नमस्कार मंडळी,
जगभरात पसरलेल्या मराठी मायबोलीने मराठी माणसांना मायबोलीच्या प्रेमळ धाग्यात गुंफलं आहे. हे अंतर कमी करण्यासाठी आपल्या मायबोली वर साजरे होणारे उत्सव, उपक्रम ह्यांचा महत्वाचा वाटा आहेच.
नवीन आव्हाने स्वीकारत मायबोली वरचे उपक्रम केवळ लिखित स्वरुपात न ठेवता, मायबोलीवरचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी एक माध्यम वापरायचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून आपण करत आहोत.
त्यासाठी ह्या वर्षीही म भा दिनाच्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत "साहित्यवाचन "/ "अभिवाचन" हा उपक्रम. जालीय जगातील आयडींच्या आजवर केवळ लिखाणावरून असणाऱ्या ओळखीला आता आवाज, कदाचित चेहरा सुद्धा मिळेल.
उपक्रमाचे स्वरूप-
उपक्रमात भाग घेणाऱ्या सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या कोणत्याही साहित्याचे अभिवाचन करून ते रेकॉर्डिंग आमच्याकडे पाठवायचे आहे.
हे रेकॉर्डिंग मायबोलीच्या युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात येईल.
हे रेकॉर्डिंग दृकश्राव्य (व्हिडीओ) असेल तर फारच छान, पण जर काही कारणाने व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य नसेल तर केवळ ध्वनिमुद्रण (ऑडिओ) दिलेत तरी चालेल.
उपक्रमाचे इतर नियम
१) कथा, ललित, प्रवासवर्णन, कविता, वैचारिक लेख असे कोणत्याही प्रकारचे साहित्य चालेल. ते
शक्यतो तुमचे स्वत:चे असावे. पण सगळ्याच लेखकांना सादरीकरण जमते असे नाही. आणि ज्यांना
सादरीकरण जमते त्यांना लिहिता येतेच असे नाही. त्यामुळे ध्वनिमुद्रित करण्याअगोदर मायबोलीकर लेखकांची पूर्वपरवानगी घेऊन इतर मायबोलीकरही यात भाग घेऊ शकतील.
अशी परवानगी मूळ लेखकाने , मायबोलीत प्रवेश करून (लॉगीन करून) मायबोलीची संपर्क सुविधा वापरूनच वेबमास्तरांना कळवावी आणि कुठल्या आयडीला ती परवानगी दिली आहे तेही कळवावे. थेट ईमेल किंवा फॉरवर्डेड ईमेल चालणार नाही. फक्त लेखकांनाच ही परवानगी देता यावी म्हणून ही काळजी घेत आहोत.
२) एक आयडी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवू शकेल.
३) रेकॉर्डिंग ची कमाल लांबी ८ ते १० मिनिटे असावी.
४) साहित्य मायबोलीवर / इतरत्र पूर्वप्रकाशित असले तरी चालेल.
५) इतरत्र पूर्वप्रकाशित साहित्य पुन:प्रकाशित करण्यासाठी पूर्वीच्या प्रकाशकाची परवानगी घेणे आवश्यक असेल तर ती घेण्याची जबाबदारी त्या त्या सदस्याची राहील.
६) सर्व सहभागी सदस्यांचे अभिवाचन प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, मात्र वादग्रस्त ठरू शकेल किंवा कायदेशीर समस्या उभ्या करेल असे वाटणारे अभिवाचन संपादित करण्याचे किंवा नाकारण्याचे हक्क मायबोली प्रशासन राखून ठेवत आहे.
७) सर्वात महत्वाचे :- आलेली फाईल कोणत्याही तांत्रिक संस्करणाशिवाय प्रसारित होईल. दृकश्राव्य माध्यमात चुका खूप लवकर आणि मोठ्या दिसतात. त्यामुळे सादरीकरणाचा नीट विचार करून ध्वनि/चित्र मुद्रण करावे.
