Submitted by Barcelona on 28 January, 2022 - 20:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
2 कप हेवी क्रीम/हेवी व्हिपिंग क्रीम/क्रीम फ्राईश इ
१/२ कप साखर
5 टेबलस्पून लिंबाचा रस
क्रमवार पाककृती:
एका जाड बूडाच्या भांड्यात क्रीम आणि साखर एकत्र गॅसवर गरम करा. ढवळत रहा. 5 मिनिटे उकळू दे.
भांडे गॅसवरून काढा आणि लिंबाचा रस मिसळा. ऐच्छिक: किसलेली लिंबाची साल किंवा केशर मिसळा.
थंड होऊ द्या. चार ग्लास/ आठ वाट्यात सम प्रमाणात घाला. 2 तास फ्रिजमध्ये थंड करा.
वाढणी/प्रमाण:
८ जणांना पुरते. खादाड असेल तर एकच व्यक्ती संपवू शकते.
अधिक टिपा:
झालं! काही टीपा नाही. सर्वात लहान पाककृती लिहील्याबद्दल सीमंतिनी यांना पुरस्कार देऊ शकता.
"प्रादेशिक" ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये "ब्रिटीश" ऑप्शन नाही. "हे विश्वाचे अंगण, आम्हा दिले आहे आंदण" अशा रूबाबात वावरता येईल असा ड्रॉपडाऊन मेन्यू हवा. सगळे झिम्मात बिझी. कुणाला सांगायचं? इटालियन निवडलं पण ते बरोबर नाही.
माहितीचा स्रोत:
https://food52.com/recipes/3060-lemon-posset आणि https://www.bbcgoodfood.com/recipes/collection/posset-recipes
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मीपण बनवलं आज, व्हॅलेन्टाईन
मीपण बनवलं आज, व्हॅलेन्टाईन डे स्पेशल रेसिपी.
लिंबाचा रस घालताना धाकधूकच वाटत होती.
पण छान झालं... नवऱ्याला आवडली टेस्ट.
श्रीखंडाच्या गोळ्यांची आठवण आली.
फोटो अपलोड नाही होत. नेट स्लो
फोटो अपलोड नाही होत. नेट स्लो आहे.
नवऱ्याच्या वाटची रेसिपी आज
नवऱ्याच्या वाटची रेसिपी आज नेट तुम्हाला बाकीच्यांशी शेअर करू देणार नाही असं दिसतंय
हपा
हपा
झाला बाबा एकदाचा....
झाला बाबा एकदाचा....
अर्रे कसलं गोड!! दोघींचे
अर्रे कसलं गोड!! दोघींचे पॉसेट मस्तच दिसतंय!! हो आभा, मी रेसिपीत लिहील्याप्रमाणे गॅसवरून भांडे काढून मग लिंबू घालते. निवल्यावरही सेट होते ते करून बघते पुढच्या वेळेला. हॅप्पी गॅलेंटाईन्/व्हॅलेंटाईन टू ऑल पॉसेट-इटर्स
हपा
आभा, माऊमैय्या काय सुंदर
आभा, माऊमैय्या काय सुंदर दिसतंय पॉसेट, फळ वगैरे आवडली, बोलही सुरेख !!
फारच छान दिसतंय! करुन बघतो.
फारच छान दिसतंय! करुन बघतो.
हे त्या बारक्या एडिबल द्रोणात ब्लूबेरी/ रासबेरी घालून देतात का? आभाचा फोटो बघुन पूर्वीच्या ऑफिसात असं डिझर्ट मिळायचं ते आठवलं.
Yummy जनहितार्थ
Yummy
जनहितार्थ
अमुल क्रीम मिळते इथे मुंबई
अमुल क्रीम मिळते इथे मुंबई मध्ये... त्याचे बनेल क?
मी अमि, लेबल वाचून बघा. किमान
मी अमि, लेबल वाचून बघा. किमान २०% टोटल फॅट हवे. यापेक्षा जास्त असेल तर जास्त चांगली चव्/टेक्श्चर. कुठल्याही ब्रँडचे क्रीम चालेल.
Pages