लेकीची चित्रकला - तिने काढलेले स्केचेस

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 August, 2022 - 13:23

हा या विभागातील माझा दुसरा धागा. हा देखील लेकीच्याच कौतुकात काढला आहे Happy
पहिला धागा लेकीने घरी रंगवलेल्या पणत्यांचा होता - https://www.maayboli.com/node/77232

तशी चित्रकला हस्तकलेची तिला उपजतच आवड असली तरी मधल्या काळात तिने फार काही ती जोपासली नव्हती वा यात काही विशेष प्रगती नव्हती. कोणाचा बड्डे आला तर एखादे ग्रीटींग तेवढे बनवायची.

पण नुकतेच गेल्या काही दिवसात अचानक पुन्हा काहीतरी गिरगटवायला सुरुवात केली. जे आधीपेक्षा नेक्स्ट लेव्हलला गेलेय हे जाणवले.
तेच शेअर करायला हा धागा.

जर हि आवड पुढेही कायम राहीली तर यात आणखी काय करता येईल यावर तज्ञ आणि जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आवडेल Happy

-------------------------------------------------

हे एक सायन्स पोस्टर - हे तिच्या शाळेतही बोर्डावर लावले आहे - हे मला त्या दिवशी पॅरेंट टीचर मिटींगला गेलो तेव्हा समजले Happy

science poster.jpg

हा असाच फावल्या वेळेतला चाळा. अशी चित्रे कोणीही काढली की मला त्यांच्या चिकाटीचे कौतुकच वाटते Happy

fine art.jpg

हे आपले असेच, मध्यंतरी काही नाही सापडले तर एक बंद मोबाईल रंगवून काढला. आता तो घेऊन खोटे खोटे बोलायची स्टाईल मारत रस्त्याने फिरतेही Happy

mobile painting.jpg

आणि हे नुकतेच काढलेले स्केचेस, ज्यामुळे कौतुकाने हा धागा काढावासा वाटला. जवळपास दहाबारा स्केचेस एकाच बैठकीत आणि पटापट काढलेली आहेत. काही कलर केलेलेही आहेत. काही स्केचेसचे मूळ चित्रासोबत कोलाज केले आहे. कारण मला चित्रकलेतील काही कळत नसले तरी मूळ चित्राचीच साईज आणि प्रपोर्शन हे माझ्या ईंजिनीअर मनाला फार भावले Happy

स्केचेस १

sketches 1.jpg

स्केचेस २

sketches 2.jpg

स्केचेस ३

sketches 3.jpg

स्केचेस ४

sketches 4.jpg

स्केचेस ५

sketches 5.jpg

स्केचेस ६

sketches 6.jpg

स्केचेस ७

sketches 7.jpg

स्केचेस ८

sketches 8.jpg

स्केचेस ९

sketches 9.jpg

स्केचेस १०

sketches 10.jpg

स्केचेस ११

colour sketch 1.jpg

स्केचेस १२

colour sketch 2.jpg

स्केचेस १३

colour sketch 3.jpg

कोलाज १

collage 1.jpg

कोलाज २

collage 2.jpg

कोलाज ३

collage 3.jpg

कोलाज ४

collage 4.jpg

कोलाज ५

collage 5.jpg

कोलाज ६

collage 6.jpg

- धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोरीच्या हातात जादू आहे ऋ, तिला प्रोत्साहन, शिक्षण, ट्रेनिंग अस सगळं देऊन खूप मोठी कर+१११११

शाब्बास परी

ती सही करतेय ते इतकं गोड वाटलं ना.

इथं ब-याच जणांनी क्लास लावावा असं सुचवलंय. छानच आहे. पण एक वेगळं मतही नोंदवून ठेवतेय विचार करण्यासाठी.
लहान मुलांना "चित्रकला" शिकवूच नये. म्हणजे ते स्वप्रतिभेनी खूप गोष्टी "नव्या" शोधतात. लहानपणी, दिसतं तसं उतरवणं ह्या फेजमधे त्यांना मुक्त संचार करू देणं ह्यानी त्यांना मजा येते. जसं ते व्याकरण न समजता भाषा उचलतात तसं. सराव मात्र करत रहावं.

पुढे जाऊन मोठं झाल्यावर मग ते शास्त्रशुद्ध शिक्षण वगैरे घ्यावं.

अदिती, ती ८ वर्षांची आहे.

सर्वांंना मनापासून धन्यवाद Happy
सर्वांचे प्रतिसाद वाचायला खूप आवडले. Happy

मेधावि, हो. खरे तर क्लासबाबत माझेही मत असेच आहे. चित्रकला वा डान्स दोन्ही बाबत. किंबहुना कुठल्याही कलेबाबत. या वयात त्यांचे त्यांना शिकू द्यावे. एंजॉय करू द्यावे. त्यातून त्यांची क्रिएटीव्हिटी मुक्तपणे बाहेर पडू द्यावी. पण तेच खेळाबाबत त्यातील तंत्रशुद्धता लहानपणापासूनच शिकवू शकतो. असो, आपली मते चुकीचीही असू शकतात Happy

तरी मायबोलीकर नीलम यांचा क्लास सुचवल्याबद्दल वा क्लास लावायच्या सूचनेबद्दल धन्यवाद. घरी तिला तसे विचारून नक्की बघेन. आजवर तिने असे बरेच क्लास धरून सोडले आहेत. ते डेडिकेशन दाखवणे हा तिचा पिंड नाही. असो, मुलांचे अभ्यासाव्यतीरीक्त ईतर क्लासेस हा एक वेगळ्याच धाग्याचा विषय आहे Happy

@ विक्षिप्त मुलगा,
ते सायन्स पोस्टर तिने कुठूनतरी बघून बनवले आहे. ईतकीही बालवैज्ञानिक नाहीये ती Happy
पण तिला हे पिरीऑडीक टेबल हा प्रकार माहीत आहे. तिच्या मावश्यांच्या रूममध्ये ते लावले आहे. हे सायन्स पोस्टर बनवण्याची प्रेरणाही त्यांच्याकडूनच आली.