८) रेकॉर्डिंग ची फाइल MP4 format स्वरूपात दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत mabhadi2022@maayboli.com या email वर पाठवावी
छानच. भाग घ्यायचा प्रयत्न
छानच. भाग घ्यायचा प्रयत्न करणार.
वावे +१
वावे +१
आणि बरीच लवचिकता ठेवल्याने भाग घेणे अधिक सोपे होईल.
भारी स्पर्धा आहे.. मजा येईल
भारी स्पर्धा आहे.. मजा येईल
अरे मस्त माबोकरांचे वाचन
अरे मस्त माबोकरांचे वाचन ऐकायला/ पहायला मिळेल.
छान उपक्रम...!
छान उपक्रम...!
ह्या उपक्रमात भाग नक्की घेणार...!
एन्ट्री पाठवली
एन्ट्री पाठवली
अरे वा. मी बिपिन सांगळे यांची
अरे वा. मी बिपिन सांगळे यांची एक कथा आमच्या गणेशोत्सवात वाचली होती. त्यांनाही माहिती आहेच. ते चालेल काय? कारण हा आवडता प्रांत आहे व आता पुन्हा नवे काही करायला वेळ नाही.
प्रवेशिका पाठवताना आपल्या
प्रवेशिका पाठवताना आपल्या माबो आयडीचा उल्लेख करणे अपेक्षित आहे ना?
माझ्या एका मैत्रिणीने माबो सभासदत्व न घेता प्रवेशिका पाठवली आहे. ती स्वीकारली जाणार नाही ना?
मी तिला सभासदत्व घ्यायला सांगितले आहे.
३ कथा पाठवल्यात :).
३ कथा पाठवल्यात :).
इतकी उत्सुकता आहे. अर्थात संयोजक चमूवरती आहे कोणती/त्या निवडायची आणि मूळात त्यांचा अंतर्भाव करायचा की नाही.
-------------------
mp4 मध्ये कन्व्हर्ट (रुपांतरीत) करता आली नाही याबद्दल क्षमस्व.
------------
नाही निवडली तरी नो हार्ड फीलींग्स. सुधारणा करुन पुढच्या उपक्रमात पाठवेन. असो.
मनस्विता, सभासदत्व घेतल्यावर
मनस्विता, सभासदत्व घेतल्यावर कथा स्वीकारली जाईल.
सामो, ३ कथा पाठवल्याबद्दल धन्यवाद. सध्या तरी कथांच्या निवडीचा काही प्रश्न उद्भवेल असे वाटत नाही. अभिवाचनासाठी काही तांत्रिक प्रश्न सुटण्याकरता आपण थांबलो आहोत.
प्लीज युट्युब चॅनेलची लिंक
प्लीज युट्युब चॅनेलची लिंक किंवा नाव मिळेल का? अभिवाचन बघण्यासाठी...
>>>>>>अभिवाचनासाठी काही
>>>>>>अभिवाचनासाठी काही तांत्रिक प्रश्न सुटण्याकरता आपण थांबलो आहोत.
धन्यवाद
चष्मिश - https://www.youtube
चष्मिश - https://www.youtube.com/maayboli
मंडळी नमस्कार .
मंडळी नमस्कार .
अभिवाचन पाठवले आहे . फाईल अगोदर जाईना . तेव्हा परत पाठवली .
कृपया आपण चेक कराल का ?
आभार
बिपीन
एम पी ४ फॉरमॅट - कथा - हॉरर
नमस्कार संयोजक,
नमस्कार संयोजक,
माझे अभिवाचन आपल्याला मिळाले आहे का? मला ईमेल्स येत नाहीयेत. तेव्हा जर आपण काही सुधारणा कळवली असेल तर ती माझ्यापर्यंत पोचलेली नाही.
जरी मी ४ वाचने पाठवली असली तरी आपण फक्त १-२ टाकली तरी हरकत नाही. नाही टाकलीत तरी पुढच्या वेळेस सुधारणा करण्याचा प्रयत्न असेलच.
बिपीन, बघून सांगतो.
बिपीन, बघून सांगतो.
