चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यू ट्यूब वर 'सावट' हा मराठी चित्रपट बघितला. सस्पेन्स थ्रिलर आहे एकदम मस्त. ईतका छान सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपट पहिल्यांदाच बघितला.

The Conjuring: The Devil Made Me Do It पाहिला प्राईमवर. ओके ओके वाटला.

रिपब्लिक -तेलुगू पाहिला झीफाईव्ह वर.सोशल पॉलिटिकल आहे.ठिक आहे.

पुष्पा हिंदीत कुठं आहे?

Submitted by मेधावि on 8 January, 2022 - 12:47
>>>>>>>>>
प्राईम वर 14 जानेवारी ला हिंदीत येणार आहे .

प्राईम वर 14 जानेवारी ला हिंदीत येणार आहे .
>>>>>
श्रेयस तळपदेच्या आवाजातला का.?. भारी वाटतो त्याचाही आवाज. आताच तेलगूत बघायचा प्रयत्न केला.. पण भाषेचा त्रास करून घेण्यापेक्षा श्रेयससाठी थांबूया म्हटले

सुडोकूच्या व्यसनामुळे चित्रपट बघताना त्यात लक्ष राहत नाही. एखादा महत्वाचा भाग मिसला तर मग पुढे समजून घेताना गडबड होते. त्यात सबटायटल वाले बघणे म्हणजे सहा डोळे असायला पाहीजेत. Lol तरीही एखादा वेगळा मूव्ही असला तर मात्र सुडोकूवर मात करून पाहिला जातो. पुष्पा मसाला वाटतोय एकंदर, पास.

Don't look up भारीच आहे. खरे तर त्यावर वेगळा धागा हवा. त्यात असलेले काही इनसाईड जोक्स अमेरिके बाहेर असलेल्या लोकांना लगेच कळणार नाहीत. तो सिनेमा पाहून १६-१७ वर्षाच्या मुलांची काय प्रतिक्रिया आली हेही पहणे मजेदार असेल.

मल्याळम: कुरूप.... द(दु)लकर सलमान.. catch me if you can सारखा आहे. दुसरा... Take Off... इराण- इराक युद्धात अडकलेल्या नर्स love story.

तामिळ: 96.... love Story

कोयते आणि कुऱ्हाडी घेऊन भ्रष्ट राजकारण , पोलीस, गुंड ह्यांची चिरफाड करणार्‍यां सिनेमापेक्षा चांगले वाटले.

पुष्पा पुढे थोडासा आणखी पाहिला. पुढे जरा पकड घेतोय. तरी इतका बझ काय आहे ते अजून झेपले नाही. जंगलातील सीन्स चे वाइड अँगल्स आहेत त्यातला निसर्ग जबरी आहे. आता टिपिकल टॉलीवूड वाले बटबटीत व्हिलन्स वगैरे आले आहेत. रश्मि़का मंदाना बरोबरचा रोमॅण्टिक ट्रॅक आहे त्यातली बेसिक थीम - पैसे देउन बघायला लावणे, किस ई - भिकार आहे. तेथे मजा आणतात ते सहकलाकार व त्यांच्या अस्सल हैदराबादी वाटणार्‍या साइड कॉमेन्ट्स. पुष्पा म्हणजे कोण हे रश्मिकाला सांगताना तिच्या मैत्रिणी "तो त्या एका सावळ्या पोराबरोबर असतो तो" असे काहीतरी सांगतात (आता हे मूळ तेलुगू चे इंग्रजी सबटायटल व त्याचे माझे मराठी भाषांतर आहे, तेव्हा चुभूद्याघ्या), तेव्हा तोपर्यंत कणीस खात असलेला तो याचा साइडकिक "त्याचे नाव केशव आहे" असे एकदम ठसक्यात त्यांना सांगतो. असले प्रकार मजेदार आहेत.

रश्मिका "नॅशनल क्रश ऑफ इण्डिया" आहे ही नवीन माहिती कळाली. संदर्भ - अ‍ॅमेझॉन प्राइमवरची कलाकारांबद्दलची माहिती. ही एखाद्या फॅनबॉयने भरल्यासारखी वाटली.

पुष्पा वन टाइम वॉच आहे. दाक्षिणात्य अतिरंजीत पणा ठासून भरलेला आहे. अल्लूच्या सिंपल वाटणार्‍या डान्स स्टेप आणि त्याचा ओवरॉल स्वॅग मस्त आहे. मी हिंदीत पाहिला आणि श्रेयस च्या आवाजात मस्त डबिंग झालेल आहे. आणि ती नायिका कदाचित नॅशनल क्रश असेल पण फक्त डोक्यावर पडलेल्या लोकान्ची. चित्रपटात खूप मंद वाटते ती.

