सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.
नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.
नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html
तुम्ही इराकवर हल्ला का केला?
तुम्ही इराकवर हल्ला का केला?
कारण त्यांच्याकडे आण्विक शस्त्रास्त्रे आहेत, असा आम्हांला संशय होता.
तुम्ही रशियावर हला का करत नाही?
कारण त्यांच्याकडे आण्विक शस्त्रास्त्रे आहेत.
असे संवाद असलेलं एक व्यंग्यचित्र पाहिलं होतं.
(No subject)
@भरत
@भरत
'बळी तो कान पिळी' रे बाबा!!!
अण्वस्त्रे तर अमिरिकेकडेही
अण्वस्त्रे तर अमिरिकेकडेही आहेत. आपल्या लोकांवरच्या हल्ल्याची ज्याला फिकीर आहे तो युद्धखोरी करत नाहीये
नंगे से खुदाभी डरता है!!
नंगे से खुदाभी डरता है!!
https://threadreaderapp.com
https://threadreaderapp.com/thread/1500610676926005251.html
https://threadreaderapp.com/thread/1501056474218336257.html
मुकुंद, झंपू च्या पोस्टवरून
मुकुंद, झंपू च्या पोस्टवरून तुम्ही माझी बाजू घेतली, धन्यवाद.
पण अश्या लोकांच्या कडे दुर्लक्ष करायचे असते. असे बरेच लोक असतात, विशेषतः म्हातारे, जे जीवनात मनासारखे झाले नाही की प्रत्येक गोष्टीला नुसत्या शिव्या देत बसतात. बिचारे.
वैयक्तिक शिव्या देणे हा तर मुळी मायबोलीवरच्या धाग्यांचा महत्वाचा भाग आहे. वैयक्तिक शिव्या, विषय भरकटवणे वगैरे प्रकार करून धागा बंद पाडायचा.
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh/ukraine-president-zelensky-says-no-...
युक्रेन कसा सातत्याने
युक्रेन कसा सातत्याने भारताच्या विरोधात उभा आहे - दहशतवाद्यांना समर्थन, अणुस्फोट चाचणीच्या वेळी भारतविरोधी भूमिका असे तीनचार मुद्दे असलेली एक पोस्ट (बहुतेक भारतातून आलेली व्हॉट्स अॅप फॉर्वर्ड नंद्या यांनी आमचा अड्डा या धाग्यावर लिहिली होती. त्यावर त्यांना काही प्रश्न विचारले होते. उत्तर मिळालं नाही, म्हणून इथे विचारतो.
१. १९७१ बांग्लादेश मुक्तियुद्धाच्या वेळी अमेरिकन आरमार पाकिस्तानच्या बाजूने हिंदी महासागरात येऊ पाहत होतं.
२. १९९८ च्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक व अन्य निर्बंध घातले.
३ अमेरिका पाकिस्तानला पैसा आणि शस्त्रे पुरवते जी पाकिस्तान आर्मी भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवाद्यांनाकडे वळवत आली आहे.
यावर मूळचे भारतीय असलेल्या अमेरिकी नागरिक नंद्या यांची भूमिका काय?
त्यांनी लिहिलं की काही झालं तरी मुस्लिम त्यांच्यासाठी परकेच. त्यांची वकिली करणार्यांनी या वाक्याकडे दुर्लक्ष केलं. असो.
त्यांच्या आधी तिथे आलेले अमेरिकन त्यांना (नंद्या यांना) आपलं मानतात का? त्यांनी आपलं मानावं यासाठी काही विशेष करावं लागलं का?
मुस्लिम परके तसे ख्रिस्तीही परके आहेत की नाही? की त्यांना आपलं मानलं? असेल तर का?
मी वर दिलेल्या दोन ट्विटर
मी वर दिलेल्या दोन ट्विटर थ्रेड्सपैकी एक रशियाच्या माजी संरक्षणमंत्र्याने लिहिलं आहे.
दुसरं शिवम शंकर सिंग यांचं आहे. The Art of Conjuring Alternate Realities हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे.
रशियापुतिन अमेरिका व मित्र राष्ट्रांना युक्रेनमध्ये उतरण्यापासून रोखण्यासाठी काय करतो आहे, याचं विवेचन त्यांनी केलं आहे. संकल्पना - Reflexive Controlअफगाणिस्तान मधील कंधार मध्ये
अफगाणिस्तान मधील कंधार मध्ये भारतीय विमान हायजॅक करून नेणाऱ्या अतेरिक्यांतील जहुर मिस्त्री ला पाकिस्तान मध्ये कोणीतरी गोळ्या घातल्या आणि 72 हुरो कडे पाठवून दिले .
