Submitted by Barcelona on 28 January, 2022 - 20:41

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
2 कप हेवी क्रीम/हेवी व्हिपिंग क्रीम/क्रीम फ्राईश इ
१/२ कप साखर
5 टेबलस्पून लिंबाचा रस
क्रमवार पाककृती:
एका जाड बूडाच्या भांड्यात क्रीम आणि साखर एकत्र गॅसवर गरम करा. ढवळत रहा. 5 मिनिटे उकळू दे.
भांडे गॅसवरून काढा आणि लिंबाचा रस मिसळा. ऐच्छिक: किसलेली लिंबाची साल किंवा केशर मिसळा.
थंड होऊ द्या. चार ग्लास/ आठ वाट्यात सम प्रमाणात घाला. 2 तास फ्रिजमध्ये थंड करा.
वाढणी/प्रमाण:
८ जणांना पुरते. खादाड असेल तर एकच व्यक्ती संपवू शकते.
अधिक टिपा:
झालं! काही टीपा नाही. सर्वात लहान पाककृती लिहील्याबद्दल सीमंतिनी यांना पुरस्कार देऊ शकता.
"प्रादेशिक" ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये "ब्रिटीश" ऑप्शन नाही. "हे विश्वाचे अंगण, आम्हा दिले आहे आंदण" अशा रूबाबात वावरता येईल असा ड्रॉपडाऊन मेन्यू हवा. सगळे झिम्मात बिझी. कुणाला सांगायचं? इटालियन निवडलं पण ते बरोबर नाही.
माहितीचा स्रोत:
https://food52.com/recipes/3060-lemon-posset आणि https://www.bbcgoodfood.com/recipes/collection/posset-recipes
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(इथे प्रतिसादात फोटो होता पण आता फोटो मुख्य चित्र म्हणून द्यायला जमलं. पण अख्ख्या सोसायटीला पुरेल इतका मोठा ग्लास झालाय... फक्त ४ औंसाचा ग्लास आहे.)
लई भारी...
लई भारी...
टीप- हा प्रतिसाद पदार्थासाठी नसून पा कृ ज्या रूबाबात (attitude) लिहिलीय त्याबद्दल आहे......
धनवंती , +111
धनवंती , +111
रच्याकने , सि , फोटो मस्त आलाय. तो मुख्य चित्र म्हणून डकव ना म्हणजे धागा उघडायच्या आधी ही अनुक्रमाणिके मध्ये ही दिसेल
सोप्पी रेसिपि आहे.. मी सोडून
सोप्पी रेसिपि आहे.. मी सोडून घरी बाकी सगळेच गोड खाऊ आहेत.. करून बघेन .. लाईम पाय सारखी टेस्ट येत असावी
ले मॅन म्हणजे कोणीही करू शकतं
ले मॅन म्हणजे कोणीही करू शकतं. मस्त सी , तुझी स्टाईल पण लय भारी. करून बघण्यात येईल.
ओ तै,
ओ तै,
८ जणांना कसं पुरेल. चमचा-चमचा भर कां ?
करुन बघेन......थोडा खोकला कमी झाला की.
"सलपा"वती श्री श्री श्री २०१६ सीमंतिनी
मला आवडेल.छान दिसतेय.
मला आवडेल.छान दिसतेय.
लिंबाचे पदार्थ आवडतात. करून बघेन.
छान वाटते..
छान वाटते..
>>>हेवी क्रीम/हेवी व्हिपिंग
>>>हेवी क्रीम/हेवी व्हिपिंग क्रीम/क्रीम फ्राईश>>>
बाळबोध प्रश्न..... म्हणजे काय?
घरच्या दूधातूनच बनवायचे का?
ते एन आर आय पदार्थ आहेत
.
दुधात/साईत लिंबू पिलल्यावर ते
दुधात/साईत लिंबू पिळल्यावर ते नासणार नाही का असा एक प्रश्न मनात आला. कदाचित परदेशी दूधं/साया नासत नसावीत.
दिसतेय चांगलं.
दिसतेय चांगलं.
मलाही डीजेसारख वाटले. पनीर सारखी चव लागते का?
मडमिणताई, रेसिपी छान दिसतेय.
मडमिणताई, रेसिपी छान दिसतेय.
व्हिटॅमिन c ने भरपूर..
व्हिटॅमिन c ने भरपूर.. इम्म्युनिटी बूस्टर ..व्वा...
लेमन कि लाईम हे कन्फयुजन दूर करा...
मस्तय पाककृती, कि लाईम ग्रीक
मस्तय पाककृती, कि लाईम ग्रीक योगर्ट आवडतं , हेही आवडेल असं वाटतंय. (लेमन झेस्टच असेल च्रप्स , लाईमची साल कडवट लागते. वरवर किसायचे पांढरा भाग येऊ द्यायचा नाही. )
खूप सोप्पी पाकृ, धन्यवाद!
खूप सोप्पी पाकृ, धन्यवाद!
दूध फाटल्यावर त्यातले पाणी काढून त्यात साखर घालून खायला आवडते, म्हणजे हेही आवडेलच.
- डीजे, चांगला प्रश्न. मी ही
- डीजे, चांगला प्रश्न. मी ही पहिल्यांदा करण्याअगोदर अगदी विचारात पडले होते. पण म्हणे दूधात फॅट्स कमी असतात. त्याने लिंबू घातल्यावर दूध नासते. हेवी क्रीममध्ये स्निग्धांश जास्त असल्याने ते दह्यासारखं किंवा कस्टर्डसारखं 'सेट' होतं, नासत नाही. क्रीम नासायला जास्त लिंबू लागेल. भारतातही हेवी क्रीम अमूल किंवा अन्य कंपन्यांचे मिळते, त्याने बरोबर जमेल.