@विकु काढा की धागा. सगळेच संदर्भ नाही समजले कारण. ते समजले तर अजून मजा येईल.
ते 'I want to die peacefully ... ' वालं वाक्य वाचून भयंकर हसायला आलं.

आताच पाहिला. मला आवडला चित्रपट. वेगळा आहे. हटके आहे. वेगवान आहे. तुम्हाला बोअर व्हायला वेळ देत नाही. सायन्स वायन्स मानसशास्त्र मला फारसे कळत नाही म्हणून स्क्रिप्टचे दोष शोधत न बसता एंजॉय करता आला. कारण कलाकारांची अदाकारी मस्तच. धनुषचा प्रश्नच नाही. सारा अली खान देखील केदारनाथमध्ये जितकी आवडली होती तितकीच ईथेही आवडली. हिरोचा मित्र ज्याचा मोठा रोल आहे तो ही छान. आणि अक्षयकुमारही कुठे जास्तीचा आव न आणल्याने सुसह्य. बघितल्यावर वेळ वसूल सिनेमा वाटला. मात्र कोणाला बघा म्हणून सुचवणार नाही. कोणाला त्यातली केस पटली नाही तर वा ते पटणे त्याच्यासाठी गरजेचे असेल आणि त्यामुळे नाही आवडला तर उगाच माझ्या नावाने बोंबलायला नको Happy

काल अतरंगी रे बघितला.. वेगळी स्टोरी म्हणून आवडला पण डिरेक्शन बऱयाच ठिकाणी गंडलंय. सुरूवातीचा अर्धा तास रांझना २ बघतोय की काय असं वाटतं (रांझना आवडला होता मला) .. त्याच वेळेस नक्की काय चाल्लय हे कळत नाही.. मग एक ट्विस्ट येतो.. बाकी तुम्ही बघा आणि इथे लिहा.
Submitted by म्हाळसा on 4 January, 2022 - 13:58

मलाही वेगळी स्टोरी म्हणून आवडला.. पण तो ट्विस्ट काहीतरी करून शेवटी टाकायला हवा होता.

उप्स नाव नाही टाकले का.. फेसबूक पोस्ट ईथे कॉपीपेस्ट केली त्यामुळे तसे झाले..
म्हाळसा बरोबर.. अतरंगी रे

अहा गॉट इट Happy
धन्यवाद म्हाळसा व ऋ.

पण तो ट्विस्ट काहीतरी करून शेवटी टाकायला हवा होता.
>>>>
अश्या केस.अध्ये कोणी स्पॉईलर टाकताच चित्रपट बघायची मजाच गेली असती..
बाकी रांजना मी पाहिला नाही..
बघायला हवा आता.. धनुष चांगला कलाकार आहे हे आज समजले.. त्याचा हा पहिलाच पिक्चर पाहिला

आतरण्गी रे मध्ये क्यानडाकुमार सज्जादभाई आहेत व ते एका हिण्दुस्त्रीशी विवाह करतात.
अजुन सण्स्कृती रक्शक उठ्ले नाहीत.

लक्ष्मी मध्येही ते आसिफ होते, आता सज्जादभाई

झाला पूर्ण पाहून पुष्पा द राइज. जनरल टॉलीवूड पिक्चर्स असतात तसा आहे. फहाद फाजिल सुद्धा काय भारी बिरी वाटला नाही. सुरूवातीचा साधा पुष्पा नंतर एकदम गँगस्टर होतो तेव्हाच्या स्वभावातील बदल नोटिस केला. बाकी काही फार नाही.

लाल चंदनाच्या (रक्तचंदन?) जंगलातून दुधाचे टँकर भरभरून जाताना, ते ही पूर्वीचा चंदन स्मगलर ते घेउन जाताना बरेच दिवस कसलाही संशय न येणारे पोलिस महान आहेत.

गाणी ऑलरेडी फेमस झाली आहेत का माहीत नाही. मोस्टली सगळी गाणी स्क्रीनसमोर केलेली नृत्ये - स्क्रीनकडे फेस करून- टाइपची आहेत.

प्राईम वर अभय देओल दिसला म्हणून उत्सुकतेने velle बघायला घेतला
अररर त्यात लीड रोल ला कोण तर करण देओल
सन्नी पाजी सुपुत्र
आणि काय तो अभिनय आणि डान्स
अहहहा डोळ्यांचे पारणेच फिटले
Happy Happy

संपूर्ण देओल घराण्याचे अभय देओल ने नाव खराब केलं आहे अभिनय करून Happy

संपूर्ण देओल घराण्याचे अभय देओल ने नाव खराब केलं आहे अभिनय करून>> तुम्हाला करण देओल म्हणायचे आहे का? कारण अभय देवोल हा एकमेव उत्तम अभिनेता आहे त्या घराण्यात, धरम पाजि सुद्धा उत्तम लुक आणी थोडा फारच अभिनय यावर चालुन गेले.

Pages