पाकिस्तानी न्यूज चॅनेल्स ने रॉ च्या नावाने शिमगा चालू केला आहे , यात रॉ चा हात असेल तर प्रत्येक भारतीयांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे .
जयसिंग, इथे का टाकले आहे ?
जयसिंग, इथे का टाकले आहे ? पाकिस्तानमधील घटनेचा युक्रेनशी काय संबंध आहे ?
मुकुंद तुमची पोस्ट पटली. युरोप रशियाच्या एनर्जीला घेणे थांबवत नाही तोपर्यंत काही होणार नाही.
रशियन नागरिकांचे हाल होतील.
त्या साठी वेगळा धागा
@ कॉमी ,
त्या साठी वेगळा धागा काढण्यात काय हशील ?
म्हणून टाकले ईथे !
पाकिस्तान ची विद्यार्थीनी
त्याच प्रमाणे बांगलादेश च्या विद्यार्थ्यांना आणल्या बद्दल त्यांच्या पंतप्रधान ने ही भारत सरकार ला धन्यवाद दिले आहेत .
विद्यार्थ्यांना भारतात आणण्याच्या प्रक्रियेत अतिउत्साही मंत्र्याच्या त्रुटी मोठ्या करून दाखवणाऱ्यांच्या नजरेतून या दोन सकारात्मक बातम्या निसटणे साहजिकच आहे ....
युक्रेन प्रेसिडेंटने
युक्रेन प्रेसिडेंटने अमेरीकेला विचारले की नाटोचे सैनिक मदतीला कधी येणारेत ? तर त्यांना हे उत्तर मिळाले म्हणे
https://www.youtube.com/watch?v=S2NMbJteP0Q
युद्धात काय झालं, काय होणार..
युद्धात काय झालं, काय होणार....
युक्रेन हरलं, युक्रेनियन जिंकले.... रशिया जिंकले, रशियन हरलें.... दोन्ही देशातील आणि इतर परिस्थितीवर अवलंबून असलेले इतर देशातील नागरिक यात भरडले गेले. काही भिकेला लागलें आणि काही .....
झंपु दामलु, हा प्रश्न तुम्ही
झंपु दामलु, हा प्रश्न तुम्ही मला विचारला नाही आहे.
त्याला कारण आहे. नंध्या उर्फ झक्की हा आयडी मायबोलीवर सतत भारतीय लोकांना कमी लेखणारे कुत्सित प्रतिसाद देत असतो. मागे एकदा त्याने विशिष्ट समाजाला "आरक्षण मागणारे भिकारी" असे म्हणले होते. ह्या कारणासाठी त्याला बाहेर हाकलले होते. तो प्रतिसाद त्याच्यासाठी खास होता. तुम्हाला उडते रजक घ्यायचे असल्यास हरकत नाही.
पोटापाण्यासाठी बाहेरच्या देशात जाऊन मायभूमीबद्दल झक्कीजंत सारखे विचार असल्यास तो प्रतिसाद तुम्हालाही लागू
रश्मी, तुम्हांला विनोद
रश्मी, तुम्हांला विनोद सुचताहेत म्हणून हे खास तुमच्यासाठी. पुतिनने दक्षिण युक्रेनमधल्या एका शहरातील मॅटर्निटी आणि पेडियाट्रिक हॉस्पिटलवर बाँबवर्षाव केलाय. व्हिडियो नक्की बघा.
भरत, अहो हा विनोद नाही.
भरत, अहो हा विनोद नाही. दुसर्यावर विसंबुन राहीले की कसे तोंडघशी पडतो हे ते विदारक सत्य आहे. अमेरीका अन ब्रिटन दोघांना सवयच आहे दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वागायची. त्यांनी युक्रेनला नष्ट करण्यात हातभार लावलाय. तुम्ही समजता तेवढी मी निर्दयी नाही. पण जे आपल्या हातात नाही किंवा जे आपण थांबवुच शकत नाही तिथे हताश होण्या पलीकडे दुसरे काय करणार? आणी यात युक्रेनवर विनोद नाहीये तर अमेरीकेवर आहे. जे जमिनीवरचे युद्ध कधीच लढु शकले नाहीत, कायम पराभूत होऊनही ते धडा शिकत नाहीत. इराक उध्वस्त करुन झाले आता युक्रेन.
याच अमेरीकेच्या शस्त्रास्त्र दलालांनी प्रेसीडेंट केनेडींना मारले ज्यांनी युद्ध नको शांतता हवी असे म्हणले होते.
“त्यांची वकिली करणार्यांनी”
“त्यांची वकिली करणार्यांनी” हे लिहीणारे स्वतः मात्र आपण भारतिय मुस्लिमांचे/सगळ्या सेक्युलर लोकांचे अधिकृत वकिल असल्याच्या थाटात बोलत आहेत आणी हे त्यांच्या गावीही नाही!