- रेव्यूसर, दूध नको. अनेकवेळा घरात सायीचं दही लावायला साय्/मलई सटात साठवली जाते. त्या सायीचे जमेल. नाहीतर अमूलचे हेवी क्रीम मिळते.
- च्रप्स, इथे लेमन उर्फ पिवळ्या सालीचे गोडसर लिंबू वापरून केले आहे. पॉसेट लाईम उर्फ इडलिंबू किंवा हिरव्या सालीच्या आंबट लिंबानेही जमते. शँपेन, रॉसबेरी, पॅशनफ्रूट (कृष्णफळ) इ अम्ल रसाचे पदार्थ वापरूनही करतात. तसे इतर प्रकार करायचे असल्यास बीबीसीच्या लिंक मध्ये रेसिपी आहेत. अम्लाचे प्रमाण बदलावे लागते.
-जाई, चव पनीर सारखी नाही. लिंबाचे प्रमाण आणि केशर घातल्याने श्रीखंडाच्या आसपास चव लागते.
सर्वांना धन्यवाद!!!!
जे बॉ - २ कप फ्रेश क्रीम =
जे बॉ - २ कप फ्रेश क्रीम = ४७५ मि.ली आणि अर्धा कप साखर =११५ ग्रॅम. याचे जवळ जवळ ५९० मिली इतके पॉसेट तयार होते. ८ माणसांना प्रत्येकी = ७३ ग्रॅम आसपास होते. एक स्कूप साधारण ६० मिली असतो. ८ जणांना चमचा चमचा नाही तर स्कूप स्कूपभर मिळेल. कृपया हरी चटणी और लाल चटणी का फर्क समझिए...
>"प्रादेशिक" ड्रॉप डाऊन
>"प्रादेशिक" ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये "ब्रिटीश" ऑप्शन नाही.
घ्या दिला ! तुम्ही पाककृती द्या आम्ही पर्याय देतो.
>"हे विश्वाचे अंगण, आम्हा दिले आहे आंदण" अशा रूबाबात वावरता येईल असा ड्रॉपडाऊन मेन्यू हवा.
थोडे फार विश्व आहे : पोलीश , मेक्सिकन , चायनीज, इंडियन, मेडिटरेनियन, फ्रेंच, फ्यूजन, थाई,आफ्रिकन,अमेरिकन हे प्रकार अगोदरच आहेत. काय करणार जगातल्या प्रत्येक देशाची काही वेगळी खाद्य संस्कृती नाही आहे.
थँक्यू. ओके, देते अजून
थँक्यू. ओके, देते अजून ब्रिटीश व इतर पाककृती.
(आहे विश्व आहे बरेचसे. त्यातल्याही पाककृती करेन तशा देते.)
सो नाइस ऑफ वेमा. ह्यांना एक
सो नाइस ऑफ वेमा. ह्यांना एक कप द्याहो.
मी माझ्या माबो रोमा मोड मध्ये वाचलेली रेस्पी मग श्रीखंड ऑर्डर केले काल. दोन चमचे खाउच शकतो.
माझ्या शंकेच निरसन
माझ्या शंकेच निरसन केल्याबद्दल धन्यवाद सीमंतिनीजी..!
मस्त वाटतेय पाकृ! लिंबू आणि
मस्त वाटतेय पाकृ! लिंबू आणि केशराचा एकत्र स्वाद चांगला लागेल असे वाटते.
व्वा! कप नाही तरी ऑप्शन
व्वा! कप नाही तरी ऑप्शन मिळाला.
कृपया हरी चटणी और लाल चटणी का
कृपया हरी चटणी और लाल चटणी का फर्क समझिए... Lol
भारीच शंकानिरसन केल्याबद्द्ल धन्यवाद.
(थोडी हरी चटणी देना भैय्या गृपचा आजन्म मेंबर....लालवालीमें टेस्ट नी आ रहा !)
मस्त दिसतेय पाकृ
मस्त दिसतेय पाकृ
अवांतर.... मी तुम्हाला भला/ली
अवांतर.... मी तुम्हाला भला/ली मोठा/ठी विपु केली. पण ती माझ्याच अकाउंटला सांडली. मग परत तुम्हाला पाठवली. मिळाली की नाही यासाठी हा प्रपंच.
(कधी कधी नां मी जास्त टेक्नोसॅव्ही होतो मग न्युटनच्या मांजरासाठी दोन दोन होल होतात.)
विपू मिळाली, वाचली. आता
सर्वांना थँक्यू, जि, लिंबू केशर नसेल आवडत तर इतर फ्लेवर्स बीबीसीच्या लिंक मध्ये आहेत. कराल तेवढं थोडं आहे.
वेमांचं जेस्चर आवडलं. पाकृ
वेमांचं जेस्चर आवडलं. पाकृ लिहिण्याची शैलीही आवडली.
सीमंतिनी, ही रेसिपी आणि नेटवर
सीमंतिनी, ही रेसिपी आणि नेटवर थोडं वाचुन रेसिपी बनविली. एक नम्बर झाली आहे. सोप्प्या रेसिपीसाठी खुप खुप धन्यवाद!
मी एकच बदल केला, तो म्हणजे, क्रिम व साखर मंद गॅसवर छान गरम करुन घेतले आणि दोन मिनिटे निवल्यावर मग त्यात लिम्बुरस आणि राईंड घातले. गॅसवर असताना लिम्बुरस घालयची भिती वाटत होती.
Pages