गेले दोनेक दिवस आमच्या मुंबईत अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.
या रविवारी सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे ऊठून सहपरीवार सहकुटुंब मॉर्निंग वॉकला गेलो. कपडे तेच आपले हलकेफुलके आणि स्टायलिश. कारण स्वेटर वा तत्सम जाडजूड कपडे मुंबईत कसली डोंबलाची थंडी म्हणत केव्हाच लाईफस्टाईलमधून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यावर जेव्हा गारठलो तेव्हा मॉर्निंग वॉक एका जागीच दाटीवाटीने बसून साजरा होऊ लागला. बागेत गेल्यावर मास्क काढावा हा शिरस्ता पाळत सर्वांनी तो काढला, पण खिश्यात न टाकता कानावर चढवला. आणि त्या जागी हात खिश्यात टाकले. पण तरीही नारियलपाणीवाला दिसताच सवयीने ते प्राशन करायला खिश्यातले हात बाहेर आले. पोरं सोबत असल्याने घरी परतताना आईसक्रीमचाही एक राऊंड झाला. त्यानंतर मग व्हायचे तेच झाले...
सकाळी कानातून चोरमार्गाने शिरलेली थंडी रात्र होता होता नाकातून बाहेर पडू लागली. म्हणून सोमवारी कसलाही आगाऊपणा न करता खास थंडीचा लुत्फ उचलायला म्हणून सुट्टी टाकली. पण सकाळचा गरमागरम पोहे मिसळीचा नाश्ता झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न पडला. पावसाळ्यात चहा - कांदाभजी - चहा - समोसे - चहा - बटाटाभजी - चहा थालीपीठ - चहा यांव आणि त्यांव असे राऊंड घेता येतात. पण थंडीचे सुट्टी टाकून करतात काय हा प्रश्नच पडला. मग दुपारी मस्तपैकी दारे खिडक्या पडदे फॅन लाईट वगैरे सारे काही बंद करून मस्त चादर ओढून ताणून दिली.
थोडावेळ छान झोप लागली. पण त्यानंतर चादरीतही थंडी शिरू लागली. मग पाय जवळ ओढून घेतले. चादर गच्च लपेटून घेतली. पण तरीही जेव्हा असह्य झाले तेव्हा ताडकन ऊठलो आणि पाहतो तर काय... पोराने सवयीने एसी चालू करून ठेवलेला. आता त्याला बिचार्यालाही थंडी हा सीजन नवीनच. त्याचा तरी काय दोष. तरीही आलेला राग शांत करायला चार वर्षाच्या पोराला जितके बदडणे अलाऊड असते तितके त्याला बुकलून काढले. त्याने तो गरम झाला. पण माझी थंडी मात्र रात्र होत आली तरी जायचे नाव घेत नव्हती. उलट रात्री पुन्हा गारठू लागलो तसे मग वेळ घालवायला भूतकाळातल्या थंडीच्याच आठवणी काढून गरम होऊया म्हटले. यही मौका है, यही दस्तूर है, और बंबई की थंडी है भाई.. क्या पता, कल हो ना हो
तर थंडी म्हटले की मला सर्वात पहिले माझगावच्या आमच्या चाळीतील दादरावर पेटवली जाणारी शेकोटी आठवते. आहाहा, छोटीशी होळीच म्हणा ना.. ते कॅम्पफायर वगैरे ईंग्लिश शब्द मला फार उशीरा कळले. जेव्हा कळले तेव्हाही डोक्यात हेच पहिला आले, अरे ही तर आमची शेकोटी
म्हणजे नारळाच्या सुक्या करवंट्या, ज्या तेव्हा चाळीतील दर दुसर्या घरात सापडायच्या. अगदी आमच्या दारातही एक ड्रम भरून असायच्या. सोबत जमेल तसा लाकूडफाटा, जसे की आब्याच्या पेट्यांची फळकुटे वगैरे,. एक मोठठाला परातीईतका तवा, त्यात हा सारा लाकडी ऐवज जमा करायचा. आणि रॉकेल टाकून पेटवून द्यायचा. तेव्हा स्टोव्हच्या जमान्यात रॉकेलही प्रत्येक घरात सापडायचे. फार नाही, कपभर पुरायचे. दररोज हा कप आळीपाळीने एकेका घरातून यायचा. जेवणखान झाले की साधारण दहा-साडेदहाला शेकोटी पेटायची ते रात्री एकदिडलाच विझायची. तोपर्यंत आमच्यासारखे रातकिडे अखेरपर्यंत तिला सोबत द्यायचे. कधी मूड आला तर गाणीही व्हायची. पण खरी धम्माल शेकोटीवरील गप्पांची. आणि चाळीसारख्या जागी गप्पांच्या विषयाला कमी कधीच नसायची.