झंपु, अहो मी काय माझ्या मातृभुमीबद्दल विचार मांडणार? माझे जिथे इतके वर्ष वास्तव्य नाही , जिथल्या राजकारणाची व घडामोडींची मला फक्त इंटरनेट वरुनच माहीती मिळत असते. तसल्या बिनभरवशाच्या व टेंटेड माध्यमाने मिळणार्या माहीतीवरुन कुठले ठाम विचार/ मते तर सोडाच पण मातृभुमीबद्दल साधे कॉमेंट करायची सुद्धा माझी लायकी नाही इतके समजण्याइतकी अक्कल नशिबाने मला आहे.
पण ज्या लोकांनी कधी अमेरिकेच्या भुमीवर उभ्या आयुष्यात पाय टाकला नसेल तरी पण इथे अमेरिकेविषयी बिनधास्त असे काही विचार मांडतात, असे काही तारे तोडतात, असे काही प्रश्न विचारतात की जणु काही यांच्या सात पिढ्या अमेरिकेत गेल्या आहेत. ते विचार वाचुन, ते प्रश्न वाचुन त्यांच्या त्या धाडसाचे कौतुक करावे की कीव करावी हा प्रश्न अश्या पोस्टी वाचुन मला नेहमी पडतो.
बाकीच्या धाग्यावर झालेल्या मानापमानाचे उट्टे व प्रश्न/ प्रतिप्रश्न यामधे या धाग्याचा मुळ विषय भरकटत चालला आहे. मी त्यात अजुन भर घालु इच्छित नाही. बाकी चालु द्यात. शुभेच्छा!
ते प्रश्न वाचुन त्यांच्या
ते प्रश्न वाचुन त्यांच्या त्या धाडसाचे कौतुक करावे की कीव करावी हा प्रश्न
सध्या कीव नका करू. तिथे रशिया कडून बॉम्बहल्ले होत आहेत. तुम्ही जरा थंड घ्या. आधीच लिहिले आहे की तो प्रतिसाद तुमच्या साठी नव्हता.
मुकुंद, ते म्हातारं काय काय
मुकुंद, ते म्हातारं काय काय बावचाळल्यागत बोलत लिहत असतंय ते एकदा वाचून बघा. बहुतेक तुम्हाला त्याच्या कमेंट्स ठाऊक नसाव्यात म्हणून सांगितलं. माहित असेल तर राहिलं
अजून एक इसीस ही मानवतावादी
तालिबान नंतर अजून एक इसीस ही मानवतावादी एन जी ओ रशिया युक्रेन युद्धात उतरली आहे !
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही काफिर देश असून एकमेकांत लढून संपतील आणि ते इस्लाम धर्मासाठी चांगले आहे " थोडक्यात इस्लाम धर्मियांनी या युद्धात भाग घेऊ नये असे आवाहन इसीस या एन जी ओ ने केलेलं दिसतंय !
झम्पू, फिल्मी आणी इतर
झम्पू, फिल्मी , भरत आणी इतर
माझे मायबोलिवर कोणाशीच वैयक्तिक शत्रुत्व नाही आणी यापुढेही करण्याची इच्छा नाही.
अमेरिका जे काही करते ते सगळेच चांगले/ बरोबर करते असा दावाही मी करत नाही अथवा करणार नाही. पण त्या बाबतीत सकारात्मक व खुली चर्चा करायची माझी नेहमी इच्छा असते. तशी विचारांची देवाणघेवाण करायला मी केव्हाही तयार आहे.
पण ज्यांना फक्त पुर्वग्रहावर आधारुन, अर्धवट माहीतीवरुन नुसते अमेरिका बॅशींगच करायचे असेल,वैयक्तिक ताशेरे झाडायचे असेल तर तर मला त्यात रस नाही. म्हणुन माझ्या वरच्या पोस्टीत मी तुमचे चालु द्यात असे म्हणालो.
मी अश्या मताचा आहे की प्रत्येक माणसाकडुन काहीतरी घेण्यासारखे/ शिकण्यासारखे असते. खासकरुन आपल्या मायबोलीवर खरच खुप हुशार व अनेक प्रकारचे गुण असलेले सभासद आहेत. त्यामुळेच मायबोलीवर येणे हा एक चांगला अनुभव असतो.
मुकुंद, स्पेसिफिकली नंद्या
मुकुंद, स्पेसिफिकली नंद्या यांना उद्देशून असलेल्या कमेंटला तुम्ही उत्तर दिलंत, म्हणून वकिली करणारे असे शब्द वापरले.
