यमुनेच्या जळावर, दुपारची सूर्यकिरणं पडली आहेत,
त्यांचा प्रकाश कदंबाखाली बसलेल्या शांतमुद्र श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर पडतोय. जणू सूर्य त्या यमुनेमार्फत आपला नमस्कार पोहोचवतोय...किंबहुना, यमुनेमार्फत तो श्रीकृष्णाकडून तेज घेतोय.
कृष्ण डोळे मिटतो, एक दीर्घ श्वास घेतो... बाजूच्या लतावेली हलकेच शहारून आता हा वंशी हातात घेणार म्हणून जणू उत्सुक होतात. यमुनेच्या पाण्याचा आवाज तानपुरा होतो आणि कृष्ण कित्येक जन्मांतरांच्या स्नेहाला स्मरत, पंचमावरून स्थिर असा षड्ज लावतो!
षड्ज! सहा स्वरांना जन्म देणारा.. आपल्यातून सारं स्वरविश्व
निर्माण करणारा... एक निर्माता दुसऱ्या निर्मात्यापासून प्रसवतो... शांतता या षड्जाची जुळी बहीण असल्यासारखी भवतालावर पसरू लागते. हळूहळू यमुनाजळाच्या तरंगांशी बासरीचे गोलाईदार स्वर सलगी करायला लागतात. यमुनेवर येणाऱ्या वाऱ्याच्या लहरी, तिच्यावर पसरणारे हे स्वरब्रह्म अजून लांब पसरवतात.
मिटल्या डोळ्यांपुढे कृष्ण काय पाहत असेल? कुणास ठाऊक... पण त्याने या समाधीतून बाहेर येऊ नये आणि यावंही असं वाटून द्विधा झालेली राधा तिथेच जवळच्या वेलीपाशी स्तब्ध उभी! कृष्ण मला पाहतोय, अशी तिची उगाचच समजूत.
उगाचच नाही खरं तर... पण तरीही उगाचच!
कृष्ण हळूहळू दुपारच्या सूर्यासारख्या तळपणाऱ्या तीव्र निषादाकडे जातोय, तिथेच वारंवार थांबतोय...
तार षड्ज जणू समोर असून भेटत नसल्यासारखा!
त्या निषादाने जीवाची तगमग झालेली राधा न राहवून पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात कृष्ण तार षड्जावर स्थिरावतो!
तिच्या मनातलं ओळखून का? कुणास ठाऊक. पण तो तार षड्ज आसपासच्या शांततेला अजून प्रबळ करतो. जणू आपला श्वासही सगळ्या जगाला ऐकू जाईल की काय असं तिला वाटतं. अशा वेळी ती शांतवणारी बासरीही क्वचित असह्य होते.
पण प्रत्येक गोष्ट एक निश्चित वेळ घेऊनच येत असते आणि ती वेळ संपली की जातही असते, तसाच तो तार षड्जही... थोडा अजून पुढे रिषभ- मध्यमाशी काहीतरी उत्कट हितगुज करून हळूहळू पंचमावरून खाली उतरू लागतो. राधेचा श्वास आता हळूहळू पूर्ववत होतोय... तिला उमगतंय यमुनाजळातील तरंगांचं अस्तित्व... डोळे आपोआप मिटून आत्तापर्यंत वाजत असलेल्या बासरीचं जणू क्षणचित्र डोळ्यांपुढे आणू बघते... एक लख्ख निळं, हिरवं मोरपीस फक्त तिच्या डोळ्यांपुढे येतं! त्या मोरपिसालाही मध्यभागी डोळा आहे... ती त्या डोळ्यात बघते आणि तिला ती स्वतःच दिसते.
इकडे कृष्ण पुन्हा मध्य षड्ज लावून स्थिर होत आलाप आवरता घेत डोळे उघडतो.
समोर, स्वतःलाच भेटलेली राधा त्याला दिसते... कृष्णही स्वतःला भेटतो !
~ चैतन्य दीक्षित
मीच वाजवलेला वृंदावनी सारंग इथे ऐकता येईल.
https://www.bandlab.com/join/sa15zv6
https://youtu.be/ngOC8PwbhDI
तळटीप :- मी स्वतःला कृष्ण समजत नाही, अजिबातच
चैतन्या, खूपच छान झाले आहे .
चैतन्या, खूपच छान झाले आहे . एकद म शांत वाट्ते आहे. बांसुरी माझी फेव् रिट आहे. गेली चाळीस वर्शं पंडित हरिप्र साद, रोनु मुखर्जी, प्रवीण घोड खिंडी व आता चैतन्य दीक्षित. ह्यांचे वादन ऐकले जाते. तुझा तिथे अल्बम आहे काय? त्याची पण लिंक दे. काँसर्ट बनव मी नक्की ऐकेन.
पुढील वादनास हार्दिक शुभेच्छा.
हे ऐका लोक्स. फार शांत व प्रसन्न करणा रे आलाप आहेत.
रात्री फोन वरुन हेडफोन्स
रात्री फोन वरुन हेडफोन्स लावुन ऐकेन.
रागाचे आरोह अवरोह , काय चीज
रागाचे आरोह अवरोह , काय चीज वाजवली आहे ते पण लिही.
जियो
जियो
किती दिवसांनी लिहिलस, अन काय हृदय लिहिलस. फार अलवार!
बासरीही गोडच
अमा, अवल, मनःपूर्वक धन्यवाद
अमा, अवल, मनःपूर्वक धन्यवाद
Bandlab ची लिंक काहींना उघडत नसल्याचे समजले म्हणून youtube ची लिंक पण लेखात समाविष्ट करतोय.
क्या बात है!
क्या बात है!
लेख सुरेख. युट्युबवर बासरी
लेख सुरेख. युट्युबवर बासरी ऐकली. फार सुरेख.
Make full concerts with tabla
Make full concerts with tabla saath and voice narration. Text part is very beautiful. Let your inner Krishna manifest.
छान लिहिले आहे, बासरीवादनही
छान लिहिले आहे, बासरीवादनही सुरेख, शांतवणारे !
खूपच छान! शेवट हा खरा शेवट
खूपच छान! शेवट हा खरा शेवट वाटला नाही. पुढचं रेकॉर्डिंग मिसिंग आहे का ह्यात?
गजानन, मामी, अमा, अस्मिता,
गजानन, मामी, अमा, अस्मिता, हपा..
मनःपूर्वक धन्यवाद
@हपा- नाही एवढंच आहे. तानपुरा लगेच बंद केल्याने ते तसं वाटत असावं. नेक्स्ट टाइम जरा तानपुरा शेवटी थोडा सुरू ठेवेन.
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद अज्ञानि
धन्यवाद अज्ञानि