळ पासुन कुठ दिसत नाहीयेत वेमांना प्यारे झाले की काय?
(No subject)
वार्यात वारा थंडगार वारा
वार्यात वारा थंडगार वारा
चार्यात चारा हिरवा चारा
सर्वच मायबोलीकर तसे महान पण
सर्वात स्पेशल आहे आयडी तिनशेच्यापुढे तेरा
मामीने केला 'मी मी' पणा, मग
सगळेच
मामीने केला 'मी मी' पणा, मग मागे कशी राहू,
मायबोलीवर आयडी स्पेशल साडेतीनशे शून्य नऊ.
गवळ्याने आणला चिक की त्याचा करतात खरवस
मायबोलीकरांना का आठवेना कॉलेजचे मोरपिशी दिवस
कालिंदीत कालिया, कालियावर
कालिंदीत कालिया, कालियावर बाळकृष्ण उभा
माबो-संयोजकांना नाही गणेशोत्सवात, खेळायची मुभा
मायबोली संयोजक मंडळात जायचा
मायबोली संयोजक मंडळात जायचा कैफ अगदी आगळा
पोस्टी मारता न आल्याने सामो जणू पाण्याशिवाय बगळा.
सामो, तुझ्या उखाण्यात
सामो, तुझ्या उखाण्यात 'मायबोली' आले नाही. तुझा उखाणा संयोजक बाद करतील

टाकला गं
टाकला गं

निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे
निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे, काढते जुने लेख वर
रेसिपी स्पर्धक आहेत कमी, घाबरले सर्व फूड ब्लॉगर
निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे, काढते जुन्या कथा वर
शशकच लिहीले कुणी शंभर, अरे आता तरी आवर....
निमित्त आहे माबो गणेशोत्सवाचे, काढते जुन्या कविता वर,
इतर उपक्रम अवघड मात्र उखाण्यात वावर इज अवर...
सगळेच भारी आहेत... पण..
सगळेच भारी आहेत... पण..
बार्सिलोना, साष्टांग दंडवत कुबूल करो!
वाह वाह सी, एकसे एक उखाणे.
वाह वाह सी, एकसे एक उखाणे.
ओ सामो. संयोजकांना खेळता येत
ओ सामो. संयोजकांना खेळता येत नाही का म्हणताय? खेळा की बिनधास!
(No subject)
चाफ्याच्या झाडाखाली टपटप पडती
चाफ्याच्या झाडाखाली टपटप पडती साडीवरती प्राजक्ताची फुले (संदर्भ : साडी धागा .रचना.)
मायबोलीच्या गणेशोत्सवाला भरभरून प्रतिसाद देती लहानथोर औssssर मुले
सगळे उखाणे मस्त! ध मा ल धागा
सगळे उखाणे मस्त! ध मा ल धागा आहे हा!
Pages