याच थंडीच्या सीजनमध्ये मग नाताळही यायचा. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत सांताक्लोजला जाळून करायची पद्धत होती आमच्यात. पाशवी प्रथाच म्हणा ना. अगदी साग्रसंगीत फटाक्यांसह हा जाळण्याचा कार्यक्रम पार पडायचा. ती सुद्धा एक शेकोटीच म्हणू शकतो. पण जाळण्याआधी ती बुजगावणी ख्रिसमसपासून बिल्डींगच्या कॉमन गॅलर्यांना लटकावलेली असायची. थोडीथोडकी नाही तर तब्बल दहाबारा बुजगावणी बनायची. ते बनवायला लागणारे सुके गवत तेव्हा भायखळा भाजीमार्केटमध्ये मुबलक आणि फुकटात मिळायचे. रस्त्यात पडलेले असायचे. गोणी गोणी भरून आणायचो. बरेचदा शेकोटीत त्यातलेच गवत जाळले जायचे. असा हा शेकोटी, नाताळ, थंडीचा सण जवळपास किमान महिनाभर तरी साजरा व्हायचा. आजच्या मुंबईत राहणार्या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघडच.
मग मोठे होता होता ती थंडी हरवलीच. नाही म्हणायला कधीतरी जगाच्या पाठीवर बर्फ पडला तर वाहत्या वार्यांसोबत एखादी थंडीची लाट मुंबईत अवतरते. तेवढ्या काळात आम्ही मुंबईकर रजनीकांतचा फ्रिज उघडा राहिलाय वगैरे पांचट जोक मारून घेतो. झाल्यास पुण्याच्या गुलाबी थंडीचीही खिल्ली उडवायचा प्रोग्राम पार पडतो. पण बालपणीच्या थंडीच्या आता आठवणीच उरल्या आहेत. तुमच्याही असतील तर उगाळा याच धाग्यावर. तेवढेच त्या आठवणींच्या शेकोटीची ऊब..
- ऋन्मेष
सॉरी चे स्पेलिंग एस डबल ओ आर
सॉरी चे स्पेलिंग एस डबल ओ आर इ
आय-माय स्वारी ( एस डबल ओ आर इ) बर कां.
पण तुम्ही असं का टॉल्कुन रायले माझ्याशी......हा किती पार न्यायचाय ?????????
कसे रे तुमचे सगळ्यांचे
कसे रे तुमचे सगळ्यांचे इंग्रजी... ... सॉरी च स्पेलिंग एस डबल ओ डबल आर आय डबल वाय इ आहे...
मरणाची थंडी पडलीय मुंबईत
मरणाची थंडी पडलीय मुंबईत
सरणावर जाऊन झोपावेसे वाटतेय
तेवढीच ऊब
१६ डिग्री तापमान
सर आता परत डोंगर पेटवू नका
सर आता परत डोंगर पेटवू नका
आधीच मुंबईत डोंगर कमी उरलेत
तुमची हौस होते, डोंगराचा जीव जातो
या वर्षी न्यु यॉर्क, न्यु
या वर्षी न्यु यॉर्क, न्यु जर्सीत स्नो नाही. ऊन आहे, गरम आहे. हे सर्व विचित्र आहे.