@ मनीमोहोर,
हो आताच तिला हे कौतुकाचे प्रतिसाद दाखवले. पण तिच्यापेक्षा जास्त आनंद मलाच होतो. बरंय पण ते एकाअर्थी, कौतुकाने हुरळून जायचा प्रश्नच मिटला.

@ ssj ,
हो जेव्हा घरच्या कोणाच्या बड्डेला केक बनवतो तेव्हा एक छोटासा सजवायला तिलाही हवा असतो हल्ली Happy

@ वावे,
या विषयात मी अगदीच 'ढ' असल्यामुळे मला फार कौतुक वाटतं अशी छान चित्रं काढणाऱ्या मुलांचं!
>>>>>
अगदीच. माझी तर वही फेकण्यात आलीय चित्रकलेची. माझी चित्रे वर्गात दाखवण्यात आली आहेत की अशी चित्रकला नसावी. अजूनही कैक किस्से आहेत ज्यांचा वेगळा धागा निघावा. पण त्यामुळे मलाही चांगली चित्रकला असणार्‍यांचे फार कौतुक वाटते. आणि त्यात आपली मुलगी असल्याचे एक्स्ट्रा कौतुक. त्यामुळे मला धागा काढतानाही प्रश्न पडलेला की नक्की धागा काढावे ईतके कौतुकास्पद ती चित्रे आहेत का आपल्याच भारी वाटत आहेत Happy

नाव सांगण्याची काय गरज आहे? माझी मुलगी म्हणू शकता की. इतकी माहीती कशाला देता? हे माझे वैयक्तिक मत.
उद्या कोणी नेटवरुन तिला शोधून तुमची सर्व माहीती देउन म्हणाले की बाबांनी तुला बोलावले आहे- माझ्याबरोबर चल तर???

@ सामो
ईतके साधेसोपेही नसावे हे आणि माहिती शोधणारे कुठूनही शोधू शकतातच.
बाकी यावर आमच्या घरीही बोलणे होतेच. हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. आणि महत्वाचाही आहे. आपण गणपतीनंतर काढूया ..
काळजीबद्दल मनापासून धन्यवाद Happy

शामली. धन्यवाद Happy
काका होते एक जेजे स्कूलचे स्टुडंट.. आता तुमची पोस्ट पाहून आठवले. त्यांनी काढलेले एक पेंटींग आमच्या घरातही लावले होते. तसेच माझ्या वडिलांकडेही लोकं मोठाले बॅनर बनवायला यायचे. त्यांच्या आर्टीस्टीक अक्षरामुळे.. तिथूनही हे झिरपत आले असावे.. वा आईकडूनही एक भाऊ कलाकार होते. त्यांनीही काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र त्यांच्या घरात होते. आणि वर बायकोच्या बहिणींचा उल्लेख आहेच. उद्या लेकीने यात प्रगती केली तर श्रेय घ्यायला मारामारी होणार आहे घरात Happy

>>>>>> यावर आमच्या घरीही बोलणे होतेच.
होय लहान मुलांना पढवावच लागतं. समजवून सांगावं लागतं की कोणी आलं व म्हणालं चल बाबा वाट बघतायत/ आजारी आहेत वगैरे तर जायचे नाही. कोणीही दिलेला प्रसाद खायचा नाही.
मुद्दा लक्षात आल्याने, हा शेवटचा प्रतिसाद.

हा फावल्या वेळेतील टाईमपास.
पोरगी BTS आणि Black Pink फॅन आहे. मला त्यातले काही कळत नाही. काढलेले चांगले वाटले म्हणून फोटो काढले Happy

IMG_20220918_193154.jpg
.
IMG_20220918_193317.jpg

धन्यवाद धनुडी Happy

मला हा धागा दिसलाच नाही >>> गुलमोहर - ईतर कला ग्रूपचे सदस्यत्व नसल्याने असावे का? या निमित्ताने चेक केले तर समजले गुलमोहर-चित्रकला असाही विभाग आहे. हे खरे तर तिथे हवे होते Happy

या धाग्यातील स्केचेस नंतर थेट काल पुन्हा लेकीला मूड आला आणि हे स्केचेस काढले.

यावेळी कुठे न बघता मनाने काढलेत.
फुलाचा अगदी साधा सिंपल आहे तरी मला आवडलाच.
.

IMG_20230104_224757.jpg

.

IMG_20230104_224613.jpg

.

आणि गणपती तर अगदी माझ्यासारखाच पहिलवान काढला आहे हे विशेष आवडले Proud
तरी तिला गणपती आता बघून काढायला सांगायला हवे.

IMG_20230104_224939.jpg

.

IMG_20230104_224626.jpg

लेकीनेच हे केले.
कुठे नवीन धागा काढणार म्हणून इथेच शेअर करतो.
दिवाळीला असे अजून दोनचार कर म्हटले म्हणजे रात्री इतर लाईट काढून हे लावले की घर जरा मंद प्रकाशात उजळून निघेल Happy

Screenshot_2023-10-27-00-39-22-13_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

Pages