सामो, आपली अभिवाचने मिळाली आहेत. नियमानुसार त्यातली तीन घेता येतील. त्यावर काम चालू आहे. आज ना उद्या ते होईलच.
धन्यवाद संयोजक. यावेळी माझा
धन्यवाद संयोजक. यावेळी माझा फार उतावळेपणा, पोरकटपणा चाललेला आहे
>>आज ना उद्या ते होईलच. >>
>>आज ना उद्या ते होईलच. >> तुम्हाला आज किंवा उद्या म्हणायचं आहे का?
संयोजक, माझ्या प्रश्नाचे
संयोजक, माझ्या प्रश्नाचे तुमच्याकडून उत्तर आले नाही. पण आता उपक्रम चालू झालाय त्यामुळे तसाही उशीर झालाय म्हणा.
सुनिधी, क्षमस्व! लेखकाची
सुनिधी, क्षमस्व! लेखकाची परवानगी असलेले कोणतेही अभिवाचन चालेलच. तुम्हाला १-२ दिवसांत जमत असल्यास सांगा. अजून अभिवाचनाची कामं संपलेली नाहीत.
संयोजक धन्यवाद. एक किंचीत
संयोजक धन्यवाद. एक किंचीत अडचण आलीये. ईमेलवर कळवली आहे. ईमेल उत्तर देऊ शकाल काय? थँक्स.
सुनिधी, ह्या वरच्या इमेलवर
सुनिधी, ह्या वरच्या इमेलवर पाठवली आहे ना?
हो.
हो.
तुमची इमेल मिळाली आहे, व ते
तुमची इमेल मिळाली आहे, व ते कसं करता येईल ह्यावर विचार चालू आहे.
काही मायबोलीकरांना अजूनही
काही मायबोलीकरांना अजूनही अभिवाचन पाठवायची इच्छा आहे, पण वेळ झालेला नाही. लेखांबाबतीतही असं झालं आहे. त्यामुळे प्रवेशिका पाठवायची मुदत २ मार्च रात्री १२पर्यंत PST अशी एका दिवसाने वाढवण्यात येत आहे. अपूर्ण राहिलेल्या प्रवेशिका ह्या वेळपर्यंत पूर्ण करून पाठवाव्यात.
>>>>>>काही मायबोलीकरांना
>>>>>>काही मायबोलीकरांना अजूनही अभिवाचन पाठवायची इच्छा आहे, पण वेळ झालेला नाही. लेखांबाबतीतही असं झालं आहे. त्यामुळे प्रवेशिका पाठवायची मुदत २ मार्च रात्री १२पर्यंत PST अशी एका दिवसाने वाढवण्यात येत आहे. अपूर्ण राहिलेल्या प्रवेशिका ह्या वेळपर्यंत पूर्ण करून पाठवाव्यात.
मस्त मस्त मस्त!! नवीन शैली, नवीन आवाज, पोत, फेक, लय - खूप मेजवानी आहे.
संयोजक मभादि,
संयोजक मभादि,
मी एक अभिवाचन काल संध्याकाळीच आपल्या ईमेल वर पाठवले आहे.
ते मिळाले आहे का..?
कृपया कळवावे..
नमस्कार संयोजक माझ्या २
नमस्कार संयोजक माझ्या २ धाग्यांत फार देवाचे संदर्भ आलेत. ती अभिवचने पब्लिश नाही केलीत तरी हरकत नाही पण तेवढी कविता कराल का जमलं तर? कविता मस्त आहे (माझ्या मते). धन्यवाद.
अर्थात आग्रह नाही!! एक सुचना फक्त.
मभा दिन समिती ,
मभा दिन समिती ,
नमस्कार .
मी माबो आय डी - सुनिधी -
यांना - लगीनघाई - ही कथा अभिवाचनासाठी परवानगी देत आहे .
कळावे
आभार
मभा दिन समिती ,
मभा दिन समिती ,
नमस्कार .
आपण घेत असलेल्या मेहनतीसाठी आपलं कौतुक अन
आभार
Pages