या उलट मुंबईत १६? बाप रे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे टॉप्सी टर्व्ही (उलट-पुलट) झाले आहे का?
वरती या. आणि मग बघा मज्जा!
वरती या. आणि मग बघा मज्जा!
गेला जवळ जवळ सगळा आठवडा फील्स लाईक -४० आहे.
वरती काय? आमच्याकडे खाली या.
वरती काय? आमच्याकडे खाली या..परवाच इतका छान स्नो झालाय.. सगळ्या बायकांनी साडी वगैरे नेसून बर्फात फोटो सेशन करत बॅालिवूडची हौस भागवली
बाप रे कॅनडात ४०?
बाप रे कॅनडात ४०?
तुम्ही अमेरीकावाले तयार असतात
तुम्ही अमेरीकावाले तयार असतात ओ थंडीशी लढायला .. (एलियनशी लढायला तयार असतात तिथे थंडी काय चीज आहे)
पण ईथे अशी परीस्थिती आहे की आयत्यावेळी शेकोटी पेटवायची म्हटले तरी कुर्हाड हातात घेऊन जंगलात जा आणि झाडे तोडा..
आजच संध्याकाळी मुंबईहून वडिलांचा फोन आला की स्वेटर कुठेय? आई म्हणाली की तिसर्या घरात आहे. मग दोघांचे भांडण सुरू झाले. त्यातूनच काही मिळाली ती ऊब.. त्यातच समाधान..
हो. थंडीची तयारी हे सगळ्यात
हो. थंडीची तयारी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे -४० चं काही वाटत नाही, पण पुण्यात ७-८ झालं की कुडकुडायला होतं आणि ठाण्यात २० लाच हुडहुडी भरते.
>>>>एलियनशी लढायला तयार असतात
>>>>एलियनशी लढायला तयार असतात तिथे थंडी काय चीज आहे
>>>>>आयत्यावेळी शेकोटी पेटवायची म्हटले तरी कुर्हाड हातात घेऊन जंगलात जा आणि झाडे तोडा..
हाहाहा
स्वेटर कुठेय? आई म्हणाली की
स्वेटर कुठेय? आई म्हणाली की तिसर्या घरात आहे. >>> सातव्या, दहाव्या आणि क्ष व्या घरात काय आहे हे कसे लक्षात ठेवता सर ?
मध्यमवर्गीयात कसली आलीत ओ दहा
मध्यमवर्गीयात कसली आलीत ओ दहा घरे
तीनच आहेत सध्या. आम्ही राहतो तिथे नाही. वडील राहतात तिथे नाही. मग उरले तिसरे घर. त्यात लक्षात काय ठेवायचे
धागे पेटत नाहीत, नवीन येत
धागे पेटत नाहीत, नवीन येत नाहीत. आहेत त्या धाग्यांना थंडीत स्वेटर घालणे गरजेचे आहे.
लोक खुशाल क्वारंटाईन होऊन माबोकडे दुर्लक्ष करतात. ओटीटीवर सिनेमे, शिरेली बघतात. अशांवर कारवाई व्हायला हवी.
यंदा घरातलं तूप पार गोठलं आहे
यंदा घरातलं तूप पार गोठलं आहे. नीरांजनात घालताना छोट्या चमच्याने फोडून छोटे तुकडे करून घालावं लागतंय.
लोकांना इथं निरंजन लावताना
लोकांना इथं निरंजन लावताना कष्ट होत आहेत
सरांनी अख्खा डोंगर पेटवला तेव्हा काय कष्ट उपसले असतील याचा विचारही करवत नाही
आणि त्यातून विनम्र इतके की त्याबद्दल बोलतही नाहीत
असा जमिनीवर पाय असलेले थोर व्यक्तिमत्त्व मायबोली वर आहे हे आपले भाग्यच आहे
तीनच आहेत सध्या>>> तीनच
तीनच आहेत सध्या>>> तीनच ओह्ह नो हाऊ मिडलक्लास (माया साराभाई स्टाईल)
थंड हवेचा एक फायदा असतो मस्त
थंड हवेचा एक फायदा असतो मस्त मस्त शॉल्स घेउन गाणी ऐकत सोफ्यावरती रेलून बसता येतं. शॉल्स फार आवडतात. मला नातवंड झाली ना की मी नेहमी शाल घेणार. त्यांना त्यांची आज्जी नेहमी शालीमधली आठवली पाहीजे
त्याकरता छान छान शालींचे कलेक्शन करणारे.