मी स्वतःला सेक्युलर समजतो आणि भारतीय मुस्लिमांची बाजू घेऊन बोलतो. त्यासाठी मला या कोणाचे अधिकृत वकील असायची गरज नाही.
<अहो मी काय माझ्या मातृभुमीबद्दल विचार मांडणार? माझे जिथे इतके वर्ष वास्तव्य नाही , जिथल्या राजकारणाची व घडामोडींची मला फक्त इंटरनेट वरुनच माहीती मिळत असते. तसल्या बिनभरवशाच्या व टेंटेड माध्यमाने मिळणार्या माहीतीवरुन कुठले ठाम विचार/ मते तर सोडाच पण मातृभुमीबद्दल साधे कॉमेंट करायची सुद्धा माझी लायकी नाही इतके समजण्याइतकी अक्कल नशिबाने मला आहे.> हे तुम्ही जे लिहिलंत त्याबद्दल _/\_. हे सगळं नंद्या यांनाही लागू होतं. पण ते उठसूट आपल्या मातृभूमीबद्दल कमेंट्स करत असतात आणि त्यातल्या बहुतेक तुच्छतापूर्ण असतात. तुम्हांला असलेली अक्कल नंद्या यांना नाही, असं लिहिलं तर वेबमास्तर माझा आयडी उडवतील.
मी नंद्या यांना विचारलेले प्रश्न त्यांच्याच एका कमेंटला अनुसरून आहेत. त्यासाठी मला अमेरिकेत राहण्याची गरज नाही. अमेरिका भारत संबंधांबद्दल भारतात राहून मला जितकी माहिती आहे, ती ते प्रश्न विचारायला पुरेशी आहे. ते अमेरिका बॅशिंग नाही. त्यांचा दुटप्पीपणा त्यांनाच दाखवून द्यायचा आहे.
माझेही तुमच्याशी शत्रुत्व नाही किंवा करायची इच्छा नाही. तुम्ही लिहिलेल्या काही पोस्टी वाचल्या आहेत आणि तुमच्याबद्दल आदरच आहे.
<<<<मुकुंद, ते म्हातारं काय
<<<<मुकुंद, ते म्हातारं काय काय बावचाळल्यागत बोलत लिहत असतंय ते एकदा वाचून बघा. बहुतेक तुम्हाला त्याच्या कमेंट्स ठाऊक नसाव्यात म्हणून सांगितलं. माहित असेल तर राहिलं >>>
Filmy on यांना सत्य कळले.
अज्ञान हे कलहाचे मूळ कारण आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल काही लिहीणे या आधी त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करणे वगैरे शक्य नसते.
त्या व्यक्तीने जे लिहीले त्याचा जसा अर्थ त्यांना कळला, त्याप्रमाणे ते लिहितात.
आणि ते रागावले म्हणून मीहि रागवावे का? जागतिक घडामोडींवर चर्चा करणारे असे एखाद्या माणसामुळे दुखावत असतील, तर कठीण आहे.
फेकुलर लोकांशी इतक्या संयमाने
फेकुलर लोकांशी इतक्या संयमाने चर्चा करणाऱ्यांची सहनशक्ती दाद देण्यासारखी आहे !
वा ....
<त्या व्यक्तीने जे लिहीले
<त्या व्यक्तीने जे लिहीले त्याचा जसा अर्थ त्यांना कळला, त्याप्रमाणे ते लिहितात.>
बरोबर आहे. तुमच्या लिखाणात डार्क ह्युमर असतो असं मागे काहींनी लिहिलं होतं. मला आणि इतर काहींना तो कळला नव्हता. त्यामुळे तुम्हांला
बराच त्रास झाला होता.
<<<पोटापाण्यासाठी बाहेरच्या
<<<पोटापाण्यासाठी बाहेरच्या देशात जाऊन मायभूमीबद्दल झक्कीजंत सारखे विचार असल्यास तो प्रतिसाद तुम्हालाही लागू>>>
अहो ते पोटापाण्यासाठी आलेले १९९० नंतरचे. त्यातले बरेचसे भारतीय कंपन्यांचे नोकर म्हणूनच अमेरिकेत आले.
तुम्हाला पण संधि मिळेल. जळू नका, वाट बघा.
आम्ही ५० वर्षांपूर्वी आलो, तेंव्हाची कारणे तेंव्हा तिथे असलेल्या, शिक्षण घेऊ इच्छिणार्यांनाच माहित.
आम्ही ५० वर्षांपूर्वी आलो,
आम्ही ५० वर्षांपूर्वी आलो,
म्हणून देशवासीयांबद्दल काहीही लिहायची परवानगी मिळाली का?
Pages