----------------------------
शालिंचे आकर्षणच आहे. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला नवर्याला, शालच मागीतली होती. केशरी function at() { [native code] }ओनात सुंदर नेपाळी शाल आहे. function at() { [native code] }इशय सुंदर दिसते. वेगळच वुल आहे.
.
पश्मिना शाली खूप सुंदर असतात.
पश्मिना शाली खूप सुंदर असतात. लडाखच्या डिस्कीट मधे लोकल वूलच्या शाली मिळतात त्या जास्त गरम असतात.
ओह पद्मिनी शाली? अरे वा शोधते
ओह पद्मिनी शाली? अरे वा शोधते. एक रॉयल ब्लु शाल इज अ मस्ट. मे बी चंदेरी बुट्ट्यांची.
आणि मग नातीच्या लग्नाला ती शाल मी तिला घालणार
अजुन मुलगीच लहान आहे. कशातच काही नाहीये
छांछ छागोळे भैंस भागोळे
घरमा धमाधम.
सामो, या शालीचा फोटो पाहून
सामो, या शालीचा फोटो पाहून हात लावून पहावासा वाटतो. कुठे मिळेल ते सांगण्याचे करावेच आता.
या प्रकारच्या डिझाईन्स
या प्रकारच्या डिझाईन्स असलेल्या सुंदर शाली डिस्कीट मधे मिळतात. मी वीसेक घेतलेल्या. ती बॅग प्रवासात चोरीला गेली होती.
https://pashtush.in/products/pashtush-mens-shawl-28?currency=INR&variant...
करेक्ट शामा तिला अशी मस्त
करेक्ट शामा तिला अशी मस्त तूसे आहेत. डुलुथ, मिनेसोटा मध्ये एक दुकान आहे - ग्लोबल इम्पोर्टस.
अरेरे बॅग चोरीला गेली???
अरेरे बॅग चोरीला गेली???
उसगावात घेतल्या का ?
उसगावात घेतल्या का ?
साठ डॉल्र्स्ची होती. ५५ ला
साठ डॉल्र्स्ची होती. ५५ ला दिली कारण ती माझी मैत्रीण होती.
एक याच प्रकारात गर्द जांभळी आई ग्गा!!! ख तरनाक होती.
होय डुलुथ, मिनेसोटा.
होय डुलुथ, मिनेसोटा.
येताना सामान जास्त असल्याने
येताना सामान जास्त असल्याने ट्रेनने आलो. ते पण सेंट्रल लाईनने. इटारसीला चोर्या होतात हे माहिती असून झोप लागली. नेमकीच बॅग पहाटे चोरीला गेली.
आई ग्ग!!! भयानक.
आई ग्ग!!! भयानक.
जीव अडकलेला असतो आप ल्या आवडीच्या वस्तूत. मग पैसे गेले असते तर इतकं नसतं वाटलं. माणूस मनाची समजूत घालतो - पैसे गेले ते येतील परत.
पण आवडलेली चीज
ही हौस आईकडुन अलेली आहे.
ही हौस आईकडुन अलेली आहे. आम्ही दिल्लीला एकदाच गेलो. आईने इतके सुंदर वेगवेग ळ्या शिवणीचे स्वेटर (स्लीव्हलेस, विथ स्लीव्हस) वगैरे घेतले. शनिवारी सकाळच्या शाळेला जाताना मी दर आठवड्याला नवा रंगीबेरंगी, नक्षीचा स्वेटर घालून जायचे.
ही जी हौस असते , तिला मोल नसते.
Pages